शाहिद कबीरची प्रतीकात्मक शैली कधी सुबोध तर कधी निसटून जाणाऱ्या आशयांची माळ भासते पण त्यातील नावीन्य मंत्रमुग्ध करणारं असतं. एकाच वेळी दर्जेदार वाङ्मयीन ग़ज़्‍ाल नज्म ते लिहीत. त्याच वेळी मुशायऱ्याची दादलेवा ग़ज़्‍ाल अथवा हलकीफुलकी गीतंही लिहिण्याचे कसब त्यांच्या लेखणीतून अवतरते.

किये है इतने जहाँ और इक *करम कर दे
मेरे खुदा तू मेरी ख्वाहिशों को कम करे दे
ग़ज़्‍ालचा हा मतला त्याने सादर करताच श्रोत्यांतून उत्स्फूर्त दाद अन् टाळ्यांचा कडकडाट पुढची पाच-सहा मिनिटे होतच राहिला. तो शेर त्याला पुन:पुन्हा वाचण्याचा आग्रह होत गेला. असे दाद घेणारे शेर खरे तर त्याच्या शायरीत वारंवार भेटतात-
कितनी सदियों से डराते है उजाले मुझम्को
अपने दामन में कोई रात छुपाले मुझको
सध्याच्या शहरी धकाधकीच्या जीवनात घरातून बाहेर पडलेली व्यक्ती सुखरूप घरी परतेल याची घरच्यांना खात्री नसते, असं सांगणारा हा शेर –
जायेगा भी तो कहाँ जायेगा पाँव वाला
घर से निकले कि उठा हाथ, दुआओंवाला
वियोग क्षणाचा रंगांशी या शायराने घातलेला मेळ पाहा-
आज हम बिछडे है तो कितने रंगीले हो गये
मेरी आँखें *सूर्ख तेरे हाथ पिले हो गये
असे अनोखे शेर नावावर असणाऱ्या शायराचे नाव शाहिद कबीर. हा शायर नागपूरचा अन् त्याचा जन्म १ मे १९३२चा. महाराष्ट्रातील ज्या शायरांच्या ग़ज़्‍ाला सर्वाधिक गायकांनी गायल्या आहेत त्यापकी शाहिद कबीर एक होते. लता मंगेशकर, जगजीतसिंह, पंकज उदास, साबरी ब्रदर्स, अजीज नाझाँ, हरीहरन, उषा अमोणकर आदी अनेक नावे सांगता येतील, त्या गाजलेल्या सुरेल व मोहक ग़ज़्‍ालांपकी काहींचे मतले ऐका-
गम का खजाना तेरा भी है मेरा भी
ये *नजराना तेरा भी है मेरा भी
मयखाने की बात न कर *वाईज मुझसे
आना-जाना तेरा भी है मेरा भी

मं न हिन्दु न मुसलमान मुझे जीने दो
दोस्ती है मेरा ईमान मुझे जीने दो
वो अपने तौर पे देता रहा सजा मुझको
हजार बार लिखा और
मिटा दिया मुझको
देखणा हसतमुख चेहरा, सडपातळ उंच बांधा, गंभीर आवाज अन् आनंदी स्वभाव हे शाहिद कबीरच्या व्यक्तिमत्त्वाचे पलू होते. खरं तर त्यांना शायरीचं प्रेम नव्हतं. गद्य लिखाणाचं आकर्षण मात्र होतं. सातवीत असताना ‘गालिब’ अन् ‘मीर’ची ग़ज़्‍ाल वाचण्यात आली.
नाजुकी उसके लब की
क्या कहिये
पंखुडी इक गुलाब
की सी है
अन् त्या शेराने शाहिद एवढं प्रभावित झाले की समग्र मीरकाव्यं त्यांनी विकत घेतलं. त्यापूर्वी ही किमया दीवाने-गालिबनं केलीच होती. शाहिद कबीरचं पाठांतर फार चांगले होते. त्यांना अर्धा अधिक गालिब कंठस्थ होता.
अकरावी शिकत असताना शाहिद कबीर यांनी कथा लिहण्यास सुरुवात केली. त्यांच्या कथा ‘शायर’ या श्रेष्ठ उर्दू मासिकात प्रकाशित होत. गालिब-मीरच्या दर्जाची आपण शायरी करू शकत नाही तर उगाच कशाला लिहावं असं त्यांना वाटे.
किसी अमीर को कोई फकीर क्या देगा
*गज़्‍ाल के सिन्फ को शाहिद कबीर क्या देगा?
गालिबच्या ग़ज़्‍ालचा शेर त्याच्या मनात शेवटपर्यंत विसावला-
जिन्दगी यूँ भी गुजर जाती
क्यों तेरा *रहगुजर याद आया
१९५३ मध्ये नोकरीच्या निमित्ताने शाहिद दिल्लीला गेले. तेथे ते एवज सईद या उर्दू कथाकारासोबत रूम पार्टनर होते. तेथेच शाहिद कबीरने आपली पहिली ग़ज़्‍ाल (जी गालिबच्या ग़ज़्‍ालेवर बेतली होती) एहसान दानिश (उर्दूचे श्रेष्ठ शायर) यांच्या ‘चौधवीं सदा’ या मासिकात प्रकाशित झाली. संपूर्ण मलपृष्ठ तिने व्यापले होते. एहसान दानिशचे प्रोत्साहनपर पत्र त्यांना आले अन् त्यांनी पूर्णपणे ग़ज़्‍ालसर्जनावर ध्यान द्यायला सुरुवात केली. शाहिद कबीरच्या ग़ज़्‍ालचे विषय नवीन नाहीत, मात्र पेशकश दिलकश आहे
हर एक हँसी में छुपी *खौफ की उदासी हैं
समुंदरों के तले भी जमीन प्यासी हैं
मैं वो भूला हुआ चेहरा हूँ कि आईना भी
मुझसे मेरी कोई पहचान पुरानी मांगे
*लिबासे जिस्म में शाहिद को ढूँढने वालों
कभी तो उसको बदन से निकाल कर देखा
यही नहीं है कि वो सब से जुदा सा लगता है
वो जब भी मिलता है बिल्कुल नयासा लगता है
शाहिद कबीरचा पहिला काव्यसंग्रह ‘मिट्टी का मकान’ १९७९ मध्ये, दुसरा काव्यसंग्रह ‘पहचान’ १९९९ मध्ये व तिसरा काव्यसंग्रह ‘उसकी गली’ २०१४ मध्ये प्रकाशित झाला. पण तत्पूर्वीच ११ मे २००१ ला शाहिद कबीर यांचे निधन झाले होते.
शाहिद कबीर मुशायऱ्यात गाऊन काव्य पेश करीत. एकाच वेळी दर्जेदार वाङ्मयीन ग़ज़्‍ाल नज्म ते लिहीत. मुशायऱ्याची दादलेवा ग़ज़्‍ाल अथवा हलकीफुलकी गीतंही लिहिण्याचे कसब त्यांच्या लेखणीत होते.
शाहिद कबीर यांनी ‘कच्ची दीवारे’ अन् ‘फासले’ अशा दोन कादंबऱ्याही लिहिल्या. पण कथा-कादंबऱ्या, गद्य लिहिण्याचा त्यांना आळस होता म्हणून ते म्हणतात- मी तिकडे फारसा रमलो नाही. १९५८ ला त्यांची बदली नागपूरला झाली. त्या वेळी त्यांनी राष्ट्रपती भवनासाठी ‘गालिब’ हे नाटक लिहिले ते राष्ट्रपती भवनात सादरही झाले. पण घरी म्हणजे नागपूरला परतण्याच्या आनंद व घाईमुळे ते नाटकासाठी न थांबता तडक नागपूरला परतले.
जदीद म्हणजे आधुनिक शायरीच्या रंगातले शाहिद यांचे काही लक्षणीय शेर पाहा. यातील प्रतीकात्मकता अनेक अर्थ व्यापून असते.
कदम निकाले तो परो तले जमीन न थी
जरा जो सर को उठाया
तो आसमान लगा
दूर से देखो तो है एक से चेहरे सब के
पास से देखो तो हर *शख्स यहां गहरा है
उत्थानानंतर पतनाचे संकेत देणारा हा शेर-
चोटी पे रुक के देखलो मंजर ढलान का
आगे अगर बढोंगे तो खतरा है जान का
खुद मछलियाँ आ-आके तडपती है किनारे
तूफाँ हो तो साहिल पे मछेरे नहीं आते
ज्या चार िभतींमध्ये माणूस स्वत:ला सुरक्षित मानतो त्यावरही शाहिद कबीर विश्वास ठेवत नसावेत.
रेत की इंट की, पत्थर की हो या मिट्टी की
किसी दीवार के साये का भरोसा क्या है
नश्वरतेच्या भावनेने ग्रस्त हा वरचा शेर तर कधी ते म्हणतात-
मैं तो बहता हुआ पानी हूँ न हाथ आऊँगा
लाख *साहिल से तू आईना बना ले मुझको
शहरो हवस में दिन का डूबा सूरज हूँ मैं
रात होते ही अपने घर में निकल आऊँगा
उर्दूचे एक ज्येष्ठ संपादक साहित्यकार नियाज फतेहपुरी त्या वेळी (१९५०) ‘निगार’ नावाचे वाङ्मयीन मासिक संपादित करीत असत. मोठमोठय़ांचे साहित्य पसंत न पडल्यास परत पाठवीत असत. शाहिद कबीर यांच्या एका बिलासपुरी मित्राने आपले काव्य ‘निगार’ला पाठवले. ते उलट टपाली परत तर आलेच पण नियाज फतेहपुरींनी त्यावर एक ओळ लिहिली होती, आप शायरी क्यों करते हैं?
शाहिद कबीरनी आपल्या काही ग़ज़्‍ाला निगारला पाठवून त्यावर नियाज यांचे मत मागितले. त्यावरही नियाज फतहपुरींनी एक ओळ लिहिली, शायरी का सिलसिला जारी रखिये। इंतेखाब (निवडक) निगार मे शाया (प्रकाशित) किया जा रहा है।

मराठीतही ‘कवितारती’च्या पुरुषोत्तम पाटील यांनी अनेक ज्येष्ठ कवींच्या नापसंत कविता परत पाठविल्याची उदाहरणे ेआहेत.
शाहिद कबीरची प्रतीकात्मक शैली कधी सुबोध तर कधी निसटून जाणाऱ्या आशयांची माळ भासते पण त्यातील नावीन्य मनमुग्ध करणारं असतं.
मुझ में जो रहता है अपनी फिक्र करे वो
मेरा क्या है मैं तो इक दिन मर जाऊँगा
तू जिसके *तसव्वुर में मिला करता है मुझसे
उस शख्स से मेरी भी मुलाकात करा दे
त्यांच्या शायरीत त्रयस्थताही अध्येमध्ये आढळून येते –
बांध रख्खा हैं किसी सोच ने घर से हम को
वर्ना अपना दरो-दीवार से रिश्ता क्या है?
अन् ते पुन्हा स्वत:लाच बजावतात-
शाहिद सदा लगाने से पहले ये सोच लो
सदियों के बाद भी तुम्हें दोहराएगी सदा
कारण
ऊपर से जिन्दगी है बहुत *खुशनुमा मगर
अंदर से कितने जख्म छुपे हैं लिबास में
शाहिद कबीर ११ मे २००१ ला निवर्तले. मात्र जाता जाता सुरेल गळ्याचा हा सजीला शायर बजावून गेला-
गूँजूँगा फिजाओं में सुनाई नहीं दूंगा
पण शाहिद कबीरच्याच शब्दात त्यांचं हे रुसून निघून जाणं.
जैसे गुल होती चली जाये *चिरागों-कतार
जब कोई रुठ के जाता हो तो मंजम्र देखो
——-
शब्दार्थ-
करम -कृपा , सूर्ख – लाल ,नजराना – भेट वस्तू, वाईज- उपदेशक, ईमान- धर्म/ श्रद्धा , ग़ज़्‍ाल-सिन्फ – ग़ज़्‍ाल विधा, रहगुजर – रस्ता, खौफ – भय, लिबासे-जिस्म – देह पोशाख, शख्स – व्यक्ती, साहिल – किनारा, शहरे-हवस – प्रिय शहर, कामनारूपी शहर, तसव्वुर – कल्पना/ विचार, लक्ष्य खुशनुमा – सुंदर/ मनोहर, चिरागों-कतार – दिव्यांची रांग

– dr.rampandit@gmail.com