|| डॉ. आशीष  देशपांडे

आपल्याला अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मनात निर्माण झालेल्या  ‘डिफे न्स मेकॅ निझम्स’बद्दल- अर्थात ‘मनाच्या तऱ्हां’बद्दल आपण मागच्या तीन लेखांमध्ये जाणून घेतलं. आता या विषयात थोडं आणखी खोल जाऊ या. मनाच्या या तऱ्हा आपला तात्पुरता बचाव करतात खऱ्या, पण या प्रक्रियेत अनेकदा आपण ठरावीक अनुभवांपासून वंचित राहात असतो. हे कित्येक वेळा आपल्या लक्षातही येत नाही. माणसाच्या अनादि अनंत सुरू असलेल्या सुखाच्या शोधात हा एक अडथळाच म्हणावा लागेल; पण जशा ‘मनाच्या तऱ्हा’ आपसूक तयार होतात, तशी ‘सुखाची रसायनं’ मनात तयार करता येतील का?..

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
diy homemade natural chemical free floor cleaner recipe for a Healthier Home
फक्त २० रुपयांत घरच्या घरी तयार करा फ्लोअर क्लिनर; वापरताच आरश्यासारखी चमकेल फरशी
Children Fear
“बुवा आला…, पोलीस आले…”; अशी भीती तुम्हीही मुलांना घालता का? मुलांच्या ‘घाबरटपणा’मागे पालकच ठरतात जबाबदार!

मनाच्या जडणघडणीत जाणिवेच्या नजरेतनं निसटलेल्या (अनकॉन्शिअस) गोष्टी ‘ओरखडे’ बनून मनावर आपली प्रतिमा उमटवतात. हे ओरखडे किती तापदायक ठरणार ते जनुकीय रचना नि त्या जडणघडणीत तयार झालेली वृत्ती ठरवते. अशा दुखऱ्या नसा प्रत्येकाच्या असतात; पण मेंदूतल्या मज्जापेशींच्या अनंत पुंजक्यांत त्या दडलेल्या असतात. कधी त्यांची पुसट आठवण आपल्याला येणारे अनुभव आपल्याला आवडतात की नाही हे ठरवते, तर कधी अनुभव घेतानाच्या टाळाटाळीसाठी कारणीभूत ठरते.

असे वर्दळीपासून मुद्दाम दूर ठेवलेले पुंजके एकूणच मेंदूची कार्यक्षमता कमी करणार, कारण त्या पुंजक्यांशी निगडित मेंदूक्षमता वापरात येतच नाही. त्यामुळे घडून येणारी एककल्ली वाढ दैनंदिन जीवनावर परिणाम करणार की नाही, हे एकूणच या पुंजक्यांनी घातलेल्या बंधनांवर अवलंबून असतं. म्हणजेच हा ‘तऱ्हेवाईकपणा’ आपल्या अनुभवविश्वाला जसा बंधनं घालतो, तसाच आपल्या कर्तृत्वालाही, आणि आपण त्यापासून अनभिज्ञच राहातो. या स्वत:हून निवडलेल्या वंचितावस्थेत अपूर्णत:, निराशा, वैफल्य, आकस सहज येऊ शकतात नि व्यक्तीला स्वत:ला स्वीकारायला आध्यात्मिक गरज निर्माण होते.

कधी काही प्रसंगांत या पुंजक्यांभोवती असलेले पुंजके अचानक येणाऱ्या संकटसदृश परिस्थितींनी अकार्यक्षम होतात. तेव्हा या दुखऱ्या नसेच्या पुंजक्यांचा वापर अनिवार्य होतो. रेल्वेचे रूळ बदलल्यासारखी सर्वच वैचारिक-भावनिक वर्दळ याच दुखऱ्या पुंजक्यांतून व्हायला लागते आणि मनाला बेचैनी आणि चिंतेचं ग्रहण लागतं. परिस्थितीला साजेशी किंवा न्याय्य न वाटणारी ही बेचैनी, चिंता अनेकांना समजत नाही, अनेकांना ‘सुखातलं दु:ख’ वाटते. गेल्या तीन लेखांमध्ये आपण वेगवेगळ्या १० ‘मनाच्या तऱ्हा’ आणि त्यांचा वागण्यावर नि मन:स्वास्थ्यावर होणारा परिणाम आपण पाहिला. आता आपण ही अस्वस्थता कुठून येते हे समजून घेण्याचा प्रयत्न करू या. आपण दुखऱ्या नसांबद्दल बोललो; पण गंमत अशी की, प्रत्यक्ष मेंदूला स्पर्श जाणवतच नाही. अगदी शस्त्रक्रिया करतानाही नाही. मग ‘दुखरी नस’ म्हणजे नक्की काय?

हजारो वर्षांपासून माणसाला उत्तेजक आणि मादक पदार्थाची माहिती आहे. परिस्थितीत काहीही बदल झाला नसतानाही काही काळासाठी विवंचनांना विसर पाडणारी, दुखणी, भीती कमी करणारी, थकवा घालवणारी, शौर्य वा लैंगिक सामर्थ्य वाढवणारी पेयं/पदार्थ माणसानं सर्रास वापरले आहेत. या रसायनांचा ‘सुखाच्या शोधातला’ अनुभव ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या प्रश्नाचं उत्तर दुसरंतिसरं काही नसतं, तर ते ‘रासायनिक असतं’ हेच सांगतो! ही सगळी उत्तेजकं जेव्हा मेंदूत पोहोचतात तेव्हा आपल्या मेंदूतल्या सुखाच्या/संतृप्तीच्या रसायनांचा ओघ वाढवतात. जसं या उत्तेजकांचं प्रमाण रक्तातून कमी होतं, तसा तो ओघ कमी होतो. डोपामाईन, सेरोटोनिन, एनकेफालिन/ एन्डॉर्फिन्स, नॉरएड्रनालिन अशी ती रसायनं. सकाळपासून दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत आपण ज्या गोष्टी आवडीनं किंवा नावडीनं करतो किंवा टाळतो त्या सगळ्यांशी या रसायनांचा कुठून तरी संबंध असतो.

आवडत्या गोष्टी मादक पदार्थासारख्या असतात. त्या करण्यासाठी फारसा खटाटोप करायला लागत नाही. नावडत्या गोष्टी मनाविरुद्ध करायला लागल्यामुळे या रसायनांना जशी गळती लागते, तशीच गळती मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांमुळेही लागते. किंबहुना कुठल्याही अपेक्षाभंगामुळे ही गळती वाढू शकते. जसं भुकेल्या पोटी आवडत्या खाद्यपदार्थाच्या नुसत्या आठवणीनंही तोंडाला पाणी सुटतं, तसंच नकारात्मक अनुभवाच्या अपेक्षेनं किंवा आठवणीनंदेखील या ‘सुखाच्या रसायनां’ना ओहोटी लागते. असे अनुभव, आठवणी, दिनचर्या, कर्तव्यं, जबाबदाऱ्या, नाती सांभाळून टाळता आल्या तर ठीक, नाही तर आयुष्यातला गुंता वाढतच राहातो.

ही सुखाची रसायनं  फक्त उत्तेजकांनीच वाढतात असं नाही. व्यायाम, त्यामुळे वाढलेली रक्ताची प्राणवायू आणि जीवनसत्त्व/ क्षार वहनाची क्षमता, यामुळे जशी या रसायनांमध्ये वाढ होते, तशीच वाढ ही व्यायामामुळे तयार होणाऱ्या ‘ब्रेन डिराइव्हड’ आणि ‘इन्सुलिन डिपेंडंट’ नव्‍‌र्ह फॅक्टरनी तयार होणाऱ्या नव्या मेंदूपेशींच्या पुंजक्यांनी होते. या नवीन पुंजक्यांवर ओरखडे नसल्यानं सुखाच्या रसायनांच्या निर्मितीत अडसर राहात नाही. भरपूर पाणी, जीवनसत्त्वं, योग्य आहार, या नवनिर्मितीत मदतच करतात. या नवीन पुंजक्यांत जास्तीत जास्त सुखाची रसायनं तयार व्हावीत यासाठी ते तयार होत असताना ज्या ज्या गोष्टींमधून आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टी करणं आवश्यक होतं, जेणेकरून नवीन पुंजके ही रसायनं बनवण्यात सराईत होतील. आपल्या आयुष्यात छंदांचं महत्त्व हेच असतं. हे नवीन पुंजके तयार होऊन जुन्यांशी जोडण्यासाठी मेंदूला ‘नवीन काही तरी शिकण्याचा’ प्रयत्न करायला लागतो. हे सगळं करण्यासाठी मनाची लवचीकता नि जुन्या अनावश्यक र्निबधांना जोखून पाहाण्याची तयारी लागते. या सगळ्याच गोष्टी उत्तेजकांसारखाच सुखाची रसायनं वाढवायचा प्रयत्न नैसर्गिकरीत्या करतात. फम्रक इतकाच, की उत्तेजकं तो बदल पटकन, जोमानं, पण तात्पुरता करतात, तर या गोष्टींना वेळ लागतो; पण एकदा का रतीब सुरू झाला की झाला! पण या प्रक्रियांनाही जनुकीय मर्यादा असतातच.

सकाळी ताजंतवानं वाटणं नि संध्याकाळी थकणं हा सगळ्यांचाच अनुभव आहे. झोपेत आपला मेंदू मोबाइलसारखाच चार्ज होतो (सुखाची रसायनं तयार होतात). जर मेंदूच्या अकार्यक्षमतेमुळे झोपेत तो चार्ज नाही झाला किंवा जनुकीय वैविध्यामुळे या रसायनांची निर्मिती कमी असली किंवा ‘मेंदूमनातल्या ओरखडय़ां’नी पेशींची ही रसायनं तयार करण्याची ताकद कमी केली किंवा गळती वाढवली, तर ही रसायनं मेंदूतल्या मोक्याच्या जागी कमी पडतात. साहजिकच त्याचा परिणाम मेंदूच्या कामांवर होतो. झोप, विचार करणं नि भावना तयार करणं, यांवर झालेला या रसायनांच्या कमतरतेचा परिणाम ती कमतरता आपसूक भरून काढण्याची शक्यताच कमी करतो. एवढंच नाही, तर ती कमतरता अधिकाधिक तीव्र बनते. नकारात्मक विचार-भावना, त्यातून घेतले गेलेले चुकीचे निर्णय, व्यसनाधीनता (विनाशकाले विपरीत बुद्धी), झोप-आहार-स्वास्थ्याकडे झालेलं दुर्लक्ष, त्यातून निर्माण होणाऱ्या शारीरिक समस्या आणि मानसिक ताणतणाव आणि त्यांना सामोरं जाण्यासाठी लागणाऱ्या विवेकबुद्धीला रसायनांच्या कमतरतेनं लागलेलं ग्रहण, अशा दुष्टचक्रात ती व्यक्ती अडकते.

मेंदू कवटीत असतो हे सर्वश्रुत आहे, पण शरीरशास्त्रातील काही लोकांना असं वाटतं, की कदाचित माणसाच्या शरीरात दोन किंवा तीन मेंदू असतील. दुसरा पोटात नि तिसरा कदाचित हृदयात! गर्भाशयात एका पेशीपासून विभाजन होत शरीर बनत असताना, ज्या पेशीपासून मज्जासंस्था बनते, त्याच पेशीपासून पचनसंस्था बनते. त्यामुळे या दोन्ही संस्थांमध्ये रसायनं सारखीच आढळतात आणि रसायनांच्या कमतरतांचे परिणामही. ताणतणावांमुळे होणारा मधुमेह, रक्तदाब, ‘इरिटेबल बॉवेल सिंड्रोम’, बद्धकोष्ठ, हृदयविकाराचा झटका, हे मानसशास्त्र     ‘मानस-शरीरशास्त्र’ असल्याचीच ग्वाही देतात.

अ‍ॅरिस्टॉटलच्या सुखासीनतेपासून सुरू झालेला आधुनिक मानसशास्त्राचा प्रवास फ्रॉईड-युंगच्या ‘स्वप्निल’ आळोख्या- पिळोख्यांतून कूस बदलून, डेकार्टेच्या मेंदू-मनाच्या संकल्पनेतून आकार घेऊन, मास्लो-पियाजे-एरिक्सन यांच्या ह्य़ूमॅनिस्ट मानसशास्त्राकडे आणि पुढे विल्हेम वून्ड्ट-एडवर्ड टिट्चनर यांच्या प्रयोगशाळांतील कॉग्निटिव्ह मोजमापांतून मज्जाशास्त्रापर्यंत पोहोचला. काल्पनिकापासून भौतिकापर्यंतचा हा प्रवास मानसशास्त्रासाठी नि दुर्दैवी रुग्णांसाठी सोपा कधीच नव्हता. मनाचा ताबा पूर्वापार ‘धर्मानं’ घेतला होता. त्यानंतर तत्त्ववेत्ते आले. त्यांच्या विवादात माणसाचे ‘विचार-भावना-वर्तणूक’ यांची जी काही कारणमीमांसा होती तिला पाप-पुण्य, स्वर्ग-नरक अशा अप्रायोगिक/ काल्पनिक संकल्पनांचं कोंदण होतं किंवा नैतिक-अनैतिकतेचा आधार होता. आदिमानवापासून मानवापर्यंत झालेल्या उत्क्रांतीत समूहजीवन, शेती नि स्वसंवर्धनासाठी, स्वसुरक्षेसाठी वस्तू-शस्त्रांची निर्मिती या तीन गोष्टी बदलल्या. एकत्र राहाण्यासाठी नियमावलीची गरज निर्माण झाली. ही नियमावली साहजिकच ‘जिसकी लाठी उसकी भैंस’प्रमाणे समूहाला सुरक्षा पुरवणाऱ्यांच्या हातात आली. ज्यांचे नियम लोकांना समूहजीवनासाठी उपयुक्त वाटले, पिकांसाठी लागणारा अवधी देऊ शकले नि परकीय आक्रमणांपासून वाचवू शकले त्यांचं नेतृत्व समूहात तयार झालं. वैयक्तिक हेवेदावे, जिद्द, हव्यासापोटी अशा वस्त्यांमध्ये कलह होऊ लागले. त्याच वेळी यंत्र आणि शस्त्र-शास्त्रांतील प्रगतीमुळे माणसाची संहारकता वाढायला लागली. वस्ती, टोळी, राज्यं अशी समूहवृद्धी होत असताना स्वसमूहसुरक्षा, बाधक विचारांपासून परावृत्त करण्यासाठी नि एकजूट वाढवण्यासाठी एका नवीन नियमावलीची गरज समाजातल्या प्रत्येक घटकाला जाणवायला लागली. आजप्रमाणेच तेव्हाही युद्धात/ संघर्षांत गोरगरिबांचीच होरपळ जास्त होत असणार. समाजकारणातील राजकारण आणि अर्थकारण सांभाळून समूहनीती जपण्यासाठी ‘माणसानं कसं वागायला पाहिजे’ याबद्दल मार्गदर्शक तत्त्वांची गरज साधारणपणे माणसाच्या इतिहासात ताम्रकालामध्ये निर्माण झाली. ५००० वर्षांपूर्वीही अशा मार्गदर्शक तत्त्वांची गरज भासलेली जाणवते, पण बहुतांश वेळा ती ‘पुनरोत्पादन-आजार-मृत्यू’शी निगडित वाटते. जगातील विविध ठिकाणी झालेल्या ‘मार्गदर्शक तत्त्वां’मध्ये काळाप्रमाणे फेरविचारही झाला. अशा फेरविचारांतून तावूनसुलाखून जे विचार तरले ते साधारण इ.पू. २००० ते इ.नंतर ५००-६०० वर्षांमध्ये बऱ्यापैकी घट्ट झाले. स्वास्थ्य-सुरक्षा-समूहजीवन सांभाळत वैयक्तिक उत्कर्ष साधण्याची संधी केवळ क्षमताधिष्ठित न ठेवता, मार्गदर्शक तत्त्वांच्या अंगीकारणात दाखवून, एकत्रित समाजातील बहुतांचं हित साधण्याचा प्रयत्न मनात ठेवूनच सध्याच्या धर्माचा उगम झाला असावा. समूहनीतीचं भान नि प्रबोधन कठीण किंवा वेळखाऊ वाटल्यानं स्व-उत्कर्षांचं गुपित ‘जन्नत-स्वर्ग-हेवन’ या सुखासीनतेच्या संकल्पनांत, तर ‘जहन्नम-नरक-हेल’ या भीतीत आणि ‘निज्जत-मोक्ष-सॅल्वेशन’च्या आमिषांत दाखवून तो उत्कर्ष साधण्यासाठी ‘नमाज-पूजा-प्रेअर्स’, पवित्र वस्तू-चिन्हं-प्रथांची समर्पक, स्वयंसिद्ध, स्वयंपूर्ण आणि सामूहिक पद्धत म्हणजे धर्म. म्हणूनच धर्म माणसाला ‘अशा परिस्थितीत वागायचं कसं?’ हे सांगू शकतो.

मानसशास्त्रात ‘माणूस असा का वागत असेल?’ याचा नुसता तर्क नसतो, तर त्याला प्रायोगिक पुरावा लागतो. मेंदूच्या अनाकलनीय प्रक्रिया आणि धर्माच्या अप्रायोगिक/ काल्पनिक संकल्पना यांचा मेळ घालणं मानसशास्त्राला फारसं जमलं नाही आणि या विवादातलं मानसशास्त्राचं स्थान गेल्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत विवादास्पदच (किंवा हास्यास्पदच) राहिलं होतं.

माणसाच्या मनाला सांभाळणाऱ्या, समजून घेणाऱ्या, बळ देणाऱ्या, समाधान/ संतृप्ती देणाऱ्या, चुकांचं परिमार्जन करणाऱ्या कित्येक चांगल्या गोष्टी सगळ्याच धर्मात आहेत. मेंदूमानसशास्त्रात झालेल्या गेल्या शतकातील प्रगतीमुळे बरेचसे अंधश्रद्धाग्रस्त आजार आता दवाखान्यात बरे व्हायला लागले आहेत. एपिलेप्सी, पॅरानोया, चर्मरोग, देवी, करणी/ वशीकरण, अंगात येणं, असे किती तरी आजार औषधोपचारानं बरे होतात- पापपुण्याचा घडा नि पूर्वजन्मीचा उलगडा लागत नाही.

फ्रॉईडियन कल्पनेच्या भराऱ्या, धर्मातल्या अप्रायोगिक संकल्पना आणि तत्त्वज्ञानाचा नैतिक-अनैतिकाचा रोख, या सगळ्यांतून मार्ग काढत मनोरुग्ण नि मानसोपचारशास्त्र शल्य, काळिमा, गैरसमज, कुचेष्टांना धीरानं सामोरं जात, मेंदूमनशास्त्र (न्यूरोसायकोलॉजी), मेंदूरसायनशास्त्र (न्यूरोके मिस्ट्री), मेंदूभौतिकशास्त्र (न्यूरोफिजिक्स), मेंदूजनुकीयशास्त्र (न्यूरोजेनेटिक्स), इतकंच नाही तर मेंदूतत्त्वज्ञानापर्यंत (न्यूरोफिलॉसॉफी) पोहोचलं आहे. बेचैनीच्या परिस्थितीजन्य उगमाबद्दल पुढच्या (१० एप्रिल) लेखात.

dr.deshpande.ashish@gmail.com