25 October 2020

News Flash

करून बघावे असे काही

० घरातील पुस्तके चांगल्या स्थितीत राहावीत म्हणून ती आर्द्रता नसणाऱ्या ठिकाणी ठेवावी, कारण कागद ओलावा शोषून घेत असल्याने ओलावा असणाऱ्या ठिकाणी, पुस्तकाची पाने लवकर फाटण्याची

| June 20, 2015 12:08 pm

० घरातील पुस्तके चांगल्या स्थितीत राहावीत म्हणून ती आर्द्रता नसणाऱ्या ठिकाणी ठेवावी, कारण कागद ओलावा शोषून घेत असल्याने ओलावा असणाऱ्या ठिकाणी, पुस्तकाची पाने लवकर फाटण्याची शक्यता असते.
० सोयीसाठी पुस्तके आपण उभी ठेवतो, परंतु त्यामुळे पुस्तकांचे बाइंडिंग लवकर निघते, काही वेळा पुस्तकांची पानेही निखळतात, त्यामुळे पुस्तक काढून घेताना घाईघाईत ओढून न काढता सावकाश काढावे.
० पुस्तक वाचनासाठी घेतल्यास ते मागील बाजूने तळहातावर पकडावे.
० पुस्तकाची पाने उलटताना सावकाश उलटावीत. जोरात उलटल्याने शिलाई किंवा डकवण निघून पाने खिळखिळी होऊन निखळतात.
० पुस्तक वाचत असताना द्रवपदार्थ घेणे किंवा खाणे करू नये. कारण पुस्तकावर द्रवपदार्थ सांडून किंवा खाण्याच्या पदार्थाचा तेलकटपणा पानांना लागून कायम स्वरूपाचे डाग पडतात.
० पुस्तक एका बैठकीत वाचून होण्यासारखे नसेल किंवा काही वेळाने ते पुन्हा वाचायचे असेल तर वाचत असलेले पान टोकाला न दुमडता खुणेसाठी बुकमार्कचा वापर करावा.
० काही वेळा पुस्तके शेल्फमध्ये ठेवली जातात आणि ती महिनोन् महिने किंवा अगदी वर्ष वर्ष तशीच राहातात. तसे न करता महिन्यातून कधीतरी पुस्तके उघडून पहावीत. तशीच राहिल्यास त्याला कसर वा वाळवी लागते.
० मराठी, हिंदी, इंग्रजी अशी पुस्तकांची वर्गवारी केल्यास तसेच यातूनही कथासंग्रह, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, विज्ञान संदर्भासाठी अशी उप वर्गवारी करून रचना केल्यास उगाचच पुस्तके हाताळली जाऊन पुस्तकाची पाने निघणार नाहीत.
० पुस्तकांच्या शेल्फमध्ये कापूर, डांबरगोळ्या ठेवून कपाट व पुस्तकांचे आयुष्य वाढवू शकता.

संकलन- उषा वसंत – unangare@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2015 12:08 pm

Web Title: look after your home library
Next Stories
1 करून बघावे असे काही
2 फर्निचरची काळजी
3 करून बघावे असे काही
Just Now!
X