स्त्रियांमधील प्रचलित धारणा, प्रतीकं, म्हणी, वाक्प्रचारांचा जेहरा काव्यात वापर करते पण त्यातील आशयसूत्र स्त्रियांपर्यंतच मर्यादित राहत नाहीत. तिने तत्कालीन सामाजिक, राजकीय स्थितीवरही भाष्य केले आहे. बांगलादेशचे युद्ध, अफगाणिस्तानातील हृदयद्रावक घटनांवर तिची लेखणी
प्रतिक्रियावादी झाली आहे.

सीता को देखें सारा गाँव
आग पे कैसे धरेगी पाँव
बच जाए तो देवी माँ है
जल जाए तो पापन
जिसका रूप जगत की ठंडक
अग्नी उसका दर्पन
सब जो चाहें सोचे समझें लेकिन वो भगवान
वो तो खोट-कपट के बरी
वो कैसे नादान
अग्नी पार उतर के सीता
जीत गई विश्वास
देखा दोनों हाथ बढमए
राम खडम्े थे पास
उस दिन से संगत में आया
सचमुच का बनवास
‘बनवास’ शीर्षकाची ही कविता आहे, पाकिस्तानची ज्येष्ठ कवयित्री जेहरा निगाहची. (ऊर्फ पूर्वीची जोहरा निगाह) जेहरा म्हणजे फूल अन् जोहरा म्हणजे तारा. १९५० च्या नंतर जो कवी वर्ग उर्दू साहित्य क्षितिजावर उदयमान झाला त्यात हा तारा म्हणजे जोहरा, आपल्या ग़ज़्‍ाल व कवितेमुळे व सुरेल आवाजामुळे लक्षणीय ठरला. लहान वयातच जोहराने मुशायरा गाजविण्याचे गुण अवगत केले होते. दादलेवा शेर अन् सुरेल स्वरात त्याचं वाचन यामुळे तिचा कलाम प्रत्येक मुशायऱ्यात बाजी मारून जात असे. पण तिला मिळणाऱ्या प्रोत्साहनाचा सूर अविश्वासाचा होता. श्रोत्यांना वाटे ही लहानशी सडपातळ मुलगी एवढे प्रगल्भ शेर कसे काय मिळू शकेल? निश्चितच कोणी तरी जाणकार ज्येष्ठ व्यक्ती लिहून देत असेल. त्या काळातले जेहराचे हे काही शेर
ये क्या सितम है कोई * रंगो-बू न पहचाने
बहार में भी बंद रहे तेरे *मयखाने
हम जो पहुंचे तो * रहगुजर न थी
तुम जो आये तो मंजिले लाए
कहाँ के इश्को-मुहब्बत किधर के * हिजरो विसाल
अभी तो लोग तरसते है जिंदगी के लिये
‘फैज’ म्हणतात, ‘‘हे शेर, ग़ज़्‍ालच्या गुणांनी परिपूर्ण आहेत, पण एका युवतीच्या व्यक्तिमत्त्वाच्या खुणा त्यात आढळत नाहीत. अकाली प्रौढत्वाच्या खुणा वाटतात.’’ पण जेहराने अल्पावधीतच मुशायरेबाज कृतक शायरीतून आपली सुटका करून घेतली. अन् ती वास्तववादाकडे वळली. याच वेळी ती कवितेकडेही झुकली. या नव्या पडावाचे हे काही शेर.
हम है ठुकराए हुए अपनी तमन्नाओं के
इक नजर पाये तो अफसाना बना लेते है
कोई करता है अगर प्यार भरी बात तो हम
शहर के शहर सितारों से सजा देते है
तुमने बात कह डाली कोई भी न पहचाना
हमने बात सोची थी बन गये है अफसाने
जेहरा निगाह व अदा जाफरीपासून उर्दू कवयित्रींची भाषा स्त्रियांची भाषा बनली. त्यापूर्वीच्या उर्दू कवयित्री पुरुषांच्याच भाषेत काव्यरचना करीत होत्या. सामाजिक वास्तवाचे भान सहजपणे जेहराच्या ग़ज़्‍ाल काव्यात दृष्टीस पडतं. आपबितीला जगबिती बनविणे तिला साध्य झाले. पण स्वत:ला फेमिनिस्ट म्हणणं तिला आवडत नसे. असं वर्गीकरण तिला मान्य नव्हतं.
आ ही जाता है जमाने में इक ऐसा हंगाम
* मौजे-तुफाँ भी तडपती है किनारे के लिए
दर्द जब * तल्खि-ए-हालात में ढल जाता है  
इक दीया दिल के लिए और भी जल जाता है
दिल की दुनिया से खुशी छीन के जाने वालों
कुछ न कुछ दिल के बहलाने का *सामां हो जाए
हे शेर सकारात्मक सूत्र सांगतात जेहरा अश्रू ढाळणाऱ्यांशी संवाद असा साधते-
अश्क बरसाओ कि रौशन हो सितारों के चिराग
मुस्कुराओं कि हर इक *जर्रा गुलिस्ताँ हो जाए
कब तक जाँ को खाक करोगे, कितने अश्क बहाओगे
इतने महंगे दामों आखिर कितना कर्ज चुकाओगे
दिलों के जख्म छिपाओं, हँसी को आम करो
ये हुक्म है कि बहारों का * एहतराम करो
स्त्रियांमधील प्रचलित धारणा, प्रतीकं, म्हणी, वाक्प्रचारांचा जेहरा काव्यात वापर करते पण त्यातील आशयसूत्र स्त्रियांपर्यंतच मर्यादित राहतात असे नाही. तिने तत्कालीन सामाजिक, राजकीय स्थितीवरही भाष्य केले आहे. बांगलादेशचे युद्ध, अफगाणिस्तानातील हृदयद्रावक घटनांवर तिची लेखणी प्रतिक्रियावादी  झाली आहे.
‘कल से *सहरा गर्द हुआ तो कौनसे रस्ते जाओगें,’ असा प्रश्न ती शोषितांना जनरल झियांच्या काळातही निर्भीडपणे विचारत होती. प्रेम व प्रेमाच्या विविध भावनांची रंगीत सुगंधित फुलं यांनीच उर्दू ग़ज़्‍ालचा पुष्पगुच्छ बनला आहे. जेहराची ग़ज़्‍ाल मग त्याला अपवाद कशी असणार? शेरांचा इश्किया बाज बघा
उसने आहिस्ता से ‘जेहरा’ कह दिया दिल खिल उठा
आज से इस नाम की खूशबू में बस जायेंगे हम
मैं तो अपने आप को उस दिन बहुत अच्छी लगी
वो जो थककर देर से आया उसे कैसी लगी?
कुछ कहना जुर्म है तो खतावार मैं भी हूँ
ये और बात, मेरा कहा वो समझ न पाए
भूलें अगर तुझे तो कहाँ जायें, क्या करें
हर रहगुजर में तेरे गुजरने का हुस्न है
उम्र सारी *गमे-दुनिया में बसर होती है
तब कहीं जा के तिरे गम की *सहर होती है
कौन जाने तिरा * अन्दाजे-नजर क्या हो जाए
दिल धडम्कता है तो दुनिया को खबर होती है
जेहराचा जन्म १४ मे १९३७ रोजी भारतातील हैदराबाद येथे झाला. १९५० नंतर म्हणजे १४ व्या वर्षांपासूनच ती काव्यरचना करू लागली. १९४७ ला फाळणीनंतर तिचे कुटुंब पाकिस्तानात स्थायिक झाले. तिचे वडील सनदी अधिकारी म्हणून सिंधमध्ये कार्यरत होते. त्यांनाही काव्यात रुची होती. जेहराची मोठी बहीण सुरैया लेखिका आहे तर भावापकी अन्वर मसूद वक्ता व व्यंगलेखक आहे व दुसरा भाऊ अहमद मसूद सिंधचा सचिव होता. तिचे पती माजिद अली सनदी अधिकारी होते व त्यांना सूफी काव्यात रस होता. जेहराची दोन मुले आहेत अली व नोमान.
जेहरा निगाहचे दोन ग़ज़्‍ाल-काव्यसंग्रह उर्दूत आहेत. ‘शाम का पहला तारा’, ‘बर्क’. जेहराने जास्त लिहिले नाही. पण पाकिस्तान टी.व्ही.साठी अनेक मालिका लिहिल्या. तिला पाकिस्तान सरकारने ‘तमगा-ए-हुस्न-ए-कारकिर्दगी’ या नागरी पुरस्काराने गौरविले होते. जेहराचे काही सुबोध शेर अनेक संकलनांत नमूद होत असतात, त्यापकी काहींची ही झलक.
  यहीं मत समझना तुम्ही जिंदगी हो
  बहुत दिन अकेले भी हमने गुजारे
      अब बिगडी बात बनायें क्या,
      अब रुठे दोस्त मनायें क्या
      अब मीर की ग़ज़्‍ाले क्या ढूँढें,
      गालिब के शेर सुनाएं क्या
अब दोस्ती वो * फन जो सीखे वहीं निभाएँ
और है वफा वो खेल, जिसे आये वो दिखाए
कडे सफर में मुझको छोड देने वाला हमसफर
बिछडते वक्त अपने साथ सारी धूप ले गया
अब इस घर की आबादी मेहमानों पर है
कोई आ जाए तो वक्त गुजर जाता है
जेहराने तरल शेरही लिहिले आहेत-
कह दो कोई *सबा से इथर आजकल न आये
कलियाँ कही महक न उठें, कुछ फूल खिल न जाये
हवा सखी थी मेरी रुत हमजोली थी
हम तीनों ने मिलकर क्या क्या सोचा था
शाम ढले आहट की किरनें फूटी थी
सूरज डूब के मेरे घर में निकला था
सकृद्दर्शनी हे तरल शेर निसर्गासंबंधित दिसत असले तरी त्यातील प्रतीकात्मकता पाकिस्तानातील राजकीय परिस्थितीशी निगडित आहे. फैजने जेहराच्या संग्रहाला दिलेल्या प्रस्तावनेत ही बाब अधोरेखित करताना तिच्या एक कवितेचा तुकडा अन् ग़ज़्‍ालचा शेर नमूद केला आहे.
मेरे बच्चे,
कहानी में जो थकी हारी जो लडकी थी
वो शहजादी नहीं थी, मैं थी
वो जादू का महल जो एक पल में जल के
सहरा हो गया
वो मेरा घर था
आज जेहरा निगाह या जगात नाही पण तिचा कलाम वाचताना अनेक उर्दू काव्यप्रेमींना वाटत असेल.
बरसों हुए तुम कहीं नहीं हो
आज ऐसा लगा यही कहीं हो
——————————————-
रंगो-बू- रंग-गंध, मयखाने – मदिरालय,         रहगुजर -रस्ता, हिजरो विसाल- योग आणि मिलन,  मौजे-तुफाँ -वादळ लाट, तल्खि-ए-हालात – जीवनातली कटूता, सामां हो जाए -व्यवस्था, जर्रा -कण, एहतराम -आदर, सहरा -जंगल, गमे-दुनिया -जगाची दु:खे , सहर – पहाट,  तिरा अन्दाजे नजर – बघण्याचा ढंग, फन -कला
डॉ. राम पंडित – dr.rampandit@gmail.com

Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
settlement in Criminal case is not divorce
फौजदारी प्रकरणातील समझोता म्हणजे घटस्फोट नव्हे!