सुक्या मेव्याचा राजा म्हणून बदामाला ओळखले जाते. शरीर व मनाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी औषधी व अन्न अशा दोन्ही स्वरूपात बदाम वापरले जातात. त्यात असणाऱ्या अलौकिक गुणधर्मामुळे सौंदर्यप्रसाधन म्हणूनही त्याचा वापर केला जातो. तेल, साबण, क्रीम, मिठाई अशा विविध ठिकाणी बदामाचा वापर केला जातो.

औषधी गुणधर्म –
शुष्क बदाम बी मधुर, कषाय, तीक्त गुणात्मक असून मधुर विपाकी व उष्ण वीर्यात्मक आहे. त्यामुळे बदाम बी स्निग्ध, बलकर, पौष्टिक, वातनाशक व कफकर आहे. या सर्व गुणधर्मामुळे आयुर्वेदात अनेक औषधांमध्ये बदामाचा वापर करतात. कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, नायसिन, ‘ब’ जीवनसत्त्व, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, खनिज, प्रथिने, स्निग्धता ही घटक द्रव्य बदामामध्ये असतात. या घटकांनी उत्साह वाढतो व शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे संपूर्ण शरीराचं आरोग्य चांगलं राहून दीर्घायुष्य लाभतं. बदामाच्या देशी व जंगली अशा दोन जाती आहेत. जंगली बदाम हा चवीला कडू असतो. तर देशी बदाम हा गोड असतो.

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
homemade mango ice cream recipe
Mango Ice-cream: मुलांसाठी घरच्या घरी बनवा आंब्याचे थंडगार आइस्क्रीम! वापरा फक्त ‘हे’ तीन पदार्थ

उपयोग –
० बदामाचं तेल केसांच्या मुळाशी लावलं असता केसांना पोषक घटक मिळाल्यानं केसांची वाढ चांगली होते व केस गळणं, कोंडा होणं, अकाली केस पिकणं या समस्या दूर होतात.
० डोळयांखाली काळी वर्तुळं तयार झाली असतील तर बदाम दुधामध्ये उगाळून त्यांचा लेप लावावा. लेप सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. नियमितपणे ही प्रक्रिया केल्यास डोळ्यांखालील काळी वर्तुळे निघून जातात.
० बदाम पेस्ट, दुधाची साय व गुलाब पाणी एकत्र वाटून चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग, मुरुमे जाऊन चेहरा टवटवीत व कांतीयुक्त होतो.
० बदाम रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी सोलून खावेत. याने स्मृतिभ्रंश, विस्मरण हे आजार कमी होतात.
० भिजलेल्या बदामाची पेस्ट दुधात कालवून दूध उकळावे व गाईचे तूप, वेलची, साखर घालून त्याची खीर बनवावी. ही खीर खाल्याने अशक्तपणा व थकवा दूर होतो. यासह वंध्यत्व असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे या खिरीचं सेवन करावं.
० वारंवार डोकेदुखी होत असेल तर बदामाची खीर खावी. तीव्र डोकेदुखीमध्ये बदाम आणि कापूर दुधात उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा.
० शरीरामध्ये चांगल्या कोलेस्टेरॉलची निर्मिती होण्यासाठी नियमितपणे ४ बदाम रोज सकाळी उपाशीपोटी खावेत. यामुळे चांगल्या कोलेस्टेरॉलची (एच.डी.एल) निर्मिती होते व वाईट कोलेस्टेरॉलला (एल.डी.एल.) प्रतिबंध केला जातो. तसंच हदयविकार, रक्तदाब हे विकार टाळले जातात.
० जुनाट मलावरोधाची तक्रार असेल तर नियमितपणे झोपताना ६-८ बदाम खाल्ल्यास सकाळी पोट साफ होतं.
० चेहऱ्यावर काळे वांग आले असतील किंवा ओठ काळे दिसत असतील तर दुधाच्या सायीमध्ये बदाम उगाळून हळुवार मालीश करावी. यामुळे काळसरपणा दूर होतो.
० त्वचा कांतीयुक्त होण्यासाठी बदामाचं तेल, चंदन तेल, लोणी व मध यांचं मिश्रण त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन रंग उजाळतो.
० मेंदू, हदय, डोळे यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी नियमितपणे बदामाचं सेवन करावं.
० शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी, बाळंतिणीचं दूध वाढविण्यासाठी, तिच्या शरीराची झीज भरून तसंच वातप्रकोप कमी करण्यासाठी बदाम,काजू, िडक, खोबरं, मनुका, चारोळी, पिस्ता, खारीक यांचे गूळ घालून लाडू बनवावेत. रोज नियमित एक लाडू खाल्ल्याने खूप फायदा होतो.

सावधानता –
सहसा बदाम बी ही कवचाच्या आत असल्यामुळे सुरक्षित आहे. फक्त बदाम खाताना अति प्रमाणात खावू नये. ते सारक गुणधर्माचे असल्यामुळे अति खाल्ल्यास जुलाब होण्याची शक्यता असते.

डॉ. शारदा महांडुळे, sharda.mahandule@gmail.com