० लॅपटॉपची साफसफाई करण्यापूर्वी लॅपटॉप बंद करून त्याला जोडलेली बाहेरील अटॅचमेंट काढून मगच स्वच्छता सुरू करावी.
० वर्षांतून एकदा व्यावसायिक जाणकाराकडून त्याची सव्‍‌र्हिस करून घ्यावी. जेणेकरून आतील बाजूला साचलेली धूळ, कचरा साफ होईल.
० की बोर्ड आणि कडेच्या बाजूंच्या सफाईसाठी ब्रशचा किंवा मलमलच्या कापडाचा वापर करावा.
० की बोर्डसाठी बाजारात मिळणारे कव्हर वापरावे. म्हणजे धूळ, माती किंवा इतर वस्तुंपासून त्याचे संरक्षण होईल.
० लॅपटॉपवर काम करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवून घ्या. कारण हाताला असलेला चिकटपणा किंवा तेलकटपणा लॅपटॉपला लागून त्याचा पृष्ठभाग किंवा स्क्रिन खराब होतो.
० लॅपटॉपवर काम करताना चहा, कॉफी, सरबत यासारखे प्रवाही पदार्थ लॅपटॉपपासून लांब ठेवावे. कारण अनावधानाने धक्का लागून त्यावर ते सांडल्यास लॅपटॉपचे नुकसान होऊ शकते.
० लॅपटॉप साफ करताना थेट क्लीनिंग सोलूशनचा वापर करू नका. एका पातळ सुती कपडय़ावर किंवा स्पंजवर सोलूशनचे थेंब घेऊन हलक्या हाताने लॅपटॉप साफ करावा.
० लॅपटॉप साफ करण्यासाठी तेलकट किंवा ओशट कपडय़ाचा वापर करू नये. कारण कपडय़ातील तेलकटपणा लॅपटॉपला लागून त्यावर धूळ बसली तर धुळीचा चिकटपणा तयार होऊन त्यावर अधिकाधिक धूळ साचून जाड थर तयार हाईल.
० या बाह्य़सफाईबरोबर लॅपटॉप आतूनही स्वच्छ करणे आवश्यक आहे. त्यासाठी ब्लोअर किंवा सॉफ्ट ब्रश वापरून हलक्या हाताने साफ करतात येईल.
संकलन- उषा वसंत unangare@gmail.com