परमेश्वराची व्याख्या  करताना स्वामी रामतीर्थ म्हणतात, ‘परमेश्वर हे असे वर्तुळ आहे की ज्याचा केंद्रिबदू सगळीकडे आहे, पण त्याला परीघ मात्र नाही. कारण हा परीघ अमर्याद आहे. विश्वात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत ‘चक्रमयता’ अर्थात cyclicity आहे. याचा केंद्रिबदू म्हणजे फक्त आनंद आहे.’ जेव्हा केंद्रिबदू ‘मी’ आणि  ‘माझे’ याभोवती केंद्रित होतो, तेव्हा फक्त दु:खच निर्माण होते. पण याउलट केंद्रिबदू ‘आनंद’ या कल्पनेवर स्थिरावला की आपले आयुष्य खूप सुखावह होते. यावर स्थिरावण्यासाठी ‘साधना’ अत्यंत महत्त्वाची आहे. साधनेतील सहजता, सजगता आणि आर्तताच तुम्हाला तुमच्या दु:खाच्या कारणाची मीमांसा करण्याची सारासार विवेकबुद्धी देईल.
पवनमुक्तासन
सांधे सल करणाऱ्या पवनमुक्तासनाचा पुढचा टप्पा पाहू या. बठक स्थितीतील सहज िवश्रांती अवस्थेतून उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजवी टाच डाव्या गुडघ्यावरून पलीकडे टाका. घोटय़ाचा सांधा घडय़ाळ्याच्या काटय़ाच्या दिशेने व विरुद्ध दिशेने फिरवून मोकळा करून घ्या. विरुद्ध पायाने हीच कृती करून दुसऱ्याही पायाचा घोटा अशा रीतीने मोकळा करून घ्या.
 पाय आणि पोटांचे अवघडलेले स्नायू व सांधे अशा रीतीने मोकळे झाल्यावर रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले रक्त मोकळेपणाने रक्तप्रवाहात समाविष्ट होते. मनातील साचलेले, दबलेले, कोंडलेले विचारही मोकळे करण्याच्या दृष्टीने जणू हे एक पाऊल आहे.
 आता अजून एक सोपी कृती करू या. प्रारंभिक बठक स्थितीत या. उजव्या गुडघ्याची वाटी मांडीच्या दिशेने ओढा. श्वास घेत ही कृती करा. काही सेकंद थांबून श्वास सोडत हलकेच स्नायू शिथिल करा. डाव्या गुडघ्याने आता ही कृती पुन्हा करा. साधारण १० वेळा प्रत्येक गुडघ्याने ही कृती केल्यावर दोन्ही गुडघ्यांनी एकदम करा.
सजगता श्वासावर, स्नायूंच्या आकुंचन- प्रसरणावर हवी.  ही जाणिवेची जाणीव आपल्याला साधनामार्गात पुढे पुढे नेत राहील.

संगणकाशी मत्री
मागील भागात (१८ जानेवारी) आपण इंटरनेट सुरू कसा करावा, याविषयी माहिती घेतली. गुगलचे पान (पेज) सुरू झाल्यावर समोर दिसणाऱ्या जागेत कोणताही शब्द टाकून आपण त्या शब्दाविषयीची माहिती शोधू शकतो. या भागात गुगल कसे वापरावे, याचा अभ्यास करू या.
* गुगल हे एक सर्च इंजिन आहे, म्हणजे माहिती शोधण्याचे ठिकाण.
* गुगलमध्ये आपल्याला हव्या त्या भाषेत माहिती शोधता येते. त्याकरता गुगल असे रंगीत अक्षरात लिहिलेल्या नावाच्या खाली असलेल्या मोकळ्या पट्टीच्याही खाली विविध भाषा दिलेल्या असतात. त्यापकी आपल्याला हव्या असलेल्या भाषेवर क्लिक करावे. उदा.- हिंदी, मराठी, तमीळ
* इंग्रजी उच्चाराप्रमाणे शब्द लिहिल्यास अपेक्षित भाषेत माहिती मिळते.
*  गुगलमध्ये फक्त माहितीच नाही तर हवे असलेले फोटोही पाहता येतात.
* फोटो पाहण्यासाठी िवडोच्या (पानाच्या ) वरच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात ्रेंॠी असे लिहिलेल्या पर्यायावर क्लिक करून हव्या असलेल्या माहितीचा तपशील भरून फोटो शोधावा.
*  समजा तुम्हाला भारतातील विविध राज्ये, त्यांची भौगोलिक इ. माहिती हवी असेल, तर कल्ल्िरं किंवा  राज्याचे नाव टाकून की-बोर्डवरील ील्ल३ी१  दाबा.
* त्यानंतर ही माहिती असणारी विविध संकेतस्थळांची यादी वेबपेजवर दिेसेल. त्या त्या लिंकवर क्लिक केलं, की ते संकेतस्थळ दिसेल व त्यावरील माहिती आपण वाचू शकतो.
* आजी-आजोबा तुम्ही विश्वास ठेवणार नाही इतकी विविध प्रकारची माहिती, गुगल सर्च इंजिनवर उपलब्ध आहे. मग विचार कसला करताय, गुगलवर नवीन माहिती मिळवा व कळवा आम्हाला.
संकलन- गीतांजली राणे

जिभेवर ताबा हवा
आता माझं ‘वय’ झालं असं आपण चटकन म्हणून जातो जरा कुठे पस्तिशी ओलांडली की! पण एक गम्मत अशी आहे की ‘वय’ वाढण्याची प्रक्रिया अगदी आपल्या जन्मापासून सुरू होते. पण मग आता आम्ही ‘म्हातारे’ झालो हा डायलॉग किंवा आजी / आजोबा शोभतात असं म्हणण्यासाठी वयाची ‘साठी’ का ओलांडावी लागते? कारण ‘अशा’ वय होण्याला काही पूरक संदर्भ असतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर साधारण पन्नाशी – साठीनंतर बरेच निदर्शनात येतील असे शारीरिक आणि मानसिक बदल होतात. उदा. विस्मरण, अपचन, बद्धकोष्ठता, अतिसार,  गुडघेदुखी वगरे वयाप्रमाणे शारीरिक आणि मानसिक बदल हे होणारच. पण या बदलांशी जर आपण सोयरिक जुळवली तर त्यामुळे होणाऱ्या त्रासांची तीव्रता आपण नक्कीच कमी करू शकतो.
आरोग्याच्या दृष्टीने जरूर असलेले बदल :
 * जिभेवर ताबा मिळवणे – आरोग्यदायी पदार्थसुद्धा चटपटीत असू शकतात.
* भूक मंदावते कारण पचनशक्ती कमी झालेली असते, म्हणून ‘पूर्वी’च्या खाण्याचे मोजमाप न करता कमी  आहार अवलंबावा.  
* एकावेळी जास्त खाता येत नाही म्हणून दिवसातून ५-६ वेळा थोडंथोडं खावं.
* न्याहारी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण याव्यतिरिक्त मधल्या वेळी फळ, भिजवलेले ड्राय फ्रुट्स, लाह्या – राजगिरा किंवा ज्वारी, कुरमुरे – डाळ किंवा मेतकूट, दही-पोहे, वगरे खाणं हाताला मिळतील असे ठेवा म्हणजे फरसाण / तेलकट पदार्थ जास्त खाल्ले जाणार नाहीत.
 * महत्त्वाचं म्हणजे खाण्याच्या वेळा पाळल्या जाणं महत्त्वाचं आहे. त्याबद्दल आपण पुढे बोलूच.
* काही पदार्थ वयाप्रमाणे पचत नाहीत. उदा. दूध, ब्रेड, तेलकट, मांसाहारी पदार्थ वगरे त्यासाठी पर्याय – दही / ताक / तीळ / फुलका / भाकरी वगरे. सात्त्विक आहार मनासाठीसुद्धा पोषक आहे, म्हणून तामसिक / राजसी पदार्थापेक्षा पचायला हलका आहार घेतलेला कधीही चांगला.
 वैदेही अमोघ नवाथे, आहारतज्ज्ञ

वाचनकट्टावाल्या मॅडम
‘ निवृत्तीनंतरचे नियोजन’ हा माझा लेख एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला. त्यात वाचनकट्टा सुरू करण्याची इच्छा असल्याचा उल्लेख केला होता. तो वाचून महापालिकेचे गं्रथपाल पी.के. पवार यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘‘तुमच्या या उपक्रमासाठी महापालिका दररोज दहा दैनिके देऊ इच्छिते. तुम्ही वृत्तपत्रांची जबाबदारी घ्यायची आणि त्यांची नोंद ठेवायची. शिवाय दरमहा सगळी वृत्तपत्रं तुम्हाला परतही करावी लागतील. तेही स्वखर्चाने.’’ मी त्यांना हो म्हणाले. कारण वाचन संस्कृती वाढवण्यासाठी एवढे करायला काय हरकत. त्यांच्या सर्व अटी मान्य करून तसा प्रस्ताव विनाविलंब ग्रंथपालांकडे मी सादर केला. नंतरच्या बऱ्याच घडामोडींनंतर आमच्या पार्किंगमध्ये वाचनकट्टा रीतसर स्थापन झाला.
  उद्घाटनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता मी पार्किंगमध्ये गेले. सर्व पेपर्स आले होते. पण वाचक केवळ एकच!  म्हटलं, ‘कुणी येईल की नाही?’ मात्र काही दिवसांतच माझी ही शंका निर्थक ठरली. ज्येष्ठ नागरिक महिला, विद्यार्थी, बच्चे कंपनी यांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. वाचन कट्टा सुरू होऊन तीन महिने पूर्ण होतायत. वाचकांची संख्या आता पाचाची पन्नास झाली आहे. वाचनकट्टा आता मुलामाणसांनी चांगलाच बहरला आहे. अनेक वृत्तपत्रांतील आवश्यक माहिती ज्यांना हवी असते ती मंडळी आपल्या मोबाइलमध्ये फोटो शूट करून घेतात. स्पर्धा परीक्षांना तयारी करणारे अभ्यासू त्यामुळे समाधानी आहेत. किती आणि काय काय वाचावे असे होऊन जाते. वाचनकट्टय़ावर दररोजच जणू साहित्य संमेलनच भरते. लेखक, कवयित्री अशी ओळख तर होतीच, आता ‘वाचनकट्टावाल्या मॅडम’ अशी नवी ओळखही मला मिळाली आहे. लोकांचा वाचनानंद आता माझा परमानंद झाला आहे.
आशा पैठणे
‘आनंदाची निवृत्ती’साठी मजकूर पाठवताना एकच अनुभव पाठवावा. १५०-२०० शब्दांचाच असावा. पाकिटावर ‘आनंदाची निवृत्ती’ उल्लेख करावा. सोबत फोटो जरूर पाठवा.पत्ता- ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा. chaturang@expressindia.com

ज्येष्ठांना पोटगीचा अधिकार
बऱ्याचदा असे आढळून येते की मुले आपल्या वृद्ध मात्या-पित्यांचा सांभाळ करीत नाहीत, त्यांना हीन वागणूक देतात. त्यामुळे उतारवयात हातात पसा नसताना आणि स्वतचा पसा मुलांच्या भविष्यासाठी खर्च केल्यामुळे खितपत पडण्याची, मानहानीचे आयुष्य जगण्याची वेळ येते. यासाठीच भारतीय फौजदारी संहितेच्या कलम १२५ (ड) मध्ये वृद्ध माता-पित्यांसाठी पोटगीसाठी तरतूद केली गेली आहे. आणि भारतातील वृद्धांचा तो अधिकार आहे. ज्या वृद्ध पालकांना उत्पन्नाचे पुरेसे साधन नाही, असे पालक आपल्या मुलांकडून पोटगी मागू शकतात. यासाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज केला जातो. सदरचा अर्ज वकिलांमार्फत न्यायालयात दाखल करता येतो. सदर अर्जाचा पुरावा नोंदवून सुनावणी होण्यासाठी अनेकदा बराच वेळ खर्च होतो. त्या कारणास्तव सदर संहितेमध्ये (कायद्यात)अर्ज दाखल केल्यापासून अर्जाची अंतिम सुनावणी होईपर्यंत अंतरिम पोटगीचा आदेश कोर्टातून पारित केला जातो. ज्या ठिकाणी कौटुंबिक न्यायालयांची स्थापना केलेली आहे, अशा ठिकाणी कौटुंबिक न्यायालयातही पोटगीसाठीचा अर्ज दाखल करता येतो.
(पुढील भागात (८ फेब्रुवारी) – पोटगीचा अधिकार ठरविण्याचे निकष, पोटगी भरण्याचे उपाय इ. विषयीची माहिती.)
अ‍ॅड. प्रीतेश देशपांडे pritesh388@gmail.com
    
हुशार आजोबा
त्या आजोबांना कित्येक महिन्यांपासून ऐकायला कमी येऊ लागलं होतं. ते कानाच्या डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी त्यांना अगदी स्पष्ट, स्वच्छ ऐकू येणारं मशीन लावायला दिलं. एक महिन्याने आजोबा पुन्हा त्या डॉक्टरांकडे तपासायला आले. डॉक्टर आपल्या यशावर खुश होऊन म्हणाले, ‘वा आजोबा, तुम्हाला तर अगदी शंभर टक्के ऐकू येतंय. तुमचे कुटुंबीय नक्कीच खूश झाले असतील ना ही बातमी ऐकून.’
 आजोबा म्हणाले,‘ छे छे, मी अजून कुणालाच सांगितलेलं नाही. मी फक्त त्यांच्यात जाऊन बसतो आणि ते काय काय बोलतात ते ऐकून घेतो.
.. आत्तापर्यंत मी तीनदा माझं मृत्युपत्र बदललंय.