ch00मुंबई शहर हे आधुनिक, प्रगतिशील शहर म्हणूनच मानलं जातं. हा सतत धावत्या मुंबईतल्या पूर्णवेळ गृहिणीचं आयुष्य मात्र खूपसं घरातल्या घरात, कुटुंबाच्या व्यवस्थापनातच अडकून पडलंय. त्यांच्याकडे छंद जोपासायला वेळही नाही आणि पुन्हा नोकरी-व्यवसाय करायचा विचारही नाही. गृहिणीपदावर त्या खूश आहेत. मुंबईच्या बहुतांश पूर्णवेळ गृहिणीही आपल्या पारंपरिक भूमिकेत खूश आहेत.
घरकाम करणं, पूर्णवेळ गृहिणी असणं किंवा आजच्या भाषेत बोलायचं तर ‘होममेकर’ असणं यात गर किंवा कमीपणा वाटण्यासारखं काहीच नाही. क्षमता असूनही अर्थार्जनाऐवजी तो वेळ घराला, मुलांना आणि कुटुंबीयांना देणं हा प्रत्येकीचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. घराचं संपूर्ण व्यवस्थापन बघणं, आर्थिक गणितं सांभाळणं, मुख्य म्हणजे घरातल्या प्रत्येकाची आवडनिवड जपणं, पतीच्या तसंच घरातल्या इतर सदस्यांच्या कामाच्या वेळा सांभाळणं, सकाळच्या घाईच्या वेळेत झटपट कामं उरकणं, प्रत्येकाचं मन सांभाळणं, मुलांवर संस्कार करणं, घरातल्या ज्येष्ठांची जबाबदारी ही कामं सोपी नक्कीच नाहीत. ते कौशल्याचा आणि गुणांचा कस लावणारच असतं.
पूर्णवेळ गृहिणी असणाऱ्या स्त्रियांचीही तारेवरची कसरत होतच असते. होममेकर ही पूर्णवेळची नोकरीच आहे, अशी अनेक स्त्रियांची भावना आहे. आणि समर्पित भावनेनं आणि समाधानी वृत्तीनं अनेक जणी हे काम करताना दिसतात. त्यांच्या या कामाचं, समर्पित वृत्तीचं, घरासाठी त्या करत असलेल्या श्रमाचं मोल कुटुंबीयांना असतं का? शाब्दिक का होईना, पण कौतुकाचे चार शब्द त्यांना ऐकायला मिळतात का? कौतुकाच्या या चार शब्दांनी त्यांच्या कामाचा उत्साह नक्कीच दुणावत असेल का? पूर्णवेळ गृहिणी असलेल्या स्त्रियांना अपेक्षित मान मिळतो का? या मानासाठीच तर त्या आसुसलेल्या नाहीत ना? त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचं काय? त्यांना स्वत:च्या इच्छेनुसार खर्च करायची परवानगी आहे? त्यांना तो करता येतो? की तो करता येण्यासाठी त्यांना या कामाचा मोबदला मिळायला हवा? अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही केलाय ते थेट मुंबईतल्या गृहिणींनाच विचारून. या सर्वेक्षणातून मिळालेली उत्तरे म्हणजे आपल्या समाजातल्या पारंपरिक स्त्री मानसिकतेचा आरसाच म्हणावा लागेल.
घरासाठी त्या करत असलेल्या कष्टांचा, त्यांच्या श्रमांचा आíथक मोबदला मिळावा, असं आम्ही विचारलेल्या २४ टक्के स्त्रियांना वाटतं. तर आपण समíपत वृत्तीनं घरासाठी हे करतोय, त्यामुळे आर्थिक मोबदल्याचा विचार न करणाऱ्या स्त्रियांची टक्केवारी ५४ टक्के इतकी आहे, तर २२ टक्के स्त्रियांना याबाबत काहीच सांगता आलं नाही. हेसुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणजेच समíपत वृत्तीने कुटुंबासाठी काम करताना कोणत्याही वैयक्तिक मोबदल्याची अपेक्षा न करणाऱ्या स्त्रियांची संख्या सर्वाधिक आहे. पण मोबदला असावा असा विचार करणाऱ्या स्त्रियांची संख्याही अगदीच कमी नाही. अर्थात तो तितका स्पष्टपणे त्यांना व्यक्त करता येत नाही हेही जाणवले. मला व्यक्तिगत रूपात नको, परंतु असं गृहिणीच्या कामाला मूल्य मिळाले तर हरकत नाही, अशी दुहेरी मानसिकता अनेकींची दिसली.
ch03
ch04
ch05 ch06 
घरात मान, शब्दाला किंमत हवी
कुटुंबाच्या पालनपोषणाचा आर्थिक मोबदला घेतला तर गृहिणी आणि पसे घेऊन घरकाम करणारी बाहेरील स्त्री यांत फरक राहणार नाही, या मुद्दय़ावर मात्र अनेकींची द्विधा मन:स्थिती झाली. प्रत्येक कुटुंबाच्या मानसिकतेवर हे अवलंबून असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पण घरकामाचा आíथक मोबदला घेतल्यास कुटुंबातला मान अधिकच कमी होईल, असं म्हणणाऱ्या स्त्रियांची संख्या ४० टक्के आहे. म्हणजेच १० पकी ४ स्त्रियांची ही भावना आहे.
 मुळात घरकामाच्या आíथक मोबदल्याऐवजी स्त्रियांना घरात मान, शब्दाला किंमत हवी आहे. आपल्या कामाचं कौतुक झाल्यास ‘भरून पावलो’ अशी मानसिकता असणाऱ्या स्त्रियांची संख्या लक्षणीय आहे. १० पकी ८ स्त्रियांना आपण घरासाठी करत असलेल्या कामाचं फक्त आणि निदान कौतुक व्हावं असं वाटतं. ६५ ते ७० टक्के स्त्रियांच्या घरकामाचं कौतुक होतंसुद्धा. या कष्टाचं घरच्यांना मोल असल्याचं १० पकी ७ स्त्रियांनी सांगितलं. या स्त्रियांना घरात मानही मिळतो. स्त्रियांच्या कामाचं, त्यांच्या त्यागाचं घरात कौतुक होतं, पण अनेक कुटुंबांमध्ये आजही गृहिणींना पुरेसा मान दिला जात नाही. कुटुंबाचं पालनपोषण हे स्त्रियांचं कामच आहे. त्यात वेगळं असं काहीच नाही, असा दृष्टिकोन असलेल्या कुटुंबाची संख्या ३० टक्क्यांच्या घरात आहे. आमच्या कामाचं घरात मोल होत नाही, असं सांगणाऱ्या २२ टक्के उच्चशिक्षित स्त्रिया आहेत.
कुटुंबाचं पालनपोषण म्हणजे स्त्रियांना आजही त्यांचे नसíगक, पारंपरिक काम वाटते. ८२ टक्के स्त्रियांची मानसिकता हीच आहे. अर्थात १८ टक्के स्त्रियांना ती पारंपरिक असली तरी जबाबदारीचं काम वाटते, पण त्याबरोबर आपण हे करतोय याचा आनंदही मिळतो, असं वेगळं मत १५ टक्के स्त्रियांनी नोंदवलं. त्यात उच्चशिक्षित स्त्रियांचं प्रमाण ४२ टक्के आहे.    
त्यामुळे कुटुंबाचं पालनपोषण हे फक्त स्त्रियांचे नसíगक काम किंवा जबाबदारी या विचारसरणीतून मुंबईतल्या आणि उच्चशिक्षित स्त्रियाही अजून बाहेर पडल्या नसल्याचं चित्र या स्त्रियांशी बोलताना दिसून येतं. त्याचमुळे असेल कदाचित, पण घरकाम ही कटकट किंवा आपण फुकट राबतोय अशी भावना मात्र कोणाचीही नाही. कुटुंबाच्या पालनपोषणाला प्राधान्य देत उच्चशिक्षित असूनही यातल्या ५० टक्के स्त्रियांनी कधीही अर्थार्जन केलं नाही.
तर कुटुंबाच्या पालनपोषणाला प्राधान्य या कारणामुळे नोकरी सोडणाऱ्या स्त्रियांचं प्रमाणही ५० टक्के इतकं आहे. आजवर अर्थार्जन करू न शकलेल्या २२ टक्केस्त्रियांना मुलांच्या किंवा इतर कौटुंबिक जबाबदारीतून मोकळं झाल्याने पुन्हा अर्थार्जन करावंसं वाटतंय. तर २८ टक्के स्त्रिया ‘होममेकर’च्या भूमिकेतच समाधानी आहेत. १० पकी ३ स्त्रियांना अर्थार्जन करण्याची इच्छा आहे, पण कुटुंबाच्या पालनपोषणाला प्राधान्य देत नोकरी सोडलेल्या १० स्त्रियांपकी ७ स्त्रियांना पुन्हा नोकरी करण्याची इच्छा नाही. मात्र स्त्रियांनी अर्थार्जन केलं पाहिजे असं मत ८५ टक्के स्त्रियांनी व्यक्त केलं. तर   १५ टक्के गृहिणींच्या मते अर्थार्जन न केल्याने त्यांचं स्वत:चं किंवा एकंदरीतच स्त्री वर्गाचं फारसं काही बिघडत नाही. पूर्णवेळ गृहिणीपदाची तयार झालेली साचेबद्ध चाकोरी मोडण्याची या स्त्रियांची तयारी नाही. आपल्या ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडण्याची परिस्थिती बिकट असली तरीही त्यातून वाट काढून स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्याची धडपड पूर्णवेळ गृहिणी असलेल्या स्त्रियांना सध्या तरी करायची नाही, असंच चित्र या स्त्रियांशी बोलून तरी दिसून येतंय. करिअर न केल्याने फारसे काही बिघडलेलं नाही. त्यामुळे करिअर करायचंच असा कोणाचाही आग्रह नाही. तरुण आणि मध्यमवयीन स्त्रियांचे यासंदर्भातले विचार सारखेच आहेत. उच्चशिक्षित स्त्रियाही याला अपवाद नाहीत. अर्थार्जनाची पात्रता मात्र आपल्यात नक्की होती, असं मत ९६ टक्क्य़ांनी व्यक्त केलीय.
छंदाला वेळ नाही
 कुटुंबाच्या व्यवस्थापनातच बराच वेळ द्यावा लागत असल्याने करिअर करण्यात अडचणी येण्यासोबतच स्वत:ची आवडनिवड, छंद जपायला वेळ मिळत नसल्याचं ६५ टक्केस्त्रियांचं म्हणणं आहे. तो वेळ मिळायला हवा अशी अपेक्षा ९० ते ९५ टक्के स्त्रियांनी व्यक्त केली, पण आता पूर्णत: कुटुंबात रमलेल्या या स्त्रियांना (९२ टक्के) स्त्रियांना वाईट वाटत नाही.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपण करत असलेल्या कामाचा आíथक मोबदला मिळावा, असा प्रस्ताव घरच्यांपुढे मांडायची िहमत दाखवायची ७७ टक्के गृहिणींची तयारी आहे. आपण हा प्रस्ताव मांडला तर घरच्यांना तो मान्य होईल, असं यापकी    ५३ टक्के स्त्रियांना वाटतंय. पण आपले प्रस्ताव हसण्यावारी नेले जातील, असं २४ टक्के स्त्रियांना वाटतंय. तर आपला प्रस्ताव शांतपणे ऐकून घेतला जाईल, पण त्यावर विचारमंथन होणार नाही, असं २९ टक्के स्त्रियांना वाटतंय. कुटुंबाच्या पालनपोषणासाठी स्त्रिया करत असलेल्या कामाचा आíथक मोबदला देण्याच्या बाबतीत कुटुंबीय आणि मुख्य म्हणजे पती सकारात्मक विचार करत असल्याचं चित्र दिसून येतंय.
एकटीनेच राबणं होतंय
घरकामात स्त्रियांना पतीची किंवा कुटुंबातल्या इतर सदस्यांची मदत फारशी होत नाही, हा मुद्दा या पूर्णवेळ गृहिणींशी बोलताना पुन्हा एकदा ठामपणे समोर आला. या सर्वेक्षणातील ९५ टक्के स्त्रिया दिवसरात्र एकटय़ाच राबताना दिसल्या. घरकामात घरच्यांची फारशी मदत होत नसल्याचं १० पकी ८ गृहिणींनी सांगितलं. पतीची मदत मिळत नसल्याची ९५ टक्के स्त्रियांची तक्रार आहे. त्यातल्या त्यात भाजी आणणे किंवा घरातील उपकरणांची दुरुस्ती यात घरातील पुरुष मंडळींची थोडीफार मदत होते. त्याचं प्रमाणही २ ते ३ टक्केइतकंच आहे. स्वयंपाकाच्या पूर्वतयारीत १० पकी २ स्त्रियांना पतीची आणि कुटुंबातील इतर सदस्यांची मदत मिळते, पण मुलांना शाळेत सोडण्यापासून जेवणखाण, अभ्यास, इतर संस्कार करण्याची जबाबदारी ही संपूर्णपणे यापूर्णवेळ गृहिणींचीच आहे हे ही या  सर्वेक्षणातून दिसून आले.
अर्थार्जन करीत नसल्याने ८२ टक्के स्त्रियांना भविष्याची चिंता वाटते, तर १८ टक्के स्त्रिया आíथकदृष्टय़ा सुरक्षित आहेत. आíथकदृष्टय़ा असुरक्षित वाटणाऱ्या स्त्रियांमध्ये आíथकदृष्टय़ा निम्न घरातल्या स्त्रियांचं प्रमाण जवळपास ७० टक्के आहे, म्हणूनच आíथक मोबदला मिळालाच तर भविष्याची तरतूद करण्याकडे यातल्या ९० टक्के स्त्रियांचा कल दिसून येतोय. स्वत:ची आवडनिवड जपणे, हौसमौज करणे याचा विचार स्त्रियांच्या मनाला शिवतही नाही. हौसमौज करण्यापेक्षा मिळालेल्या पशांचा विनियोग करिअरसाठी करण्याचा किंवा कुटुंबासाठीच ते पसे खर्च करण्याचा विचार १०० टक्के स्त्रिया करताना दिसतात.
 ch07 ch08ch09 स्त्रिया अर्थार्जन करीत नसल्या तरीही मुंबईतल्या या ९५ टक्के पूर्णवेळ गृहिणींच्या नावे मालमत्ता आहे आणि या मालमत्तेचे पूर्ण अधिकार त्यांच्याकडेच आहेत. मात्र स्वत:चा खर्च त्या घरखर्चातून वाचवलेल्या पशांमधूनच भागवताना दिसतात. मात्र त्यांच्याकडे खर्चासाठी दिल्या जाणाऱ्या पशांवर सर्वस्वी त्यांचाच अधिकार आहे. पसे कशावर आणि का खर्च केले, अशा प्रश्नांचा सहसा भडिमार होत नाही, असं ८७ टक्के स्त्रियांनी सांगितलं. स्वत: अर्थार्जन करत नसल्या तरीही स्त्रियांना बऱ्यापकी आíथक स्वातंत्र्य आहे, ही बाब सकारात्मक आहे असंच म्हणावं लागेल. आर्थिक अडचण असेल तर पसे आणि गरजा या दोन्ही गोष्टींत तडजोड करण्यावर ९८ टक्के स्त्रियांचा भर आहे. अर्थार्जन केले असते तर आपल्या नावावर सध्यापेक्षा अधिक मालमत्ता असली असती असं वाटणाऱ्या स्त्रियांची संख्या ६४ टक्के आहे, तर मालमत्तेत फार गुंतवणूक केली नसती, असं ३६ टक्के स्त्रियांचं म्हणणं आहे.

गृहिणी असल्यामुळे त्यांच्या मतांना काहीच किंमत नाही असं मात्र आढळलं नाही, उलट घरातले निर्णय घेताना आपलं मत विचारत घेतलं जातं असं ८८ टक्के गृहिणींचं म्हणणं आहे.
घरातल्या कामाची जबाबदारी स्त्रिया व पुरुषांमध्ये समान असायला हवी असं १० पकी ८ स्त्रियांचं मत आहे. ४० टक्के स्त्रियांच्या घरात स्त्रिया व पुरुषांमध्ये कामाचं समान वाटप आहे. तर आपल्या घरी कामाचं समान वाटप असावं, अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या स्त्रियांची संख्या ६० टक्के आहे. स्त्रिया आपली कौशल्ये, क्षमता आणि ज्ञानाचा वापर कुटुंबाच्या पालनपोषणासाठी करतात आणि कुटुंबाला पुढे नेण्यात गृहिणींचाही मोठा वाटा आहे यावर १०० टक्के स्त्रिया सहमत आहेत.
आíथक मोबदला पतीकडून मिळावा आणि पतीनं आपल्या हातात दरमहा मोबदल्याचे पसे द्यावेत, असं मत आíथक मोबदल्याची अपेक्षा करणाऱ्या ९२ टक्के स्त्रियांनी व्यक्त केलंय. यासोबत बँक खात्यात पसे जमा करावेत, आपल्या नावे स्थावर मालमत्ता घ्यावी, असं त्यातल्या आठ टक्के स्त्रियांना वाटतंय. मोबदल्याच्या पशात आपल्याला एखादा व्यवसाय सुरू करून द्यावा, असं वेगळं मतही दोन ते तीन टक्के स्त्रियांनी मांडलंय. पतीच्या मिळकतीतला ५० टक्के वाटा स्त्रियांना मिळावा, असंही ५७ टक्के स्त्रियांना वाटतंय. २२ टक्के स्त्रियांना कामाचा मोबदला मिळण्याची अपेक्षा आहे, पण तो कशा स्वरूपात असावा, हे मात्र त्यांना नक्की सांगता येत नाही.
 स्त्रियांबाबतच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर स्त्रियांची समाजातील दुय्यम भूमिका त्यांच्या विकासात अडचणीची ठरतेय, हे ९५ टक्के गृहिणींनी मान्य केलंय. आपल्याला गृहीत धरले जात असल्याबद्दल ९० टक्के स्त्रियांनी नाराजी व्यक्त केली.
स्त्रिया उच्चशिक्षित असोत की अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या कुटुंबाच्या पालनपोषणाच्या जबाबदारीतून त्यांची मुक्तता नाही. वर्षांनुवर्षे चालत आलेले हे स्त्रियांचे नसíगक काम आहे, त्यामुळे स्त्रियांनी ते केलंच पाहिजे असं ९५ टक्के स्त्रीवर्गाला वाटतं. याचा मोबदला घेणं त्यांना योग्य वाटत नाही. वैयक्तिक पातळीवर तर नाहीच नाही. पण कायदा झाला तर अशा मोबदल्याला त्यांचा विरोध असणार नाही, असं ४० ते ४५ टक्के स्त्रियांचं म्हणणं आहे.
 वैयक्तिक खर्च किंवा स्त्रीविषयक खर्चासाठी पशांची गरज लागत असली तरी यासाठी पतीवर अवलंबून राहण्यातच त्यांना धन्यता वाटते. सर्वसामान्य स्त्रियांसाठी कुटुंब हेच त्यांचं प्राधान्य असल्याचं चित्र सध्या तरी दिसून येतंय.
करिअर करण्याची क्षमता असतानाही केवळ कुटुंबीयांचा किंवा पतीचा निर्णय म्हणून कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी आम्हाला उचलावी लागत असल्याचं ७७ टक्के स्त्रियांनी सांगितलं. समाजाची स्त्रियांप्रती असलेली मानसिकता बदलत असली तरीही जोपर्यंत स्त्रिया स्वत:ची मानसिकता बदलत नाहीत, स्वत:च स्वत:साठी तयार केलेली चौकट मोडत नाहीत, तोपर्यंत प्रत्येकालाच अपेक्षित असलेली स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक बदल घडणं शक्य नाही
मुंबई  – श्रीशा वागळे-जादोन -shreesha.indian@gmail.com     

Loksatta chaturang Decisive women vote in election
निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!
Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा
another sort of freedom 2
काळाबरोबर वाहणं..
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!