News Flash

सेकंड हनिमून

कामजीवन हा जर दाम्पत्यजीवनाचा पाया असेल तर सहजीवन हा त्याचा कळस असतो.

| September 28, 2013 01:01 am

कामजीवन हा जर दाम्पत्यजीवनाचा पाया असेल तर सहजीवन हा त्याचा कळस असतो. बहुतेक दाम्पत्य केवळ सह-अस्तित्वच जगत असतात. निर्जीवपणे. याचे कारण काळाच्या ओघात वास्तवाचे भान व जबाबदारीची जाणीव यामुळे ते आकर्षणातून झालेले लला-मजनू प्रेम उडून जात असते.
न्नाशीपुढचे गुलाबराव माझ्यापुढे त्यांच्या पंचेचाळिशीच्या बायकोबरोबर बसले होते. अर्थातच काही तरी समस्या होतीच. बायको अंजलीबाई जरा रागावलेल्याच दिसत होत्या. ‘हय़ांचं गेले काही महिने माझ्याकडे लक्षच नाहीये.’ अंजलीबाईंनी बोलायला सुरुवात केली.
‘तसं काही नाही हो. ही उगाचंच काही तरी संशय घेतेय. मी जरा माझ्या बिझनेसमध्ये जास्त गुंतलोय पण म्हणून काही असं म्हणायचं कारण नाही तिला,’ गुलाबरावांनी आपली बाजू मांडायला सुरुवात केली.
‘काही सांगू नका. तुमचं प्रेमच कमी झालंय. बायकांना सगळं लक्षात येत असतं बरं! तेवढी अक्कल दिलीय देवानं आम्हाला. काही तरी पाणी मुरतंय हे न कळण्याइतपत मी काही बुद्धू नाहीये.’ अंजलीबाई चांगल्याच रागावलेल्या दिसत होत्या.
‘डॉक्टर, हिला उगाचंच तसं वाटतं. पण खरं सांगतो कामामुळेच मला तिच्याकडे जेवढं पाहिजे तेवढं लक्ष देता येत नाही. वेळही कमी देत असेन कदाचित पण प्रेमबिम सगळं आहे,’ इति गुलाबराव.
माझ्यासमोरचेच हे नवरा-बायकोचे वाद मला नवीन नव्हते. पुष्कळ दाम्पत्यांच्या आयुष्यात असे प्रसंग कधी ना कधी येत असतातच. पण इथे मात्र वाद आता टोकाला जाताना दिसत होता.
दाम्पत्याने एकमेकांसाठी वेळ काढायचा असतो हे काळाच्या ओघात आणि कामाच्या रगाडय़ात दोघेही विसरून जात असतात. कुरबुरी सुरू होतात. वेळीच उपाय केले नाहीत तर मात्र गोंधळ होऊ शकतो. यावर मी एक सर्वोत्तम उपाय नेहमी सुचवत असतो.. सेकंड हनिमून. दाम्पत्याने तीन-चार महिन्यांतून एकदा तरी ही गोष्ट अमलात आणली पाहिजे.
हनिमून ही कल्पना मुळात उत्तर युरोपियन देशांमधे उगम पावली असे म्हणतात. त्याचा उद्देश नवदाम्पत्यांना सुरुवातीच्या काळात आनंद उपभोगण्यासाठी दिलेली मोकळीक व सुट्टी. एकमेकांना समजून घेण्यासाठी या वेळेचा उपयोग व्हावा अशा अपेक्षेने ही कल्पना रूढ झाली. कित्येकदा दाम्पत्यजीवनाच्या ‘पहिल्या रात्री’पासूनच हा मधुचंद्राचा काळ सुरू होतो. कामजीवनाची रोमांचक सुरुवात या काळात होत असते.
फर्स्ट हनिमून ही दाम्पत्याच्या आयुष्यात एकदाच घडणारी घटना आहे. परंतु सेकंड हनिमून ही एक कन्सेप्ट, मनोधारणा म्हणून वापरायची संज्ञा आहे. म्हणून घटनारूपाने ती कितीही वेळा घडणारी गोष्ट आहे. पहिल्या आणि नंतरच्या मधुचंद्रामधे बराच फरक असतो. आणि तो मुख्यत: असतो सेक्सविषयी. पहिल्या मधुचंद्रात हुरहुर, काळजी, दडपण असते तर नंतरच्या प्रकारात कामजीवनाचे पुनरुज्जीवन करण्याची ओढ, उत्सुकता. पहिल्या मधुचंद्रात नवचतन्याची सळसळ तर सेकंड हनिमूनमध्ये पुनच्रतन्याचा शोध. पहिल्या हनिमूनमध्ये जोडीदाराला समजून घेण्यासाठी धडपड तर सेकंड हनिमूनमध्ये समजलेल्या जोडीदाराविषयीचे गरसमज दूर करण्याची संधी असते. पहिल्या हनिमूनमध्ये जवळीकतेचा प्रयत्न तर सेकंड हनिमूनमध्ये दुरावा दूर करण्याचे कष्ट. पहिल्या हनिमूनमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न तर सेकंड हनिमूनमध्ये विसंवाद घालवण्याचा प्रयत्न. पहिल्या हनिमून काळासाठी ‘विवाहपूर्व कामज्ञान’ व ‘विवाहपूर्व काऊन्सेिलग’ यांची आवश्यकता असते तर सेकंड हनिमून काळासाठी ‘सेक्स व रिलेशनशिप काऊन्सेिलग’ असे वेगळ्या प्रकारचे सल्ले वारंवार आवश्यक असतात.
हनिमूनचा संबंधच मुळी सेक्सशी असला तरी सेकंड हनिमूनमध्ये पहिल्या हनिमूनपेक्षा सगळी परिस्थितीच वेगळी असते. पहिल्या हनिमूनमध्ये सर्वच नावीन्य असते. त्यासाठी हनिमून सल्ला आवश्यक असतो. त्या वेळच्या समस्याही वेगळ्या असतात. सेकंड हनिमूनमध्ये सेक्समध्ये तोच तोचपणा येत असल्याने नावीन्य आणण्यासाठी झटावे लागते. दाम्पत्यात दिलजमाई आणि सेक्सविषयीचा मोकळेपणा असेल तर सेकंड हनिमूनसाठी सेक्समध्ये नावीन्य आणणे सोपे जाते. रोमँटिक बोलणे, वागणे ही कला अशांना खरे म्हणजे सहजसाध्य असते. अशा दाम्पत्याने मात्र यासाठी कष्ट घेणे जरुरीचे आहे.
पुष्कळदा वर्षांनुवष्रे सेक्स अनुभवूनसुद्धा पत्नी किंवा पती किंवा दोघेही अतृप्तच असतात. याचे कारण म्हणजे सेक्समधे केवळ ‘पाटय़ा’ टाकणे चाललेले असते. कित्येक स्त्रियांना तर त्यांचा ‘ऑरगॅझम’ काय असतो हेच कित्येक वर्षांच्या कामजीवनानंतरही माहीत नसते. याचे महत्त्वाचे कारण पतीला बायकोला हा आनंद कसा द्यायचा असतो याचेच ज्ञान नसते. कोणी त्या विषयी शास्त्रीय माहितीपण देत नाही.
कामजीवन हा जर दाम्पत्यजीवनाचा पाया असेल तर सहजीवन हा त्याचा कळस असतो. बहुतेक दाम्पत्य केवळ सह-अस्तित्वच जगत असतात. निर्जीवपणे. यामधे प्रेमविवाह असलेली दाम्पत्येपण समाविष्ट करायला काहीच हरकत नाही. याचे कारण काळाच्या ओघात वास्तवाचे भान व जबाबदारीची जाणीव यामुळे ते आकर्षणातून झालेले लला-मजनू प्रेम उडून जात असते. निरसता, तोच तोचपणा, यामुळे कामजीवनातही चाळिशी आलेली असते. रोमांचकता हा काय प्रकार असतो हे बरीच दाम्पत्ये विसरून गेली असतात. त्यात व्यक्तिमत्त्वांचे सततचे घर्षण दाम्पत्यातील ताण वाढवतच असतो. प्रत्येक दाम्पत्याच्या आयुष्यामध्ये हा सततचा ताण घालवून टाकला तरच सहजीवनातील नराश्य दूर व्हायला मदत होते. सेकंड हनिमून यासाठीच आवश्यक असतो.
काळाच्या ओघात व्यक्तिमत्त्वांमधील घर्षण हे परिस्थितिजन्य किंवा सहजप्रवृत्त असते. परंतु त्यामुळे नाते ठिसूळ बनते. सततच्या घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या राग, संताप, चीड या मूलभूत नकारात्मक प्रतिसादात्मक भावनांना आवर घालून त्यांचा निचरा करणे अत्यावश्यक असते हे लक्षात येईल. तसे जर करता आले नाही तर त्या भावनांचे रूपांतर द्वेषात होते. दाम्पत्यजीवनातील ताण दिवसेन् दिवस वाढत जातो. जोडीदाराविषयीचा द्वेष सतत खदखदत राहिला तर जोडीदाराच्या क्षुल्लक चुकांच्या वेळीसुद्धा त्याचा स्फोट होतो. लग्न मुळातच सततच्या सहवासाचे नाते. चोवीस तासांच्या एकत्रपणामुळे जोडीदाराच्या व्यक्तिमत्त्वाच्या न आवडणाऱ्या, निगेटीव्ह पलूंच्या दर्शनाने मन उद्विग्न होत असते. संताप येत असतो. त्यांच्यांशी जुळवून घेता घेता कित्येकदा तारेवरची कसरतही करावी लागते.
या सर्व गोष्टींचा पगडा कामजीवनावर, सेक्सच्या क्रियेवर पडत असतोच. कित्येक जण मग आपल्या लग्नालाच दोष देत असतात. एवढय़ा शेकडो पत्रिका पाहूनसुद्धा आपण नेमकी चुकीचीच कशी निवडली याचे काही जणांना आश्चर्य वाटत राहते. काही जण तर लग्नाच्या वाढदिवसाला ‘हुतात्मा दिन’च मानत असतात. परंतु लग्न या नात्यामध्ये ज्या दोन व्यक्ती अडकत असतात त्यातील प्रत्येक व्यक्ती ही मुळात स्वतंत्र, वेगळ्या आचार-विचारांमध्ये वाढलेली आणि वेगवेगळे मन-संच, माइंडसेट असलेलीच असते. या गोष्टीचे भान लग्नापासूनच त्या दोघांनी ठेवणे आवश्यक असते. लग्न हे केवळ दोन व्यक्तींचेच नसून ते दोन व्यक्तिमत्त्वांचे असते. त्यांची मते ही वेगवेळी असणारच. त्यामुळे त्या दोन व्यक्तिमत्त्वांचे खटके, त्यांच्यातील वाद हे सर्व त्यांच्यामध्ये असणाऱ्या मतभिन्नतेमुळेच होत असतात. एकमेकात मतभिन्नता असणारच अशी तयारी ठेवली तर अपेक्षाभंगच होणार नाही व हे मान्य करूनच जर दाम्पत्याने आयुष्याकडे पाहिले तर वैवाहिक जीवनात तडजोड सहज शक्य होऊ शकते. सेकंड हनिमूनमुळे नात्यातील ही जाण येऊ शकते.  
कधी ना कधी तरी प्रत्येक दाम्पत्याच्या आयुष्यात लैंगिक समस्या उद्भवत असतातच. सेक्सच्या समस्या या समस्या आहेत रोग नाहीत हे लक्षात घेऊन त्यासाठी सेक्स टॉनिक्स किंवा इतर औषधांच्या मागे लागू नये. सेक्स थेरपी म्हणजे एक ट्रेिनग प्रोगॅ्रम अशा सर्वसाधारण समस्यांसाठी आवश्यक असतो. १९७० साली डॉ. मास्टर्स आणि जॉन्सन या जोडगोळीने पहिल्यांदा असे दाखवून दिले की, सर्वसाधारण लैंगिक समस्या या विशिष्ट तंत्रांच्या प्रॅक्टिसने दूर होतात. त्यानंतर कॅप्लान, सीमेन्स व इतर पाश्चात्त्य सेक्सॉलॉजिस्टनी त्यांच्या सेक्स थेरपी प्रचलित केल्या. प्राचीन भारतीय कामशास्त्र व तंत्रशास्त्र यांच्या अभ्यासातून मी पहिली भारतीय सेक्स थेरपी अशा केसेससाठी विकसित केली आणि अमेरिका, फ्रान्स, जपान, सिंगापूर येथील सेक्सॉलॉजीच्या परिषदांमध्ये ती ‘डॉ. सामक सेक्स फिटनेस थेरपी’ म्हणून प्रसिद्ध केली. सेकंड हनिमूनपूर्वी गरज पडल्यास अशा ट्रेिनग प्रोगॅ्रमचा उपयोग निश्चितच केला पाहिजे. त्यामुळे सेकंड हनिमून काळातील कामजीवन रोमांचक व्हायला मदतच होईल.
संवाद हे पती-पत्नी नात्याचे प्राणतत्त्व. संवादासाठी वेळ काढणे आवश्यक असते. पती-पत्नींनी एकमेकांसाठी मत्रीच्या या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक अमलात आणाव्यात. यामुळे पती-पत्नी मत्रीचे नाते कुठल्याही प्रकारचा विवाह असला तरी दृढ होऊ शकते. पती-पत्नी नात्यात मत्री सहजशक्य का होत नाही याचीही कारणे आहेत. अतिपरिचयात् अवज्ञा. चोवीस तासांच्या संबंधांमुळे जोडीदाराच्या व्यक्तिमत्त्वाच्या नावडत्या, निगेटिव्ह गुणविशेषांनी मन नाराज होत असते. कौटुंबिक त्रासाने मन उदास होत असते. अ‍ॅरेंज्ड लग्नात जोडीदार पूर्वपरिचित नसल्यास मत्री होण्यास संकोच आड येतो तर प्रेमविवाहात जोडीदाराविषयीच्या अपेक्षा भंग होत गेल्याने रागात रूपांतर होत राहते. सुसंवाद नसल्यास हा राग साचत राहतो व स्फोटक परिस्थिती निर्माण होते. मग मत्री तर दूर शत्रुवत नाते जाणवत राहते. कालांतराने संसारात सुनामी निर्माण होते. असेच काहीसे गुलाबराव व अंजलीबाईंच्या बाबतीत घडले होते. मधून मधून सेकंड हनिमून केल्याने संवादक्षमता वाढायला मदत होऊन पुष्कळ प्रमाणात ही सुनामी टाळता येते व म्हणूनच सेकंड हनिमूनमुळे दाम्पत्याचे शारीरिक, मानसिक व भावनिक असे त्रिबंध नाते घनिष्ट होण्यास मदतच होते.     
shashank.samak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 1:01 am

Web Title: second honeymoon
टॅग : Chaturang
Next Stories
1 बलात्काराची मानसिकता
2 शून्य विवाह
3 गोड मधुमेहाची कडू लैंगिकता
Just Now!
X