जाँनिसार अख्तर म्हणजे उर्दूतील पुरोगामी चळवळीतील एक नज्मगी शायर. रोमँटिक संवेदनशील मनोवृत्ती, तरल शब्दभांडार, गेय छंदांवर असामान्य प्रभुत्व, ग़ज़्‍ालीयतचे सखोल ज्ञान या दुर्मीळ प्रतिभेमुळे जाँनिसार अख्तरचे समग्र काव्य, अन्य समकालीन शायरांपेक्षा वेगळे उठून दिसतं. यासह त्यांची सामाजिक, राजकीय जाण परिपक्व  होती, याची प्रचीतीही येते.

‘शोले’ चित्रपट आला, गाजला अन् त्यांची नवी ओळख निर्माण झाली – जावेद अख्तरांचे वडील. त्यापूर्वी त्यांची ओळख उर्दूतील पुरोगामी चळवळीतील एक नज्मगी शायर अशी होती. त्यानंतर ‘घर आंगन’ या पतीपत्नीच्या प्रेमातील प्रेयस छटांचं मोहक विश्लेषण करणाऱ्या ‘रुबाइयां’ संग्रहाचा संवेदनशील कवी. अन् मग आयुष्याच्या उत्तरार्धात रचलेल्या लक्षणीय प्रतिभेच्या ग़ज़्‍ालसंग्रह ‘पिछले पहर’चा ग़ज़्‍ालकार.- ते म्हणजे जाँनिसार अख्तर.
खरं तर चित्रपट रसिकांत जावेद अख्तरांचे स्थान काही असो उर्दू वाङ्मयविश्वात मात्र त्यांची ओळख अजूनही जाँनिसार अख्तर यांचा मुलगा अशीच आहे व तीच राहील. रोमँटिक संवेदनशील मनोवृत्ती, तरल शब्दभांडार, गेय छंदांवर असामान्य प्रभुत्व, ग़ज़्‍ालीयतचं सखोल ज्ञान या दुर्मीळ प्रतिभेमुळे जाँनिसार अख्तरांचं समग्र काव्य अन्य समकालीन शायरांपेक्षा वेगळं-उठून दिसतं.
उजडी-उजडी सी हर एक आस लगे
जिन्दगी राम का बनवास लगे
तू कि बहती हुई नदिया के समान
तुझको देखूं तो मुझे प्यास लगे
मिथकांचा सुयोग्य वापर, हिन्दीचे प्रचलित शब्द सहजपणे वापरणं हे त्यांचं वैशिष्टय़. एका ग़ज़्‍ालचा मतला (आरंभिका) पाहा-
जिन्दगी ये तो नहीं तुझ को सँवारा ही न हो
कुछ न कुछ हमने तेरा कर्ज उतारा ही न हो
जीवनाला मित्राप्रमाणे संबोधित करताना त्यांची जीवन-व्याख्या पाहा-
 ये जिन्दगी मुझे खुलती हुई किताब लगे..
जीवनाकडे बघताना जाँनिसारांना दु:खाचा आधार वाटत असे.
मैं जिन्दगी मैं बडी दूर तक चला आया
किसी के गमने बडा आसरा दिया है मुझे।
असं असूनही जीवनातील सौंदर्य ते नाकारीत नाहीत.
कब तेरे हुस्न से इन्कार किया है मैंने
जिन्दगी तुझ से बहुत प्यार किया है मैंने।
जाँनिसार अख्तरांनी युद्धकाळात ‘आवाज दो हम एक है’सारखे समर गीत लिहिले तर चित्रपटांसाठीदेखील अनेक गीते लिहिली. ती गीते वाङ्मयीनदृष्टय़ाही श्रेष्ठ आहेत.

loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
artificial intelligence make debut in Lok Sabha polls ai based software tools app in 2024 lok sabha elections
राजकारणातल्या अदृश्य शक्ती
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

ये दिल और उनकी निगाहों के साये
मुझे घेर लेते है बाहो के साये

दीवाना मुहब्बत का कहीं डर के रुका है?
दरबार में शाहों के कभी इश्क झुका है?
खुद इश्क के दरबार में शाहों को झुका दे
आ जाने-वफा..

आप यूँ फासलों से गुजरते रहे
दिल से कदमों की आवाज आती रही
थोडय़ा थोडक्या नव्हे तर तब्बल ८० चित्रपटांसाठी जाँनिसार अख्तरांनी गाणी लिहिली. त्यातील काहींचे बोल असे आहेत –
 ‘गरीब जान के हम को न तुम मिटा देना’, ‘मन मोरा बावरा’, ‘मेरी नींदें में तुम’, ‘बेचन नजर’, ‘पिया पिया पिया मेरा जिया पुकारे’, ‘बेबसी जब हद से गुज़्‍ार जाये’, ‘बेमुरव्वत बेवफा’, ‘गम की अंधेरी रात में’, ‘तुम महकती जवां चांदनी हो’, ‘ए दिले नादां’ आदी
ऐकताना, वाचताना या साऱ्यांत छंद, गेयता आणि अर्थपूर्णता यांचा सुरेल मिलाफ जाणवते. उदा.
आँखों ही आँखों में इशारा हो गया,
बठे बठे जीने का सहारा हो गया
आमचे ज्येष्ठ शायर निदा फाजली म्हणतात, फिल्मी दुनियेत दोन प्रकारचे शायर सापडतात. एक ते ज्यांना फिल्मी जग शायर बनवते. अन् दुसरे ते जे स्वत: शायर असतात अन् ते आपआपल्या काव्यसंग्रहासह फिल्म इंडस्ट्रीमध्ये येतात. जाँनिसार हे दुसऱ्या प्रकारचे शायर होते.
१९४८ मध्ये ‘शिकायत’ या प्रथम चित्रपटासाठी गाणे लिहिण्यापूर्वी जाँनिसार यांचे ‘जाविदाँ’, ‘खाके-दिल’, ‘नजरे-बुताँ’ हे काव्यसंग्रह प्रकाशित होते. साहिर लुधियानवी हा मित्र असल्याने त्यांच्या काव्यावर ते परिष्करण करीत असत. साहिर हा अल्पप्रसव शायर तर जाँनिसार हे आशुकवी होते. साहिर हे चित्रपटसृष्टीत आपल्या डाव्या विचारसरणीच्या, प्रेमपद व विद्रोही काव्यामुळे चांगलेच लोकप्रिय होते. त्यामुळे त्यांना गीतकार म्हणून बरीच मागणी होती. मागणी तेवढा पुरवठा करणे शक्य न झाल्याने कदाचित आíथक विवंचनेतील जाँनिसारने अनेक जण म्हणतात त्याप्रमाणे साहिरसाठी घोस्ट राइटिंग केलेही असेल. ‘चित्रलेखा’ या चित्रपटातील ‘संसार से भागे फिरते हो’ या गीतांची भाषा नीरज शैलीची आहे. साहिरपेक्षा ती जाँनिसारच लिहू शकतात असे मला तरी वाटतं. पण वाटणं हे काही प्रमाण होऊ शकत नाही. असो.
साहिरने जाँनिसारला आíथक आधार दिला, तर जाँनिसार अख्तरने यांना त्यांच्या एकटेपणात सतत सोबत राहून मित्र या नात्याने मानसिक आधार दिला. एकटेपणा, एकांत साहिरला खायला उठे. त्यामुळे मफिली काव्याचा त्याला शौक होता. तो स्वत:च एक अंजुमन (म्हणजे सभा, मफील) संबोधला जाई. पण जाँनिसार म्हणतात-
जो अपनी जात से अंजुमन कहा जाये
वो शख्स-तक मुझे तनहा दिखाई पडता है
जाँनिसार अख्तर यांची सामाजिक, राजकीय जाण परिपक्व होती. मध्यवयानंतर ते ग़ज़्‍ाल-सृजनाकडे वळले अन् सत्तर-ऐंशी ग़ज़्‍ालात साहिर, मजरूह, कैफी, जाफरी मख्दूम यांना त्यांनी मागे सोडले, या संदर्भातील काही शेर बघा-
शर्म आती है कि उस शहर में हैं हम कि जहाँ
न मिले भीख तो लाखों का गुजारा ही न हो
बेकारी, विवशता, गरिबी, लाचारी, आळस या साऱ्यांचा समाचार या शेरात घेतला गेलाय. एके ठिकाणी ते उपहासाने म्हणतात-
हमने इन्सान के दुख दर्द का हल ढूंढ लिया
क्या बुरा है कि ये अफवाह उडा दी जाए?
(मानवाच्या व्यथा-वेदनांवरील उपाय आम्हाला सापडलाय अशी अफवा पसरविण्यात काय वाईट आहे?)
आम्ही लवकरच परिवर्तन घडवून आणू अशा वल्गना करणाऱ्या नेत्यांना उद्देशून ते म्हणतात-
जब भी चाहेंगे जमाने को बदल डालेंगे
सिर्फ कहने के लिये बात बडी है यारों
जाँनिसार अख्तर यांच्या काव्याचा अन् ग़ज़्‍ालचा मूलभूत विषय म्हणजे प्रेम. पत्नी व प्रेयसी या द्वैतामध्ये त्यांनी एकरूपता आणली. ती एकरूपता मनाची शरीराची अन् विचारांची होती.
सोचो तो बडी चीज है तहजीब बदन की
वर्ना तो बदन आग बुझाने के लिये है
(विचारांती लक्षात येतं, शरीराची संस्कृती ही मोठी गोष्ट आहे, अन्यथा शरीर तर आग विझविण्यासाठी असतं) दोन देहांची एकरूपता, एकत्व ते पुढील शेरात नमूद करतात-
तू इस कदर मुझे अपने करीब लगता है
तुझे अलग रहे जो सोचूँ अजीब लगता है
आपल्या ग़ज़्‍ालांतील निवडक शेर फक्त पत्नीरूपी प्रेयसीसाठीच आहेत हे सांगताना-
अशआर मेरे यूँ तो जमाने के लिये है
कुछ शेर फकत उनको सुनाने के लिये है
मात्र ‘घर आंगन’ या रुबाईसंग्रहात ते स्वत:सवे पत्नीच्या भूमिकेतून प्रेमरंगाच्या विविध छटा शब्दबद्ध करतात-
आहट मेरे कदमों की जो सुन पाई है
इक बिजलीसी तनबदन में लहराई है
दौडी है हरेक बात की सुध बिसरा के
रोटी जलती तवे पर छोड आई है

नजरों से मेरे खुद को बचा ले कैसे
खुलते हुए सीने को छुपा ले कैसे
आटे में सने हुए है दोनों ही हाथ
आंचल जो संभाले तो संभाले कैसे
पत्नीच्या भूमिकेतून साकारलेली ही
मोहक रुबाई

वो दूर सफर पे जब भी जाएंगे सखी
साडी कोई कीमती-सी ले आयेंगे
चाहूँगी उसे सेंत के रख लूं लेकिन
पहनू न उसी दिन तो बिगड जाएगें
उर्दू ग़ज़्‍ालने वली, मीर, गालिब, फानी, यगाना , जिगर, फैज, नासिर, बानी अशी अनेक वळणे पाहिली. जाँनिसार अख्तर हे वेगळं वळण अधोरेखित केल्याशिवाय उर्दू ग़ज़्‍ालेचा इतिहास अपूर्णच म्हणावा लागेल. एवढंच नव्हे तर  त्यांनी संपादित केलेल्या ‘हिन्दोस्तां हमारा’ या मौल्यवान बृहद् उर्दू शायरीच्या संकलनामुळे, भारतीय संस्कृतीच्या प्रत्येक पलूला उर्दू साहित्यिकांनी गेली सातशे वर्षे किती आत्मीयतेने शब्दरूप दिलंय हे कळतं. (केवळ या दोन वाङ्मयीन योगदानामुळे जाँनिसार (८-२-१९१४ ते १८-८-१९७६) यांचे नाव त्यांचे पणजोबा फजले-हक खैराबादी (यांनी गालिबचा ‘दीवान’ संपादित केला.) प्रमाणे उर्दू साहित्यात वारंवार उद्धृत होत राहील. रोमँटिक ग़ज़्‍ालचा हा पुरोगामी शायर फिल्मी जगतात उपेक्षित राहिला पण उर्दू काव्यरसिकांत अजूनही त्यांच्या आठवणी तेवत आहे.   
डॉ. राम पंडित -dr.rampandit@gmail.com