* कार्पेटवर पडलेल्या डागावर क्लब सोडा घाला. सोडय़ातील गॅसच्या बुडबुडय़ांबरोबर डाग वर येईल. तो फेस पुसून कार्पेटवर थंड पाणी ओतावे मग सुक्या कपडय़ाने कार्पेट कोरडे करावे.
* नवीन टुथब्रश वापरण्यापूर्वी मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा. ब्रश खूप दिवस चालतो.
* कपडय़ावर च्युइंगगम लागलेल्या ठिकाणच्या आसपास नेलपेंट रिमूव्हर टाकावे आणि थोडा वेळ तसेच ठेवावे. नंतर च्युइंगगम अलगद काढून घेऊन, तो भाग ब्रशने धुवून घ्यावा.
* गडद रंगाच्या लाकडी फर्निचरवर ओरखडे दिसत असल्यास त्यावर २० मिनिटे कोरडी कॉफी पसरवून ठेवा. नंतर कोरडय़ा कपडय़ाने कॉफी हलक्या हाताने पुसून घ्या. ओरखडे दिसणार नाहीत. फिक्या कलरच्या फर्निचरसाठी आक्रोडची पूड वापरावी.
* उकळत्या चहात संत्र्याची साल टाकल्यास चहाला वेगळीच  चव येते.
* हिरव्या मिरच्या मोठय़ा प्रमाणात कापावयाच्या असल्यास हातांना तेल चोळून नंतर मिरच्या कापाव्या. हाताची आग होत नाही.
* आक्रोडमधील गर तुकडे न होता संपूर्ण निघून येण्यासाठी आक्रोडावर उकळते पाणी घालावे. नंतर थोडय़ा वेळाने फोडून गर काढून घ्यावा.
* लोणी करताना भांडे व ब्लेंडर गरम पाण्यातून काढावे व ताक घुसळावे. लोणी भांडय़ाला व रवीला (ब्लेंडरला) चिकटत नाही.
* ताकातून लोणी काढताना हात साबणाने धुवून मग लोणी काढावे. लोणी हाताला चिकटत नाही.
* कापसाचा बोळा पाण्यात भिजवून त्यावर व्हॅनिला किंवा गुलाब इसेन्सचे चार थेंब टाकून तो बोळा फ्रिजमध्ये ठेवावा, छान सुगंध येतो.
संकलन- उषा वसंत unangare@gmail.com