18 March 2019

News Flash

‘रिव्हेंज पोर्न’ची विकृती

‘रिव्हेज पोर्न’ हा शब्दच पुरेसा आहे त्याचा अर्थ समजून घ्यायला आणि त्यातलं गांभीर्यही स्पष्ट करायला! ही संकल्पना खरं तर आपल्याकडे आता आता कुठे गंभीरतेनं घेणं

| July 18, 2015 01:01 am

ch12‘रिव्हेज पोर्न’ हा शब्दच पुरेसा आहे त्याचा अर्थ समजून घ्यायला आणि त्यातलं गांभीर्यही स्पष्ट करायला! ही संकल्पना खरं तर आपल्याकडे आता आता कुठे गंभीरतेनं घेणं सुरू झालंय, पण उर्वरित देशात मात्र खूप काही घडून गेलंय, मागच्या काही वर्षांत! विकृतीमुळे आणि काहींमध्ये या विकृतीत असणाऱ्या सुडाच्या भावनेने अनेक मुलींची आयुष्यं उद्ध्वस्त झाली आहेत.. कित्येकींची आयुष्यं खोलीआड बंदिस्त झाली आहेत, तर कित्येक जणी नैराश्य, मानहानी, अपमान आणि विश्वासघाताच्या भावनेनं जगणंच विसरल्यात आणि यात फक्त तरुण मुलीच नाहीत तर अगदी मध्यमवयीन, प्रौढाही आहेत.
‘रिव्हेज पोर्न’ ही विकृती आहे नग्न वा अर्ध नग्न फोटो आणि अश्लील व्हिडीयो क्लीप्स सोशल मिडियावर शेअर करण्याची! अनेकदा ब्रेकअप झाल्यानंतर विस्कटलेला, सुडाने पेटलेला बॉयफ्रेंड, काहीवेळा तर नवराही, मैत्रिणीचे वा बायकोचे नको नको ते फोटो किंवा त्यांच्यातल्या संबंधांचे व्हिडियो क्लीप्स वेबसाईटवर टाकून मोकळा होतो. काही वेळा तर अशा ब्रेकअपचीही गरज नसते. एखादी व्यक्ती आवडतेय, पण आपल्याला मिळत नाही. मग मिळवा तिचे फोटो किंवा करा तिच्या फोटोत बदल आणि पाठवा वेबसाइटवर. मग एका साइटवरून दुसऱ्या साइटवर, एका ग्रुपवरून दुसऱ्या ग्रुपवर, काही क्षणात ते फोटो अनेकांपर्यंत पोहोचतात आणि हे तिला कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि त्या साइटवरून फोटो काढेपर्यंत तर इतका वेळ जातो की दरम्यान भरून न निघणारी हानी होऊन गेलेली असते.
खरं तर स्त्रीचे नग्न वा अर्धनग्न फोटो मासिकांमधून प्रसिद्ध होणं हे आपल्यासाठी नवीन नाही. पण त्यांची त्यासाठी परवानगी असते. पण इथे तिची परवानगी तर दूरच अनेकदा आपला फोटो घेतला जातोय, किंवा आपला व्हिडीयो शूट केला जातोय याचीही तिला कल्पना नसते. आत्तापर्यंत अनेक देशांतल्या अक्षरश: हजारो मुली या विकृतीला बळी पडल्या आहेत. बेसावधपणे किंवा प्रियकरांच्या प्रेमात बुडालेल्या या मुली मोठय़ा आनंदाने फोटो काढू देतात, काढतात किंवा त्यांच्यातले काही ‘इंटिमेट’ क्षण कॅमेराबद्ध करण्याचा मोह त्यांनाही आवरत नाही. पण जेव्हा त्या दोघांचं बिनसतं तेव्हा मात्र हेच फोटो किंवा व्हिडीओ क्लिप प्रियकराच्या हातातलं कोलीत बनतं, लक्षणीय बाब म्हणजे यात ९० टक्के स्त्रिया याच्या शिकार झालेल्या असल्या तरी शिकार झालेल्या पुरुषांचीही संख्याही १० टक्के आहे.
खरं तर या घटना इंटरनेट सुरू झाल्यानंतर सुरू झाल्याच होत्या, मात्र पहिल्यांदा जगभराचं लक्ष त्याकडे वेधून घेतलं गेलं ते हंटर मूर याने २०१० मध्ये सुरू केलेल्या isanyoneup.com या वेबसाइटमुळे. लोकांनी पाठवलेले अश्लील फोटो छापायला त्याने सुरुवात केली. त्या व्यक्तीचं नाव, पत्ता, कामाचं ठिकाण सगळं काही सोबत जोडलेलं असे. अर्थात काही जणी स्वत:हून फोटो पाठवायच्या म्हणे तिथे, तर काही ‘हॅकर’सही आपलं काम बेमालूम करायचे. पण ज्यांचे असे ‘रिव्हेंज’ म्हणून फोटो पाठवले जायचे त्या स्त्रीची बदनामी अपरिहार्य असायची. अशा असंख्य शिक्षिका, नोकरदार स्त्रिया, वकील, विद्याíथनी काही तर अगदी गृहिणीही या विकृतीला बळी पडल्या आहेत. चुकीच्या माणसाच्या हातात आपलं आयुष्य सोपवल्यानंतर केलेली ‘भूल’ त्यांना फारच महागात पडते. अशा वेगवेगळ्या ठिकाणी फोटो प्रसिद्ध झाल्याने अनेक जणींच्या नोकऱ्या गेल्या आहेत, काहींचे संसार तुटले आहेत. मुलीचं शाळा-महाविद्यालयीन शिक्षण बंद झालं आहे. म्हणूनच कोणी तरी त्याच्याविरोधात आवाज उठवणं गरजेचं होतं. तो आवाज उठवला तो शॉरलेट लॉ हिने, ही घटना २०१२ ची. एके दिवशी तिच्या मुलीला कळलं की तिचे अश्लील फोटो या साइटवर आहेत. तिने पाहिलं तर तिच्या लक्षात आलं की ते फोटो तिने आपल्या मोबाइलमध्ये सेल्फी म्हणून काढलेले होते. मोबाईलमधून संगणकात तिने ते सेव्ह करताना कुणी तरी हॅक केले. कुणी केले, का केले या प्रश्नाची उत्तरं शोधण्यात वेळ घालवणं योग्य नव्हतं, कारण तिला फेसबुकवरून नको नको त्या कॉमेन्टस् यायला लागल्या होत्या. तिच्या आईने शॉरलेटने थेट हंटरला लिहिलं, काही फायदा झाला नाही, मग त्याच्या अ‍ॅटर्नीला, मग सव्‍‌र्हिस देणाऱ्या कंपनीला, फेसबुकला, हे फोटो वेबसाइटवरून कसे काढता येतील यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यायचा प्रयत्न केला पण तो मिळालाच नाही. ती वकिलाकडे पोहोचली. तो वकीलच नव्हे तर तिच्या नवऱ्यालाही तोपर्यंत या घटनेतलं गांभीर्य कळत नव्हतं. दुर्लक्ष करा, असं ते सांगत होते. पोलिसात गेले तर तिने असे फोटो काढलेच कशाला हे ऐकवण्यात आलं. शेवटी प्रकरण एफबीआयकडे गेलं तेव्हा कुठे ९ दिवसांनंतर तिचे फोटो त्या साइटवरून काढण्यात यश आलं. पण तोपर्यंत या साईटमुळे उद्ध्वस्थ झालेल्या अनेकींचे अनुभव तिने गोळा केले होते, ते तिने पोलिसांच्या हाती दिले आणि मोठय़ा लढाईनंतर ही साईट बंद पाडण्यात त्यांना यश मिळालं. आता अटक झालेल्या मूरलाही किमान २ ते ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते. या साईटला इतका प्रतिसाद होता की मूर दर महिना वीस हजार डॉलर्स कमवायचा म्हणे.
शॉरलेटनंतर आणखी एका त्रस्त तरुणीने, हॉली जेकबने याविरोधात आवाज उठवला तो त्यातल्या क्रौर्यतेच्या विरोधात. endrevengeporn.com  नावाने तिने वेबसाइटच सुरू केली आणि मग याविरोधात कायदा येण्यासाठी तिने पावलं उचलली. सायबर सिव्हिल राइट्ससाठी प्रयत्न सुरू केले. सोशल मीडियावर तसेच ऑन लाइन बुलेटिनवर कुणाच्याही परवानगीशिवाय त्या व्यक्तीचे अश्लील फोटो, क्लीप्स किंवा त्या संदर्भातील माहिती पोस्ट करण्याला बंदी घालणारं धोरण ठरवण्यात आलं. त्यात मग ट्विटरही उतरलं, फेसबुकही आणि आता गुगलही. गुगलनंही असे फोटो वेबसाइटवर न टाकण्याचं आवाहन आपल्या पब्लीक पॉलिसी ब्लॉगवर टाकलंय.
जपाननं तर २०१४ मध्ये ‘रिव्हेज पोर्न’ फोटो अनधिकृत म्हणून जाहीर केले तर इस्रायलनं त्याचे ‘सेक्स क्राइम’मध्ये रूपांतर केलं. अमेरिकेच्या २३ राज्यांत याविरोधात कायदा केला गेलाय. आणि नुकतंच इंग्लंडमधला क्लेटन केनडी या २० वर्षीय तरुणावर केवळ सुडापोटी आपल्या गर्लफ्रेंडचे असे अश्लील फोटो साइटवर टाकल्याबद्दल खटला चालवला गेला. त्याला ४०० पौंडांची शिक्षा झाली असून या प्रकरणातला कायदेशीर शिक्षा झालेला हा पहिला गुन्हेगार ठरलाय.
खरं तर इंटरनेट आणि स्मार्टफोन आल्यापासूनच आपले ‘असे’ फोटो स्वत:ही काढू नका, काढू देऊ नका असं अगदी पोलीसही आवाहन करत आहेत. असे फोटो तुमच्या मोबाइलवरून, ईमेलवरून जरी तुम्ही डिलीट केले तरी ते डाटा रिकव्हरी करून परत मिळू शकतात. तेव्हा सावध राहा, असा सल्ला या प्रकरणातील सगळ्याच बळींनीही दिलाय. पण त्यांच्याही मनात खरं दु:ख आहे ते ‘आपल्या’ माणसाने केलेल्या विश्वासघाताचं!
जेव्हा माणसातलं माणूसपण संपतं आणि फक्त ‘हैवानियत’ उरते तेव्हा मग असं घडणं अपरिहार्य ठरतं, म्हणून आपणच सावध राहायला हवं
आरती कदम

First Published on July 18, 2015 1:01 am

Web Title: revenge porn
टॅग Woman