१९७५ ला साजरे झालेले

आंतरराष्ट्रीय महिला वर्ष नवपरिवर्तनाच्या

indian economy marathi news
UNCTAD: भारताची अर्थव्यवस्था २०२४ मध्ये किती टक्क्यांनी वाढणार? संयुक्त राष्ट्राचा अहवाल जाहीर; व्याजदराचाही उल्लेख!
Ramtek Lok Sabha
‘भाजपच्या ‘धृतराष्ट्र’ने नैतिकतेचे वस्त्रहरण निमूट बघितले’, कोणाला उद्देशून केला आरोप जाणून घ्या…
Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात
amar kale wardha marathi news, ramdas tadas marathi news
वर्ध्यात राष्ट्रवादीच्याच दोघांमध्ये लढत ?

दृष्टीने ‘परिवर्तन बिंदू’ ठरले. त्याचे

पडसाद मासिकांत उमटू लागले.

‘बायजा’ त्यानंतर ‘प्रेरक ललकारी’, ‘महिला आंदोलन पत्रिका’,

‘स्त्री उवाच’, ‘दिशा’, ‘आम्ही स्त्रिया’, ‘मिळून साऱ्या जणी’..

मराठीबरोबर अन्य भारतीय

भाषांमध्येसुद्धा स्त्रीवादी मासिकांची

लाट पसरत गेली.

संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेलं १९७५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष! आपल्या देशात अनेक संदर्भ या वर्षांला प्राप्त झाले. स्त्रीमनात साचत आलेला असंतोष आणि ताण यांचा निचरा होण्यास एक अवसर, तत्कालिक कारण मिळाले. स्त्री-मुक्ती आंदोलनाला प्रेरणा देणारी घटना ठरली. सांस्कृतिक, नवपरिवर्तनाच्या दृष्टीने ‘परिवर्तन बिंदू’ (टर्निग पॉइंट) ठरले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सांस्कृतिक दृष्टीने महिला वर्ष ते महिला आयोग स्त्रीवादी परिप्रेक्ष्य ते स्त्री-अभ्यास केंद्राच्या निर्मिती

पर्यंतच्या घटनाक्रमाच्या दृष्टीने ‘प्रारंभ बिंदू’ ठरले.

शांतता, विकास आणि समानता या त्रिसूत्राने ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचेही आवाहन होतेच. या मुळेच स्त्रीवादी विचारांची कालसंगत नवीन संवेदना निर्माण होऊन त्या केंद्राभोवती स्त्री-जीवन उभारण्याची प्रक्रिया काही प्रमाणात घडली. सांस्कृतिक दृष्टीने मध्यवर्ती विषयांमधला ‘स्त्रीजीवन, स्त्री-प्रश्न’ एक महत्त्वाचा विषय बनला.

१९७५ चे वर्ष महिला वर्ष म्हणून उत्सवी स्वरूपात साजरे व्हावे एवढा मर्यादित हेतू राष्ट्रसंघाचा नव्हता. स्त्रियांची सामाजिक परिस्थिती, प्रश्न या दृष्टीने प्रथम प्रत्येक देशाने राष्ट्रीय पातळीवर पाहणी करावी. त्यानंतर स्त्रियांच्या विकासाचे कार्यक्रम हाती घ्यावेत. असा आदेश राष्ट्रसंघाचा होता. ‘‘आमच्या देशात स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेसच स्त्रियांना मतदानाचा आणि अन्य अधिकार मिळाले आहेत. तेव्हा पुन्हा पाहणीची आवश्यकता नाही,’’ असे आपल्या देशाने कळवले. परंतु राष्ट्रसंघाच्या आग्रहानेच डॉ. फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली ‘स्टेटस ऑफ विमेन इन इंडिया’ या आयोगाची स्थापना झाली. दहा कलमांच्या आधारे कसून पाहणी केली. वास्तवाचे विदारक चित्र समोर आले. आयोगाच्या सचिव वीणा मुजूमदार अस्वस्थ झाल्या. तेव्हा ‘हे सर्व तुझ्या हृदयाला इतकं भिडलंय. हीच तुझी खरी परीक्षा आहे. तू अशीच काम करत राहिलीस तर तुझ्या हातून नक्कीच स्त्रियांसाठी मोठं काम होईल,’ अशी डॉ. गुहा यांनी वीणा मुजूमदारांची समजूत काढली. त्यामुळेच सदर अहवालसुद्धा ‘एक कळबिंदू’ ठरला.

१९७५ ते १९८५ ‘महिला दशक’ जाहीर झाले. स्त्री-जीवनाचा, स्त्रीच्या सामाजिक प्रतिष्ठेचा,   स्त्री-प्रश्नांचा, स्त्री-पुरुष समानतेचा, स्त्रीच्या सर्वच दृष्टीने हक्क आणि अधिकाराचा पुनर्विचार करण्यासाठी चालना मिळाली. सामाजिक दृष्टीने विविध स्तरांवर विभागलेल्या अनेक प्रश्नांनी घेरलेल्या स्त्रीला पुरुषकेंद्री व्यवस्थेतून मुक्त करायचे असेल तर आता आंदोलन- स्त्रीमुक्ती चळवळीला पर्याय नाही. स्त्रीमुक्ती चळवळ हे सांघिक कार्य आहे. प्रत्यक्ष कार्यक्रम ते स्त्रीवादी तात्त्विक विचारसरणीची मांडणी अशी फळी उभी राहण्याची आवश्यकता स्त्रियांच्या लक्षात आली. कार्यकर्ती ते विचारवंत अशी एक फौज पदर बांधून तयार झाली. त्यानंतर अनेक संघटना वेगाने संपूर्ण महाराष्ट्रात स्थापन होऊ लागल्या.

या दिशेने स्त्री-मुक्ती आंदोलनाचे कार्य दिशा पकडत असताना आणखीन एक गोष्ट प्रकर्षांने लक्षात आली. स्त्री-मनाबरोबरच्या नवीन संवादाची नवप्रबोधनाची, नवजागृतीची तितकीच आवश्यकता होती. एका व्यासपीठाची गरज होती. स्त्रियांसाठी मासिके होती; परंतु आता नव्या युगाची, नवे विषय थेटपणे मांडत प्रत्यक्ष संवाद साधण्याची काळाची गरज होती. ‘स्त्री’ मासिकातून होणाऱ्या संवादाला साथ देत अधिक व्यापक करणाऱ्या संवादाची निकड होती. काळाचे भान इतके तीव्र हाते की सौदामिनी राव, सुलभा ब्रrो, कुमुद पोरे, लीला भोसले, छाया दातार, निर्मला साठे हा समविचारी स्त्रियांचा गट तयार झाला.

जानेवारी १९७७ पासून स्त्रियांच्या प्रश्नांवर समाजाचे प्रबोधन करणारे एकमेव मासिक- ‘बायजा’ प्रकाशित होऊ लागले. ‘बायजा’च्या पाठोपाठ स्त्रीवादी, स्त्रीकेंद्री मासिके, मुखपत्रे प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली. ‘प्रेरक ललकारी’, ‘महिला आंदोलन पत्रिका’, ‘स्त्री उवाच’, ‘दिशा’, ‘आम्ही स्त्रिया’, ‘मिळून साऱ्या जणी’.. मराठीबरोबर अन्य भारतीय भाषांमध्येसुद्धा स्त्रीवादी मासिकांची लाट पसरत गेली. स्त्री-मुक्ती आंदोलनाला पूरक साथ देणाऱ्या, उद्बोधन, प्रबोधन व नवजागर करणाऱ्या ‘संवादाची’ विविध स्वरूपात धडाक्याने सुरुवात झाली. प्रत्यक्ष कार्याचा व्यूह जसा आकार घेत व्यापक झाला. त्यातूनच संवादाच्या दाही दिशा मुखरित झाल्या.

स्त्री-मुक्ती म्हणजे काय? स्त्री-मुक्ती कल्पनेला काय अपेक्षित आहे. स्त्री-मुक्ती कशासाठी? हे स्पष्ट करण्यातच पहिली शक्ती खर्ची पडणार होती. सर्व स्तरांवरील स्त्री-प्रश्नांचा मागोवा घेतच स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानतेचा विचार तळागाळापर्यंत पोचवायचा होता. समकालीन घटनांना नवीन जाणिवेतून तपासून घेण्याची तर गरज होतीच. नव्याने होणाऱ्या कायदेशीर तरतुदी आणि वास्तव याविषयी स्त्रियांना जागरूक करायचे होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्री-मुक्ती आंदोलन, चळवळ एकाच वेळी विविध स्वरूपात राबवयाची होती. मोर्चे, धरणे, प्रचार यात्रा, परिसंवाद, परिषदांचे वार्ताकन स्त्रियांपर्यंत पोचवून स्त्री-मनाला काळाबरोबर पुढे न्यायचे होते. एवढेच नव्हे तर प्रत्येक टप्प्यावर स्त्रीवादी विचारांचा पुनर्विचार करीत समाज मनही घडवायचे होते. स्त्री-मुक्ती हवी असेल तर पुरुषांची मानसिकता बदलायला हवी, समाजाचा दृष्टिकोन बदलायला हवा. त्यासाठी संवादाला काळाबरोबर प्रगल्भतेने पुढे न्यायचे होते. काळाच्या गरजेतून निर्माण झालेल्या संवादाच्या सर्वच पैलूंना परस्परपूरक संवादी स्वरूपात साकार करण्याचे महत्त्वाचे कार्य स्त्रियांच्या मासिकांनी अत्यंत निष्ठेने केले. कर्तव्य भावनेने भारावून जाऊन केले. त्यामुळेच विचारांत थेटपणा आला. नेमकेपणा, धार आली; परंतु त्यातून विखार, प्रहार करण्याची वृत्ती प्रकट झाली नाही.

संवादाचे सर्व पैलू अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न बहुतेक सर्वच संपादकांनी केला. महत्त्वाचे म्हणजे नवीन सर्व मासिके ‘स्त्री’संपादित होती. स्त्रीवादी, स्त्रीकेंद्री मासिकांनी तात्त्विक, वैचारिक मांडणी, वैचारिक प्रबोधनाची जबाबदारी विशेषत्वाने उचलली. विविध संघटनांच्या मुखपत्रांनी परिषदा, आंदोलनाचे उपक्रम, प्रत्यक्ष कार्याच्या प्रसिद्धीला जास्त प्राधान्य दिले; परंतु एकूणात परस्पर सहकार्यातून, परस्पर संवादांतून, स्त्री-मुक्ती आंदोलनाची तळी उचलताना स्त्री-मनाशी होणाऱ्या संवादाची साथ सगळ्यांनीच महत्त्वाची मानली. म्हणूनच विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील स्त्रीपर्व स्त्री-मनाशी होणाऱ्या संवादातूनही साकार झाले.

स्त्री-मुक्तीची कल्पना पुरुषविरोधी नाही. स्त्रीला संसार, तिची कर्तव्ये नाकारायची नाहीत. संवादाची पहिली फेरी या विषयावरच झडली. सौदामिनी राव यांनी स्त्री-मुक्तीला अपेक्षित स्त्री-प्रतिमेचे वर्णण केले- ‘‘चूल आणि मूल करणारी भोगवस्तू, पुरुषाच्या मालकीची वस्तू ही स्त्रीची पारंपरिक प्रतिमा बदलून एक नवी, आत्मनिर्भर, आत्मविश्वासपूर्ण, झुंजार, संपन्न व्यक्तिमत्त्व असलेली स्वतंत्र मानवी व्यक्ती जी स्वत:चा आणि समाजाचा विकास आपल्या मर्जीप्रमाणे करू शकते. समाजाच्या निर्णयप्रक्रियेत जिचा सहभाग आहे. अशी व्यक्ती. अशी स्त्रीची नवी प्रतिमा जनमानसात निर्माण करायची आहे. हा बदल उच्चवर्णीय-मध्यमवर्गीय स्त्रियांपुरता मर्यादित न राहता तळागाळातील स्त्रियांना त्यांच्या गुलामीची, दुय्यम स्थानाची जाणीव करून दिली पाहिजे. ‘स्त्रीउवाच’च्या पहिल्या अंकाच्या संपादकीयात विद्या बाळ लिहितात, ‘‘उलट घरातला धूर, नात्यांतले प्रदूषण, घुमसट यांना निवारण्याचा हा प्रयत्न आहे. यातून स्त्री-पुरुषांमधलं नातं मुळातून निरामय व्हावं; आपलं घर, आपला समाज खऱ्या अर्थाने सुसंगत आणि सुसंस्कृत व्हावा, अशी इच्छा आहे आणि त्यासाठी ही धडपड आहे.’ ‘स्त्री’ मासिकाचे संपादक मुकुंदराव किलरेस्कर यांनी आपल्या संपादकीयातून स्त्री-मुक्तीची संकल्पना आणि त्याचे सामाजिक प्रारूपच स्पष्ट केले. जणू काही तो ‘स्त्री-मुक्तीचा जाहीरनामाच’ ठरला.

स्त्री-विमोचन म्हणजे स्वैराचार नाही. स्त्री-विमोचनाची चळवळ म्हणजे ‘स्त्रियांनो, घराबाहेर पडा!’ असे सांगणारा भडक मोर्चा नाही. किंवा स्त्री-विमोचन म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या पारंपरिक नात्याला उलटी-पालटी करणारी खुळं नाहीत. स्त्रीला आत्मशोधाची प्रेरणा देणारी एक चळवळ आहे. ही चळवळ स्त्रीला तिच्या मर्यादित कार्यक्षेत्रातील अनुभवापासून ते थेट आजपर्यंत बंद असणाऱ्या कार्यक्षेत्रापर्यंत पोचण्याची संधी देऊ पाहत आहे. ज्या जबाबदाऱ्या अटळपणे तिच्याच आहेत. किंवा ज्यांत तिचा वाटा अटळ आहे, अशा जबाबदाऱ्या विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिवादी दृष्टिकोनातून पेलण्याचं सामथ्र्य ही चळवळ देऊ इच्छिते. यांसारख्या विविध प्रकारच्या विकासातील नव्या जाणिवा तिला होऊ लागल्या की लगेच लोकांना वाटतं, ‘बघा स्त्री-मुक्ती चळवळीचे परिणाम? आता बायका घराबाहेर पडून पुरुषांना घरात बसविणार! वास्तविक या चळवळीच्या आधारानं स्त्रीचा विकास होतो आहे. ती शहाणी होत आहे आणि शहाणा माणूस शेजारच्या बरोबरीच्या माणसाला किती काळ वेडं ठेवून स्वत: छळ सोशील? पण शहाणा होण्याचे कष्ट असतात. ते नकोस वाटणारे त्यात विसंगती शोधतात. त्याची ‘खूळ’ म्हणून टर उडवतात आणि काय काय करतात.’

फेब्रुवारी १९७९ मध्ये पुण्यात आयोजित केलेल्या स्त्री-मुक्ती संपर्क समितीच्या परिषदेत ‘स्त्री-मुक्तीची’ व्याख्याच जाहीर केली.- ‘‘स्त्रियांच्या मार्गातील आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक अडसर नष्ट होतील तेव्हाच स्त्रीची मानसिक गुलामगिरी संपण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल, असे आम्ही मानतो. संपूर्ण स्त्री-मुक्ती होण्यासाठी समाजाच्या सर्व व्यवहारांमध्ये स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने समानतेचे स्थान मिळविण्यासाठी लिंग भेदावर आधारित श्रम विभागणी नष्ट होणे, ही स्त्री-मुक्तीची पायाभूत गरज आहे. स्त्रीच्या दुय्यम स्थानाचा उगम पुरुषप्रधान विषमतेवर आधारित समाज व्यवस्थेत आहे. हे लक्षात घेता संपूर्ण समाज परिवर्तनाच्या क्रमातून स्त्री-मुक्ती होणे शक्य आहे. असे आम्ही मानतो.’’

मासिकांतून लेखांबरोबरच कवितांतूनही स्त्री-मुक्तीचा आवाज व्यक्त होऊ लागला. ‘चल ग सये वारुळाच्या’ चालीवर स्त्रिया म्हणत होत्या.

‘‘भांडण सोडू वाऱ्याला। भक्कम करू एकीला।

साथीला बोलावू वर्गाला। कष्टकरी त्या बंधूला।

लाल बावटा संगतीला। बदलू सगळ्या जगाला।

बदलायला सगळ्या जगाला। बाया बाई लागल्या भांडायला।’’

जणू स्त्रिया घोषणा देत होत्या,

‘‘जाहीर कर जाहीर कर, भारतमाते जाहीर कर।

स्त्री मुक्त आहे, ती ज्ञानी आहे, ती त्यागी आहे।

ती बलवान आहे, स्त्री ही चूलमूल नाही,

जाहीर कर।’’

म्हणूनच या टप्प्याचे वर्णन करता येते.

‘शिंग फुंकिले रणी। वाजतात चौघडे।

सज्ज व्हा, उठा चला। सैन्य चालले पुढे।

– डॉ. स्वाती कर्वे  dr.swatikarve@gmail.com