यशस्वी होण्यासाठी कोणत्याही प्रकल्पाची सुरुवात आजच करा. त्यासाठी वाट बघत राहिलात तर ती प्रतीक्षा अनेकदा न संपणारी असते.  बेंजामिन स्टीनच्या म्हणण्यानुसार- ‘‘अयशस्वी माणूस आपल्या जीवनाविषयी स्वत:शीच खोटे बोलत असतो.’’

कल्पनाकडे आयुष्यातील मोठमोठय़ा सिद्धी मिळविण्याच्या वेगवेगळ्या योजना होत्या. व्यवस्थापनाविषयी एक पुस्तक लिहून, प्रसिद्ध शिक्षक बनून मुलांसाठी ती एक प्रकल्प सुरू करणार होती. आपण काही तरी मोठे कार्य सुरू करावे असेही तिला वाटत होते. मात्र वयाच्या सत्तावन्न वर्षांपर्यंत तिचे एकही स्वप्न साकार होऊ शकले नव्हते. हल्ली तिच्यात निराशेची भावना डोकावू लागली होती, परिणामी चेहऱ्यावर म्हातारपणाच्या खुणा दिसू लागल्या होत्या. यशस्वी होण्यासाठी कोणत्याही प्रकल्पाची सुरुवात आजच करा. त्यासाठी वाट बघत राहिलात तर ती प्रतीक्षा अनेकदा न संपणारी असते. मग कल्पनासारखे म्हातारपण वेळेआधीच येते.

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
Loksatta career article about A career in singing
चौकट मोडताना: गोड गळय़ाच्या मल्हारचे बाबा

एका छोटय़ा उद्योजकाने ठरवले की, एक अब्ज रुपये साठविण्याचे माझे ध्येय आहे. इतके पैसे साठविले की मी सुरक्षित होईन आणि नंतर किरकोळ व्यापारात मग्न होईन. पण ते साठवण्यापूर्वीच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याचे स्वप्न अर्धवट राहिले. हे उदाहरण देत एक प्रसिद्ध विशेषज्ञ म्हणतात, ‘‘थडग्यात यशस्वी होण्याचे हे एक उदाहरण आहे.’’ बरेचसे लोक आयुष्यात काही मिळविण्यासाठी मनाच्या सामर्थ्यांचा सदुपयोग करीत नाहीत. ते शारीरिक व्याधीचे कारण पुढे करतात. या कारणामुळे कोणतेही मोठे कार्य करण्यापासून ते वंचित राहतात. त्या छोटय़ा उद्योजकाप्रमाणे बऱ्याच रुग्णांच्या मनात असे विचार येतात की, ‘जर मला काही त्रास नसेल तरच मी आयुष्यात काही तरी मोठे कार्य करू शकतो; परंतु या आजारामुळे माझ्या हातून काहीच होत नाही.’ बेंजामिन स्टीनच्या म्हणण्यानुसार- ‘‘अयशस्वी माणूस आपल्या जीवनाविषयी स्वत:शीच खोटे बोलत असतो.’’

धोका पत्करण्याचे महत्त्व

प्रत्येकास हे माहीत असते की, जहाज बंदरात सुरक्षित असते; परंतु जहाज निर्माण करून पूर्ण झाले की त्याला फार दिवस बंदरात नुसते उभे करता येत नाही. कारण असे करण्याने जहाजाच्या निर्मितीचा हेतूच मुळात नाहीसा होईल. सुप्रसिद्ध फ्रेंच नाटककार पियरी कोरनीलेने धोका पत्कारण्याबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे की, ‘‘धोका न पत्करता यशस्वी होणे म्हणजे जिंकूनही यश न मिळण्यासारखे आहे.’’ लोकांच्या अपयशाचे कारण अज्ञान हे नसून साहसाची कमतरता हे आहे.

संगतीचे महत्त्व

आपल्या ध्येयानुसार आपले मित्र ठेवा. तसेच किमान दहा अशा लोकांबरोबर संपर्कात राहा, जे तुमच्या ध्येयाशी निगडित विषयात तज्ज्ञ असतील. जर आपण यशस्वी उद्योजक बनू इच्छित असाल तर देशातील दहा उच्च कोटीच्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. जर तसे शक्य नसेल तर त्यांचे जीवनमान, उद्योगाच्या पद्धती, मूल्ये इत्यादीबद्दल वाचून माहिती करून घ्या. प्रतिमांकन तंत्राचा अवलंब करतेवेळी असे माना की, आपण या प्रतिष्ठित व्यापाऱ्यांबरोबरच आहात. त्यांच्या आचारविचाराने आपण प्रभावित होत आहात. जर आपण उच्चतम खेळाडू होण्याची स्वप्ने बघत असाल तर त्या क्षेत्रातील सर्वात कसबी व उत्साही खेळाडूंच्या संगतीत राहा. आपल्या भोवतालचे मित्र व इतर लोक आपण निवडलेल्या ध्येयाच्या विरोधात असू शकतात; परंतु त्यांना न जुमानता आपण आपल्या ध्येयावर ठामपणे नजर खिळवून राहा. चर्चिलने एका महत्त्वाच्या भाषणात विद्यार्थ्यांना सांगितलेल्या चार शब्दांचे सतत स्मरण ठेवा : ‘‘कधीच म्हणजे, कधीच हार मानू नका.’’

‘मी करू शकतो’ हा दृष्टिकोन

मी करू शकतो/ शकते हा विश्वास, ही वृत्ती कमाल करून दाखवू शकते. आपली कुवत किती आहे याची जराही चिंता करू नका. फक्त स्वत:बद्दल विश्वास असू द्या की आपणही हे करू शकतो. या विश्वासानेच आपल्याला सामथ्र्य येऊन आपण कोणतीही गोष्ट करू शकता. काही वर्षांपर्यंत एक मैल धावण्याची सर्वात कमी वेळाची लेखी नोंद चार मिनिटे होती. बराच काळ यापेक्षा कमी वेळात ती शर्यत पूर्ण केल्याची नोंद नव्हती. याचे कारण काय असावे? कारण हेच होते की, माणसाची सर्वाधिक योग्यता चार मिनिटांत एक मैल धावू शकणे हीच आहे, असा सर्वाचा विश्वास होता. आतापर्यंत कोणताही धावपटू यापेक्षा वेगाने धावू शकला नव्हता; परंतु एक दिवस असा उगवला की एका धावपटूने चार मिनिटांपेक्षा कमी वेळात एका मैलाचे अंतर पार केले आणि त्यानंतर अवघ्या एक महिन्यातच बऱ्याच जणांनी यापेक्षा कमी वेळात एवढे अंतर पार करण्यास सुरुवात केली. हे कसे शक्य झाले? पुन्हा एकदा विश्वासानेच हे साध्य झाले. असा विश्वास की, जर दुसरा कोणी हे अंतर पार करू शकतो तर मी त्यापेक्षा कमी वेळात तेवढेच अंतर नक्कीच पार करीन. यापूर्वी सर्वाचा असा समज होता की, हा विक्रम मोडणे माणसाला शक्य नाही. म्हणूनच दृष्टिकोनात बदल करणे अतिशय महत्त्वाचे ठरेल. महान व्यक्ती याआधी सर्वासारख्या सामान्यच असतात; परंतु एक उच्च ध्येय प्राप्त होईपर्यंत त्यांनी त्याचा पाठपुरवठा केलेला असतो. तुम्हीही स्वत:मध्ये श्रद्धा व ‘मी करू शकतो’ असा ठाम विश्वास निर्माण करा!

प्रेरणा

योग्य प्रेरणा मिळाल्यास आपले मानसिक सामथ्र्य तीन-चार पटीने वाढू शकते व आपण त्याचा योग्य उपयोग करू शकतो. सर विल्यम वॅन हॉर्ने यांनी यश मिळविण्यासाठी लागणाऱ्या उत्साहाची योग्य व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे : ‘‘ज्या व्यक्तीस काम करण्यात जोम व उत्साह वाटत नसेल तर ती व्यक्ती आपल्या कामात पाहिजे तसे यश मिळवू शकत नाही. उत्साह, जोम हा आगपेटीच्या काडीसारखा असतो. त्याला घासले असता यशाचा अग्नी प्रज्वलित होतो. उत्साह स्वत:बरोबर दुसऱ्यामध्येदेखील शक्ती निर्माण करतो आणि यशाची अनेक दालने आपल्या सर्वासाठी खुली करतो.

आव्हान

जेव्हा कोणतेही काम आपण आव्हान म्हणून स्वीकारतो तेव्हा आपले सामथ्र्य, ते काम करण्याची शक्ती नकळत वाढत जाते. जेव्हा कोणतीही परिस्थिती ‘आहे तशी’ स्वीकारली जाते तेव्हा तिला पूर्णपणे तोंड देणे मनुष्यास शक्य होत नाही; परंतु त्याच परिस्थितीला आव्हान म्हणून स्वीकारले तर तिला तोंड देणे सोपे जाते व परिणामस्वरूपी आपले मानसिक सामथ्र्यही वाढीस लागते. १९९८च्या सुरुवातीस मुंबईतील एक बहुमजली इमारत कोसळली. मातीच्या ढिगाऱ्याखालील लोकांची सुटका करण्याच्या कामात तरबेज असणाऱ्या एका तरुण समाजसेवकाने सांगितले की, बचाव कार्यात मग्न असताना माझी शक्ती पाच जणांना पुरून उरेल एवढी होती. अशा प्रसंगी शरीरात रक्त सळसळत असते. संकटकाळाला तोंड देताना पूर्ण जागृत अवस्थेसाठी दोन गोष्टींची जरुरी असते. जलदगतीने व अचूकपणे काम करण्यास तत्पर असे सक्रिय मन. कारण अशा परिस्थितीत ताबडतोब व योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता असते. शांत व दृढ मन जे सैरभैर व अस्वस्थ होणार नाही.

 (क्रमश:)

(साकेत प्रकाशनाच्या ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ – ‘तणावातून मन:शांतीकडे’ या डॉ. गिरीश पटेल लिखित आणि राजश्री खाडिलकर अनुवादित पुस्तकातील संपादित भाग.)

डॉ. गिरीश पटेल chaturang@expressindia.com