* कितीही कामात असलात तरी मधे मधे मुलांशी बोलण्यासाठी वेळ काढा.
 * घरातली छोटी छोटी कामे करायला सांगा. पण त्यात आदेश, हुकूम नको. म्हणजे त्यांच्याशी संवाद साधला जाईल, मुलांना एकटेपणा वाटणार नाही.
* खरेदीला जाताना मुलांनाही आपल्याबरोबर घेऊन जा. खरेदी करताना त्यांचेही मत विचारा.
* मुलांनी एखादे चांगले काम केले, अभ्यासात चांगला शेरा मिळाला तर त्याच्या वयाला साजेशी भेटवस्तू त्यांना द्या. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची स्तुती करा.
* मुलांमध्ये असलेल्या उणिवांबाबत त्यांना येता-जाता टोमणे मारू नका.
* आपल्या मुलाची दुसऱ्या मुलांबरोबर तुलना करू नका.
* केव्हा तरी एखाद्या वस्तूबद्दल किंवा मित्राच्या खेळण्याविषयी बोलला असेल तर तशी वस्तू देऊन त्याला सरप्राइज द्या.
* आपण घरी असलो किंवा नसलो तरी मुलांना आपल्या अस्तित्वाची जाणीव व्हायला हवी.
* मुलांवर कोणत्याही बाबतीत जबरदस्ती करू नका.
* मुलावर कडक शिस्तीचा बडगा उगारू नका. त्यामुळे मुले भीतीच्या दडपणाखाली वावरतात.
* त्यांच्याकडून झालेल्या चुकांचे समर्थन करू नका. उलट या चुकीमुळे होणारे नुकसान आणि तोटे नीट समजावून सांगा.
* मुलांना शिक्षा करताना या प्रसंगी आपण लहानपणी केलेल्या चुका आठवा. तेव्हा काय झाले हे आठवून शिक्षा करा.
* पाहुण्यांसमोर किंवा एखाद्या ठिकाणी, समारंभात, रस्त्यावर मुलांना अपमानकारक बोलू नका.    

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो