08 August 2020

News Flash

अंजुमन

निदांच्या कवितेचा केंद्रिबदू ‘माणूस’ आहे. चिंतांनी त्रस्त माणसाच्या मनात ते उतरून त्यांची व्यथासुखे काढून घेतात.

| May 2, 2015 01:01 am

sahrनिदांच्या कवितेचा केंद्रिबदू ‘माणूस’ आहे. चिंतांनी त्रस्त माणसाच्या मनात ते उतरून त्यांची व्यथासुखे काढून घेतात. जसे, ‘हर तरफ  हर जगह बेशुमार आदमी, फिर भी तनहाईयों का शिकार आदमी’.  एक अवलिया कवी, गझलकार निदा म्हणजे चालताबोलता अंजुमन वा मैफल.

काळ- आठ-दहा वर्षांपूर्वीचा.
स्थळ – मुंबईच्या खारदांडा रोडवरील १०३, अमर अपार्टमेंट्स, ब्लॉक नंबर २१.
वेळ – संध्याकाळचे सहा ते दहा-बारा.. दररोज.
हिंदी, उर्दू, मराठी, गुजरातीचे सहा-सात साहित्यकार स्थानापन्न आहेत अन् समोरच्या उर्दूतील ज्येष्ठ जनकवीचे बोलणे सश्रद्धपणे तर काही मंत्रमुग्ध होऊन कानात साठवीत आहेत. हे दृश्य जवळपास रोजचेच, मंत्रमुग्ध करणारी रसाळ वाणी व लेखणीचा हा उर्दू कवी साहित्यकार निदा फाजली या नावाने उर्दूसह हिंदी, गुजराती व मराठी काव्य प्रांतातही लोकप्रिय आहे.
 उर्दू साहित्यात नजीर अकबराबादी (१७३५-१८३०) व नजीर बनारसी (१९०९-२०००) या दोघांनंतर निदा फाजली हेच जनकवी संबोधले जाऊ शकतात. कारण या तिघांनी संमिश्र संस्कृतीचे प्रश्न, आशा-आकांक्षा, श्रद्धा यांचा तर्कनिष्ठ मागोवा आपल्या काव्यात घेतला. समकालिनांकडून अनवधानाने निसटलेले विषय, सहज सोप्या गेय भाषेत यांनी काव्यात ओवले. कृष्ण, राम, शिव, येशू, बुद्ध, महम्मद पगंबर यांच्या संदर्भात यांची लेखणी कुठेही कृत्रिम भासत नाही. यांना धार्मिक म्हणावं तर तसंही नाही.
निदा फाजलींच्या उर्दू भाषेवर, विचारांवर, मीर अमीर खुसरो, प्राचीन उर्दू शायरांप्रमाणे कबीर, रहीम, सूरदास, मीराबाई आदी हिंदी संतकाव्य भाषेचे संस्कार सखोल जाणवतात.
सातों दिन भगवान के, क्या मंगल क्या *पीर
जिस दिन सोये देर तक, भूखा रहे फकीर
सीधा सादा डाकियां, जादू करे महान
एकही थले में भरे, आँसू और मुस्कान
बच्चा बोला देखकर, मस्जिद आलीशान
अल्ला तेरे एक को इतना बड़ा मकान?
 देशाच्या फाळणीच्या काळात एका रात्रीत निदा फाजलींचे कुटुंब पाकिस्तानला रवाना झाले अन् ते मात्र ग्वाल्हेरलाच राहिले. म्हणूनच आपले क्षणार्धात लुप्त झालेले हसते खेळते ‘घर’ विविध अर्थासह प्रतीकात्मक, रूपकात्मक अंगाने त्यांच्या काव्यातून आपल्याला भेटत राहते. त्यांच्या जीवनाचा आलेख त्यांनी आपल्या द्विखंडात्मक आत्मचरित्रात मांडला आहे. (दीवारों के बाहर अन् दीवारों के बीच) दोन्ही खंड मराठीत अनुवादित झालेले आहेत व त्या अनुवादाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
निदा फाजली कविता ग़ज़्‍ाल व गीत या तिन्ही काव्य-विधांचे शायर मानले जातात. त्यांच्या या तीन सृजनांची झलक पाहू या-
दुनिया जिसे कहते है बच्चे का खिलौना है
मिल जाय तो मिट्टी हैं खो जाय तो सोना है

चलो इस तरह से सजाएँ इसे
ये दुनिया हमारी तुम्हारी लगे

*दरख्म्तों को हरा रखने के जिम्मेदार थे दोनों
जो सच पूछो बराबर के मुजरिम *बागबाँ और हम

कभी किसी को *मुकम्मल जहाँ नहीं मिलता
कही जमी तो कही आसमाँ नहीं मिलता
 चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून निदा फाजलींचे नाव अन्य यशस्वी गीतकारांसमवेत घेता येणार नाही, कारण केवळ गेयमूल्य असलेली त्यांची गीते नाहीत. आशयगर्भता हा त्यांच्या गीताचा, कवितेचा गाभा आहे. चित्रपटातील उर्दू गीतकारांना उर्दू साहित्य जगतात निदांसारखी प्रतिष्ठा नाही. हे ऋणानुबंध व अनुनयाच्या बळावर पुरस्कार हस्तगत केले तरी वाङ्मयीन अभिरुची असलेल्या वर्गात आहे. त्यांच्या गीतांचे मुखडे बघा –
हर कविता मुकम्मल होती है
लेकिन वो कलम से कागज़्‍ा पर जब आती है
कुछ थोडी-सी कमी रह जाती है

कठपुतली है या जीवन है
जीते जाओ सोचो मत

वृन्दाबन के कृष्ण कन्हैया अल्ला हूँ
बंसी, राधा, गीता मय्या अल्ला हूँ
निदांच्या कवितेचा केंद्रिबदू ‘माणूस’ आहे. मग तो गावातला असो, शहरातला असो भारतातला असो वा पाकिस्तानातला. समस्यांनी, चिंतांनी त्रस्त असलेल्या माणसाच्या मनात ते उतरून त्यांच्या व्यथासुखे काढून घेतात. त्यांचे या संदर्भातले शेर पाहा-
हर तरफ हर जगह बेशुमार आदमी
फिर भी तनहाईयों का शिकार आदमी
या हताश माणसाला ते म्हणतात-
कृष्ण वादा निभाने न जाने कब आये
तुम अपने हाथ के सूरज उभारने निकलो

हिन्दु भी मजे में हैं मुसलमाँ भी मजे में
इन्सान परेशान यहाँ भी है वहाँ भी

हर आदमी में होते हैं दस-बीस आदमी
जिसको भी देखना हो कई बार देखना
निदा फाजलींचा जन्म १२ ऑक्टोबर १९३८ ला दिल्ली येथे झाला. प्राथमिक शिक्षण ग्वाल्हेर येथे झाले. इंग्रजीत त्यांनी एम.ए. केले. उर्दू साहित्यातील ते एक मान्यवर हस्ती गणले जातातच. ‘लफ्जें का फूल’ हा त्यांचा ग़ज़्‍ाल काव्यसंग्रह प्रकाशित होताच भारत-पाकिस्तानात त्यांना जी लोकप्रियता लाभली तशी लोकप्रियता फार कमी शायरांना आजवर मिळाली. मुलाकाते व गद्य लिखाणामुळे ते वादग्रस्त ठरले व सतत चíचत व्यक्तिमत्त्व ठरले. ‘मोरनाच’, ‘आँख और ख्वाब के दरमिया’, ‘ खोया हुआ सा कुछ’ (साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त संग्रह) ‘आँखो भर आकाश’,‘आदमी की तरफ’, ‘कुल्लियात’ हे त्यांचे संग्रह असून ‘दीवारों के बीच’ व ‘दीवारों के बाहर’ आत्मकथा खंड लोकप्रिय आहेत.
‘आई’ ही व्यक्ती निदांच्या भावविश्वाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. तिचे पाकिस्तानात निघून जाणे त्यांना व्यथित करून गेले. अनेक शेरात, कवितेत ती व्यथा अशी साकारते-
बेसन की सोंधी रोटी पर
खट्टी चटनी जैसी माँ
याद आती है चौका-बासन
चिमटा, फुकनी जैसी माँ

आधी सोयी, आधी जागी
थकी दोपहरी जैसी माँ
बीवी, बेटी, बहन, पडोसन
थोडी थोडी-सी सब में
दिनभर इक रस्सी के ऊपर
चलती नटनी जैसी माँ
तुलसी की चौपाई ही या मीरा के गीत
तन में माँ का दूध ही जग में बांटे प्रीत

गिरजा में ईसा बसें मस्जिद में रहमान
माँ के परों से चले हर आंगन भगवान
किसी में उसकी चाल है किसी में उसका रंग
थोडी थोडी हर जगह माँ है सब के संग
उर्दूच्या पुरोगामी व आधुनिक शायरीचा हा कवी प्राचीन परंपरेला विसरत नाही. म्हणूनच राम, रावण, सीता, कृष्ण, ईसा, मीरा, तुलसी, कबीर त्यांच्या काव्यात समकालीन संदर्भ घेऊन येतात.
पहले जैसा ही दुखी है आज भी बूढा कबीर
कोई आयत का * मुखातिब कोई सूरत के खिलाफ
लहान मुलांविषयी निदा फाजलींना अत्यंत प्रेम आहे. त्यांचा काव्यसंग्रह, काही कविता त्यांनी आपली मुलगी तहरीर हिच्या नावे केल्या आहेत. मुलांच्या संदर्भात ते म्हणतात ,
घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूँ कर ले
किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाये
इथे मस्जिदमध्ये नमाज अदा करण्याएवढंच रडणाऱ्या मुलाला हसविणे महत्त्वाचं आहे हे यातून अधोरेखित केलंय.
बच्चों के छोटे हाथों को चार सितारे छूने दो
चार किताबे पढकर ये भी हम जैसे हो जायेंगे
हमेशा मंदिर-मस्जिद में वो नहीं रहता
सुना है बच्चों में छुपकर वो खेलता भी है
मुंबईसारख्या अपरिचित महानगरात निदांनी हलाखीचे दिवस काढले, पण त्यांच्या शायरीतील विचार सकारात्मक राहिले. दुनियेबद्दल हा शेर मुलाहिजा हो..
इक मुसाफिर के सफर जैसी है सब की दुनिया
कोई जल्दी में कोई देर में जानेवाला
जीवन व्यतीत करण्याबाबत
मन बरागी, तन अनुरागी कदम कदम दुश्ववारी है
जीवन जीना सहज न जानो, बहुत बड़ी फनकारी है

अब खुशी है न कोई दर्द रुलाने वाला
हमने अपना लिया हर रंग जमाने वाला
जीवनाला जाणून घेण्याचा उपाय निदांच्या शब्दात-
होशवालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है
इश्क कीजे फिर समझिये जिंदगी क्या चीज है
अन् मिश्कीलपणे हेही सांगतात –
कभी कभी यूँ भी हमने अपने जी को बहलाया है
जिन बातों को खुद नही समझे औरों को समझाया है
निदा फाजली स्वत एक *अंजुमन (मैफल) आहेत. झळ सोसलेल्या दिवसांचे प्रतििबब त्यांनी आपल्या आयुष्यावर पडू दिले नाही. कला-साहित्य प्रांतातले मित्र जमवून साहित्य-कला चर्चा करताना त्यांचे भाष्य तर्कनिष्ठ व उत्स्फूर्त असते. विनोदबुद्धी तर वाखाणण्यासारखी आहे. सकारात्मक समन्वयवाद असतो.
यहाँ किसी को कोई रास्ता नहीं देता
मुझे गिरा के अगर तुम संभल सको तो चलो

दुश्मनी लाख सही खतम न कीजे रिश्ता
दिल मिले या न मिले हाथ मिलाते रहिए

मुम्किन है सफर हो आसाँ अब साथ भी चलकर देखें
कुछ तुम भी बदलकर देखो, कुछ हम भी बदल कर देखें
याला कारण
सिखा देती है चलना ठोकरें भी राहगीरों को
कोई रस्ता सिधा दुश्वार हो ऐसा नही होता
निदा फाजलींना आपल्या जीवन अवलोकनातून काही शाश्वत सूत्र मांडले ते किती यथार्थ, मनमोहक आहेत हे तुम्ही ठरवा –
चाहे गीता बाचिए, या पढिए कुरान
मेरा तेरा प्यार ही हर पुस्तक का ज्ञान

वो सूफी का कौल हो, या पंडित का ज्ञान
जितनी बीते आप पर, उतना ही सच मान

सब की पूजा एक-सी, अलग अलग हर रीत
मस्जिद जाये मौलवी, कोयल गाये गीत
आधुनिक विचारांचा सर्वार्थाने निधर्मी असलेला हा शायर भावुक होऊन मौला ऊर्फ श्रीकृष्णाला विनवितो,
फिर मूरत से बाहर आकर चारों ओर बिखर जा
फिर मंदिर को कोई मीरा दीवानी दे मौला
ग़ज़्‍ालविधेच्या अनेक व्याख्या उर्दूत उपलब्ध आहेत, निदांची एक सर्वसमावेशक सोपी व्याख्या ऐका-
जो खो जाता है मिलकर जिंदगी में
ग़ज़्‍ाल है नाम उसका शायरी में
म्हणूनच संभाषणचातुर्य अन् मफिलीचा हा रसिया, माणसांची.. आवड असलेला विलोभनीय साहित्यकारही कधी कधी म्हणतो,
नक्शा उठा के कोई नया शहर ढूंढिये
इस शहर में तो सब से मुलाकात हो गयी
शब्दार्थ- पीर -गुरुवार, दरख्जों-वृक्ष, बागबाँ -माळी, मुकम्मल- परिपूर्ण, मुखातिब- विरोधक, फनकारी-कला, अंजुमन -मैफल, दुश्ववारी – कठीण     
     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2015 1:01 am

Web Title: urdu poet nida fazli
Next Stories
1 दगुड फोडतो प्वॉट जाळाया
2 माहितीपूर्ण व प्रेरणादायी लेख
3 संक्रमणाची चाहूल
Just Now!
X