माधुरी ताम्हणे madhuri.m.tamhane@gmail.com
पंजाबमधील मूर्तिपूजा न करणाऱ्या  घरातील आणि पत्रकारितेचं शिक्षण घेतलेल्या किरण जहांगीर यांनी एके  ठिकाणी मूर्तिकारांना गणेशमूर्ती घडवताना पाहिलं आणि यापुढे आपणही गणेशमूर्तीच्या मूर्तिकार व्हायचं, हे ठरवून टाकलं. त्यासाठीचं प्रशिक्षण घेऊन त्यांनी कौशल्यानं काम सुरू केलं आणि शाडूमाती, कागद, पीठ यांचा वापर करत गणेशमूर्ती बनवत पर्यावरणपूरकतेचा सातत्यानं प्रचार-प्रसार केला. मोजक्या स्त्री मूर्तिकारांमध्ये किरण यांनी आज स्वत:ची ठळक ओळख तयार के ली आहे.

चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती पंजाबमधील मूर्तिपूजा न करणाऱ्या   घरातील आणि पत्रकारितेचं शिक्षण घेतलेल्या किरण जहांगीर यांनी एके  ठिकाणी मूर्तिकारांना गणेशमूर्ती घडवताना पाहिलं आणि यापुढे आपणही गणेशमूर्तीच्या मूर्तिकार व्हायचं, हे ठरवून टाकलं. त्यासाठीचं प्रशिक्षण घेऊन त्यांनी कौशल्यानं काम सुरू के लं आणि शाडूमाती, कागद, पीठ यांचा वापर करत गणेशमूर्ती बनवत पर्यावरणपूरकतेचा सातत्यानं प्रचार-प्रसार के ला. मोजक्या स्त्री मूर्तिकारांमध्ये किरण यांनी आज स्वत:ची ठळक ओळख तयार के ली आहे.

nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी

श्री गणेश! कोणत्याही क्षेत्रातील कलाविष्काराचा उद्गाता श्री गणेश! त्याचा कृपा-आशीर्वाद लाभलेली एक स्त्री कलाकार स्थापत्य क्षेत्रात कलेचा उत्तुंग आविष्कार घडवते आहे. त्या स्त्रीचं नाव किरण जहांगीर. किरण या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याचं अत्यंत मोलाचं कार्य करत आहेत.

कलात्मक, सुबक गणेशमूर्ती बनवणाऱ्या किरण यांचे कुटुंबीय पंजाबमधील राधास्वामी संप्रदायाचे अनुयायी. या संप्रदायात मूर्तिपूजा नाही. केवळ ध्यानधारणेवर भर. त्यामुळे किरण यांना देवदेवतांच्या मूर्ती कशा असतात, त्यांची पूजा, प्राणप्रतिष्ठा कशी केली जाते, याचा गंधही नव्हता. किरण यांचे माहेर जयपूर येथील. जयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये विविध कलाप्रकारांची उन्हाळी शिबिरं भरवली जातात. राजस्थान विद्यापीठात पत्रकारितेचं शिक्षण घेत असताना एकदा त्या तिथे वार्ताकन करण्यासाठी गेल्या. तिथे काही मुलं शाडूच्या गणपतीच्या मूर्ती बनवत होती. ते पाहिलं मात्र, किरणजी यांना साक्षात्कार झाला, की भविष्यात आपल्याला हेच काम करायचं आहे. त्या म्हणतात, ‘‘ही माझी गणपती बाप्पाशी झालेली पहिली ओळख. मग मी या क्षेत्रातील गुरूंचा शोध सुरू केला. माझी भेट थोर मूर्तिकार       पद्मश्री अर्जुन प्रजापती यांच्याशी झाली. त्यांच्याकडे मी माझी मूर्तिकार बनण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यावर ते म्हणाले, ‘‘मी तुला ही कला शिकवेन, पण तुझं या क्षेत्रातील यश हे सर्वस्वी तुझी तीव्र प्रामाणिक तळमळ, अंत:प्रेरणा आणि मेहनत, यावर अवलंबून आहे.’’ त्यांनी सुरुवात केली ती गणपती बाप्पाच्या मूर्तीनं. ती मूर्ती घडवताना जी एकतानता मी अनुभवली, ती आजवर टिकून आहे. ती पहिली गणेशमूर्ती आजही मजजवळ आहे. मर्मबंधातली ठेव आहे ती मूर्ती माझ्या! पुढे स्केचिंग, मातीची पोट्र्रेट्स, देवदेवतांच्या मूर्ती असं काम सुरू झालं. उमेदवारीच्या काळात मी खूप मूर्ती घडवल्या. त्यांचं प्रदर्शन भरवलं. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. आणि मला जाणवलं की ‘मूर्तिकार’हीच आपली खरी ओळख.’’

‘गणपती बाप्पाची मूर्तिकार’अशी खास नवी ओळख किरणना मिळायला मात्र काही काळ जावा लागला. राजस्थान ते मुंबई असा पल्ला गाठत असताना कौटुंबिक व सांस्कृतिक स्थित्यंतरं अनुभवावी लागली. मधल्या काळात विवाह, अपत्य संगोपन, यामुळे कलेच्या साधनेत खंड पडला. मात्र मनातली तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्या पतीची मुंबईत बदली झाली. मुंबईत आल्यावर त्यांनी पहिला गणेशोत्सव पाहिला, अनुभवला आणि त्यांच्यातल्या कलाकारानं पुन्हा उसळी घेतली. ती आठवण त्या सांगतात, ‘‘२०१० ची गोष्ट. मी ठाण्यात तलावपाळीजवळ राहत होते. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी तळ्यावर मॉर्निग वॉकला गेले आणि जे दृश्य पाहिलं, त्यानं काळजाचं पाणी पाणी झालं. सर्वत्र ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्तीचे भग्नावशेष विखुरले होते. आजवर या हातांनी सुंदर गणेशमूर्ती घडवल्या होत्या. त्याच मूर्तीचं हे रूप मनाला जखमी करून गेलं. त्या क्षणी मी निर्णय घेतला की यापुढे पर्यावरणपूरक साहित्यातून गणेशमूर्ती बनवायच्या आणि त्यांचा सर्वत्र प्रसार करायचा.’’

सुरुवातीला किरण यांच्या कल्पनेला कोणीच प्रतिसाद देईना. अगदी त्यांची स्वत:ची सोसायटीसुद्धा.  तरीही नाउमेद न होता त्या शाळाशाळांमधून विद्यार्थी व शिक्षकांना पर्यावरणाचं महत्त्व समजावून देत मातीच्या गणेशमूर्ती कशा बनवायच्या ते शिकवू लागल्या. वेगवेगळ्या सोसायटय़ांत जाऊन स्त्रियांना घरच्या घरी गणपती कसे बनवता येतात ते दाखवू लागल्या. गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन त्यांना मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना करा, हे पटवून देऊ लागल्या. समाजमाध्यमांवर सक्रिय झाल्या. ‘यूटय़ूब’वर स्वत:चं चॅनल सुरू करून मातीच्या गणेशमूर्ती बनवण्याचं रीतसर प्रशिक्षण देणारे तपशीलवार व्हिडीओ तयार करून ‘अपलोड’ करू लागल्या. सोप्या पद्धतीनं शाडूच्या गणपती बाप्पाच्या मूर्ती शिकवल्यामुळे प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. लाखोंच्यावर प्रेक्षक संख्या गेली. कॅनडा, अमेरिकेसह जगभर याचा प्रसार झाला आणि किरण यांना हुरूप आला.

आता याला व्यावसायिक स्वरूप देण्याची गरज भासू लागली आणि पहिली शाडूच्या गणेशमूर्तीची व्यावसायिक मागणी आली ती ‘वात्सल्य ट्रस्ट’ या संस्थेकडून. या गणेशमूर्तीला सलग दोन वेळा एका वृत्तपत्राच्या स्पर्धेत पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचं प्रथम पारितोषिक मिळालं. तसंच एका इंग्रजी वृत्तसमूहाकडूनही प्रथम पारितोषिक मिळालं. समाजाला पर्यावरणाचं महत्त्व पटवून देण्यात या गणेशमूर्तीच्या निर्मितीनं खूप हातभार लाला. त्याचं नेमकं कारण विशद करताना त्या म्हणतात,‘‘पीओपीच्या गणेशमूर्ती या स्वस्त, आकर्षक व वजनाला हलक्या असतात. त्यामुळे त्या अधिक लोकप्रिय आहेत. परंतु त्या मोठय़ा जलाशयात विसर्जित कराव्या लागतात. त्या घडवताना त्यात मॅग्नेशियम, सल्फर, जिप्सम असे विषारी घटक वापरावे लागतात. त्यामुळे पीओपी मूर्ती विसर्जित केलेल्या तलावातील मासे, जीवजंतू व वनस्पतींना हानी पोहोचते. त्यातही पीओपी पाण्यात विरघळत नसल्यामुळे अत्यंत श्रद्धेनं पूजलेल्या गणेशमूर्तीचे भग्नावशेष दुसऱ्या दिवशी बघवत नाहीत. त्याउलट मातीच्या मूर्तीचं घरच्या घरी बादलीत, टबमध्ये, कृत्रिम जलसंचयात विसर्जन करता येतं. मातीची मूर्ती पाण्यात चटकन विरघळते. त्यामुळे मूर्तीची विटंबना टळते आणि मनाला शांती, समाधान लाभतं.’’

पर्यावरणपूरक गणपती बाप्पाची मूर्ती काळी माती, लाल माती, कागदाचा लगदा, गव्हाचं पीठ, अशा घरगुती व सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यातून बनवता येते. गव्हाच्या पिठात हळद मिसळली की मूर्तीला छान रंग येतो. शिवाय विसर्जनपश्चात याच्या बारीक गोळ्या बनवून पक्ष्यांना व जलाशयातील माशांना खाऊ घालता येतात. पेपरच्या लगद्यापासून बनवलेली मूर्ती वजनाला हलकी होते. तसंच शाडूची गणेशमूर्ती ही आकारानं छोटी असो वा मोठी, भक्तांना मिळणारा आशीर्वाद हा मूर्तीच्या आकारावर अवलंबून नसतो, तो भक्ताच्या आंतरिक भावनेच्या तीव्रतेवर अवलंबून असतो, असं त्या आवर्जून सांगतात.

‘‘या निराकार तत्त्वाला देण्यात आलेला आकार महत्त्वाचा. तो आकार साकार करण्यासाठी पर्यावरणपूरक साहित्य वापरलं व निसर्गाचं संवर्धन केलं तर बाप्पा नक्की प्रसन्न होईल! म्हणूनच ऊर्जेची बचत व्हावी यास्तव विद्युत रोषणाई न करता पारंपरिक तेलातुपाचे दिवे लावावेत, निर्माल्याचं खत बनवून वापरावं. अशा प्रकारे पर्यावरणाचं रक्षण करावं. ईश्वर आणि भक्ताचं नातं आंतरिक प्रेमाचं आहे. त्यात दिखावा, उधळपट्टी, चढाओढ, स्पर्धा कशासाठी?’’ हा मुद्दा त्या मांडतात.

‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीनुसार किरण यांची ही कृती आहे. त्या शाडूची मूर्ती स्वहस्ते बनवतात. साच्याचा वापर करत नाहीत. वास्तवदर्शी, पारंपरिक मूर्ती बनवण्याकडे त्यांचा कल असल्यानं त्या अमूर्त रेखाटन करत नाहीत. मूर्ती रंगवताना कृत्रिम रंगाचा वापर न करता त्या हळद, मेहंदी, गुलाल या साहित्याचा वापर करतात. माती भिजवण्यापासून मूर्तीचे हात, बोटं व सोंड याला आकार देणं हे कौशल्याचं काम असतं. मात्र गणपती बाप्पाची मूर्ती बनवणं तुलनेनं सोपं आहे, असं त्या सांगतात. त्यामुळे त्यांच्या कार्यशाळेमध्ये ज्या लोकांनी कधी मातीत हातही घातला नाही, तेही योग्य मार्गदर्शनातून छान मूर्ती घडवतात. शाडूची मूर्ती वजनाला जड असते. ती हलकी व्हावी यासाठी दोन प्रकारे ती बनवली जाते. पहिल्या प्रकारात ती आतून पोकळ ठेवतात. तर दुसऱ्या प्रकारात आतमध्ये लाकडाची फ्रे म बसवली जाते. जेणेकरून मूर्ती मजबूत होते,पण वजनाला हलकी होते. या मूर्ती बनवण्यासाठी जास्त जागा लागत नाही व मातीचा पसाराही होत नाही. त्यांच्या घरातील एका खोलीत त्यांनी स्टुडिओ बनवला आहे. माती मळणं, मूर्तीला आकार देणं, ती रंगवणं व त्यावर दागिन्यांची कलाकुसर करणं ही सर्व कामं किरण या खोलीतच करतात. साधारणपणे तीन दिवसांत १५ इंचाची मूर्ती त्या बनवतात. मात्र त्यासाठी दिवसाला सलग चार तास काम करावं लागतं. किरण म्हणतात,‘‘प्रत्येक मूर्तीशी माझे भावबंध जुळलेले असतात. ही मूर्ती ग्राहकांच्या हाती सुपूर्द करताना आनंद, समाधान आणि हुरहुर अशा संमिश्र भावना मनात असतात. ’’

गणेशमूर्तीला क्षती पोहोचली तर अपशकुन मानला जातो, याची काळजी तुम्ही कशी घेता?, या प्रश्नावर त्या सांगतात,‘‘मातीची मूर्ती सुकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान ती भंग पावण्याची भीती सर्वात जास्त असते. मातीची गणेशमूर्ती सुकवण्यासाठी सूर्यप्रकाशात ठेवता येत नाही. ती सामान्य तापमानात सुकवावी लागते. या प्रक्रियेला किमान दहा दिवस लागतात. त्यानंतर त्याच क्रमानं तिचं रंगकाम  सुरू होतं. मूर्तीचे डोळे कौशल्यानं रंगवावे लागतात, तरच मूर्ती बोलकी दिसते. मूर्ती बनवण्यापूर्वी माती खूप मळावी लागते. अन्यथा मूर्तीला बारीक तडे जाऊ शकतात. मूर्ती सुकत असतानाच या भेगांवर बारीक लक्ष ठेवून वेळच्या वेळी त्या भराव्या लागतात. प्रत्येक मूर्ती वेगळी असावी, असा माझा प्रयत्न असतो. विशेषत: बाल गणेश मूर्ती बनवताना मी हा विचार करते. ते बाळरूप आईशी कसं लडिवाळपणे बोलत असेल, कोणते खेळ खेळत असेल, मूषक त्याचा मित्र आहे, लाडू हातात घेऊन या मित्राला तो कसा चिडवत असेल, अशा त्याच्या निरागस भावछटा नेमक्या चित्रित करण्यासाठी मी माझ्या गुटगुटीत धाकटय़ा मुलाला बाप्पासारखी मांडी घालून मॉडेल बनवून माझ्यासमोर बसवते! त्याच्या मांडीला पडणाऱ्या वळया, गालावरच्या खळ्या, मोठं पोट, हे सर्व तपशील माझी बालगणेशमूर्ती सुबक व वास्तवदर्शी बनवतात.’’

‘‘प्रत्येक मूर्ती घडवताना मी त्या प्रतिमेचा आधी अभ्यास करते. फोटोंचं बारकाईनं निरीक्षण करते. त्या मूर्तीच्या मुखावरील भाव, मुद्रा, हातापायांचा घोटीव रेखीवपणा, यासाठी मनोमन माझं सतत चिंतन चालू असतं. त्या विचारमंथनातून आधी ती मूर्ती मनात आणि नंतर वास्तवात साकार होते. गणपती बाप्पाची मूर्ती घडवत असताना, ती रंगवताना दिवसरात्र माझ्या मनात फक्त बाप्पाचंच रूप घोळत असतं. मी गणपती बाप्पाशी इतकी एकरुप होऊन जाते, की जणू मीच बाप्पास्वरूप होते! ’’

समाजात मूर्तिकार स्त्रिया अभावानंच आढळतात. त्यामुळे आपली ओळख निर्माण करण्यावर किती मर्यादा येतात?, या प्रश्नावर किरण हसून उत्तर देतात,‘‘स्त्री मूर्तिकार ही ओळख निर्माण करण्याचा प्रवास सोपा कधीच नव्हता. मुळात राजस्थानात स्त्रियांबाबतचा दृष्टिकोन अत्यंत संकुचित. त्यांनी साचेबद्ध आयुष्य जगावं, ही कुटुंबीयांची व एकूण समाजाची अपेक्षा. त्यात ही कला शारीरिक कष्टांची. हे कष्ट तुला कसे झेपतील? सासरच्या लोकांनी प्रोत्साहन नाही दिलं तर? अशा प्रश्नांच्या काटेरी कुंपणात मला अडकवण्याचा खूप प्रयत्न झाला. पण मी हरले नाही. पुढे लग्न झालं. पतीनं खूप प्रोत्साहन दिलं. यथावकाश मुलं झाली आणि सांसारिक जबाबदारीचं नवं आव्हान सामोर आलं. काही काळ माझं काम पूर्ण थांबलं. त्या वेळी मी खूप अस्वस्थ झाले. आजही तज्ज्ञ म्हणून प्रात्यक्षिकांसाठी अथवा कार्यशाळा घेण्यासाठी अनेक संस्था मला सन्मानानं आमंत्रित करतात. पण बऱ्याच वेळा ही निमंत्रणं मला स्वीकारता येत नाहीत. हे काम पूर्णपणे व्यावसायिक दृष्टीनं करत असल्यामुळे मासिक पाळीचं बंधन मात्र मी पाळत नाही. अत्यंत मनोभावे हे काम मी करत असल्यानं समाजानंही माझं स्त्रीत्व मान्य करून, त्यापलीकडे एक व्यक्ती म्हणून माझ्यातील कलाकाराला स्वीकारलं आहे. गणेशमूर्ती बनवणं हा माझ्या आयुष्यातील भाग्ययोग आहे.

माझ्या कार्यशाळेतील मुलं गणेशमूर्तीचे फोटो पाठवतात, तेव्हा या सुंदर व पवित्र कार्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित केलं आहे, याचा मला आनंद होतो. या कामाचा माझ्या व्यक्तिमत्त्वावर खोल परिणाम झाला आहे. मला आता चटकन राग येत नाही, मत्सर, द्वेष या नकारात्मक भावना माझ्या मनाला स्पर्श करत नाहीत. बाप्पानं वेगवेगळ्या स्थानी, विविध कार्यासाठी, विविध रूपं घेतली आहेत. प्राचीन ग्रंथांतून त्यांचा उल्लेख आहे. या स्थळांचा, तेथील मूर्तीचा शोध घेऊन ती रूपं साकार करण्याचा माझा मानस आहे. लोक भौतिक गोष्टींतून आनंद , सुख व मन:शांती शोधत असतात. ती मनशांती माझ्या या गणेशमूर्ती साकारण्यातून मला मिळते.

मला नेहमी वाटतं, पूर्वपुण्याईमुळेच गणपती बाप्पानं या पवित्र व कलात्मक कार्यासाठी, त्याचं निर्गुण स्वरूप सगुण साकार करण्यासाठी माझी निवड केली असावी! त्यासाठी मी गणपती बाप्पाप्रति अपार कृतज्ञता व्यक्त करते.’’