सिंगल पॅरेन्ट किंवा एकल पालक असणं, तेही आर्थिकदृष्टय़ा निम्नस्तरातील, हे  मुलं असलेल्या स्त्रीसाठी किती अवघड असू शकतं याची कल्पनाच केलेली बरी. पतीचं अकाली निधन झालेल्या किंवा घटस्फोटित असणाऱ्या या स्त्रियांनी मुलांना एकटीनं वाढविलं. त्यांच्या शिक्षणाविषयी आग्रही असणाऱ्या या स्त्रियांनी त्यासाठी घरकाम, धुणीभांडीही केली, आजही करीत आहेत. अशा या आपल्या आईविषयी मुलींनी लिहिलेले हे निबंध. आईच्या कष्टाची मनोमन जाणीव असलेले.‘डोंबिवलीच्या ज्ञानदीप स्त्री जागृती मंच’ने या स्त्रियांना एकत्र आणलं ते मैत्रीण आधार गटाच्या माध्यमातून. त्यांच्यासाठी अनेक कार्यक्रमही आयोजित केले. त्यांना प्रोत्साहन दिलं. या एकल स्त्रियांच्या मुलींसाठी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेतील हे सहा निवडक निबंध. आठवी ते दहावी आणि अकरावी, बारावी या दोन गटांसाठीच्या या स्पर्धेतील खरं तर सर्वच निबंध हृदयस्पर्शी होते. मात्र जागेअभावी हे निवडक सहा निबंध प्रसिद्ध करीत आहोत. अगदी त्यांच्याच भाषेत. उद्याच्या (११मे ) जागतिक मातृदिनानिमित्त या मातांना आमचा सलाम !