ch00आदर्श पत्नी, माता, सुगृहिणी अशा पारंपरिक प्रतिमेला छेद देण्याची या पूर्णवेळ गृहिणींची अजिबात इच्छा नाही, उलट गृहकामाचा मोबदला त्यांना कुटुंबात मान, आदर, कौतुक या रूपात हवा आहे, पशांच्या स्वरूपात नको असा बहुतांशी विचार करणाऱ्या औरंगाबादच्या प्रातिनिधिक पूर्णवेळ गृहिणींचे सर्वेक्षण.
पहिला महिला दिन साजरा केला तेव्हा खूप उत्साही वाटलं, आनंद झाला. वाटलं, आता लवकरच आम्हाला हवं ते मिळणार आहे. आपल्या ईप्सिताचा मार्ग नुसताच सापडला नाही तर सुकरही होतो आहे. पण आता ३५-४० वर्षे महिला दिन ‘साजरे’ केल्यानंतर  मागोवा घेतल्यास वाटतंय. कितपत मिळालं आपल्याला स्वातंत्र्य? आमची वाट तरी आम्हाला गवसली का? वाटेवरचे खाचखळगे कमी झालेत की नव्याने काही खळगे तयार झालेत? नेमकं आम्हाला काय पाहिजेय? कुठलं स्वातंत्र्य हवं आहे? आपल्या जाणिवांचं आम्हाला भान आहे का? हे सगळे प्रश्न तरी आम्हाला पडतात का? की आपली मराठवाडय़ाची भूमी संतांची भूमी असल्यामुळे आमचीहि वृत्ती ‘ठेविले अनंते तसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान’ अशीच आहे? लग्न होईपर्यंत शिक्षण, नोकरी.. लग्न झाल्यावर संसार, मुलं, जबाबदाऱ्या, खस्ता खाणं, धावपळ याच चक्रात आम्ही गुरफटलोय? तेच आमचं समाधान आहे का?  पूर्णवेळ गृहिणी असणाऱ्या स्त्रियांची मानसिकता काय आहे? त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना मिळावा का? याबद्दल त्या स्वत: किती जागरूक आहेत का?  या गोष्टीचा त्यांनी विचार केलाय का? या सर्व जाणिवांच्या शोधासाठी औरंगाबादच्या काही प्रातिनिधिक पूर्णवेळ गृहिणींच्या सर्वेक्षणाचा हा लेखाजोखा.
 आम्ही सर्वेक्षण केलेल्या पूर्णवेळ गृहिणींपैकी २० टक्के गृहिणी पूर्वी अर्थार्जन करीत होत्या. त्यातल्या ३३ टक्के गृहिणींनी कुटुंबाच्या पालनपोषणाच्या जबाबदारीला प्राधान्य देऊन नोकरी सोडली. सर्वात आश्चर्य आणि जराशी खेदाची गोष्ट म्हणजे ३३ टक्के गृहिणींनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळलं. म्हणजे या गोष्टीवर त्यांनी विचार केला नाही किंवा घरचे म्हणाले, ‘नाही करायची नोकरी किंवा तुला नोकरीची गरज काय? सगळं मिळतंय ना व्यवस्थित?’ आणि त्यांनी नोकरी सोडली अशीही स्थिती असू शकते.
स्त्री-पुरुष समानता हे स्त्री-स्वातंत्र्याचे सूत्र, निरोगी कुटुंबांचं, निरोगी समाजाचं लक्षण समजून काही प्रश्न विचारले. उदा. तुमच्या घरात तुम्ही कुठली कामं करता? याची एक लंबीचवडी यादीच गृहिणींनी दिली. सर्वेक्षणात पर्याय म्हणून (जवळजवळ २६ ते २७ कामांची यादी) दिलेल्या जवळजवळ सर्वच कामांना महिलांनी होकारार्थी मान हलवली, असं निरीक्षणात आढळून आलं. अगदी स्वयंपाकाच्या पूर्वतयारीपासून झाडू, लादी पुसणं, धुणं-भांडी ते मुलांना शाळेत घेऊन जाणं, क्लासला पोचवणं-आणणं, बाजारहाट करणं व इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या इत्यादी सर्वच. या यादीमध्ये  एक पर्याय  उपकरणाची दुरुस्ती असा दिला होता. त्याला ४५ टक्के गृहिणींनी होकार दिला आहे. ही गोष्ट स्वागतार्हच आहे, पण अजून सहभाग किंवा टक्का काढायला हवा.
या सर्व कामांत नवरे किती मदत करतात असा प्रश्न विचारल्यावर काही जणींनी माझ्याकडे असं पाहिलं की – ‘काय हे ? हे काही विचारणं झालं का? मी असल्यावर ते कशाला घरकाम करतील?’ तेव्हा घरकामाच्या पर्यायांत आकडेशास्त्राच्या दृष्टीने कुठलाही लक्षणीय पर्याय पुरुषांच्या सहभागाचा नाही. पण ४४ टक्के पुरुष उपकरणांची दुरुस्ती करतात. (ते आपलं काम, असं गृहीतक ही त्यामागे आहे.) कदाचित या गोष्टीत स्त्रिया फारसा सहभाग घेत नसाव्यात हेही कारण असू शकेल. मात्र एक गोष्ट विशेषत्वाने नोंदवावीशी वाटते, ती म्हणजे जवळजवळ ६० टक्के नवरे (पुरुष) मुलांना शाळेसाठी तयार करणं, शाळा, क्लासेसला पोचवणे आदी कामं करताना आढळून आले. कदाचित या गृहिणींना स्कूटर, गाडी चालविता येत नसावी म्हणून नवऱ्यांवर ही जबाबदारी आली असावी. फक्त    १८ टक्के पुरुष स्वयंपाकात मदत करतात. (काही जणींच्या म्हणण्यानुसार स्वयंपाकात लुडबुड करतात. सूचना करतात इत्यादी) असं निरीक्षण या स्त्रियांनी नोंदवलंय. पण पुरुषांनी मुलांची जबाबदारी उचलण्यात बऱ्यापकी सहभाग घेतलाय ही गोष्ट स्त्री-पुरुष समानतेला उभारी देणारी आहे.
आमच्या औरंगाबादमध्ये पाणी भरणं सर्वात महत्त्वाचं काम आहे. (नेहमीसाठीच. दुष्काळी भाग आहे) सकाळी तीन वाजल्यापासून ७ वाजेपर्यंत केव्हाही पाणी येतं आणि पाणी भरण्याचं काम घरातल्या बाईलाच करावं लागतं. मग ती शाळेत जाणारी मुलगी असो की गर्भवती किंवा आजीसुद्धा. नवरे गाढ झोपणार (सकाळची साखरझोप) आणि बायका पाण्याचे हंडे, बादल्या उचलणार. फार थोडय़ा जणी पाइप लाव, मोटर चालू कर, अशी सोपी कामे करतात.
 ch23आपण घरात पूर्ण वेळ विनामोबदला काम करतो, याविषयी स्त्रियांना कितपत आत्मभान आहे, याविषयी विचारले असता २४ टक्के स्त्रियांना हे काम नसíगक, पारंपरिक काम आहे असंच वाटतं तर  ६६ टक्के स्त्रियांना ही स्त्रियांचीच जबाबदारी आहे, असं वाटतं. तर १० टक्के स्त्रियांना आपण कुटुंबासाठी कष्ट करतोय, पण मोबदल्याशिवाय, असं वाटतं.
आपण कुटुंबासाठी करत असलेल्या या कामाची वा कष्टाची कुटुंबीयांना कितपत किंमत आहे यावर १४ जणींनी ‘किंमत नाही’ हे उत्तर दिलं तर १८ टक्के गृहिणींनी ‘नरो वा कुंजरो वा’ असा पवित्रा घेतला. मात्र ६५ टक्के जणींनी आपल्या कामाची कुटुंबीयांना किंमत आहे, असं स्वागतार्ह उत्तर दिलं. हे फार महत्त्वाचं आहे. नवऱ्याने बायकोच्या कष्टाची दखल घेणं हे महत्त्वाचं आहे.
घरकामाची विभागणी स्त्री-पुरुषात समान असावी, या विधानास २८ टक्के स्त्रियांनी ‘नाही’ असं उत्तर देऊन समानतेच्या मुळावरच घाव घातला. ही विचारसरणी मराठवाडय़ापुरती आहे की प्रातिनिधिक?
सर्वात महत्त्वाच्या प्रश्नावर म्हणजे तुम्ही घरात २४ तास काम करता (विश्रांतीचे ८-१० तास सोडून) त्याचा मोबदला मिळावा, असं तुम्हाला वाटतं का? तेव्हा फक्त २० टक्के गृहिणींनी ‘होय’ असं उत्तर दिलं. तर ८० टक्के स्त्रियांनी चक्क नाही असं उत्तर देऊन या सर्वेक्षणालाच हादरे दिले. पण काहींनी ज्यांच्या घरी सुशिक्षित वातावरण आहे. समजूतदार नवरे आहेत आणि ज्यांना आíथक स्वातंत्र्य आहे. अशांनी ‘ऑफ द रेकॉर्ड’ मला विचारलं किंवा सांगितलं की श्रमाची विभागणी अगदी अनादी काळापासून अशीच आहे ना. पुरुषांनी कमवायचं, स्त्रियांनी कुटुंब जपायचं, जोपासायचं असं घरकामाचं मूल्य घेऊन स्त्रियांचं कुटुंबातील स्थान आणि सन्मान वाढणार आहे का? त्यापेक्षा असे सर्वेक्षण आणि समुपदेशन वगैरे तुम्ही पुरुषांचं का करत नाही? असो. तर अशा ८० टक्के गृहिणींनी मोबदला नसावा, असं मत मांडल्यामुळे पुढच्या प्रश्नावलीलाही अशीच अपेक्षित उत्तरं मिळाली.
घरकामाचा मोबदला पशाच्या स्वरूपात मिळावा का? याच ५४ टक्के स्त्रियांनी नकारात उत्तर दिलं तर ३६ टक्के स्त्रियांनी ‘होय’ असं दिलं. तर      १० टक्के गृहिणींनी उत्तरच दिलं नाही. आपल्याला घरकामासाठी मोबदला मिळावा असा विचार कधी केलाय का? या प्रश्नाला ७२ टक्के गृहिणींनी ‘नाही’ असं उत्तर दिलं यावरून आपल्या मत्रिणींना याचं कितपत भान आहे हे स्पष्ट होतं.
 जर पशाच्या स्वरूपात मोबदला मिळाला तर तो कुणी द्यावा यावर मात्र ७ टक्के स्त्रियांनी तो पतीनंच द्यावा हे ठामपणे सांगितले आणि हा पशाच्या स्वरूपातील मोबदला दरमहा पतीनं हातात द्यावा, असं ३० टक्केस्त्रियांनी सांगितलं तर ३२ टक्के गृहिणींनी तो पत्नीच्या खात्यात जमा करावा, असा व्यवहारी पर्याय दिला. अवघ्या १४ टक्के गृहिणींनी तो निवृत्तीवेतन, पी. एफ. मध्ये जमा व्हावा, असं मत दिलं. मी जेव्हा ही प्रश्नावली लिहून घेत होते. तेव्हा बऱ्याच जणींनी मला खासगीत विचारलं असे खरंच घरकामाच्या मोबदल्याचे पसे मिळणार आहेत का? खरं तर बहुतेक जणींनी प्रश्नावलीत आम्हाला पशात मोबदला नको हाच पर्याय निवडला होता. पण प्रत्यक्षात मिळाले तर हवे होते म्हणजे अजूनही परंपरा, कुटुंबाची चौकट, सामाजिक संस्कार याचाच आमच्यावर किती पगडा आहे हे अधोरेखित होतं.
पशात मोबदला मिळाला तर ताशी किती पसे मिळावेत, या प्रश्नावर आमच्या मत्रिणी खूपच गांगरल्या. काहींनी दोनशे तर काहींनी महिन्याला १ ते २ हजार रुपये मिळावेत इतकी कमी अपेक्षा केली. खरं म्हणजे धुणंभांडी, झाडू, लादी पुसणारी बाईसुद्धा हल्ली १५०० ते २००० रुपये (आणि ही रक्कम परिसरानुसार बदलतही जाते) घेते. कुटुंबातील उत्पन्नाच्या किती टक्के हिस्सा तुम्हाला मिळावा याचं उत्तर स्त्रिया आम्हाला वाटलं होतं कमीत कमी ५० टक्केअसं सांगतील पण प्रत्यक्षात १२ टक्के स्त्रियांनीच ३० ते ४० टक्के एवढा हिस्सा मिळावा असं उत्तर दिलं तर अवघ्या १६ टक्क्यांनी ५० टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा मिळावा, असं सांगितलं. घरकामाचा आíथक मोबदला घेतला तर आपल्यात आणि कामवालीत काहीच फरक राहणार नाही, असं ५२ टक्के गृहिणींना वाटतं.
एक खूप इंटरेिस्टग प्रश्न आहे तो, मला माझ्या कामाचा मोबदला मिळावा असा प्रस्ताव कुटुंबापुढे ठेवला तर काय होईल, या प्रश्नावर १८ टक्के गृहिणींनी ‘सांगता येत नाही’, असं प्रांजळपणे कबूल केलं. ६ टक्के गृहिणींनी मात्र असा मोबदला मिळण्याची शक्यता नाही, असं ठामपणे सांगितलं. गंमत म्हणजे ६ टक्के गृहिणींनी आणखी एक पर्याय सांगितला तो म्हणजे असा काही प्रस्ताव जर आम्ही घरात नुसता मांडला तरी त्याकडे कुत्सितपणे पाहिलं जाईल. ४२ टक्के गृहिणींनी या मोबदल्याचं आम्ही स्वागत करू, असं सांगितलं तर ३२ टक्के गृहिणींनी आम्हाला या मोबदल्याची गरज वाटत नाही, असं खडय़ा बोलात सांगितलं. २० टक्के गृहिणींना याबद्दल काहीच ठरवता आलं नाही, हे फार खेदजनक निरीक्षण आहे असं वाटतं.
 महिन्याकाठी तुम्ही स्वत:साठी किती पसे खर्च करू शकता, या प्रश्नाचं एकाही गृहिणीने उत्तर दिलं नाही. कदाचित असा विचार त्यांनी केलाच नसावा किंवा त्यांना हवे तेवढे पसे मिळत असावेत, असा सोयीस्कर अर्थ आम्ही काढला.
कुटुंबाच्या आर्थिक स्रोताची, मालमत्तेची माहिती ६८ टक्के गृहिणींना आहे, हे या सर्वेक्षणातील सर्वात आनंदाचे निरीक्षण आहे आणि ६८ टक्के गृहिणींनी अजूनही नोकरी, करिअर करावेसे वाटते हीही उत्साहवर्धक गोष्ट आहे.
काही महत्त्वाची निरीक्षणे-
 घरातील सर्व कामे या पूर्णवेळ गृहिणीच करतात. त्यात नवरे किंवा इतर पुरुषांचं योगदान नगण्य आहे. स्वयंपाकघरात तर जणू काही प्रवेश निषिद्ध, मात्र मुलांना शाळेत क्लासला पोहोचवणं, आणणं त्याची खरेदी, आजारपणात डॉक्टराकडे नेणं यासाठी बरेच पती मदत करतात. याचंही कारण मला वाटतं थोडासा नाइलाज असंही असू शकतं. पण ज्या स्त्रिया वाहन चालवतात, त्या मात्र हे काम जबाबदारीने करताना दिसत आहेत.
घरकाम ही एकटय़ा स्त्रीची जबाबदारी नसून ती सर्वाचीच आहे हे आमच्या मत्रिणींना पटतं, पण प्रत्यक्षातील चित्र आणि अनुभव पूर्णत: वेगळे आहेत. परंपरा, रूढी, कौटुंबिक संस्कार इत्यादी गोष्टी आपल्यात इतक्या खोलवर रुजल्या आहेत की पुरुषांनी घरकामात योगदान न देणं हे आता अगदी आमच्या सवयीच झालंय. ते जसंच्या तसं पुढच्या पिढीत उतरू नये यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहोत की नाही?
घरकामाचा मोबदला मिळावा का? कुठल्या स्वरूपात? याविषयी स्त्रियांनी फारसा विचार केलेला जाणवत नाही. याविषयीचं आत्मभानही पुरेसं नाही. आदर्श पत्नी, माता, सुगृहिणी अशा पारंपरिक प्रतिमेला छेद देण्याची आमच्या या मत्रिणीची इच्छा नाही असं दिसतं. त्याविषयी विचार करावा असंही वाटत नाही. उलट बऱ्याच जणींनी आम्ही यात समाधानीसुद्धा आहोत, असं मत नोंदवलं हे समाधान जर आíथक स्वातंत्र्यातून आलं असेल तर त्याचं स्वागतच आहे.
 एक गोष्ट अगदी प्रकर्षांनं जाणवली ती म्हणजे सरसकट सर्वच स्त्रियांना वाटतं की त्या करत असलेल्या गृहकामाचा मोबदला त्यांना कुटुंबात मान, आदर देऊन मिळावा. पशांच्या स्वरूपात नको हे विधान, निरीक्षण पुरेसं बोलकं आणि अंतर्मुख करणारं आहे. आमची दुखरी नस कोणती आहे हेही यामुळे कळतं. आणि या विधानाने काय अधोरेखित होतं हे वेगळं सांगायला नको.
‘युनो वूमन’ ने सुरू केलेल्या नव्या मोहिमेचं He for she  म्हणजे ‘तिच्यासाठी तो’. या घोषवाक्याचा थोडा तरी अर्थ आपल्या मत्रिणीपर्यंत आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मित्रापर्यंत पोहोचणार आहे का? ही खरी तळमळ आहे.    
    

हे प्रश्न विचारत असतानाच तिथे असलेल्या एका छोटय़ाला विचारलं की बाबा घरात काय काय काम करतात? तर खूप विचार करून त्यानं सांगितलं बाबा, पेपर वाचतात, टी.व्ही. पाहतात. ‘हे आण ते आण’ अशा ऑर्डर सोडतात. मग त्याला विचारलं, मोठं झाल्यावर तू घरात काय काय काम करशील? तर म्हणाला, मी टॅबलेट, लॅपटॉपवर काम करीन ना. आणि पाण्याची बॉटल भरून रूममध्ये ठेवीन, म्हणजे कुणाला पाणी आणायला सांगायला नको.

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?