परीक्षेचा शेवटचा पेपर दिला की त्याच रात्री झुकझुक गाडीत बसून मामाच्या गावी जाणाऱ्या पिढीला त्याचं भलतंच आकर्षण असायचं. पण आताच्या पिढीचं काय? तुम्हाला काय वाटतं, या मुलांचा मामाचा गाव हरवलाय? दरवर्षी एकाच ठिकाणी दोन महिने जात असूनही तुम्ही जो नात्यांचा गोडवा अनुभवला, निसर्ग उपभोगलात ते करायला आजची मुलं उत्सुक असतात? की ही संकल्पनाच हरवलीय?  काय गवसलं तुम्हाला आणि काय हरवलंय मुलांचं? कळवा तुमचे अनुभव २०० शब्दांत. या पत्त्यावर -‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा.
chaturang @ expressindia.com