नेहमी नीटनेटकी राहणारी, सदा हसतमुख चेहऱ्याची मला आईचं प्रेम देणारी काकू, तिच्या त्या अवस्थेत बघवत नव्हती.. सुरुवातीला चैतन्यला मी खूप धीर देत होते, पण मग हळूहळू माझंही अवसान कमी होत गेलं गं.. आणि एक दिवस चैतन्य रडत मला म्हणाला, ‘ताई, आईला हे असं जगणं आवडत असेल का गं? किती हाल होतायत तिचे? आपण डॉक्टरना सांगू या का. खूप दिवसांनी शाळेतली अगदी सख्खी सखी भेटली. अगदी जिवाभावाची मैत्रीण .. तीही अगदी भर रस्त्यात. वर्षांनुर्वष म्हणजे अगदी बालवर्गापासून एस. एस. सी. होईपर्यंत एकाच बाकावरची जागा न सोडणाऱ्या आम्ही आणि आमची मत्री हे इतर मुलांच्या दृष्टीनं एक आदराचं स्थान होतं. दहावीनंतर दोघी दोन दिशांना गेलो आणि मग पुढे लग्न, संसार यात गुरफटल्यामुळे फोनवरच्या भेटींची संख्या पण हळूहळू कमी होत गेली. त्यामुळे आज अशी अचानक भेट झाल्याचा आनंद काही औरच होता. आपण रस्त्यावर आहोत हे विसरून दोघीनी आनंदाने गळाभेट केली. रस्त्यात ज्या भाजीवाल्या बाईजवळ आम्ही उभ्या होतो, तिला पण कदाचित आमच्या गळाभेटीवरून आता आम्ही गप्पा मारत बराच वेळ उभ्या राहणार हे उमगल्यामुळे तिनं पुढल्या पांच मिनिटांत, ‘‘अवो ताई, जरा साईडीला रहा की उभ्या .. माझं गिऱ्हाईक येतय ना भाजी घ्यायला.’’ असं म्हटलं तेव्हा आम्ही जाग्या क्षालो आणि मग जवळच्या सी. सी. डी. त गेलो. दोघींनाही किती बोलू आणि काय बोलू असं झालं होतं. आपाआपल्या मुलाबाळांची, लेकीसुनांची चौकशी झाली आणि मला एकदम या माझ्या मत्रिणीच्या काकूची आठवण झाली. आई तिच्या लहानपणीच गेली असल्यामुळे काकूनेच तिला आईच्या प्रेमाने सांभाळल होतं. ही काकू माझ्याशी पण छान गप्पा तर मारायचीच, पण हातावर नेहमी गोड खाऊ टेकवीत असे. त्या आठवणीनं मी तिला विचारलं, ” अगं, तुझी काकू कशी आहे?” “काकू गेली ..” “काऽऽय? कधी? आणि कशानं?” “घराजवळ अ‍ॅक्सिडेंट झाला तिचा.. आणि जी कोमात गेली ती सहा सात महिने हॉस्पिटलमध्ये कोमातच होती.” “पण कधी झालं हे सगळं? “वर्ष होऊन गेलं गं ..” “अगं, मला कळवायचस ना .. मी आले असते ना काकूला भेटायला ..” “अगं आम्हाला तरी कुठे कल्पना होती .. पण ” “पण..पण काय? ” मी तिच्या डोळ्यांतलं पाणी पुसत विचारलं. “तुला चारूताई आठवत्येना? काकूची मोठी मुलगी .. “हो, आपण दहावीत असताना ती परदेशी गेली ना ..” “हो, तीच ती ..” “तिचं काय?” “अगं ती फक्त एकदा दहा बारा दिवस येऊन गेली . आणि मग चतन्यला तिच्या भावाला तिकडून रोज फोन करून चौकशी करायची. मोठय़ा तोऱ्यात सांगायची, ‘‘तू पशाची काळजी करू नकोस, हॉस्पिटलचा सगळा खर्च मी देईन.’’ पण प्रश्न फक्त पशांचा नव्हता गं. माणूस बळ नव्हतं आमच्याजवळ. माणूस हॅस्पिटलमध्ये असलं की किती मदत लागते हे तिला तिथं राहून कसं कळणार? दिवसभर मी आणि रात्री चतन्य. असे आम्ही सहा महिने काढले. डॉक्टर कसलीच खात्री देत नव्हते.. ‘काकू कोमातून बाहेर येईल का?’ सांगता येत नाही.. ‘बाहेर आल्यावर नॉर्मल आयुष्य तरी जगेल का?’ माहीत नाही .. फक्त ह्रदय चालू होतं म्हणून ती जिवंत आहे असं आम्ही समजत होतो. पण तिच्या चेहऱ्यावर ना कसले भाव.. ना शरीराची पुसटशी हालचाल.. जाणिवा-नेणिवांपलीकडे गेलेल्या चेतना नसलेल्या काकूला रोज बघणंसुद्धा मनाला इतकं वेदना द्यायचं ना? पूर्वी एकदा कोणाच्या तरी आजारपणावरून आमचं बोलणं चाललं होतं तर म्हणाली होती, ‘मला ना बोलता बोलता मरण आलं पाहिजे.. कोणाला माझी सेवा करायला लागता कामा नये.. आजकाल सगळं पशानं विकत घेता येईल पण वेळ . तो मात्र नाही कोणी कोणाला सहज देऊ शकत ..असं काही माझ्या बाबतीत झालं ना तर..’ मी तिच्या तोंडावर लगेच हात ठेवला पण तरी माझा हात काढत तिनं वाक्य पुरं केलं. ‘.. तर मला या जगातून कायमची स्वेच्छानिवृत्ती घ्यायला आवडेल..’ नेहमी नीटनेटकी राहणारी, सदा हसतमुख चेहऱ्याची मला आईचं प्रेम देणारी काकू, तिच्या त्या अवस्थेत बघवत नव्हती.. सुरुवातीला चतन्यला मी खूप धीर देत होते, पण मग हळूहळू माझंही अवसान कमी होत गेलं गं.. आणि एक दिवस चैतन्य रडत मला म्हणाला, ‘ताई, आईला हे असं जगणं आवडत असेल का गं? किती हाल होतायत तिचे? आपण डॉक्टरना सांगू या का .. ’ आणि पुढले शब्द त्याच्या तोंडातून बाहेर न पडता तो धाय मोकलून रडायला लागला .. थोपटत मी त्याला शांत केलं.. आणि रात्री चारूजवळ विषय काढला.. ती चवताळून माझ्या अंगावर आली.. तिचा राग, तिचं दुख मी समजू शकत होते, पण इथं प्रॅक्टिकली सगळं सांभाळणं खूप कठीण होतं. ती फक्त सुरुवातीला एकदा येऊन गेली होती. पण आम्ही सहा महिने रात्रंदिवस आज ना उद्या काकू कोमातून बाहेर येईल या आशेवर तिची मनापासून सेवा करत होतो. पण आमची ती सेवा तिच्यापर्यंत पोहचत कुठे होती. अखेर देवालाच तिच्या सोशीकपणाची बहुतेक कींव आली असावी किंवा आमची दया आली असावी.. दुसऱ्याच दिवशी मी नेहमीप्रमाणे हॉस्पिटलला गेले तेव्हा काकूंनी आम्हाला कोणाला न सांगता, अगदी गुपचूप जगाचा निरोप घेतला होता. गेल्या सहा महिन्यांत कधी ही दिसला नसेल एवढा तिचा चेहरा मला कमालीचा शांत दिसला ..माहीत नाही खरंच तो शांत होता का मला तो शांत भासला .. ” आणि मत्रिणीचा बांध फुटला .. आत्ता मात्र मी तिला रडू दिलं. वर्षभरापासून सांभाळलेल्या जखमेतून रक्ताऐवजी येणारे अश्रू होते ते .. समोर आलेली थंड झालेली कॉफी तशीच सोडून आम्ही फक्त एकमेकींचे हात हातांत घेतले आणि त्या स्पर्शातूनच जाणवलेला निरोप घेत आपापल्या घराकडे वळलो, आणि मला सुरेश भट यांची गझल आठवली- इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते। मरणाने सुटका केली जगण्याने छळले होते। chaturang@expressindia.com

nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
Framework That Stunts Progress
जिंकावे नि जगावेही : प्रगतीला खीळ घालणारी चौकट
Womens Health why facial hair growth increase and What is the solution on it
स्त्री आरोग्य : तुमच्या चेहऱ्यावर आहेत त्रासदायक केस?
how to make crunchy karela fry recipe
Recipe : अशा पद्धतीने कारल्याच्या काचऱ्या बनवाल तर, कडवटपणा झटक्यात विसरून जाल! ही रेसिपी पाहा…