० तुम्ही अँटिरिफ्लेक्टिव आणि कोटेड सनग्लास वापरत असलात तर तो साफ करण्यासाठी मिळणाऱ्या स्प्रेनेच साफ करावा.
० पेपर नॅपकिन, रुमाल, टॉवेल, कपडे यांनी ग्लास साफ केल्यास त्याला चरे पडू शकतात. त्यामुळे या काचा लेन्स क्लिनर स्प्रेने, मुलायम कपडय़ाने साफ कराव्यात.
० काचा साफ करण्यासाठी मायक्रो फायबर किंवा मऊ
सुती कपडय़ाचा वापर करवा.
० लेन्स नियमित साफ कराव्यात. साफ न केल्यास त्यावर धूळ आणि घामाचा चिकट थर जमून धूसर दिसायला लागेल.
० गॉगल किंवा चष्मा लावताना व काढताना फ्रेमला धरून काढावा. लेन्सला हात लागणार नाही याची काळजी घ्या.
० लेन्सवर काही चिकट किंवा दाट डाग पडला असेल तर तो नखाने खरवडून काढण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे काचेवर चरे पडतील.
० गॉगल, चष्मा त्यासाठी मिळणाऱ्या केसमध्ये ठेवावा.
बॅगेत किंवा खिशात ठेवल्याने त्याच्या दांडय़ा वाकून, काचाही खराब होतील.
० केसमध्ये ठेवताना लेन्स वरच्या बाजूला येतील
अशा पद्धतीने ठेवावा. उलटा करून ठेवल्यास लेन्सवर चरे पडतील.
० दांडय़ाचे स्क्रू पडल्यास किंवा नोजपॅड निघाल्यास त्वरित बसवून घ्यावे. कारण त्यामुळे बॅलन्स बदलतो व त्यामुळे पाहण्यास त्रास होतो.
० गॉगल किंवा चष्मा काढताना कधीही एका हाताने काढू नये. एका हाताने काढताना हिसका बसल्याने अलाइन्मेंट बिघडून फ्रेम चेहऱ्यावर व्यवस्थित बसत नाही.
० लेन्स साफ करण्यासाठी अमोनिया किंवा अल्कोहालिक ग्लास क्लिनरचा वापरू नये त्यामुळे लेन्सचे कोटिंग निघून जाते. लेन्स क्लिनर नसल्यास साध्या पाण्यात भांडय़ाचा साबण थोडासा विरघळवून हलक्या हाताने काचा साफ कराव्या व मायक्रोफायबर कपडय़ाने कोरडय़ा कराव्या.
० आरामदायी किंवा स्टाइल म्हणून बरेच जण चष्मा किंवा गॉगल डोक्यावर लावतात. त्यामुळे ईअरपीस ताणले जाऊन सैल होतात. शिवाय लेन्सला केसाचे तेल लागून लेन्स खराब होतात.
० उन्हाळ्यात चष्मा किंवा गॉगल कारमध्ये ठेवू नका, जास्त उष्णतेने लेन्सचे कोटिंग उडून जाते आणि
फ्रेमची ठेवण बिघडते.
–संकलन- उषा वसंत – unangare@gmail.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 3, 2015 2:35 am