27 June 2019

News Flash

गच्चीवरची बाग : जमिनीवरील वाफे…

विटांच्या मदतीने गच्चीवरच्या अरुंद वा छोटय़ा जागेत वाफे कसे करायचे याची माहिती आपण घेतली. त्याहून अधिक जागा म्हणजे ओपन टेरेसप्रमाणे जागा असेल व तेथे फुलझाडे

| May 30, 2015 01:01 am

विटांच्या मदतीने गच्चीवरच्या अरुंद वा छोटय़ा जागेत वाफे कसे करायचे याची माहिती आपण घेतली. त्याहून अधिक जागा म्हणजे ओपन टेरेसप्रमाणे जागा असेल व तेथे फुलझाडे व भाजीपाला यांची लागवड करायची असेल तर अशा जागेवर लांबचलांब वाफे करण्याची संधी असते. येथे जागेचा कल्पकतेने वापर करून वाफे गोलाकार, चौकोनी, आयताकृती, त्रिकोणी, षट्कोनी अशा आकारांचे करता येतात. वाफ्यांमध्ये निव्वळ माती भरण्यापेक्षा, अधिकाधिक पालापाचोळ्याचा वापर करावा म्हणजे दीर्घकाळ त्याचा परतावा मिळवता येतो. 

टाकाऊतून टिकाऊ ही आपली संस्कृती आहे तर परदेशात पर्यावरणीय हितासाठी ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ ही चळवळ राबवली जाते. आपल्याकडे टाकाऊ बॅनर असतील किंवा प्लॅस्टिकचे टिकाऊ कापड असल्यास त्यापासूनही जमीन किंवा टेरेसपासून ५ इंच उंचीवर वाफे तयार करता येतात.
उपयोगाचे नसलेले बांबू, लाकडे यांचे मचाण करून किंवा त्याच्या चारही टोकांना कापड बांधून परसट भांडय़ासारखा किंवा झोळीसारखा वाफा तयार करता येतो. यात पाण्याचा निचरा होण्यासाठी कापडाला भोकं पाडून घ्यावीत. फक्त काळजी घ्यावी-कारण टाकाऊ बॅनर, प्लॅस्टिक कापड हे उन्हात अधिक काळ राहिल्यास त्यास चिरे जाऊन फाटण्याची शक्यता असते. बाकी हा प्रकार अगदी सोपा, टिकाऊ व कल्पकतेला वाव देणारा आहे. दोन झाडांच्या मध्ये किंवा दोन खांब, पोल, अँगलच्या मध्येही हा झोळी प्रकार साकारता येतो. झाडांची पाने ही दाटीवाटीने वाढून सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न तयार करतात त्यामुळे कमीत कमी जागेचा जास्तीत जास्त वापर करणे हे शहरी शेतीचे लक्ष्य सहज साध्य करता येते. व्हर्टकिल पद्धतीनेही या वाफ्यांची रचना करता येते.
संदीप चव्हाण

First Published on May 30, 2015 1:01 am

Web Title: terrace garden 3
टॅग Terrace Garden