News Flash

चला चॅटींग करूया..

जीमेलवरून मेल (पत्र), कागदपत्रे, फोटो कसे पाठवावे व चॅट (गप्पा) कसे करावे? पूर्वी नातेवाइकांची ख्यालीखुशाली विचारायची असेल

| February 22, 2014 01:05 am

 जीमेलवरून मेल (पत्र), कागदपत्रे, फोटो कसे पाठवावे व चॅट (गप्पा) कसे करावे?
पूर्वी नातेवाइकांची ख्यालीखुशाली विचारायची असेल,  कागदपत्रे, फोटो पाठवायचे असतील तर टपालामार्फत ते पाठवले जात. यामध्ये बराच वेळ जात असे, परंतु आता इंटरनेटवरील विविध मेल सुविधांमुळे हीच कामे काही सेकंदात होऊ लागली आहेत. इतकेच नाही तर या मेल सुविधांमुळे जगातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी सहज लेखी गप्पाही मारता येतात. आज जीमेलच्या मेल सुविधेविषयी माहिती घेऊ.
१) प्रथम गेल्या लेखात पाहिल्याप्रमाणे गुगलचं पान उघडल्यावर त्यात www.gmail.com असे टाइप करावे.
२)    समोर सुरू झालेल्या पानावर युजरनेम व पासवर्ड असे दोन शब्द दिसतील. त्यापकी प्रथम युजरनेममध्ये जाऊन आपला ई-मेल आयडी त्यात लिहा. उदा. abc@gmail.com
३)    त्यानंतर युजरनेमच्या खाली असलेल्या पासवर्डच्या जागेत आपला पासवर्ड (गुप्त संकेतांक) लिहून, त्या खालच्या लॉग इनच्या पर्यायावर क्लिक करा.
४)    आता आपल्यासमोर जीमेलची खिडकी सुरू होईल; आता पत्र लिहिण्याकरता डाव्या बाजूला वर असलेल्या compose या पर्यायावर क्लिक करावे.
५)    सुरू झालेल्या खिडकीवर  to  असे लिहिलेल्या ठिकाणी ज्याला मेल पाठवायची आहे, त्या व्यक्तिचा ईमेल आयडी लिहावा. उदा.  xyz@gmail.com
६)    subject  असे लिहिलेल्या ठिकाणी मेलचा विषय लिहावा. त्या खाली असलेल्या मोकळ्या जागेत, आपल्या हवा असलेला मजकूर टाईप करावा.
७)    जर काही कागदपत्र किंवा फोटो पाठवायचे असतील तर send च्या बटणाशेजारी असलेल्या यू-पीन’च्या चिन्हावर क्लिक करा. आता ज्या फोल्डरमध्ये संबंधित माहिती असेल त्या फोल्डवर क्लिक करून open हा पर्याय निवडावा.
८)    हे सर्व झाल्यानंतर निळ्या रंगात असलेल्या send  च्या बटनावर क्लिक करा. अशा पद्धतीने आपण माहिती सहज दुसऱ्या व्यक्तीला काही सेकंदात पाठवू शकतो.
९)    जर जीमेल वरुन गप्पा मारायचा असतील तर compose च्या खाली असलेल्या पर्यायांपकी chat च्या पर्यायावर क्लिक करावे.
१०)    आता ज्या व्यक्ती त्या वेळेस उपस्थित असतील म्हणजे ऑनलाइन असतील त्यांच्या नावासमोर हिरव्या रंगाचा गोल दिसेल.
११)    ज्या व्यक्तीशी गप्पा मारायच्या असतील त्याच्या नावासमोर क्लिक करताच एक खिडकी सुरू होईल, तिथल्या छोटय़ाशा चौकोनात तुम्हाला हवा असलेला मजकूर लिहून आपण गप्पा मारू शकता. चला तर मग. हे इतकं शिकल्यावर कुणाशी चॅट केलंत ते आम्हाला नक्की कळवा. आणि शंका असल्यास त्याही विचारा पण तुमच्या इमेल वरून.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2014 1:05 am

Web Title: lets chat on internet
टॅग : Computer
Next Stories
1 ब्रह्मानंदी टाळी..
2 गणिताची साथ
3 पोटगीचा अधिकार
Just Now!
X