७०-८० केळ्यांचा फणा ज्यातून निर्माण होतो ते केळफूल फुलासारखं दिसतच नाही. केळफुलाच्या वरची गुलाबी, लाल रंगाची जाड पानं उलगडत गेलं की आत पिवळसर फुलांचे केळ्याच्या घडासारखे घड दिसतात.
केळफुलात कोलेस्टोरॉल नाही, साखर नाही, पण भरपूर चोथा आणि कॅल्शियम असतं. सोडियमने समृद्ध असलेल्या या केळफुलात चांगल्या प्रतीची प्रथिनं असतात, तसेच मॅग्नेशियम, आयर्न आणि कॉपरही असतं. केळफुलाचा अर्क साखर नियंत्रणात ठेवतो, शरीरातल्या जंतूंची वाढ रोखतो.
केळफुलाची भाजी निवडायला किचकट. कारण त्यातल्या प्रत्येक फुलातला कडक दांडा आणि पातळ पापुद्रा काढावा लागतो. पण ती अतिशय पौष्टिक असल्याने जरूर खावी. चिरल्यानंतर भाजी ताक किंवा लिंबू घातलेल्या पाण्यात घालावी नाही तर काळी पडते.

केळफुलाचे अप्पे
साहित्य : १ वाटी बारीक चिरलेलं केळफूल, १ वाटी बारीक रवा, १ वाटी दही, १ मोठा चमचा बेसन, २ मोठे चमचे मोहरी, हिंग, हळद घातलेली तेलाची फोडणी, प्रत्येकी १ चमचा तीळ आणि लसूण-मिरची ठेचा, चवीला मीठ, साखर, पाव वाटी कोमट पाणी, १ चमचा इनो फ्रूट सॉल्ट.

cow cuddling Seller Then Vendore feeding the some vegetables To Her Video Winning Hearts Online
VIDEO: गाय पक्की शिस्तीची! भाजीवाल्याकडे खाणं मागायला गेली अन् असं काही केलं की, तुम्हीही कराल कौतुक…
Masala Dhemse Bhaji Recipe In Marathi
भूक नसतानाही खावीशी वाटेल असे झणझणीत मसाला ढेमसे; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Upvasachi bhakari and batata rassa
उपवासाची भाकरी आणि बटाट्याची रस्सा भाजी; ही घ्या मस्त रेसिपी, फराळही होईल चमचमीत-चवदार
Dahi vada recipe in marathi holi special recipe marathi
Holi 2024: होळी रे होळी! चविष्ट अन् झटपट बनवा “कलरफूल दहीवडे” होळी हाईल खास!

कृती : चिरलेलं केळफूल कुस्करावं. एक मोठा चमचा फोडणी वगळून इतर सर्व जिन्नस एकत्र करावेत, नॉन स्टीक अप्पेपात्रात थेंब थेंब चमचा फोडणी घालून त्यात पीठ घालावं, झाकण ठेवून ४ मिनिटांनी अप्पे उलटावे. परत थोडीथोडी फोडणी घालून दुसरी बाजू भाजावी.

वसुंधरा पर्वते
vgparvate@yahoo.com
(सदर समाप्त)