News Flash

सेक्सी ग्रे शेडस्

ओवुमनिया, आपल्या जोडीदाराबरोबर जरा जास्तच रोमॅन्टिक व्हायला खरं तर एखाद्या दिवसाची वगरे वाट बघायची गरज नसावी ना, पण आज व्हॅलेन्टाइन्स डे..

| February 14, 2015 02:54 am

ओवुमनिया,  आपल्या  जोडीदाराबरोबर जरा जास्तच रोमॅन्टिक व्हायला खरं तर एखाद्या दिवसाची वगरे वाट बघायची गरज नसावी ना, पण आज व्हॅलेन्टाइन्स डे.. मग नेकी और पूछ पूछ ..  स्त्रियांना सेक्समध्ये फार इन्टरेस्ट नसतो, त्यांना शृंगारिक रोमान्स आवडत नाही, त्या पुढाकार घेत नाहीत.. किती आणि काय काय बोललं गेलंय ना. पण ते खरं आहे?
 ई. एल. जेम्स हिचा अनुभव जरा वेगळाच आहे, कारण तिने लिहिल्यात, ‘फिफ्टी शेडस् ऑफ ग्रे’ मालिकेतल्या तीन कादंबऱ्या. एक प्रेमकथाच, पण जरा जास्तच बोल्ड, इरॉटिक रोमान्स फॅन्टसीच्या रूपात मांडलेली. तिला अक्षरश: शेकडो मेल येताहेत. रोजच्या रोज. अगदी १८ वर्षांच्या तरुणीपासून  ८० वर्षांच्या आजींपर्यंतचे. आपले वैवाहिक जीवनातले शृंगारिक अनुभव त्या मनमोकळेपणाने शेअर करतात तिच्याशी. ‘तू आमच्या आयुष्यात रोमान्स परत आणलास, माझा नवरापण त्यामुळे खूप खूश आहे’ इथपासून ‘तुझ्यामुळे मला माझ्यातली वेगळी मी सापडले’ इथपर्यंत, काय काय सांगायचं असतं त्यांना तिला.
गेल्या चार वर्षांत या तिनही कादंबरीच्या १० कोटींहून जास्त प्रती खपल्यात (‘फिफ्टी शेडस् ऑफ डार्कर’  ‘फिफ्टी शेडस् फ्रीड्’)आणि त्याही प्रामुख्याने स्त्रीवर्गातच. तेही जगभरातल्या, कारण एक-दोन नाही तर पहिली कादंबरी ५२ भाषेत गेलीय. अगदी मराठीतही वाचकही आहेत बरं तिचे. आणि आता नव्याने यावर चर्चा
सुरू झालीय ती ‘व्हॅलेन्टाइन्स डे’च्या निमित्ताने कालच प्रदíशत झालेल्या याच नावाच्या चित्रपटामुळे. तो दिग्दíशत केलाय, सॅम टेलर-जॉन्सन या स्त्रीनेच, तितक्याच बोल्डपणे!  शृंगारिक फॅन्टसी इन्टेन्स करणाऱ्या जेम्सला वाटतं, ही एक लव्ह स्टोरी आहे,  प्रेम आहे तर सेक्स येणारच. पण हा जरा किंकी म्हणजेच थोडा विक्षिप्त आहे इतकंच. यात वेदना आहे. तिच्या प्रियकरात डॉमिनन्स आहे नि ती आहे, सबमिसिव्ह- शरणागत. त्याच्यावर सारं निछावर करणारी, त्यातून सुख उपभोगणारी. स्त्रीला पुरुषाकडून- नवऱ्याकडून असं ‘प्रोटेक्डेड’ प्रेम हवं असतं. त्यातूनच सुरुवातीला अगदी भोळी असणारी अनेस्शिया अर्थात अ‍ॅन पुढे पुढे कणखर होत जाते. बदलत जाणारी अ‍ॅना हाच कादंबरीचा जीव.
शृंगारिक प्रणय, तोही स्त्रीने लिहिलेला. त्यावर टीका होणार नाही, असं शक्य आहे? अगदी सलमान रश्दीसारख्यांनीही तो उथळ म्हणत त्यावर टीका केलीय. काहींनी तर या निमित्ताने स्त्रीच्या इरॉटिक फॅन्टसीचा थेट सव्‍‌र्हेच केला. ‘मिशीगन’च्या प्राध्यापक   डॉ. बोनोमी यांनी त्यांच्या या निष्कर्षांतून ‘ग्लॅमरायझेशन ऑफ व्हायलन्स’ या शब्दात या कादंबरीची बोळवण केलीय. ती सांगते, ज्यांचं वैवाहिक नातं विस्कटलेलं, िहसाचारी आहे, अशांनाच ही कादंबरी आवडते. तर काहींना स्त्रीचं शरणागत होणं पटत नाहीए. काहींना अ‍ॅनच्या ‘ रेड रुम     ऑफ पेन’मधलं पुरुषी वर्चस्व खटकतं.
जेम्स मात्र अशी टीका हसून टाळते. ती स्त्रीवादात वगरे जाणं नाकारत सांगते, या कादंबऱ्यांमुळे मला असंख्य मत्रिणी मिळाल्यात, आपलं रोमॅन्टिक, शृंगारिक नातं त्या मोकळ्या मनाने सांगणाऱ्या. असंख्य जणी ज्या कधी कादंबरी वाचत नव्हत्या त्या वाचायला लागल्या आहेत. अनेकींची आयुष्यं, लग्नं सावरली गेली. त्यांच्या आयुष्यातला रोमान्स परत आला. पुरे मला इतकंच.
एका बाईच्या नजरेतून शृंगारिक फॅन्टसी मांडलेली ही पहिलीच कादंबरी आणि म्हणूनच पहिलाच चित्रपट    असावा. तसं आपल्याकडेही            गौरी देशपांडेंच्या ‘थांग’मधला आणि मेघना पेठेंच्या ‘नातीचरामी’मधला  शृंगार थांबवतोच की आपल्याला. पण जेम्सने तो जगात सर्वत्र नेला..
तेव्हा आजचा व्हॅलेन्टाइन जर हटके व्हायलाच हवा..

तिला कुटुंब मिळालंय..
ch11जिलीने वयाच्या सातव्या वर्षी स्वप्न पाहिलं होतं, स्वत:च्या कुटुंबाचं. ती, तिचा नवरा आणि दोन मुलं, पण आयुष्य कुठे आपल्याला हवं ते दान पदरी टाकतं! मात्र मिळालेल्या दानाचं सोनं कसं करायचं ते ठरवतो आपला निर्णय. ऐन पस्तीशीत तिचं बॉयफ्रेंडशी बिनसलं. नवरा नसला म्हणून काय कुटुंब पूर्ण नाही होऊ शकत? तिला आई व्हायचंच होतं. लवकरात लवकर, कारण हाताशी असलेला वेळही भराभर पुढे सरकत होता. तिने निर्णय घेतला, एक अजब निर्णय! ती आई झाली दोन गोड गोजिरवाण्या मुलांची, दोन्हीही डाऊन
सिंड्रोम.. पण आता ती तिची, कायमसाठीची!
ती जिली स्मीथसन. एका विकलांग मुलांच्या शाळेत शिकवणारी. अशा मुलांच्या मानसिक, शारीरिक गरजा खूप जवळून माहीत असलेली. या मुलांना हवं होतं प्रेम. जे तिच्याकडे भरपूर होतं. तिने निर्णय तर घेतला, पण तो भावनेच्या भरात तर नाही ना? तिने स्वत:लाही अनेकदा विचारून याची खात्री करून घेतली. आपण सिंगल मदर असणार आहोत. पावलोपावली कुणाच्या तरी सोबतीची गरज लागणार आहे, आपण सांभाळू सारं एकटीने? पण तिच्या अंतर्मनाने कौल दिला. आणि ती एमिलीला भेटायला रुग्णालयात पोहोचली. ऑक्सिजनच्या नळ्यांमध्ये अडकलेल्या पाच       आठवडय़ांच्या एमिलीची निळ्याशार डोळ्यांची नजर एकटक तिलाच पाहात राहिली. तिने तिला हातात घेतलं आणि एका क्षणात दोघी एकमेकांच्या झाल्या. अर्थात तिला सांभाळणं सोपं नव्हतं. ती जन्मत:च व्यंग घेऊन आलेली. त्यातच तिची ओपन हार्ट सर्जरी करावी लागली. आज ती पाच वर्षांची आहे आणि आत्तापर्यंत तिच्या अशा तीन शस्त्रक्रिया झाल्यात. जिली सांगते, त्या सर्वच वेळी ती ज्या समजुतीने वागली, संयम, धाडसाने वागली त्याने मलाच कणखर बनवलं. ती मोठी झाल्यावर मग तिच्या कुटुंबातलं मुलाचं स्थान भरून काढलं टॉमने. तोही डाऊन सिंड्रोमचाच. ती सांगते, ‘‘मी त्यांना प्रेम आणि सुरक्षित घर देऊ शकत होते आणि त्यांना समजून घेऊ शकत होते. टॉम एमिली इतका नाजूक नव्हता. पण त्यालाही ओपन हार्ट सर्जरीला सामोरं जावं लागलं. आज तोही दोन वर्षांचा झालाय. आणि एमिली त्याला सांभाळते.  एकत्र लायब्ररीत जाणं, बागेत खेळणं, अभ्यास करणं. मुलांचं मोठं होत जाणं जिलीतल्या आईला कृतार्थ करतंय. आई असणं सोपं नसतंच, पण जाणीवपूर्वक असं मातृत्व स्वीकारणं तर त्याहून कठीण, पण जिली ते जगते आहे. आनंदाने, समाधानाने, कृतार्थतेने!

सेफ शॉपिंग?
‘‘तुला काय हवंय आज व्हॅलेन्टाइन डेला’, असं तुमच्या ‘अरे’ने विचारलं तर, ‘तुला माहीत आहे मला काय हवंय ते’ किंवा ‘तूच शोधून काढ बरं..’ असं काही तरी सांगण्याच्या भानगडीत पडू नका बरे. कारण यंदा अमेरिकेत तरी आजच्या दिवशी अनेकांचा अपेक्षाभंग व्हायचीच शक्यता जास्त आहे. एका ऑनलाइन सव्‍‌र्हेनुसार दहापैकी आठांचे अंदाज चुकलेले आहेत. त्याने तिच्यासाठी एक गिफ्ट निवडलंय नि तिला त्याच्याकडून दुसरंच काही तरी हवंय. सर्वात जास्त खरेदीची ऑर्डर आहे फुलांची, सेफ शॉिपग!  त्याच्या अंदाजानुसार तिला फारशी नाराज न करणारी.  त्या खालोखाल  दागिने, चॉकलेट्स, परफ्युम, कार्ड्स, टॉईज.  रोमॅन्टिक स्वप्न पाहाणाऱ्या तिला ड्रिमी इनर्सची अपेक्षा आहे, पण त्याने मात्र कार्ड्सची ऑर्डर दिलीय. कॅण्डल लाईट डिनरची अपेक्षा असणाऱ्या तिला चॉकलेट्सवरच समाधान मानावं लागणार, असं दिसतंय.. काहीही असो, पण यंदा गेल्या चार वर्षांतला रेकॉर्ड तोडला गेलाय.. ‘व्हॅलेंटाइन्स डे’चं स्तोमच मुळी खरेदी, उद्योगधंद्यात बरकत यावी म्हणून वाढवलं गेलं असल्याने गाडी योग्य मार्गाने जाते आहे यात शंका नाही. पण यंदा पुरुषांनी खरेदीत बाजी मारली आहे हे विशेष. फक्त अमेरिकेतील व्हॅलेंटाइनसाठीची खरेदी चक्क १८ अब्ज रुपयांवर पोहोचली आहे. पण एवढं करून एकमेकांचा अपेक्षाभंगच? खरेदी तर झालीय. त्यामुळे आता एकमेकांना खूश करायला ही मंडळी काय करणार ते व्हॅलेन्टाइनच जाणो.
आरती कदम -arati.kadam@ expressindia.com
(संदर्भ : ‘ग्रे शेड्स’- पुस्तक ५० शेडस ऑफ ग्रे, ई.एल जेम्सच्या यूटय़ूब मुलाखती. मिशिनग युनिव्हर्सिटीच्या डॉ. अॅमी बोनोमी यांचा सव्र्हे,द गार्डियन) शॉिपग- पाम गुडफेलो, यांनी रिटेल इंडस्ट्री ग्रुपसाठी केलेला सव्र्हे, whatyourprice.com आणि rakuten. com ¨ऑनलाइन सव्र्हे .
कुटुंब-  द गार्डियन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 2:54 am

Web Title: romantic grey shed
Next Stories
1 पुरुषांचे अश्रू!
2 चिनी घटस्फोट
3 फिरत्या चाकावर‘ती’
Just Now!
X