आपल्या आनंद साधनेला सुरुवात करू या! वाढत्या वयामुळे, मानसिक ताणांमुळे, वापरामुळे सांधे व स्नायूंमध्ये भरपूर ताण जाणवतो, हा ताण कमी करण्यासाठी, आसनसाधना सुलभ होण्यासाठी ‘पवनमुक्तासन’ मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. किंबहुना देहसाधनेमध्ये या शिथिलीकरणाला आत्यंतिक महत्त्व आहे. खूप कठीण आसने करता आली नाही तरी अगदी चालेल. साधनेमध्ये पवनमुक्तासने केली तरी पुरते, असे परमहंस स्वामी निरंजनानंद म्हणतात. शरीरातील अगदी पायाच्या बोटांच्या हालचालीपासून सुरुवात करू या.
 यासाठी प्रारंभिक स्थिती घ्या. बठक स्थिती. पाय लांब, हात पाठीमागे, हाताची कोपरे सरळ. पाठीमागच्या बाजूस किंचित रेलून बसा. कुठेही ताण नको. डोळे मिटा. लक्ष फक्त श्वासावर केंद्रित करा. आता डोळे उघडून पायांचे पंजे सावकाश रीतीने पुढे व मागे हलवा. कृती करताना श्वास घ्या. कृती सोडत असताना श्वास सोडा. घेतलेल्या प्रत्येक श्वासागणिक ‘मी प्राणयुक्त होत आहे’ व सोडणाऱ्या प्रत्येक श्वासागणिक ‘मी तणावमुक्त होत आहे’ हा संकल्प करीत राहा. साधारण १० वेळा ही कृती केल्यावर पायाचे घोटे चक्राकार हलवा. म्हणजे घडय़ाळाच्या काटय़ाच्या दिशेने व विरुद्ध दिशेने! हे करीत असताना गुडघे व जांघेतील स्नायू व सांधे अत्यंत शिथिल ठेवा. दोन्ही पायांमध्ये (पावलांमध्ये) सुखावह असे अंतर ठेवा. पावले वरच्या दिशेला जाताना श्वास घ्या, पावले खालच्या दिशेने जाताना श्वास सोडा. हे करताना सजगता अत्यंत महत्त्वाची!

      

Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!