२४ ऑगस्टच्या ‘चतुरंग’ पुरवणीतील अमृता सुभाष यांचा ‘थम्स अप’ हा लेख मनापासून आवडला. वाचताना उंबऱ्याला ‘हात रे’ म्हणत नातवंडांना ‘उगी उगी’ करणाऱ्या माझ्यासारख्या अनेक आज्या अंतर्मुख झाल्या असतील. बालसंगोपनात नवी दृष्टी दाखवणारा असाच एक अनुभव मी अलीकडेच घेतला. माझ्या एका मैत्रिणीच्या सुनेला मुलगा झाला म्हणून त्याला बघायला आम्ही २/४ जणी तिच्या घरी गेलो होतो. त्यावेळी तिची दुबईस्थित मुलगी आपल्या ३ वर्षांच्या मुलीसह नुकतीच माहेरी आली होती. बाळाला आंघोळीआधी तेल लावण्याचा कार्यक्रम सुरू होता. ती छोटी मुलगी सगळं कुतुहलाने बघत होती. मध्येच तिने बाळाच्या लिंगाकडे बोट दाखवून आईला विचारलं, ‘याला हे काय आहे?’ यावर माझ्या मैत्रिणीने तिच्या आईला तिला बाहेर घेऊन जा म्हणून खूण केली. आम्हाला पण काय बोलावे ते सुचेना. पण तिची आई पुढे आली आणि तिला समजावून सांगू लागली, ‘हा बॉय आहे. बॉईजना शू करण्यासाठी असा ऑर्गन (भाग) असतो. तू गर्ल आहेस ना? म्हणून तुला वेगळा ऑर्गन (भाग). समजलं?’ या उत्तराने त्या चिमुरडीचं समाधान झालं असावं, कारण मग लगेचच तिच्या प्रश्नांची गाडी दुसरीकडे वळली. ते पाहून आम्हीही ‘असं उत्तर आम्हाला नसतं बाई सुचलं.’ म्हणत कौतुकाने त्या आईची पाठ थोपटली.
-संपदा वागळे, ठाणे
पुरुषांची कुचंबणा
१७ ऑगस्टच्या चतुरंगमधील अमिता बडे यांचा ‘कधी कधी आम्ही संसार करतो’ हा लेख वाचला. लेखिकेने अशा प्रकारे संसार करणाऱ्या स्त्री-पुरुषांची कुचंबणा व कैफियत चांगल्याप्रकारे मांडली आहे. यात स्त्रियाच नाही तर पुरुषांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
पण लेखात घेतलेली उदाहरणे बहुतांश करिअरिस्ट स्त्री- पुरुषांची आहेत. म्हणून ते काहीसे सुखवस्तूही आहेत. पण अनेक वेळा निम्नस्तरातील पुरुषही, पत्नी व मुलांना एका ठिकाणी ठेवून एकटे नोकरीच्या ठिकाणी जात असतात. त्यांची अनेक पातळ्यांवर होत असलेली कुचंबणा कुणाच्या फारशी गावीही नसते. अर्थात त्याला कारणेही त्यांनी कुटुंबात व समाजात घेतलेली वरचढपणाची भूमिका हेच असते.  मुलांचे शिक्षण, जागेची टंचाई, वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी, कुटुंबातील इतर व्यक्तींच्या स्थैर्याला दिलेले प्राधान्य यामुळे अनेक वेळा कुटुंब मागे ठेवून बदली बढती  किंवा नव्या नोकरीवर पुरुष एकटेच जातात. कर्त्यां पुरुषाच्या अनुपस्थितीत पत्नी, मुले, वृद्ध आई-वडील यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतेच. पण एकटय़ा पुरुषालाही खाण्या-पिण्याची आबाळ, प्रकृती अस्वास्थ्य, होम सीकनेस, दोन्हीकडचा वाढीव खर्च, सारखा प्रवास व भकास एकटेपणा अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. काही ठिकाणी तर असं लांब सतत राहिल्यामुळे या पुरुषांचे पत्नी व मुले यांच्याशी फारसे भावनिक नातेच उरत नाही. त्यामुळे निवृत्तीनंतर कुटुंबात परतल्यावर  अवस्था कठीण होते.
-श्रीनिवास गडकरी, पेण.
संस्कार महत्त्वाचेच
२४ ऑगस्टमधील ‘स्वागत की निरोप’ हा लेख कल्पना देशपांडे यांचा सवरेत्कृष्ट व भावनाप्रधान आहे. ‘शेजारधर्म’ कसा पाळला जातो याचे एक उत्तम उदाहरण आहे. नवीन येणाऱ्या सुनेला काहीही कळू न देता, तिचे स्वागत नवीन घरात करणे याहून सासू-सासऱ्यांचे मानसिक औदार्य दिसून येते. यासाठी प्रत्येक व्यक्तीला संस्काराची गरज असते. परंतु आजची नवीन पिढी अशी आहे की, त्यांना संस्कृती व संस्कार या गोष्टी निर्थक वाटतात. मात्र त्याचा कधी कसा उपयोग होतो हे त्यांना वरील लेख वाचला असल्यास समजून येईल.
– विजया ना. भट, बोरिवली.
लेखन ‘शैली’ भावली
‘सावळे परब्रह्म आवडे या जीवा’ बाबा महाराज सातारकर यांच्या लेखाचे शब्दांकन माधुरी-ताम्हणे यांनी फारच चांगल्या शैलीत केले आहे. हा लेख मला खूप आवडला. याच्यात जो आमचा सामाजिक प्रश्न वृद्ध ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत सांगितला आहे तो मनाला खूपच भावला. कारण ह्य़ाचा अनुभव समाजात फेरफटका मारला तर क्षणोक्षणी दिसून येतो. आज काही मुले आणि सुना अतिशय उर्मटपणे वागतात. काही ठिकाणी सुना सासूला मारतात, बाथरूममध्ये कोंडून ठेवतात. संरक्षणाच्या नावाखाली व सुरक्षितेसाठी वृद्ध माणसांना आंत ठेवून बाहेरून कुलूप लावतात असे प्रकार सुशिक्षित कुटुंंबात अगदी जवळून पाहिले आहेत. तेव्हा मनात येत की पुंडलिकाच्या मनात जेव्हा परिवर्तन झालं, तेव्हाच तो आईवडिलांची सेवा करू लागला. त्याने वीट भिरकावली व त्या विटेवर कर कटावरी घेऊन विठोबा उभा राहिला, तसेच आज मुलांच्या व सुनांच्या मनात परिवर्तन होण्यासाठी पांडुरंगाने अवतार घ्यावा.
 विठूरायाने एकविसाव्या शतकात परत अवतार घेऊन आमच्या समाजातील जातीयवाद, अत्याचार, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि वृद्ध ज्येष्ठ नागरिकांचे हाल अशा समस्यांचे मूळ नष्ट करून समाजात सुख, शांती निर्माण करावी, अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.
-उज्ज्वला नी. मालाडकर, पवई.
दाभोलकरांचे विचार सर्वदूर जावेत
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या  ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावरील विचारांचे संकलन करून सुमन ओक यांनी लिहिलेला लेख व त्यात प्रकट केलेले त्यांचे स्वत:चे विचार अत्यंत आवडले. हा लेख प्रसिद्ध केल्याबद्दल चतुरंग, लोकसत्ता यांचे अनेक आभार.
यातील विचार फारच वास्तववादी आहेत. जर खुळचट सांस्कृतिक समजुतीनं/अंधश्रद्धांना धक्का द्यायचा असेल तर तो खूप जोरात व सर्व स्तरांवर  दिल्याशिवाय मानसिकतेची जडणघडण बदलणे तर दूरची गोष्ट आहे, पण मोठय़ा संख्येने तरुणाई तसेच इतर सर्व क्षेत्रांतील, सर्व स्तरांतील नागरिक किमान विचार करण्यास प्रवृत्त तरी  होतील असे वाटते. अन्यथा ही कुरूप बाजू समाजातून कधीही पुसली जाईल असे वाटत नाही. जादूटोणाविषयक वटहुकुम जारी झाला त्याला किती दिवस उलटले, परंतु किती बुवाबाजी करणारे या वटहुकुमांतर्गत पकडले गेले? लोकांनी तक्रारी तरी केल्या का ?
 लेखातील सर्व आवडले, पण एक गोष्ट खटकली आणि ती म्हणजे ‘डॉ. शरद जहागीरदारांना (दिवंगत जस्टिस जहागीरदार यांच्या सुविद्य पत्नी)’ अशी ओळख. या देशातील स्त्रीला ‘कोणत्या तरी पुरुषाची कोणी तरी’  अशी ओळख जोपर्यंत लागेल तोपर्यंत सुधारणेला सुरुवात होईल असे वाटत नाही. आपली संस्कृती मुळात चांगलीच आहे; परंतु काही स्वार्थी, संधिसाधू लोकांनी चुकीचे अर्थ काढून, लोकांना शिक्षणाच्या हक्कापासून दूर ठेवून त्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेत, आपण लावलेला अर्थच कसा बरोबर आहे,  हे लोकांच्या गळी उतरवून तिची वाट लावली असावी. प्रत्येक धार्मिक सणाला एक कुरूप वलय प्राप्त झालेय. परंतु आम्ही फक्त सत्य आणि सत्यच दाखवतो असा दावा करणारी प्रसिद्धीमाध्यमं त्या कुरूप सत्याचं चित्रीकरण दाखवण्याची तयारी ठेवत नाहीत. त्यामुळे कुरूप सत्य दडपले तर जातेच, परंतु वर्षांगणिक त्यात वाढच होताना दिसते. काही नेते असे सांगतात की, या सणांमुळे अनेक जणांना रोजगार मिळतो, ते खरेही आहे व सण साजरे करायला हरकत नाही; परंतु  चुकीचे संदेश देणे थांबायला हवे, बाजारूपण थांबायला हवे. हे राज्य १०-११ कोटी लोकसंख्येचे आहे. सणांमुळे खरोखर किती जणांना रोजगार मिळतो तेही एकदा शोधून काढायला हवे.
 – राधिका जे.
‘हा तर मानवतेला शाप!’
‘जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले’- श्रीसंत तुकाराम. ‘अश्रूंची फुले’ फुलविणाऱ्या पद्मजा गोडबोले म्हणजे २१व्या शतकात अवतरलेल्या फ्लोरेन्स नाईटिंगेलच जणू! ३ ऑगस्टच्या ‘ प्रत्यक्ष जगताना’ या सदरातील लेख वाचल्यावर मन भरून आले.
ऑटिझम हा रोग नसून ती जन्मस्थ अवस्था आहे, हे त्यांच्याकडे येणाऱ्या पालकांना समजावून दिले व त्यांच्या दु:खावर फुंकर घालून, त्यासाठी त्यांनी ‘प्रसन्न ऑटिझम सेंटर सुरू केले. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. ऑटिझम हा होतो? पालकांना त्याचे कारण त्यांनी समजूतदारपणे पटवून दिले. गर्भ तयार होताना, गुणसूत्राचे एकत्रीकरण होत असताना मूल जन्मण्यापूर्वीच मुलाच्या मेंदूवर तडाखा बसून, मज्जा संस्था, श्वसन संस्था, स्नायू संस्था कमजोर होऊन मूल दुर्दैव घेऊनच जन्माला येते. व याला ‘स्वमग्नता’ असे संबोधले जाते. मेडिकल सायन्समध्ये एवढी प्रगती झाली, तरी ‘स्वमग्नता’ घेऊन मूल जन्मालाच येऊ नये, त्याला प्रतिकार करण्याचे कोणतेही उपाय व त्याचे संशोधन झालेले नाही. हा मानवतेला केवढा मोठा शाप!  पद्मजा गोडबोले आपले सर्वस्व पणाला लावून, पाश्चात्य देशांतील ‘ऑटिझम’ शाळांना भेटी देऊन नेटाने प्रयत्न करीत आहेत. त्यांचे आभार मानायला हवेत.
-मधुमालती पुजारे, मुंबई
‘मैत्रीचा प्रांजळ प्रत्यय’
३ ऑगस्टच्या चतुरंग पुरवणीतील ‘अखंड मैत्रीचा झरा’ या संपदा वागळे यांच्या लेखाने आमच्या मैत्रीची किर्ती पार सातासमुद्रापलिकडे पोहचली. त्या दिवशी आणि पुढचेही काही दिवस प्रत्येकाचा फोन नुसता घणघणत होता. मेल बॉक्स ओसंडून वहात होते. यामध्ये प्रत्येकाला आलेला पहिला फोन होता. प्रकाश जाधव या आमच्या जिवलग मित्राचा. ज्याचं नाव लेखात अनवधनाने राहून गेल होतं. त्याच्या दिलखुलास बोलण्याने मनात उगवू पहाणारं झाकोळ क्षणार्धात नाहीस झालं आणि आमच्या प्रांजळ नात्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाल. अशी ही आमची आगळीवेगळी मैत्री या जन्मीच नव्हे तर जन्मजन्मांतरी अशीच राहो एवढच परमेश्वरापाशी मागणं.
-दीपक पाटील, प्रदीप नाईक

-संपदा वागळे, ठाणे<br />पुरुषांची कुचंबणा

dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
Loksatta editorial Government bans sugar mills from producing ethanol
अग्रलेख: धडाडांची धरसोड!
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार

‘हा तर मानवतेला शाप!’
‘जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले’- श्रीसंत तुकाराम. ‘अश्रूंची फुले’ फुलविणाऱ्या पद्मजा गोडबोले म्हणजे २१व्या शतकात अवतरलेल्या फ्लोरेन्स नाईटिंगेलच जणू! ३ ऑगस्टच्या ‘ प्रत्यक्ष जगताना’ या सदरातील लेख वाचल्यावर मन भरून आले.
ऑटिझम हा रोग नसून ती जन्मस्थ अवस्था आहे, हे त्यांच्याकडे येणाऱ्या पालकांना समजावून दिले व त्यांच्या दु:खावर फुंकर घालून, त्यासाठी त्यांनी ‘प्रसन्न ऑटिझम सेंटर सुरू केले. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. ऑटिझम हा होतो? पालकांना त्याचे कारण त्यांनी समजूतदारपणे पटवून दिले. गर्भ तयार होताना, गुणसूत्राचे एकत्रीकरण होत असताना मूल जन्मण्यापूर्वीच मुलाच्या मेंदूवर तडाखा बसून, मज्जा संस्था, श्वसन संस्था, स्नायू संस्था कमजोर होऊन मूल दुर्दैव घेऊनच जन्माला येते. व याला ‘स्वमग्नता’ असे संबोधले जाते. मेडिकल सायन्समध्ये एवढी प्रगती झाली, तरी ‘स्वमग्नता’ घेऊन मूल जन्मालाच येऊ नये, त्याला प्रतिकार करण्याचे कोणतेही उपाय व त्याचे संशोधन झालेले नाही. हा मानवतेला केवढा मोठा शाप!  पद्मजा गोडबोले आपले सर्वस्व पणाला लावून, पाश्चात्य देशांतील ‘ऑटिझम’ शाळांना भेटी देऊन नेटाने प्रयत्न करीत आहेत. त्यांचे आभार मानायला हवेत.
-मधुमालती पुजारे, मुंबइर्