News Flash

त्यांची दु:खं जाणवायला हवी सहसंवेदना

पहाटेच चार वाजले. तशी उठले आन स्मशान झाडायला गेले.

प्रामाणिक प्रयत्न असूनही..

मी घाईघाईत माझ्या वस्तीतल्या अंगणवाडीकडे चालले होते

‘‘म्हावरं हीच आपली लक्ष्मी’’

मच्छीमारीचा पारंपरिक व्यवसाय करणारी गीताबाय कोळणीचं जीवन तिच्याच शब्दांत..

मुलं शिकली तर सण यील जिंदगीत!

‘‘ मी रोज आरोग्य कोठीवरची डय़ुटी संपली की कंबर मोडस्तोवर बारा सोसायटय़ांमध्ये झाडूकाम करते.

नशा विडी ओढणाऱ्याला, राख मात्र आमाला!

विडय़ा वळण्यात आयुष्य सरलेल्या बिडी कामगार नागमणी कोटा हिची कहाणी..

पोटासाठी..  आन् पोरांसाठी..

‘‘समद्या जागी शेतमजूर बायांबर लय अन्याय व्हतो. समदं दिसतं. पण तोंडाला टाळं ठोकायचं. गडय़ापरीस जास्ती काम करून घ्येत्यात पन बाईमानूस म्हून मजुरी मात्र कमी देत्यात!

रस्त्यावरचं लाचार जिणं

‘‘राती झोपेत व्हते, अचानक जाग आली. कोनतरी अंगाशी चाळा करत व्हतं.

मातेरं झालेल्या आयुष्याला सावरणारं मातेर

‘समदं सामसूम झालं तसा झाडू उचलला. रोडवर सांडलेलं धान्य गोळा क्येलं

लाचारीचं जीणं नाय जगायचं!

सुरुवातीला माझा दीर म्हनायचा, ‘तू रातची कंदी बी येती. ह्य़े आसलं हमालीचं काम करतीस. आमचं काय नांव रानार?’ तवा येकदा त्यान्ला सुनावलं, ‘कष्टाचं जीणं नाशिबात हाय.

भोगले जे दु:खं त्याला : जवानीचा इस्कोट आन् बुढापा बरबाद

लोकान्ला आजकाल खेळ बघाया बी येळ न्हाय. आमी खावं काय? शिक्शान नाय तर कुठं नोकरी मिळणार? घरकामालाबी साक्षीपुरावे लागतात. आताशा काम बी झेपत न्हाय. जवानीत कसरत केलीया. आता हातपाय

धडपडणाऱ्या जगण्याला यशाचं मोल

हुशार असूनही दहावी न करता बाबांनी तिचं लवकर लग्न लावून दिलं, पण तिनं प्रौढ शिक्षण वर्गात प्रशिक्षण घेतलं, अपार धडपड करत त्याचे वर्ग चालवले, माध्यान्ह भोजन योजना राबवली, आरोग्यसेविकाही

चणे-फुटाणेवाली ते सरपंच

जगायचं तर पैसे कमावणं गरजेचंच होतं. त्यामुळे आधी नर्सचं काम, मग शिलाईचं काम सुरू केलं. त्यातही भागेना तेव्हा चणे-फुटाणे विकले, मग खाणावळ, त्यातच बँकेची साफसफाईही केली. त्याच पैशातून भाचीचं...

माती घडवणारे हात…

विटा तयार करून दुसऱ्याचं घर मजबूत करणाऱ्या वीटभट्टी कामगारांना मात्र त्यांचं स्वत:चं साधं घरही बांधता येत नाही. हातावर पोट असणाऱ्यांना फक्त चिंता असते ती रोज भूक कशी भागवायची याची...

ऊस आमच्यासाठी कडूच

अंधारात माजा न्हवरा बॅटरी घिऊनशान हिरीवर पानी शेंदाया गेला. मी येक भाकरी थापली आसल नसल तेवढय़ात भावजय वरडत आली. माझा न्हवरा काळोखात हिरीत पडला व्हता.

रस्त्यावर गळतो घाम आन् रगात

ती रस्त्याचं काम करणारी बिगारी कामगार आंबुबाई. रोज उन्हातान्हांत, रस्त्यात डांबराचं काम करणार तेव्हा पैसे मिळणार, पोटाला अन्न मिळणार. दिवसा मुकादमाच्या शिव्या आणि रात्री नवऱ्याचा मार खात...

दगुड फोडतो प्वॉट जाळाया

‘‘आज बी बुत्ती बांदली आन् दगुड फोडाया निघाले. आमी सा म्हयनं घराभायर. मंग साळा नाय काय नाय. पोरंबी अशीच वाऱ्यावर!

आम्हाला दुवा कोण देणार?

ये शेठाणी हर हप्ते बेटे की नजर उतारती है। सौ रुपया देती है। दिल बडा खुष होता है। मन से दुवा देती मै उसको. जे प्रेम आईबापाने नाय दिलं

कचरा झाला जिंदगीचा!

‘रोजच्या रोज थंडी-पावसात कचराकुंडय़ा पालथ्या घालत कचऱ्यातले खिळे, कागद, काच, पत्रा गोळा करून भंगारवाल्याला विकायच्या, मिळालेल्या पैशांवर गुजारा करायचा.

आधार फक्त पाटीतल्या भाजीचा

पालिकेची नजर चुकवत रस्त्यावर भाजी विकायची, त्याच्याच जिवावर म्हाताऱ्या आईची काळजी घेत स्वत:ला जगवायचं एवढंच तिचं आयुष्य आहे. भविष्याचा विचारही तिचा थरकाप उडवतो. भाजीची पाटीच तिला सोबत करते.

पटरीवरचं धावणं

घरातल्याचं पोट भरायचं तर रेल्वेतल्या पोलिसांचा ससेमिरा चुकवायचा, डब्यातल्या बायकांच्या शिव्या खायच्या, जे काय १००-२०० रुपये मिळतील त्यातच आयुष्य घालवायचं.

रिक्षावाल्या मॅडम

मुलांना चांगलं आयुष्य , शिक्षण मिळावं म्हणून उषा इंगळे रिक्षा चालवतात. दहा-दहा तास खाचखळग्यांच्या रस्त्यांवरून रिक्षा चालवणं हाडं खिळखिळं करणारं असतं,

भोगले जे दु:ख त्याला – घाणीतच जगायचं नि घाणीतच मरायचं?

सार्वजनिक संडास साफ करणं हे तिचं काम. रोजच्या रोज येणारे असहय़ अनुभव सहन करायला तिला ताकद मिळते ती 'कशासाठी पोटासाठी' या मंत्राची. वाचतानाही अंगावर काटा येणारे अनुभव तिला रोज

भोगले जे दु:खं त्याला : एक गलती खेल खतम..

रात्रीचे साडेअकरा वाजलेत. गाडीत माल भरून विजापूरच्या धाब्यावर जेवण आटोपून ट्रककडे निघाले, तेव्हा खाटल्यावर बसलेल्या दोघा-तिघा ट्रक ड्रायव्हर्सनी एकमेकांना केलेले इशारे माझ्या नजरेने अचूक हेरले.

Just Now!
X