15 October 2019

News Flash

चिनी घटस्फोट

परदेशातही स्त्रीजगतात असंख्य घटना, घडामोडी घडतच असतात. काही स्त्रीच्या गुणांवर प्रकाश टाकणाऱ्या, तर काही दोषांवरही; कधी तिच्यावर अन्याय होतो,

| January 17, 2015 04:58 am

womanyaपरदेशातही स्त्रीजगतात असंख्य घटना, घडामोडी घडतच असतात. काही स्त्रीच्या गुणांवर प्रकाश टाकणाऱ्या, तर काही दोषांवरही; कधी तिच्यावर अन्याय होतो, तर कधी ती अन्यायाविरु द्ध आवाज उठवते. त्यातल्याच काहींवर हा प्रकाशझोत.
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन  की धिक्कार धिक्कार धिक्कार
काय करावं नेमकं?
कारण चीनमध्ये कौटुंबिक िहसाचार हेसुद्धा घटस्फोटासाठीचं कारण असू शकतं, हे अखेर मान्य केलं गेलंय. आणि ३० डिसेंबर २०१४ ला याचं परिणामस्वरूप म्हणून की काय हान मेइमेइ या ६९ वर्षीय स्त्रीला घटस्फोट मिळालाय. इतक्या वर्षांनंतर निदान यासंदर्भात कायदेशीर मसुदा तयार केला गेला आहे. त्याबद्दल धिक्कार करावा की अखेर डोळे उघडले म्हणून अभिनंदन करावं चीनचं?
भारत काय किंवा चीन, बहुतांशी आशियाई देशात कौटुंबिक िहसाचार काही नवीन नाही. तो इतका हाडामांसात रुजलाय की आपल्याकडेसुद्धा म्हण आहेच की, नवऱ्यानं मारलं नि पावसानं झोडपलं तर दाद कुणाकडे मागायची? परंपरेनं तेच ठरवलं असल्यानं नवऱ्यानं आणि सासरच्या मंडळींनी केलेल्या मारहाणीविरुद्ध आवाज उठवायचा असतो हेच माहीत नसल्यानं तिथल्या बायकाही गप्प होत्या नि कायदाही! तेथील माध्यमांनुसार आज चीनमधल्या थोडय़ाथोडक्या नाही तर लग्न झालेल्यांपैकी पाचातल्या दोन स्त्रिया या कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी आहेत. आता बोला! ही गोष्ट त्या नवरा-बायको दोघांमधली आहे, खासगी आहे म्हणून इतकी वर्षे त्याच्याकडे कानाडोळाच केला गेला. पण पाणी डोक्यावरून जायला लागल्यावर नाकातोंडात गेलंच ना, मग गुदमरायची वेळ आली नि सुरू झाला संघर्ष!
गेली कित्येक वष्रे त्या विरोधात आवाज उठवला जातोय. या आंदोलनाचा पहिल्यांदा परिणाम दिसला तो २००१ मध्ये. त्यावेळी विवाह कायद्यात दुरुस्ती केली गेली आणि कौटुंबिक हिंसाचाराला विरोध केला गेला. पण कायदा होत नव्हता. मग काय पुन्हा संघर्ष. न्याय मिळत नाही म्हणून संघर्ष करत रहा, नाही तर सहन करा.. वर्षोनुवर्षे ..
पण नोव्हेंबर २०१४ च्या अखेरीस कौटुंबिक हिंसाचारविरोधातलं चीनमधलं पहिलं वहिलं  विधेयक मांडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि आशा दिसू लागली आहे. ६९ वर्षे वयाच्या हानला  घटस्फोट मिळाला खरा, पण त्यासाठी थोडीथोडकी नाहीत तर तिला ४० वर्षे न्यायालयात  लढावं लागलं. त्यात ती कफल्लक होऊन गेलीए आणि एकाकीही. पण तरीही ती खूश आहे, कारण निदान इतक्या वर्षांंच्या नवऱ्याच्या जाचातून तिची सुटका झाली आहे. अगदी खात्रीनं!   
 चीनमध्ये घटस्फोट घेणं सहज स्वीकारलं जात नाहीच, स्त्रीनं तर नाहीच नाही. कारण  आपल्यासारखंच, पुरुषप्रधान समाज! आजही अनेकजणी आपल्याच लोकांच्या विरोधात लढताहेत. एकीला जेव्हा खूप प्रयत्नांनंतर घटस्फोट मिळाला तर तिच्या सासूने ती घराबाहेर पडू नये म्हणून मारहाण सुरू केली. अगदी तिच्या सख्ख्या मुलानं आणि मुलीनं तर तिच्याशी बोलणंच टाकलं नि पसे द्यायलाही नकार दिला, तर दुसऱ्या एका तरुणीनं या िहसाचारी लग्नातून बाहेर पडायचा प्रयत्न केला तर तिच्या सासूनं तिचं बाळ तीन महिने लपवून ठेवलं. वर्षभरानंतर न्यायालयानेच त्याचा ताबा तिला दिला. आज ती आपल्या बाळासह सुखरूप दुसऱ्या शहरात राहतेय.
घटस्फोट हा कुटुंबासाठी मारकच, पण तो काहीवेळा अपरिहार्य असतो. चीनमध्येही घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या  सध्या वाढतेय, पण ती मुख्य शहरांमध्ये. संपूर्ण चीनची घटस्फोटाची आकडेवारी आहे, २.२० टक्के! यावर काही म्हणाल? की हेच खरं.. नवऱ्यानं मारलं नि पावसानं झोडपलं तर..

गंध-सुगंध
बाईची घ्राणेंद्रिये तीक्ष्ण असतात.. तिला ‘वास’ लवकर लागतो. – हे एक साधं सरळ विधान. हां, कुणाला कुत्सित वास येत असेलही या वाक्यात, पण त्याकडे दुर्लक्ष करणं हेच योग्य. काय? कारण आता हे शास्त्रीयदृष्टय़ा सिद्ध झालंय.    
स्त्रीच्या मेंदूमध्ये ’ olfactory cells ’२ ची संख्या पुरुषाच्या तुलनेत ४८ टक्क्य़ांपेक्षा जास्त असते, त्यामुळे तिची घ्राणेंद्रिये तीक्ष्ण असतात. म्हणजे बघा, पुरुषांपेक्षा तिला सगळ्याच गोष्टींचे ‘वास’ बरोबर लागतात, हे खरंच आहे.
खरं तर माणसामध्येच ६० लाख गंध हुंगण्याची क्षमता असते. (कुत्र्यामध्ये ती क्षमता २२० दशलक्ष गंध इतकी असते.) असं म्हणतात की माणसाच्या बालपणातील महत्त्वाच्या आठवणी या तेव्हाच्या काही विशिष्ट गंधांशी जोडलेल्या असतात. जसं आजीच्या साडीचा वास, तिच्या घरातली किंवा बालपणीची एखादी घटना किंवा एखाद्या पदार्थ मनाच्या तळाशी खूप खोलवर दडून बसला असतो, तो त्यावेळच्या काही विशिष्ट गंधासह; तर आईसाठी  तिच्या पहिल्या बाळाचा पहिला गंध अविस्मरणीय असतो.
तिची ही वास ओळखण्यातल्या तीव्रतेची क्षमता लक्षात घेऊनच विविध कंपन्या गंधांच्या परीक्षणासाठी, मग तो कॉफीचा वास असो, वाईनचा असो वा वेगवेगळ्या परफ्युमचा, स्त्रियांनाच बोलवतात. (चला, निसर्गाने स्त्रीवर केलेले हे उपकारच म्हणायला हवेत. त्यामुळे आता केवळ वाटतं म्हणून नव्हे तर ब्राझीलमधील नॅशनल इन्स्टिटय़ुट ऑफ ट्रान्सलेशन न्युरोसायन्स आणि रिओ द जनेरियो फेडरल विद्यापीठात झालेल्या या संशोधनातलं वैज्ञानिक सत्य म्हणून मान्य हे करायलाच हवं. त्यामुळे तिला लागला बरोबर ‘वास’ किंवा चालली ‘वास’ घेत, असं कुणी म्हटलं तर वाच्यार्थानेच घ्या..भावार्थ नको बरं .

१८ कोटींची भरपाई
  ‘तू प्रेग्नन्ट आहेस, तुला स्टोर मॅनेजरचं पद आता झेपणार नाही, तुला नोकरीवरून काढणंच योग्य’ हे जेव्हा अमेरिकेतल्या एका बाईला ऐकवलं जातं आणि तसं प्रत्यक्ष कृतीतही आणलं जातं तेव्हा तुम्ही काय म्हणाल?
हो ना, आहे, अमेरिका पुढारलेली आहे, विकसितही आहे, परंतु तिथेही स्त्रीला दुय्यम लेखणारी पुरुषी मानसिकता आहेच की. अगदी आजही! पण ती बाई अर्थात रोझरिओ जुवरिझसुद्धा अमेरिकेतलीच असल्याने दाखवतेच आता इंगा म्हणत गेली ना थेट कोर्टातच! आणि कोर्टाने थोडेथोडके नाही तर १८६ मिलीयन अर्थात १८ कोटी साठ लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे, ती द्यायची आहे ‘ऑटोझोन’ या ती नोकरी करत असलेल्या कंपनीने.  
‘ऑटोझोन’ ही अमेरिकेतली बडं प्रस्थ असलेली कंपनी. वाहनांचे भाग विकणाऱ्या या कंपनीची अमेरिकेतच ५२०० दुकानं आहेत. त्यातल्या एक सॅन दियागो येथील दुकानात जुवरिझ कामाला लागली ते वर्ष होतं, २०००.  तिच्या कामातलं नपुण्य बघून तिला २००१ मध्ये सेल्स मॅनेजरचं पद दिलं गेलं आणि २००४ मध्ये ती स्टोअर मॅनेजरही झाली. पण २००५ मध्ये तिला दिवस गेले आणि दुकानाचा व्यवस्थापक भडकलाच तिच्यावर. तिचं अभिनंदन करण्याऐवजी, मला तुझं वाईट वाटतंय, असंच सांगत राहिला. त्याचा अर्थ तिला नंतर समजला. जेव्हा ती मुलाच्या जन्मानंतर परत कामावर आली तेव्हा तिची पदावनती झाली होतीच, शिवाय पगारही कमी केला गेला. आपल्या सेल्स मॅनेजर पदापर्यंत पुन्हा पोहोचण्यासाठी तिने एक वर्ष वाट पाहिली. वर्ष संपल्यानंतर मात्र तिने पुन्हा प्रयत्न केले. ती तक्रार करतेय म्हटल्यावर तिला काढून टाकण्यात आलं. त्यांच्या डिस्ट्रिक्ट मॅनेजरला तर कंपनीच्या उपाध्यक्षाने म्हणे ऐकवलं, ‘आपण काय इथे ब्युटीक चालवतो आहे का, काढून टाका अशा बायकांना..’
मग रोझ थोडीच गप्प बसणार. तिने त्याच्या विरोधात न्याय मागितला आणि थोडाथोडका नाही, अगदी घसघशीत न्याय तिला मिळाला. अर्थात ‘ऑटोझोन’ आता तीच कशी खोटारडी आहे, आणि ‘आता वरच्या कोर्टात जाणार’ च्या बाता मारत बसला आहे.
सध्या तरी रोझरिओ जिंकली आहे. कोणी काहीही म्हटलं तरी आता आहेत तिच्या, सब उंगलीया घी में !    

First Published on January 17, 2015 4:58 am

Web Title: social impacts of divorce in china
टॅग China,Divorce,Women