फ्लॅट संस्कृतीत किचन/हॉलच्या भिंतींना मोठय़ा खिडक्या असतात. या खिडक्यांना १८ इंच रुंदीची ग्रिल बनवता येते. खिडकीच्या रुंदीएवढी जागा मिळते. त्यातही आपण बाग फुलवू शकता.. खरं तर निसर्गही फुलण्यासाठी आसुसलेलाच असतो. त्याची फक्तआपण व्यवस्था करून दिल्यास येथे निसर्ग आपल्या दारी येतो. कुंडय़ा, पिशव्या, शीतपेयांच्या बाटल्यांत बाग फुलवता येते. अर्थात आपल्याकडे जागा किती आहे व त्याचा कल्पकतेने वापर केल्यास आपण त्याचा अधिकाधिक उपयोग करून घेऊ शकतो.  खिडकीला संपूर्ण ग्रिल करणे शक्य नसेल तर कुंडय़ा, पिशव्या खाली पडू नये म्हणून कुंडय़ाच्या उंचीचे व रुंदीचे बकेट टाईप रॅक तयार करता येते. बरेचदा कुंडी जड असल्यामुळे पडणार नाही या ch087गरसमजात असू नये.. पक्ष्यांचे येणे-जाणे वाढले, आपले काही काम करतांना अनवधानाने कुंडी सरकून पडू शकते किंवा पंतगाचा धागा, केबलची वायर यामुळे कुंडय़ा पडू शकतात व अपघाताची शक्यता असते. मोजक्याच कुंडय़ा असतील फोडणीसाठी गरजेच्या किंवा ग्रीन टी म्हणून उपयुक्त वनस्पती लावता येतात. येथे हँगिंग कुंडय़ा लावूनही त्यात बाग फुलवता ग्रीलप्रमाणे अपार्टमेंटमधील जिनाही बाग फुलवण्यासाठी उत्तम जागा ठरू शकतो. बरेचदा अपार्टमेंटमध्ये वर्दळ नसेल किंवा टेरेसवर जाणाऱ्या रस्त्यात अडचण नसेल तर येथेही कुंडय़ांमध्ये बाग फुलवता येते. अर्थात या पायऱ्यांचा अंदाज घेऊन आपणास कुंडय़ाचा आकार ठरवावा लागतो. प्रत्येक पायरीवर एक कुंडी याप्रमाणे कुंडय़ांची रचना करता येते.
 मात्र अशा बागेसाठी इमारतीची रचना खेळती हवा, भरपूर सूर्यप्रकाश येणारी अपेक्षित असते. अगदी कोंदट व अंधार असलेल्या पायरीवर बाग फुलवणे शक्य होत नाही. अपार्टमेंटमधील पॅसेजचाही वापर कुंडय़ा ठेवण्यासाठी करता येतो. अर्थात पॅसेजची लांबी रुंदी, इतर सदस्यांची हरकत नसेल तर ही जागा व्यापता येते. तसेच पॅसेजला असलेल्या सुरक्षा िभतीच्या बाहेरील बाजूस सुरक्षित असा लोखंडी प्लॅटफार्म तयार करता येते. यामुळे  एका निर्जीव वास्तूत फुला-झाडांमुळे सौंदर्यात भर तर पडतेच, पण तेथे जिवंतपणाही येतो.  
संदीप चव्हाण -sandeepkchavan79@gmail.com