माझी एक जवळची मत्रीण व तिचा नवरा काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील सर्व ऐश्वर्य सोडून आध्यात्मिक हेतूने प्रेरित होऊन भारतात परतली. त्यानंतरचे सर्व आयुष्य आश्रमाच्या सेवेत व्यतीत करीत हे कुटुंब अत्यंत आनंदात राहते आहे, परंतु परत आल्यावर द्विधा मन:स्थिती तिला अस्वस्थ करीत असे. अमेरिकेत परत जावेसे वाटे. आपण काही चुकीचे करत असल्याच्या विचारांनी तिला रडू कोसळे. त्यात नातेवाईक व इतर मित्र मत्रिणींनी त्यांना ‘वेडे’ या जातकुळीत टाकून दिले होतेच.
आपल्या लहानग्या मुलीला कुशीत घेत तिने विचारले, ‘आपण परत जाऊ यात का?’ यावर १० वर्षांच्या त्या चिमुरडीने उत्तर दिले, ‘आई, एकदा दार लागले की काय फरक पडतो?’ हे उत्तर इतक्या लहान मुलीने देणे अपेक्षितच नव्हते. जणू काही आपले सद्गुरूच या मुलीच्या मुखातून बोलले आहेत यावर तिचा दृढ विश्वास बसला. नवीन आयुष्य अधिकच जोमाने, उत्साहाने जगण्याचा हुरूप आला.
वाईट, नकारात्मक विचारांचे दार लावून घ्यायला काय हरकत आहे? आपल्या घरात कुणी यावे हे ठरविण्याचा अधिकार आपला आहेच ना? आयुष्यात कुठल्याही प्रश्नाला ‘काय फरक पडतो,’ असे विचारले की बऱ्याच वेळा ‘हो-खरेच फारसा फरक पडणार नाही,’ हे पटते. प्रश्न आपोआप सुटतात.
मार्जारासन
पाठकणा व मनाला लवचीक बनविणारे मार्जारासन आज करू या. वज्रासनस्थ व्हा. आता हाताचे तळवे एक हात अंतरावर जमिनीवर ठेवा. दोन्ही हात, दोन्ही गुडघे, पायांचे तळवे यांमध्ये दोन्ही खांद्यांइतके अंतर घ्या. पाठकणा जमिनीला समांतर असेल, आता सावकाश पाठकणा आत घ्या व मान वर घ्या. पाठकण्याला अंतर्वक्र आकार येईल. डोळे मिटून श्वासावर लक्ष एकाग्र करा. काही श्वास थांबल्यावर पुन्हा पाठकणा जमिनीस समांतर करा.
आता पाठकणा वर उचला व मान खाली घ्या. श्वास रोखू नका. या स्थितीत प्राणधारणा करा. एकाच वेळी पाठकण्याला अंतर्वक्र, बहिर्वक्र आकार देणारे हे एकमेव आसन आहे.

खा आनंदाने : व्रत आरोग्याचे!
वैदेही अमोघ नवाथे (आहारतज्ज्ञ)
वटपौर्णिमा जवळ आली आहे. हिन्दू पौराणिक साहित्यानुसार वडाचे झाड त्रिमूर्ती चिन्हांकित आहे ब्रह्मा, विष्णू व शिव. म्हणजेच ब्रह्मा -मूळ, विष्णू- झाडाचा बुंधा, आणि शिव म्हणजे बुंध्यावरचा भाग. पूर्ण झाड सावित्री मानली जाते. व्रत कोणी, कधी, का करावे हे सांगण्यासाठी मी त्यातली तज्ज्ञ नाही. पण सहज डोक्यात विचार आला की वर्षांनुवर्षे आपण बायका विविध व्रते मनोभावे पाळत असतो तर आता आयुष्याच्या संध्याकाळी ‘आरोग्याचे व्रत’ पाळण्याचा वसा घेतला तर? मला खात्री आहे की हे व्रतसुद्धा फक्त आजीच नाही तर आजोबासुद्धा नक्कीच घेऊ शकतील!
आपले शरीर पाच महाभूतांनी बनले आहे -आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी आणि आकाश म्हणजे पोकळी म्हणजेच शरीरातील पेशींच्या आतील आणि बाहेरील भाग जो रिकामा नाही तर विविध रस / वायू / टिशूंनी भरलेला आहे. जसे वय वाढते तसे द्रव्य भाग सुकत जातो आणि जितकी ‘पोकळी’ मोठी तितकी जास्त थंडी वाजते म्हणजेच वातप्रकोप जास्त. वायू म्हणजे गती. (शरीराचे चाक) विविध होर्मोन्स, मज्जातंतूंची देवाण-घेवाण, रक्ताचा प्रवाह इत्यादींची शरीरातील ‘वाहतूक’. वायू जितका जास्त तितका शरीरातील शुष्कपणा जास्त. अग्नी म्हणजे प्रकाश आणि उष्णता. शरीरातील सर्वात महत्त्वपूर्ण अग्नी म्हणजे ‘जठराग्नी’ जो आपण सेवन केलेल्या अन्नामधील प्राण, पाचक रसांच्या मदतीने आरोग्य जपायला मदत करतो. अग्नी जास्त प्रज्वलित झाला तर पित्तप्रकोप होतो आणि कमी झाला तर आम (विषद्रव्य) जमा होतात. जल म्हणजेच जे पाण्यासारखे प्रवाही आहे. शरीरातील विविध रसायने ही क्रियांचा आधार. अधिक झाल्यास कफ दोषाला आमंत्रित करतो. अणू, रेणू आणि परमाणू इत्यादी रचनांनी युक्त म्हणजेच पृथ्वी. अधिक झाल्यास भूक कमी लागणे, शरीराला जडत्व येणे, हालचाली मंदावणे असे त्रास होतात तर कमी झाल्यास हाडे / शरीरातील ताकद कमी होते.
१. तिखट, आंबट, खारट, कडू, गोड, आणि तुरट इत्यादी चवी असलेले विविध पदार्थ प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे योग्य प्रमाणात आहारामध्ये समाविष्ट करणे म्हणजे वात / पित्त / कफ आटोक्यात राहू शकतील.
२. अन्नपचन झाल्यावर बनणारे रस आरोग्याचे चक्र मजबूत करतात. म्हणून अन्नाचे योग्य प्रकार, प्रमाण, वेळ, खाण्याची पद्धत खूप महत्त्वाची असते.
३. चरक लिहितात : Life is just food transformed into life म्हणूनच अन्नातील ‘प्राण’ जपणे खूप महत्त्वाचे आहे.
४. किती अन्न सेवन करावे हे प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीवर तसेच मानसिक स्थिती, कामाचे आणि भुकेचे प्रमाण, वय, ऋतू इत्यादींवर अवलंबून असते. आणि आपण स्वत:लाच अधिक चांगले ओळखू शकतो. म्हणून शरीराशी संवाद साधा. आणि त्याप्रमाणे वागा. दुपारचा एक वाजलाय पण पोट फुगल्यासारख वाटतेय, न जेवलेले बरे! भिंतीवरच्या घडय़ाळापेक्षा शरीराचे ‘घडय़ाळ’ समजून घेणे आरोग्याच्या दृष्टीने अधिक हितकारक आहे. शुद्ध, सात्त्विक, सुवास-रंग-चव मनाला सुखावणारे आहेत असे अन्न शरीराला आणि मनाला योग्य इंधन पुरवते.
असे आरोग्याचे व्रत आपण नक्कीच पाळू शकतो नाही का?
शुभम् भवतु!

Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
America Police
अमेरिकेत चाललंय काय? आणखी एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू, वाणिज्य दूतावासाने दिली माहिती

संगणकाशी मत्री : आरक्षणासाठी खाते कसे उघडाल ?
गीतांजली राणे
मागील भागात आपण संगणकावरून आरक्षण कसे करायचे ते पाहिले. आज आपण हे आरक्षण करण्याकरिता जे खाते तयार करावे लागते ते कसे तयार करावे हे पाहणार आहोत. रेल्वेच्या तिकिटाचे आरक्षण करण्याकरिता https://www.irctc.co.in या संकेतस्थळावर जा. आता आपल्यासमोर र्रॠल्ल वस्र् हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर Registration Form दिसेल. या फॉर्ममध्ये आपल्याला आपली सगळी माहिती भरावी लागेल. उदा. नाव, पत्ता, फोन क्रमांक. फोन क्रमांक तोच द्या, जो सध्या चालू आहे. कारण आरक्षण केल्यानंतर तिकीट आरक्षित झाल्याचा एसएमएस त्याच मोबाइल क्रमांकावर येतो. जो प्रवासादरम्यान तिकीट म्हणून तिकीट तपासनीसाला दाखवावा लागतो. फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर Submit या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर ड‘ या पर्यायावर क्लिक करा. आता आपल्यासमोर नियम व अटी असलेले पान सुरू होईल. या सगळ्या अटी वाचून त्या मान्य असतील तर अूूीस्र्३ या पर्यायावर क्लिक करा. आता आपल्याला कफउळउ तर्फे आपल्या ईमेल आयडीवर Activation Link पाठवली जाईल. ती लिंक ओपन केल्यानंतर Mobile Verification Code पाठवला जाईल. तो कोड टाकून खाते सुरू करता येईल.
आता आपल्यासमोर सुरू झालेल्या पानावर असलेल्या From या पर्यायामध्ये आपले जाण्याचे ठिकाण टाका आणि To या पर्यायामध्ये जिथे जायचे ते ठिकाण लिहा. प्रवासाची तारीख, किती जणांसाठी आरक्षण करायचे याची माहिती भरून Find Trains या पर्यायावर क्लिक करा. ट्रेनची यादी आपल्यासमोर दिसेल. त्यातील आपल्या हव्या असलेल्या ट्रेनच्या नावावर क्लिक करा आणि जर आपल्या त्या ट्रेनचे तिकीट काढायचे असेल तर इ‘ या पर्यायावर क्लिक करून सुरू झालेला Ticket Reservation Form भरा.
ज्या बँकेत आपले खाते आहे त्या बँकेचा पर्याय निवडून तिकिटाचे पसे भरा. आता आपल्याला आपल्या मोबाइलवर आपले तिकीट मिळेल. https://www.youtube.com/watch?v=NbG9izmguCc&noredirect=1 या संकेतस्थळावर गेलात तर आपल्याला चलत्चित्राच्या माध्यमातूनही तिकीट कसे आरक्षित करावे आणि खाते कसे तयार करावे याची अधिक तपशीलवार माहिती मिळू शकेल.
rane.geet@gmail.com

आनंदाची निवृत्ती : संगीत आराधनेचा वसा
एखादा छंद जोपासायचा तर त्यासाठी प्रचंड चिकाटी, जिद्द व मेहनत दाखवावी लागते. मुलांमध्ये लहानपणीच एखादा छंद लागणं आवश्यक असतं, जो पुढे त्यांच्यासाठी आनंदाचा ठेवा ठरू शकतो. म्हणून निवृत्तीनंतर मी लहान मुलांना संगीत शिकवायला सुरुवात केली आणि अपार आनंदाचा धनी झालो.
आमचे घराणे हे एकेकाळी संगीतासाठी फार नामांकित होते. ५०-६० वर्षांपूर्वी आमच्या आजोबांनी गायन व व्हायोलिनवादन शास्त्रोक्त पद्धतीने वाजवण्याचे तंत्र तज्ज्ञ संगीतकारांकडून शिकून घेतले. त्यामुळे माझ्या आजोबांना चर्चमध्ये ‘क्वायर मास्टर’ची नोकरी मिळाली. पुढे त्यांनी स्टाफ नोटेशन पद्धतीने मोठय़ा संगीतकाराच्या रचना बॅले ऑपेरा इत्यादी अचूक वाजवणारी एक बॅन्ड कंपनी काढली. ही बॅन्ड कंपनी नावाजली गेली. पुढे ही कला माझ्या काकांनी आजोबांकडून शिकून पुढे चालू ठेवली. असे संगीत-वादन माझ्या घरी दिवस रात्र होत असले तरी प्रत्यक्ष संगीत शिकण्याचा योग काही आला नाही. मात्र, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काकांनी मला व्हायोलिन शिकवायला सुरुवात केली. पुढे दर रविवारी ‘चर्च गायन मंडळा’मध्ये व्हायोलिन वाजवू लागलो. तेव्हापासून आजपर्यंत या वाद्यावरची माझी ओढ कमी झालेली नाही. पण नोकरीमुळे मला या छंदाकडे पूर्ण वेळ लक्ष देणे जमले नव्हते, मात्र निवृत्तीनंतर संगीत आराधना हाच जीवनाचा अर्थ बनला.
सुरुवातीला सेमिनरीतील एक ब्रदर माझ्याकडे व्हायोलिन शिकत होते. त्यांच्याकडून पाश्चात्त्य संगीतावरील एक ग्रंथ माझ्या हातात पडला. मी त्या ग्रंथाचा बरेच दिवस अभ्यास केला. त्यामुळे माझ्या शिकवण्याला एक निश्चित दिशा मिळाली. त्यातून व्हायोलिनसारख्या वाद्यावर हुकमत येण्यासाठी प्रचंड मेहनत आणि त्यात सातत्य याची गरज असते, हे अनुभवाने माझ्या लक्षात आले. त्यामुळे कोवळय़ा मुलांना शिकवताना त्यांचा हिरमोड न होऊ देता त्यांच्याकडून मेहनत करून घेणे हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे होते. लहान मुलांची मनाची पाटी अगदी कोरी असते. त्यामुळे ती लवकर लक्ष केंद्रित करू शकतात.
मी १९९१ पासून मुलांना शिकवतोय. माझ्याकडे व्हायोलिन, कीबोर्ड व गिटार शिकलेल्याची संख्या सहज पाचशेच्या घरात जाईल. काही पुढे शिकत आहेत. काही चर्चमध्ये वाजवताना दिसतात तर काही सांसारिक अडचणीमुळे पुढे जाऊ शकले नाहीत. तरी प्रत्येकाच्या हृदयात स्वराचा एक हळवा कोपरा आयुष्यभरासाठी तयार करण्यात मी यशस्वी झालो, हे नक्की.