आजच्या या दुसऱ्या भागात आपण नादचतन्यरूप षट्चक्रांचा आणि मूळ नादचतन्य ॐकाराचा संबंध कसा आहे, हे समजून घेणार आहोत. विधात्याने षट्चक्रांच्या प्रत्येक पाकळीवर एकेका एकाक्षरी बीजमंत्राचे रोपण केले आहे. बीजाक्षर म्हणजे व्यंजन + ॐकारातील पहिली मात्रा अकार व ॐकाराची शेवटची मात्रा म्कार. व्यंजनाचे बीजाक्षरात रूपांतर कसे होते हे जाणून घेण्यासाठी आपण दोन्ही भुवयांमध्ये असलेल्या आज्ञाचक्राचे उदाहरण पाहू या.
आज्ञाचक्राची जागा म्हणजे महादेवाचा तिसरा नेत्र असे संबोधतात. (स्त्रिया कुंकू लावतात ती जागा) या चक्राला दोन पाकळ्या आहेत. त्या प्रत्येक पाकळीवर एकेक बीजाक्षर स्थित आहे. ती बीजाक्षरे म्हणजे अनुक्रमे हंम् आणि क्षंम् होत.
बीजाक्षर हंम् = ह + ॐकाराची पहिली मात्रा अकार (अ) + ॐकाराची तिसरी मात्रा
मकार (म्)
बीजाक्षर क्षंम् = क्ष+ ॐकाराची पहिली मात्रा अकार (अ) + ॐकाराची तिसरी मात्रा
मकार (म्)
याच पद्धतीने संस्कृत व्याकरणातील विविध व्यंजनांपासून निर्माण झालेली बीजाक्षरे उरलेल्या विविध चक्रांच्या पाकळ्यांवर सूक्ष्म सूक्ष्मतम रूपात वास करतात. त्या त्या नादचतन्यरूप बीजाक्षराचा उच्चार केल्यावर ती ती संबंधित चक्राची पाकळी स्पंदित होते. त्या चक्रावरील सर्व बीजाक्षरांचे म्हणजेच बीजमंत्रांचे उच्चारण केल्यावर त्या संबंधित चक्रावरील सर्व पाकळ्या एकदम स्पंदित होतात आणि ते चक्र पुलकित होते, उद्दीपित होते.
व्यंजनाचे बीजाक्षर होण्यात जशी ॐकारातील पहिली मात्रा अकार व शेवटची मात्रा म्कार याचा दृढ संबंध आहे. तद्वतच सर्व चक्रांचा व ॐकाराचा आणखी एका कारणाने घनिष्ठ संबंध आहे, तो असा. ॐकाराच्या साडेतीन मात्रा आहेत-अकार, उकार, मकार यांची प्रत्येकी एकेक मात्रा मिळून तीन मात्रा +िबदूमात्रा अर्धमात्रा. ॐकारातील या साडेतीन मात्रांची षट्चक्रांवरील प्रतिष्ठापना खाली नमूद केलेल्या तक्त्यांप्रमाणे आहे.
चक्राचे नाव- ॐकारातील मात्रा
मुलाधार – अकार (अ)
स्वाधिष्ठान – अकार (अ)
मणिपूर – उकार (उ)
अनाहत – मकार (म्)
विशुद्ध – मकार (म्)
आज्ञा , सहस्रदल – अर्धिबदू
आता विशिष्ट चक्रावर ॐकाराची विशिष्ठ मात्राच स्थित का? याचे प्रमुख कारण म्हणजे      अ उ म् व िबदू यांचे वेगवेगळे उच्चारण होताना त्या त्या चक्राच्या जागेवर साधकाला श्वासताणाची जाणीव होणे महत्त्वाचे आहे तरच त्या बीजाक्षराचा उच्चार शास्त्रशुद्ध झाला असे होईल, अन्यथा नाही. थोडक्यात, भारतीय तत्त्वज्ञानातील नादचतन्यरूप षट्चक्रांची संकल्पना ही संपूर्णपणे ॐकाराधिष्ठितच आहे. मूळ परमशुद्ध आत्मस्वरूप नादचतन्य ॐ सर्व षट्चक्रे व्यापून आहे.
म्हणूनच एका ॐ च्या शास्त्रशुद्ध उच्चारणात सर्व चक्रांच्या सर्व पाकळ्या एकाच वेळी पुलकित होतात, स्पंदित होतात व कार्यक्षम होतात, तेथील सूक्ष्म सूक्ष्मतम नादचतन्य शुद्ध होऊ लागते व त्यामुळेच नादचतन्यस्वरूप षट्चक्रांची शुद्धीकरण प्रक्रिया सुरू होते.
भारतीय तत्त्वज्ञानातील नादचतन्यस्वरूप षट्चक्र संकल्पना आध्यात्मिक असली तरी ती विज्ञानाधिष्ठितपण आहे.
अ‍ॅलोपॅथी म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्र, हे खूप प्रगत आहे, डोळस आहे. एक चांगली गोष्ट म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या ऑरा फोटोग्राफीच्या माध्यमातून नादचतन्याची मोहोळे असलेली ही सूक्ष्म सूक्ष्मतम षट्चक्रे आता डोळ्यांनाही दिसू शकतात. त्यामुळेच आधुनिक वैद्यकशास्त्रातील शास्त्रज्ञसुद्धा आता त्या सूक्ष्म सूक्ष्मतम षट्चक्रांच्या मानवी देहातील अस्तित्वाला व त्यांच्यातील समतौलिक कार्य आणि आरोग्याच्या संबंधाला जाणू लागले आहेत व मानूही लागले आहेत ही निश्चित आनंदाची गोष्ट आहे.
सारांश – ॐ नादचतन्यातून षट्चक्र नादशुद्धी
चक्र नादशुद्धीतून आरोग्यवृद्धी..

डॉ. जयंत करंदीकर – omomkarom@rediffmail.com

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…