हुशारी जिथे संपते तिथे शहाणपण सुरू होतं. शहाणपण म्हणजे कोणत्या गोष्टी आपल्या स्वत:च्या नियंत्रणात आहेत आणि आणि कोणत्या गोष्टी नियंत्रणात नाहीत हे ओळखणं. आणि नियंत्रणाबाहेरच्या गोष्टीवर नियंत्रण आणण्याचा व्यर्थ खटाटोप सोडून द्यायचा आणि सारं लक्ष नियंत्रणात असलेल्या गोष्टीत केंद्रित करायचं, हेच शहाणपण.
कालपर्यंत मी हुशार होतो.
भवतालचे जग बदलवण्याचा प्रयत्न करीत होतो.
आता मी शहाणा झालो आहे.
मी फक्त स्वत:ला बदलतोय – रुमी
रुमी या उर्दू साहित्यिक, विचारवंतांच्या या वाक्याने मी विलक्षण प्रभावित आहे. हुशार (क्लेव्हर) आणि शहाणा (वाइझ) या दोन शब्दांतला फरक किती सोप्या भाषेत सांगितलाय रुमींनी! आपल्याकडे हुशार, चलाख, बुद्धिवान हे समानार्थी शब्द दैनंदिन जीवनात वापरले जातात. पण ‘शहाणा’ या शब्दाला उगाचच मनातल्या मनात ‘अति’ या शब्दाचा जोड दिला जातो. ‘अति शहाणा त्याचा बल रिकामा’ ही म्हणच डोळ्यासमोर येते आणि घोटाळा होतो. लहानपणी, ‘हट्ट करायचा नाही, रडायचं नाही, शहाणा माझा राजा तो’ हे आईच्या तोंडचे शब्दही मनात पक्के रुतलेले असतात. तर शहाणा कोण?-तर हट्ट न करणारा, न रडता आई-वडिलांची आज्ञा पाळणारा, गुणी, नम्र, हुशार ऐकणारा मुलगा म्हणजे शहाणा मुलगा. आणि शहाणा नसेल तो वेडा! मध्ये अध्ये काही नाहीच!
हुशारी जिथे संपते तिथे शहाणपण सुरू होतं. शहाणपण म्हणजे कोणत्या गोष्टी आपल्या स्वत:च्या नियंत्रणात आहेत आणि आणि कोणत्या गोष्टी नियंत्रणात नाहीत हे ओळखणं. आणि नियंत्रणाबाहेरच्या गोष्टीवर नियंत्रण आणण्याचा व्यर्थ खटाटोप सोडून द्यायचा आणि सारे लक्ष नियंत्रणात असलेल्या गोष्टीत केंद्रित करायचे. हे आमच्या सुप्रिया वाहिनींना कधी कळलेच नाही ते. खरं तर त्या हुशार! मानसोपचार विषयात सुवर्णपदक विजेत्या. परंतु स्वत:च्या मुलांना कसं वाढवावं हे त्यांना कधी कळलेच नाही. त्यांची अशी ठाम समजूत होती की मुले ‘घडवायचीच’ असतात. मुलांना स्वत:चे हित कशात आहे ते समजत नाही, त्यामुळे मुलांचे अभ्यास, त्यांचा गुणानुक्रम, त्यांचे खेळ आणि इतर क्षेत्रांतील प्रावीण्य ही सर्वस्वी जबाबदारी पालकांची. त्या नेहमी इतरांना सांगत स्टेफी ग्राफला तिच्या वडिलांनी तिला अक्षरश: घडवले आहे. तिला प्रक्टिसला घेऊन जाणं, ती कंटाळली तरी तिला जबरदस्तीने खेळायला लावणं म्हणूनच आज स्टेफी टेनिसपटू म्हणून गाजली. माझ्या शमाबाबतीत मी हेच करायचं ठरवलं आहे, असं त्यांनी मला सांगितलं तेव्हा मी मनातल्या मनात म्हटलं, ‘शमाचं काही खरं नाही.’
शमाला आमच्या घरी यायला खूप आवडतं. ती म्हणायचीसुद्धा ‘काका तुमच्याकडे मस्त मोकळं वाटतं, पण आई येऊच देत नाही. मला माझा काही वेळ हवा किनई?’ आता या अकरा वर्षांच्या मुलीला मी काय उत्तर देणार. पण मी म्हणून गेलो, ‘अगं मुली आई हे सगळं तुझ्या चांगल्यासाठीच करते ना?’ तिला वाटायचं मीही सुप्रिया वहिनींना सामील आहे.
शमीचा गळा गाता होता. आणि काही जणांना जन्मजात सुराची जाण असते तशी तिला होती. अभ्यासात विशेषत: भाषांत ती रमून जायची. उत्तम निबंध लिहायची. संधी मिळेल तेव्हा आणि हातात पडेल ते वाचायची. चित्र छान काढायची. पण सुप्रिया वहिनींना तिने गाण्यात करिअर करावं असं वाटत होतं, आणि त्याकरता स्टेफी ग्राफच्या पालकांचा कित्ता गिरवत होत्या. त्याच सुमारास अनेक मराठी वाहिन्यांवर मुलांच्या स्पर्धा होत असत. या स्पध्रेत शमाच जिंकावी हे त्यांचे स्वप्न होतं. त्याकरता शमाच्या मागे अक्षरश: हात धुऊन मागे लागल्या होत्या. सकाळी सात वाजता शास्त्रीय संगीताची शिकवणी, संध्याकाळी सुगम संगीताचा क्लास, आठवडय़ातून तीन वेळा मराठी गाण्यांची प्रसिद्ध गायिकेची विशेष शिकवणी असा शिकवण्यांचा मारा होत होता. तिचे सर्व शिक्षक तिच्याबाबत खूपच आशावादी होते.
स्पर्धा सुरू झाल्या. आणि तिथले वातावरण, पालकांचे प्रतिसाद यामुळे काहीशी गांगरली. बरोबर सुप्रियाताई होत्या. तिने आवाजाची कशी काळजी घ्यावी, कधी झोपावे, कधी उठावे, रियाझ किती वेळ सूचनांचा पाऊस पडत होता. पहिली फेरी सुरू झाली. पहिले गाणे ‘रंगी रंगला श्रीरंग’ परीक्षकांची जोरदार दाद मिळवून गेलं. पण दुसऱ्या गाण्याला, ‘मालवून टाक दीप’ गाताना मध्येच ती बेसूर झाली. आणि पहिल्या फेरीतच बाद झाली. सुप्रियाताई तिथेच खेकसल्या, ‘शमे नाक कापलंस. सगळी मेहनत वाया गेली.’ या घटनेचा विचार करताना जाणवलं, सुप्रियाताई हुशार होत्या. त्यांना ज्या गोष्टी नियंत्रणात आहेत असे वाटत होते त्या करत होत्या, परंतु प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी आपला पाल्य काय करेल ही गोष्ट पूर्णपणे नियंत्रणाबाहेरची आहे हे त्यांना समजलेच नाही. म्हणून त्यांनी शमावर आणि स्वत:वर राग काढला.
पण त्या शहाण्या असत्या तर म्हणाल्या असत्या, तयारी चोख केलीय. प्रत्यक्ष ऐनवेळी काय होईल ते होईल. आपल्या आसपासचे अनेक पालक सुप्रियताईंचा कित्ता गिरवताना दिसतात. आणि मग खिन्न होतात, निराश होतात. मराठीतली एक सुंदर म्हण, घोडय़ाला पाण्याजवळ नेता येतं, पण पाणी पिणं न पिणं ही घोडय़ाची मर्जी! ही सोयीस्कररीत्या विसरली जाते. आजही अनेक माणसे इतर माणसांना, सभोवतालच्या परिस्थितीला आणि अगदी जगालासुद्धा बदलवण्याचा प्रयत्न करीत असतात, परंतु ही धडपड व्यर्थ असते हे त्यांना समजत का नाही?
माझा मित्र तन्मय म्हणतो, ‘‘माणसे किंवा परिस्थिती बदलवणे हे खूप संयमाचं आणि हळूहळू घडणारी क्रिया आहे. प्रत्येक गोष्ट बदलू शकते, पण बदलाचा वेग व्यक्तीसापेक्ष असतो. बदल का आवश्यक आहे हे जर त्या माणसाला उमगले, समजले आणि त्याची निकड भासली की माणसे बदलतात.’’
त्याच्या बोलण्यावरून मला आइन्स्टाइनचे वचन आठवले, आपल्या भोवतालचे जे जग आहे ते आपल्या विचार प्रक्रियेतून निर्माण झाले आहे, म्हणून त्यात काही बदल घडवून आणयचा असेल तर आपल्या विचार प्रक्रियेतील बदल करावा लागेल. ‘द ओन्ली थिंग दॅट इज कॉन्स्टंट इज चेंज वा बदल ही एकमेव स्थिर गोष्ट आहे,’ हे हक्र्युलसचं वचनही प्रसिद्ध आहेच.
सर्वसामान्यपणे माणसाच्या जीवनात वेगवेगळ्या टप्प्यावर बदल घडत असतातच. आणि ते नसíगक असतात. किशोरावस्था, मुलांचं वयात येणं, मुलींना ऋतुस्राव सुरू होणे, वयात येणं, लग्न, बाळंतपण, स्त्री आणि मेनोपोज आणि पुरुषांमधील अँडरापॉज, वृद्धावस्था, आजारपण, जोडीदाराचा मृत्यू आणि प्रयाण असे सारे शारीरिक बदल होतच असतात. काही बदल माणूस निवड म्हणून करत असतो. नोकरी, लग्न, व्यवसाय, विवाह विच्छेद, पुनर्वविाह, अनतिक संबंध, व्यसने, भष्ट्राचार वगरे गोष्टींतील बदल तो बहुतेक वेळा जाणीवपूर्वक करीत असतो किंवा सामाजिक रेटय़ाने करतो. त्यामुळे अशा बदलांशी जुळवून घेणे ही सर्वस्वी त्याची जबाबदारी असते.
सभोवतालची परिस्थिती बदलली किंवा आíथक स्थिती बदलली की त्याच्या नकळत काही बदल आपोआप घडत जातात. जीवनशैली बदलते. जोडलेली माणसं तुटतात किंवा बदलतात, नातेसंबंध बदलतात, आणि आधीचा माणूस आणि असा बदल घडलेला माणूस ही अगदी टोकाची भिन्न माणसे आहेत की काय, असा संभ्रम पडतो. तंत्रज्ञातील बदल झाल्यामुळे माणूस त्याच्या सवयी बदलतो, तंत्रज्ञान आपलेसे करण्याची खटपट करतो. आज जे पन्नाशीत आहेत त्यांनी हे बदल मोठय़ा प्रमाणात अनुभवले आहेत. आम्ही रेडिओ ते टेपरेकॉर्डर ते सीडी प्लेअर ते आयपॉड ते ब्ल ूरे डिस्क असं फक्त गाणी ऐकण्याचा प्रवास पाहिला आहे. लहानपणी आमच्या वाडय़ात फक्त आमच्या घरी फोन होता. मी जेव्हा स्वतंत्र संसार थाटला तेव्हा फोनची प्रतीक्षा यादी कधी संपते याची प्रतीक्षा करण्यातच कित्येक वर्षे खर्ची पडली. मग पेजर आले, मग जाडजूड एरिअल सेलफोन, हळू हळू फोनचा प्रसार इतका वाढला की घरची मोलकरीणसुद्धा गळ्यात फोन लटकवत काम करू लागली. टू जी, थ्री-जी आणि आता तर फोरजी, फाइव्हजी असे करत आपण जी जी करत अमेरिकेतल्या मुलासोबत टँगो किंवा फेस-टाइमवर व्हिडीओ कॉल करू लागलो आहोत, परंतु हे बदल सुखावह होते म्हणून आपण स्वीकारले. इंटरनेटमुळे माहितीच्या महाजालात स्वत:ला अडकवून टाकले. फेसबुक, हँं३’२अस्र्स्र्, कल्ल२३ंॠ१ंे यांसारख्या माध्यमातून निरनिराळे गट करीत रोजच कुठे, कधी आणि काय करीत आहोत ते एकमेकांना सांगत राहिलो आहोत. या सगळ्याचा आपल्या जीवनशैलीवर परिणाम झाला आणि मग आपण बदललो. भूकंपग्रस्तांचे/ धरणग्रस्तांचे/पूरग्रस्तांचे पुनर्वसन जितकी अपरिहार्यता असते, तितकेच आपल्या जीवनातील तंत्रज्ञानाने घडवलेले बदल ही अपरिहार्यता होती आणि राहील.
हे बदल घडताना त्रास झाला का? हो, काही प्रमाणात निश्चित झाला. विशेषत: मध्यमवयीन पिढीला नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना कष्ट पडले, ‘‘मला एसएमएस करता येत नाही, नेट बघता येत नाही याची खंत बाळगणारे अनेकजण दृष्टीस पडतात. म्हणजे हा त्रास झालाच, परंतु परिस्थितीला अनुसरून न बदलणे हे अधिक जाचक ठरू लागले. म्हणून ही मंडळी नाइलाजास्तव परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मला मात्र अशा प्रकारच्या बदलांबद्दल काहीही बोलायचे नाही. कारण हे बदल हा जगरहाटीचा एक भाग आहेत. जगाबरोबर चालायचं असेल तर परिस्थितीशी जास्तीत जास्त जुळवून घेणं अपरिहार्य आहे.
मला इथे चिनी विचारवंत कनफ्युशिअसचे ते प्रसिद्ध वचन आठवते, डल्ल’८ ३ँी ६्र२ी२३ ंल्ल ि२३४स्र््रीि२३ ऋ ेील्ल ल्ली५ी१ ूँंल्लॠी फक्त (अति) शहाणी आणि मूर्ख माणसे कधीही बदलत नाहीत. शेकडो वर्षांपूर्वीचे हे वाक्य आजच्या घडीला तितकेच लागू आहे. आणि माझा विश्वास आहे की आपण ना अतिशहाणे आहोत न मूर्ख! आपण शहाणपणाच्या वाटेवरचे वाटसरू आहोत आणि म्हणून बदलत्या परिस्थतीशी स्वत:ला कमीतकमी त्रास करून घेत जुळवून घेण्याचा सदैव प्रयत्न करीत राहणार आहोत. आणि ही परिस्थितीशी जुळवून घेण्याने आपलं जीवन अधिक समृद्ध होत जाईल याची सर्वाना खात्री पटलेली आहे.
आता विचार करायचा आहे तो मी माणूस म्हणून कसा आहे? कोणती आहेत माझी शक्तिस्थाने? माझ्या मर्यादा कोणत्या? माझ्या आनंदी, कार्यरत आणि आरोग्यपूर्ण जगण्यात अडथळा ठरणारे माझ्या अंगी मुरलेले दोष कोणते? मी आज आहे त्यापेक्षा कमी दोष असलेला, माझ्या मर्यादांची कक्षा वाढवणारा आणि माझी शक्तिस्थाने अधिक मजबूत करणारा चांगला माणूस कसा बनेन याचा. आणि सुरू करणार आहोत प्रवास समंजसपणे, सतर्क राहत, शहाणपणाच्या वाटेवर चालत राहण्याचा.
(‘स्वत:ला बदलताना’ हे सदर दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होईल.)

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Constitutional ethics Prime Minister and Chief Minister A political and constitutional issue
समोरच्या बाकावरून: घटनात्मक नैतिकता पणाला..