26 January 2021

News Flash

ओठांची काळजी

० वातावरणातील बदल, वाढते वय आणि ‘ब’ जीवनसत्त्वाची कमतरता यामुळे ओठ फुटतात. ओठांच्या कडेला भेगा पडल्यामुळे तोंड उघडणे कठीण होते. यापासून सुटका होण्यासाठी फळे, भाज्या,

| July 25, 2015 01:01 am

० वातावरणातील बदल, वाढते वय आणि ‘ब’ जीवनसत्त्वाची कमतरता यामुळे ओठ फुटतात. ओठांच्या कडेला भेगा पडल्यामुळे तोंड उघडणे कठीण होते. यापासून सुटका होण्यासाठी फळे, भाज्या, मासे, अंडी, सुकामेवा, दूध यांसारख्या पदार्थाचा आहारात समावेश करावा. तसेच योग्य प्रमाणात पाणी पिणे ओठांसाठी आवश्यक आहे.
० ओठ कोरडे झाल्यास त्यावर ताजे लोणी लावावे, त्यामुळे ओठांना ओलावा मिळून ओठ मुलायम होतात.
० ओठ दाताने कुरतडण्याच्या सवयीमुळे ओठांच्या त्वचेला हानी पोहोचते. ओठांचे पापुद्रे निघतात, भेगा पडतात, त्वचा खेचली गेल्याने त्यातून रक्त येते, ओठ राठ दिसतात. यासाठी ग्लॉसी लिपस्टिक वापरून ओठांना ओलावा मिळवता येईल किंवा लीप बामचा वापर करता येईल. हे पारदर्शी रंगांचेही असते.
० सकाळी, रात्री ब्रश करताना तो ब्रश ओठांवरून फिरवावा, त्यामुळे ओठावरील मृत त्वचा निघून जाईल. लोणी आणि मीठ एकत्र करून ओठांना मसाज केल्यामुळेही ओठांवरील मृत त्वचा निघून जाते.
० कोरडय़ा पडणाऱ्या ओठांसाठी रात्री झोपताना व्हॅसलिन व लिंबाचा रस एकत्र करून ओठांना लावावा.
० ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी कच्च्या दुधात केसर घालून ते ओठांवर चोळा यामुळे ओठांचा काळेपणा जाऊन ओठ चमकदार दिसतील.
० शेंगदाण्याच्या तेलाने ओठावर मसाज करून नंतर सुती कपडय़ाने पुसून घ्या. ओठ नरम होतील.
० लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना व्हॅसलिन लावून त्यावर लिपस्टिक लावल्यास ती जास्त वेळ राहते.
० लावलेली लिपस्टिक ओठांवर जास्त वेळ राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवलेली लिपस्टिक लावावी.
० लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर टाल्कम पावडरचा थर लावून बेस तयार करून नंतर त्यावर लिपस्टिक लावल्यासही लिपस्टिक बराच वेळ टिकून राहते.
० रात्री झोपताना लिपस्टिक स्वच्छ धुऊन त्यावर लीप बाम किंवा तूप लावावे.
० गडद रंगाची लिपस्टिक लावली की ती दातांना लागते आणि बोलताना-हसताना ते वाईट दिसते.
० गडद लिपस्टिक लावल्यावर पेपर नॅपकिन किंवा रुमाल ओठांच्या मध्ये ठेवून ओठांनी दाब द्यावा त्यामुळे जास्तीची लिपस्टिक टिपली जाऊन आजूबाजूला पसरत नाही.
संकलन- उषा वसंत unangare@gmail.com

* You can’t have a better tomorrow if you are thinking about yesterday all the time.
-Charles Kettering

* If you focus on results, you will never change,But you will focus on change, you will get results.
-Jack Dixon

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2015 1:01 am

Web Title: lip care tips
Next Stories
1 मायक्रोवेव्ह ओव्हन वापरताना…
2 पायांची काळजी
3 बहुउपयोगी नेलपेंट
Just Now!
X