विजयालक्ष्मी शिंदे यांचा ‘बॅरिकेड्सचे मोडून पडणे’, मेघना भुस्कुटे यांनी लिहिलेला ‘वाघीण म्हणून जन्मलीस’, तर ‘जश्न – ए इन्कलाब…’ हा राही सुजाता प्रसाद पाटील यांनी लिहिलेला लेख. हे तिन्ही लेख स्त्रीजन्माच्या नवीन कहाणीला वाचकांसमोर प्रदर्शित करणारे होते. ‘स्त्री जन्मा तुझी कहाणी’ या खोटी सहानुभूती दाखविणार्‍या वाक्याने स्त्रीला घरात डांबून ठेवणारी समाजवृत्ती आजच्या सुशिक्षित ्त्रिरयांनी केव्हाच हद्दपार केली आहे. दिल्लीतील ‘जेन झी’चे आंदोलन ्त्रिरयांमधील या धाडसी बदलाचे ज्वलंत उदाहरण आहे. या आंदोलनातील मुलींचे अनुभव म्हणजे झाशीची राणी हा केवळ इतिहास नसून वर्तमान आहे याची ग्वाही देणारे आहेत. या तरुणींनी आता मागे पाहू नये व अन्यायाविरुद्ध उपसलेली तलवार कुणाच्या दडपणाखाली म्यान करू नये हीच त्यांना विनंती.-सूर्यकांत भोसले, मुलुंड

‘ना चिरा… ना पणती…’

आपली चतुरंग पुरवणी मी मनापासून वाचते. २५ जुलैचेही सगळे लेख सुंदर आहेत. अपर्णा देशपांडे यांचे सगळे लेख खूप आवडले. त्या काळात फारशा सोयीसुविधा उपलब्ध नसताना परक्या देशात जाऊन गुप्तहेर होणे व बातम्या पाठवणे एवढे सोपे नाही. अशा अनेक गुप्तहेर ्त्रिरयांची माहिती लेखांतून मिळणे ही मेजवानीच आहे. म्हणूनच सेहमत खानवरील लेखाची वाट पाहत होते, कारण ‘राजी’ चित्रपट पाहिला होता. लेख खूप आवडला. स्वत:चा जीव धोक्यात घालून आणि दोघांचे प्राण घेऊन देशासाठी कामगिरी करणे सोपे नाही. त्यासाठी उच्च कोटीचे धैर्य लागते. म्हणूनच सेहमतचा अभिमान आहेच, पण तिची अतुलनीय कामगिरी प्रसिद्ध केली त्याबद्दल मनापासून आभार. पण अशा अनेक जणी, अनेक जण असतील ज्यांची कुणालाच माहिती नाही. त्यांच्यासाठी कुठेच ‘ना चिरा… ना पणती…’ त्यांनाही नम्र अभिवादन. -उमा मोकाशी, पुणे</p>

तरुणांनी भविष्याचा विचार करावा

‘कहाण्या वृद्धाश्रमाच्या’ या लेखात वृद्धाश्रम या संकल्पनेमागचे वास्तव किती खरे आणि खोटे आहे याचे सुंदर विवेचन दिले आहे. माझ्या वाचनात सध्या एक सुंदर पुस्तक आले आहे या संदर्भात. पुस्तकाचे नाव आहे ‘पाचवा कोपरा’. हे पुस्तक प्रा. सुनंदा पाटील यांनी लिहिले आहे. सर्वांनी वाचावे असे आहे. काही वृद्ध मंडळी पैशाने स्थिरस्थावर असूनही कशी मुलांना अडचणीची होऊ लागतात. आईवडिलांकडून सर्व मिळूनही समाधानी नसतात याबद्दलचे काही अनुभव त्यात आहेत.
हे अगदी खरे की, आपण वृद्धावस्थेकडे जसजसे जातो तसतसे जास्त प्रेमाचे भुकेले होऊ लागतो, पण सध्याचे यांत्रिक होऊ लागलेले युग माणसांनासुद्धा मने नसलेली यंत्रे बनवू लागले आहे. आम्ही भावंडांनी आमच्या आईवडिलांवर ही वेळ येऊ दिली नाही. आमच्या आईवडिलांकडे पैसा-अडका, श्रीमंती यातील काहीही नव्हते, पण आम्ही त्यांची काळजी खूप निगुतीने काळजीवाहक न ठेवता घेतली. आजकाल खूप ठिकाणी वृद्धांचे करायला बळ नाही म्हणून त्यांना वृद्धाश्रमात ठेवले जाऊ लागले आहे. शिवाय त्यांना पुन्हा भेटायलासुद्धा जाणे गरजेचे समजले जात नाही. माझ्या एका मैत्रिणीने तिच्या निवृत्तीनंतरच्या सर्व पैशांनी वृद्धाश्रम उघडला आहे आणि ती तेथे राहून सर्व वृद्ध मंडळींची खूप प्रेमाने काळजी घेत आहे. या लेखातील काही संस्था मुलांचे समुपदेशन करून आणि आईवडील यांच्याशी बोलून त्या वृद्ध मंडळींना त्यांच्या मुलांकडे पाठविण्याचे उदात्त कार्य करीत आहेत याचे आदरयुक्त कौतुक वाटले.

परदेशी राहणार्‍या मुलांना तर त्यांच्या आईवडिलांच्या अंत्यविधीलासुद्धा यायला जमत नाही, का तेवढे प्रेमाचे बंध उरत नाहीत स्वदेश सोडल्यावर? हे त्यांनाच माहिती. प्रश्न हा पडतो जेव्हा ही मुले त्यांच्या आईवडिलांशी असे वागतात तेव्हा त्यांनाही या स्थितीमधून जावे लागणार आहे, याचा विचार ते कसा काय करीत नाहीत? – नीता शेरे, दहिसर