पुरुष किती ‘मर्द’ आहे ते तीन डब्ल्यू ठरवतात. पहिला डब्ल्यू : वर्क : श्रम, दुसरा डब्ल्यू : वेल्थ : वारसा हक्काने आणि स्वकष्टाने वाढवलेली संपत्ती, आणि तिसरा डब्ल्यू : वुमन :  अनेक स्त्रियांशी असलेल्या नात्यांनी जीवन समृद्ध असणं. पण या पारंपरिक पुरुषार्थाच्या बुद्धय़ांकाला आता काळाच्या ओघात वेगळ्या तऱ्हेने बघणे आवश्यक आहे..
मला नेहमीच हा प्रश्न पडत आला आहे- पौरुषत्वाचं मोजमाप कसं करायचं? भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रत्येक आश्रमात विहित र्कम योग्य रीतीने निभावली की जीवन कृतार्थ झालं असं समजलं जातं. म्हणजे ब्रम्हचर्य आश्रमात ज्ञान, गृहस्थ आश्रमात प्रपंच करावा नेटका, वानप्रस्थ आश्रमात यात्रा वगरे, आजच्या भाषेत रिटायरमेंट, आणि संन्यास शेवटी. प्रत्येक आश्रमात विहित कम्रे करणे म्हणजे धर्मपालन करणे. परंतु हा नियम सर्व पुरुषांना लागू होण्यासारखा नाही. अजूनही ज्ञान मिळवणे ही निवडक पुरुषांची सोय आहे, लाखो दारिद्रय़ रेषेखालील पुरुष संसार व्यवस्थित करू शकत नाहीत. असंख्य पुरुष वय जास्त झालं तरी श्रमिक आहेत आणि संन्यास ही न घेण्याची गोष्ट झाली आहे.
माझ्या एका मित्राने मला याकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहायला सांगितलं. त्याच्या मते, खरं पौरुष हे धर्म, अर्थ आणि काम या त्रिवेणीत साठवलेलं असतं. काही प्रमाणात ही मोजमापाची पट्टी जास्त सोपी आहे. ही पट्टी लावून मी माझ्या आसपास असणाऱ्या वेगवेगळ्या वयोगटांतील पुरुषांच्या जीवनाकडे बघू लागलो.
नरेंद्र. वय वर्षे ३२. एका तेलवाहू जहाजाचा कप्तान. साधारणपणे सलग सहा महिने तो जहाजावर असतो. मग चार महिन्यांची पगारी सुट्टी. त्याची पत्नी निशा नृत्य अकादमी चालवते. त्या दोघांचा एकच मुलगा बिट्ट. आता प्राथमिक शाळेत आहे. निशाने त्याला अशा शाळेत अडकवला आहे की दिवसाचा जास्तीतजास्त वेळ तो शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये व्यस्त असावा व त्याला भविष्यात त्याचा फायदा व्हावा. रिकाम्या वेळात तो बुद्धिबळाच्या वर्गाला जातो. घरात चोवीस तास राहणारी बाई असते. ती निशाचं आणि तिच्या मुलाचं जेवणखाण बघते, घर सांभाळते. अधूनमधून निशाचे स्वतंत्र किंवा तिच्या अकादमीतील विद्याíथनींचे देशात-परदेशात अनेक कार्यक्रम होतात. तेव्हा मुलाची जबाबदारी मावशीबाई सांभाळतात. नरेंद्र जेव्हा सुट्टीवर असतो तेव्हा जास्तीतजास्त वेळ निशाला द्यायचा असं ठरवतो, निशाही उत्सुक असते. पण तिच्या अकादमीचा व्याप दिवसेंदिवस वाढतच चाललाय. त्यामुळे मनात असूनसुद्धा आठ-दहा दिवसांच्या वर सुट्टी घेऊ शकत नाही. नरेंद्राला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. पशाच्या दृष्टीने कश्शाची म्हणून कमी नाही. बरं, तो सुट्टीवर आहे म्हटल्यावर कोकणात घरी जावंच लागतं. आणि एकदा गावाकडे गेला की आई-दादा अजून राहा, अजून राहा, असा आग्रह करतात. आठदहा दिवस तो एकटाच गावी जाऊन येतो.
मी एकदा नरेंद्रला गाठलं आणि विचारलं, तुझ्या जीवनाबद्दल तू मनापासून समाधानी आहेस का? तो म्हणाला, ‘म्हटलं तर आहे. म्हटलं तर नाही. आता घराकडे लक्ष द्यायचं असं वाटतं, पण माझी नोकरी आणि शिक्षण असं आहे की अजून दहा-बारा वर्षे तरी माझी लाइफस्टाइल हीच राहणार. निशा इतकी तिच्या करिअरमध्ये व्यस्त आहे की घर चालवणे जणू काही आम्ही आउटसोर्स केलंय. मग राहतं माझं करिअर. त्यात फारशी स्पर्धा नाही आणि इतक्या अनुभवाच्या जोरावर मला कोणत्याही देशात नोकरी मिळेल. त्यामुळे हे सगळं असंच चालणार.’
त्याच्या बोलण्यात कुठेही उत्साह नव्हता, चतन्य नव्हतं. तरीही मी त्याचा जवळचा मित्र असल्याने विचारले- ‘सेक्स लाइफ?’ ‘आहे, म्हणायचे. कारण जे तीन महिने सुटीवर असतो तेव्हा ती नाही म्हणत नाही, परंतु कधीही पुढाकार घेत नाही. बिट्टला आई शेजारी असल्याशिवाय झोप लागत नाही आणि अजून तो इतका मोठा झालेला नाही की त्याला एकटय़ाला झोपवावे.’
यावर मी काय प्रतिक्रिया देणार? यात काय होतं त्याचं पौरुषत्व?
निरंजन हा नरेंद्रच्या अगदी उलट. सीए आहे, पण आयटीमध्ये काम करण्याची जबरदस्त इच्छा आहे. तसा अभ्यास त्याने केलाय. भरपूर पगार मिळतो, तो त्याने शेअर्समध्ये गुंतवला आणि वयाच्या तिशीत करोडपती झाला. त्याला आपली संपत्ती वाढवायची िझग होती. दिवसरात्र तो पसे आणि पसे यापलीकडे विचारच करत नाही. त्याला, सामान्य माणसाला ज्यात मजा वाटते त्या गोष्टीत अजिबात आनंद वाटत नाही. किती वर्षांत त्याने सिनेमा पाहिलेला नाही किंवा नाटकही पाहिलेले नाही. त्याची बायको ‘वुमन स्पेशल’सारख्या ट्रिप्स करते. तो तिच्याबरोबर हनीमूननंतर एकदाही कुठेही जोडीने गेलेला नाही आणि हे त्याचे जगणे त्याच्या पत्नीला मान्य आहे. ती वेगळ्या स्वभावाची आहे. खूप मनमोकळी, गप्पिष्ट. तिला सर्वत्र मित्र-मत्रिणी आहेत. काही वर्षांपूर्वी म्हणे ती एका बिल्डरबरोबर पंचतारांकित हॉटेलमध्ये दिसायची आणि म्हणे त्या बिल्डरच्या बायकोने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि तेव्हापासून ते प्रकरण थांबलं. त्यांना मूलबाळ नाही. निरांजनच्याच समस्या आहेत. अनेक महागडे उपचार झाले. आता त्यांनी नादच सोडला आहे. तो पक्का नास्तिक आहे. देव-धर्म या गोष्टी त्याला मंजूर नाहीत. तरीही दरवर्षी दिवाळीत तो लक्ष्मीपूजन करतो.
मी त्याला विचारलं, तू तुझ्या जीवनाबद्दल समाधानी आहेस का? तो म्हणाला, ‘अजिबात नाही. माझ्यातच प्रॉब्लेम्स आहेत. मी संपत्ती वाढवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करीत असतो, पण रात्री झोप लागतच नाही. हे सगळं मी कुणासाठी करतोय या काळजीने हताश झाल्यासारखं वाटतं. काही नातेवाईक आता भुंग्यासारखे गोळा होऊ लागलेत, कळत नाही का मला? पण खरं सांगू, प्रत्येक पुरुषाला संपत्तीचे व्यसन असायला हवे.’
त्याची थिअरी माझ्या डोक्यात काही शिरली नाही.
पोलीस दलात जायचे असे सुहासच्या मनात खूपच होते. समाजातील गुन्हेगारी रोखण्यासाठीच आपला जन्म झाला आहे, असे त्याला वाटत असे. त्याने भारतीय पोलीस सेनेत दाखल व्हायचेच म्हणून खूप अभ्यास केला, खूप कष्ट घेतले, बऱ्याच अपयशानंतर अखेर तो रुजू झाला. त्याला पहिले पोस्टिंग थेट बिहारमध्येच पाटणा येथे मिळाले. तिथले वातावरण पाहून तो थक्क झाला. इथे सर्रास लोकांकडे शस्त्रे होती, सगळीकडे दहशतीचे वातावरण होते. एकदोनदा त्याने धाडस दाखवून काही गुन्हेगारांना आत घेतले. पण ताबडतोब त्यांना सोडून द्या. तुम्ही नवे आहात, तुम्हाला इथले रीतीरिवाज माहीत नाहीत! असे सल्ले वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाले.
आणि नंतर पाच वर्षे बिहारमध्ये काढून झाल्यानंतर तो चांगलाच बिहारी झाला. एकटा होता. घरापासून लांब होता, खुर्ची होती आणि पसे होते. त्यामुळे वेगवेगळ्या शरीरांचा रोज उपभोग घेणे हे त्याचे एक सवयीचे काम झाले. तो त्याच्या जीवनाचे सार म्हणजे ‘WWW’ असे सांगत फिरत असे.
सुरुवातीला अनेकांनी भाबडेपणे विचारले, हे ‘WWW’ काय प्रकरण आहे?
तो म्हणाला, माणूस किती ‘मर्द’ आहे ते तीन डब्लू ठरवतात.
पहिला डब्ल्यू : वर्क : श्रम
दुसरा डब्ल्यू : वेल्थ : वारसा हक्काने आणि स्वकष्टाने वाढवलेली संपत्ती
आणि तिसरा डब्ल्यू : वुमन : अनेक स्त्रियांशी असलेल्या नात्यांनी जीवन समृद्ध असणं.
खरं सांगायचं तर एकविसाव्या शतकात,  वेबच्या युगात अजूनही पुरुष आदीमानवासारखाच विचार करीत आहेत, हे प्रगतीचं लक्षण आहे? का शतकानुशतके तेच तेच केल्याने अन्य काही म्हणजे मर्दुमकी असं वाटेनासं झालंय?
मी निरनिराळी संकेतस्थळे पाहताना ‘पुरुषांचे मानसशास्त्र’ अशा नावाच्या संकेतस्थळावर विसावलो. तिथे मला सापडला Male Intelligence training Program!
म्हणजे चक्क पौरुषत्वाचा बुद्धय़ांक. हे नेमके काय प्रकरण आहे हे जेव्हा मी अधिक तपशिलात जाऊन पाहू लागलो तर अनेक गोष्टी माझ्या लक्षात आल्या. अगदी शालेय वयापासून मुलींचे आणि महिलांचे आकर्षण मुलांना जबरदस्त असते. त्यांना प्रभावित करण्यासाठी त्यांचे कर्तृत्व वेगवेगळ्या रीतीने मुलींसमोर मांडून तिला आपल्याकडे वळवणे हीच आदिम प्रेरणा समाजमनात अजूनही मर्दानगीशी जोडलेली आहे. कोवळ्या वयात मध्यमवयीन स्त्रीला आपलीशी करणे व तिच्याकडून कामकला शिकणे हे कल्पनेत न राहता प्रत्यक्षात कसे येत आहे याबाबत अनेक अश्लील संकेतस्थळे उपलब्ध आहेत. आणि त्याचवेळी सुहासने सांगितलेल्या तीन डब्ल्यूवर अधिक विचार करता आपण आपल्या पुरुषत्वाचा अर्थात  मर्दानगीचा बुद्धय़ांक वेगळ्या तऱ्हेने ठरवू शकतो, असं लक्षात आलं. किंबहुना काळाच्या ओघात तो बदललाच गेला पाहिजे. यातला पहिला डब्ल्यू वर्क : जी व्यक्ती, आपल्या कामात इतकी तल्लीन होऊन जाते की तिच्या भवताली काय चालू आहे याची पुसटशी जाणीवही रहात नाही. जी व्यक्ती आपल्या कामात सुधारणेसाठी झटते तो मर्द आणि सगळ्यात महत्त्वाचे- जर सचोटीने, निष्ठेने काम करीत राहिलं तर फळ आपोआप येते हे मानणारी विचारधारा बाळगणारा खरा मर्द.
दुसरा डब्ल्यू : वेल्थ. पसा कुणीही कोणत्याही मार्गाने कमावतो, कारण हे जग आता साधे राहा, साधे जगा अशा मूल्यांना बाजूला सारून कसेही पसे मिळवा आणि चन करा या वृत्तीचा पुरस्कार करते आहे. ती वृत्ती बदलण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येनकेन मार्गाने पुरुषांची भौतिक संपत्ती हा भाग नाकारताच येणार नाही.
पण खरी संपत्ती म्हणजे तुम्ही जोडलेली माणसे! जितकी माणसे तुम्ही प्रेमाने, त्यांना समजून घेत जोडाल तेवढे तुमचे जीवन मौल्यवान होईल.
माझे एक नातेवाईक म्हणाले होते, मी जेव्हा कधी वर जाईन तेव्हा कदाचित माझ्या पेन्शनशिवाय काहीही नसेल, पण मला खात्री आहे माझ्या अंत्ययात्रेला किमान एक हजार माणसे असतील. हीच माझी खरी संपत्ती.
आता शेवटचा डब्ल्यू : वुमन. काम-प्रेरणा, स्त्रियांना आकर्षति करून घेणे, त्यांच्याशी उगाच लाळघोटेपणा करणे, खासगी प्रश्न विचारणे आणि जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करणे, याने बुद्धय़ांक सिद्ध होत नसला तरी ते पुरुष करतच असतात, पण कोणत्याही स्त्रीला यथोचित आदर, गुणांचे कौतुक, तिच्यातील कमतरतेची (असल्यास) जाणीव शुद्ध मनाने करून देणे, तिच्या वैयक्तिक वर्तुळात- खासगीत प्रवेश मिळवण्यासाठी संमती घेणे आणि ती स्त्री आहे म्हणून..
हे वाक्य मनातून काढून टाकणे हीच खरी मर्दाची बुद्धिमत्ता..    

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क