फुलांची, फळझाडांची, भाजीपाल्याची बाग फुलवायची म्हणजे बागेसाठी प्रामुख्याने लाल माती, कोकोपीट, गांडूळ व इतर खते, तयार रोपे, बी- बियाणे आणणे, याशिवाय पर्याय नाही, असे आपण मानतो. पण यांना खूप सारे पर्याय आहेत व ते सहज साध्य आहेत. 

अशी उपलब्ध नसíगक संसाधने म्हणजे काय तर घरातील ओला नसíगक/ जैविक कुजणारा कचरा, परिसर व बागेतील सुका पालापाचोळा, नारळाच्या शेंडय़ा..रसवंतीवर मिळणारे उसाचे चिपाड, खरकटे पाणी अर्थात हे वापरावयाचे एक वेगळे व्यवस्थापन विज्ञान तर आहेच पण त्याचे घरच्या घरी उत्तम खतही तयार करता येते. अर्थात हे खतही विविध प्रकारे व सहज सोप्या-साध्या तंत्रातूनही साध्य करता येते. यातून ‘गारबेज टू गार्डन’ ही संकल्पनाही प्रत्यक्षात उतरवता येते. घरातील कचरा बागेसाठी व बागेतील उत्पन्न घरासाठी अशी चांगली सांगड घालता येते. असा हा बाजार मुक्त पर्यायाचा विचार केल्यास आपली बाग आनंदाने फुलते, बहरते आणि त्याचा हळूहळू परतावा मिळू लागतो.
संदीप चव्हाण

How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?