दीप्ती वीरेंद्र वारंगे
सर्वसाधारणपणे जुळी मुलं असणं म्हणजे केसांच्या बटेपासून पायांच्या नखांपर्यंत, सगळं सारखं दिसणं, त्यांचं राहाणं, आवडी-निवडी सगळं सारखं असणं. त्यांच्यात कधीच काही वेगळं असू शकत नाही, असा समज बहुतेकांचा असतो. आपल्या मनात जुळ्या व्यक्तींबद्दल जी प्रतिमा तयार झालेली असते ती बहुदा कथा, कादंबरी, मालिका, चित्रपट यामध्ये दाखवलेल्या जुळ्या व्यक्तींच्या व्यक्तिरेखांमुळे तयार झालेली असते. पण त्यांचं सारखं असणं या पलीकडे जाऊन त्यांचं अंतरंग कितीतरी खोल आणि गुंतागुंतीचं असतं. ‘जागतिक जुळी मुले दिना’च्या निमित्ताने जुळ्यांच्या अंतरंगाची ही ओळख.

मी कुणी मानस अभ्यासक नाही परंतु जुळ्यांच्या नात्यातील काही बाजू उलगडून दाखवण्याचा हा प्रयत्न आहे ज्याबद्दल फारसं बोललं जात नाही. १९८०च्या सुरुवातीच्या काळात पालकत्वाच्या दृष्टिकोनातून जुळ्या मुलांचं संगोपन आणि विकास का आणि कसा वेगळा आहे यावर अभ्यास आणि संशोधन करण्यात आलं. पुढे हे संशोधन मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून केलं गेलं. सतत एकत्र असणाऱ्या दोन व्यक्ती एकमेकांबरोबर नक्की कशा वागतात? त्यांच्या सतत बरोबर असल्याचे परिणाम काय होतात? त्याचा फायदा होतो, की ते नुकसानकारक असू शकतं? त्यांना एकमेकांबरोबर राहायला आवडतं का? तसं राहणं त्यांना बंधनकारक वाटतं का? त्या दोन व्यक्तींमध्ये एकमेकांबद्दल नकारात्मक भूमिका असते का? जेव्हा ते एकमेकांपासून वेगळे होतात तेव्हा ते कसे राहतात? वयात आल्यानंतर या दोन जुळ्या व्यक्तींच्या आयुष्यात तिसरी व्यक्ती येते तेव्हा त्या जुळ्या व्यक्तींच्या काय भावना असतात? त्यांच्यामध्ये सातत्याने तुलना केली जाते का? त्यांच्या नात्यावर परिणाम होतो का? त्यांना अवलंबून राहण्याची सवय असते का? जुळ्या व्यक्ती सतत बरोबर असतात का? जेव्हा दोघांपैकी एकाचा मृत्यू होतो, तेव्हा जिवंत असणाऱ्या जुळ्या भावंड

या संदर्भात माहिती घेतल्यावर लक्षात येतं, जुळ्या व्यक्तींचं संगोपन व जुळ्या व्यक्तींचं एकमेकांशी असलेलं नातं याचा त्यांच्या मानसिकतेवर कळत-नकळत परिणाम होतोच. मध्यंतरी जुळ्या बहिणींनी एकाच व्यक्तीशी लग्न केलं तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. महाराष्ट्रात घडलेली ही पहिलीच घटना असावी, पण जगभरात अशा अनेक जुळ्या बहिणींच्या जोड्या आहेत ज्यांनी एकाच पुरुषाशी लग्न केलं आहे अथवा एकाच पुरुषाबरोबर ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहतात. त्यापैकी ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध जुळ्या मुली अॅन आणि लुसी. ज्या अगदी डिट्टो एकसारख्या दिसतात (identical twins). त्यांनी एकाच व्यक्तीशी लग्न केलं. दक्षिण आफ्रिकेच्या प्रसिद्ध टीव्ही कलाकर ऑल्वेथु आणि ओवामी यांनीही एकाच पुरुषाशी लग्न केलं होतं. नऊ वर्षं एकत्र राहिल्यानंतर त्या बहिणींनी त्या पुरुषापासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला. आता त्या दोघी एकत्र राहतात. अॅन आणि लुसी या जुळ्या बहिणी त्यांच्या पौगंडावस्थेपर्यंत सर्वसामान्य जुळ्या व्यक्तींप्रमाणेच आयुष्य जगत होत्या, त्या एकसारखेच पण वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालायच्या. त्यांची जुळं म्हणून असलेली ओळख त्यांना आवडत होती. वडिलांशी त्यांची खूप जवळीक होती. त्या २४ वर्षांच्या असताना वडिलांचं निधन झालं. त्यामुळे भावनिकरीत्या आणखीन जवळ आल्या. लोकांकडून मिळणारं प्रेम, प्रसिद्धी त्यांना हवी होती. स्वतंत्र व्यक्ती म्हणून राहण्यापेक्षा जुळं म्हणून राहणं त्यांनी पसंत केलं असावं. यामध्ये सुरक्षिततेची भावना होती. आपण एकसारखे नसल्यास नाकारले जाऊ ही भावना त्यांच्यात निर्माण होऊन त्यांना अस्वस्थ वाटायचं. सारखेपण टिकवण्यासाठी त्यांची काहीही करण्याची तयारी असायची. ऑल्वेथु आणि ओवामी जुळ्या मुलींचं संगोपन त्यांच्या आजीनं केलं. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. दोन मुलांच्या गरजा पूर्ण करण्या

मी स्वत: जुळ्यापैकी एक आहे. माझ्या आजूबाजूच्या जुळ्या व्यक्तींचं नातं कसं आहे, त्यांच्या एकमेकांबद्दल काय भावना असतात, हे जाणून घेण्यासाठी २०२०मध्ये मी एक सर्वेक्षण केलं. सर्वेक्षणात १६८ जुळ्या व्यक्ती- सहभागी झाल्या होत्या. यामध्ये ७५ जुळ्यांच्या जोड्या होत्या. तर १८ व्यक्ती जुळ्यांपैकी एक होत्या. वय वर्ष १८ ते ६० या वयोगटांतील पुरुषआणि स्त्रियांचा यात समावेश होता.

या सर्वेक्षणातील काही ठळक मुद्दे असे – १६८ जुळ्या व्यक्तींपैकी ४९ जुळ्या व्यक्तींना स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्या कशा आहेत याबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली नाही, असं वाटतं कारण त्या कायम एकत्र असत. ३७ जुळ्या व्यक्तींना ते त्यांच्या भावंडांपेक्षा वेगळे आहेत म्हणून वाईट वाटतं. ६८ जुळ्या व्यक्तींना आपल्या जुळ्या भावंडापासून वेगळं होणं म्हणजे स्वत:ला हरवून जाण्यासारखं आहे. ४४ जुळ्या व्यक्ती आपल्या भावंडांपासून वेगळ्या राहतात, त्यांच्यामते हे योग्य नाही. ७१ जुळ्या व्यक्ती स्वत:पेक्षा अधिक काळजी आपल्या भावंडांची करतात. ४८ जुळ्या व्यक्ती भावंडांबरोबर तुलनात्मक स्पर्धा करतात. २४ जुळ्या व्यक्ती स्वत:च्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, कारण त्यांना त्यांच्या भावंडांची अधिक काळजी वाटते. ३७ जुळ्या व्यक्तींना वाटतं, त्यांचं जुळं भावंडं त्यांच्यावर वर्चस्व गाजवतं. ३४ जुळ्या व्यक्ती त्यांच्या भावंडांवर अवलंबून आहेत. १७ जुळ्या व्यक्तींना वाटतं की, त्यांचा जन्म जुळ्या व्यक्ती म्हणून झाला नसता तर बरं झालं असतं.

यावरून मला वाटतं, जुळ्या व्यक्ती आपल्या भावंडांच्या नात्याबद्दल संवेदनशील असतात. त्यांच्यात भावनिक, मानसिक गुंतवणूक ही सर्वसामान्य भावंडांपेक्षा अधिक असते. अनेक वेळा दिसून येतं, दोघांपैकी एक वर्चस्व गाजवणारा, तर एक दुसऱ्यावर अवलंबून असणारा, एक नेतृत्व करणारा तर दुसरा त्याचं अनुकरण करणारा असतो. काही परिस्थितीत दोघांना एकमेकांवर अवलंबून राहण्याची सवय होते. काही वेळा एक कायम स्वत:पेक्षा भावंडांची जास्त काळजी करणारा असतो. काही वेळा दोन्ही जुळ्या व्यक्तींना अथवा जुळ्यांपैकी एकाला ती स्वतंत्र व्यक्ती म्हणून कशी आहे, याची जाणीव होण्यास अडथळे निर्माण होतात. काही जुळ्या व्यक्तींना ते स्वतंत्र व्यक्ती म्हणून कशा आहेत याची जाणीव असते. ते त्यांचं नातं सक्षमपणे हाताळतात. एकमेकांपासून वेगळं होताना काळजी, भीती वाटणं, आपल्या भावंडांव्यतिरिक्त इतर व्यक्तींशी जुळवून घेताना आव्हानात्मक वाटणं हे त्यांच्यातील उत्कट, प्रेम, विश्वास आधार दर्शवतं.

मी जुळ्यांपैकी एक आहे, याची जाणीव नक्की कधी झाली हे स्मरणात नाही पण कळत्या वयापासून माझ्या इतर भावंडांपेक्षा माझं माझ्या बहिणीशी (डॉ. श्रुती देऊलकर)असलेलं खास नातं जाणवू लागलं. मला तिचा कायम आधार, तिच्याबरोबर अधिक सुरक्षित वाटायचं. माझ्यापेक्षा तिची अधिक काळजी घ्यायचे, अनेक प्रसंगांमध्ये मला काय वाटतं यापेक्षा तिला काय वाटतं, याचा विचार केला. तिच्यापासून वेगळं होताना भीती वाटायची, असुरक्षित वाटायचं. आमच्या नात्यात ती नेतृत्व करायची आणि मी अनुकरण. शिक्षणाच्यानिमित्ताने आमचे मार्ग वेगवेगळे झाले तेव्हा स्वतंत्र व्यक्ती म्हणून वावरताना मला अनेक आव्हानांना सामोर जावं लागलं, याचा मला मानसिक त्रासही व्हायचा. एकटं राहताना, काम करताना सतत ताण जाणवायचा, याचा माझ्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होत होता. मी मानसिक, भावनिकरीत्या आमच्या नात्यात गुंतलेले होते. या कारणाने स्वत:च्या निर्णय क्षमता, आवड-निवडींबद्दल कायमच शंका असायच्या. याच्या मुळाशी माझं जुळं असणं आहे असं वाटायचं. आपला जन्म जुळी व्यक्ती म्हणून झाला नसता तर बरंच झालं असतं असं वाटायचं. मला पडलेल्या प्रश्नांची उत्तर मला जुळ्यांच्या मानसशास्त्राबद्दल जाणून घेतल्यावर म

आम्ही ‘ fraternal twins’ म्हणजे आमचं दिसणं, वागणं वेगळं आहे. आमचं बोलणं, स्वभाव, आवड-निवड अभ्यासातील गुण याबद्दल आजूबाजूच्या लोकांनी कायम तुलनात्मक चर्चा केली, पण याचा आमच्या नात्यावर परिणाम झाला नाही. आमच्यातलं नातं कायमच विश्वासाचं, प्रेमाचं, आधाराचं राहिलं. आमच्यात टोकाचं वेगळेपण आहे, पण आजही एकमेकींसाठी काहीही करण्याची तयारी असते. कितीही मतभेत, भांडणं झाली तरी ‘तुझं-माझं जमेना तुझ्यावाचून करमेना’ असंच आहे.

प्रत्येक जुळ्यांचं नातं हे जुळ्यांच्या जोडीनुसार वेगळं असतं, कारण प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. जुळं म्हणजे एकाच वेळी जन्म घेतलेल्या दोन व्यक्ती पण त्यांच्या शारीरिक, भावनिक, मानसिक गरजा या वेगवेगळ्या असतात. जुळ्या मुलांना जुळं म्हणून स्वीकारताना त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जपणं आवश्यक असतं.

जुळ्या असूनही वेगळ्या असल्या तरी इतर भावंडांप्रमाणेच त्यांच्यातलं प्रेमाचं आणि हक्काचं नातं अतूट असतं, हे मात्र नक्की.

सर्वसाधारणपणे जुळी मुलं असणं म्हणजे केसांच्या बटेपासून पायांच्या नखांपर्यंत, सगळं सारखं दिसणं, त्यांचं राहाणं, आवडी-निवडी सगळं सारखं असणं. त्यांच्यात कधीच काही वेगळं असू शकत नाही, असा समज बहुतेकांचा असतो. आपल्या मनात जुळ्या व्यक्तींबद्दल जी प्रतिमा तयार झालेली असते ती बहुदा कथा, कादंबरी, मालिका, चित्रपट यामध्ये दाखवलेल्या जुळ्या व्यक्तींच्या व्यक्तिरेखांमुळे तयार झालेली असते. पण त्यांचं सारखं असणं या पलीकडे जाऊन त्यांचं अंतरंग कितीतरी खोल आणि गुंतागुंतीचं असतं. ‘जागतिक जुळी मुले दिना’च्या निमित्ताने जुळ्यांच्या अंतरंगाची ही ओळख.

मी कुणी मानस अभ्यासक नाही परंतु जुळ्यांच्या नात्यातील काही बाजू उलगडून दाखवण्याचा हा प्रयत्न आहे ज्याबद्दल फारसं बोललं जात नाही. १९८०च्या सुरुवातीच्या काळात पालकत्वाच्या दृष्टिकोनातून जुळ्या मुलांचं संगोपन आणि विकास का आणि कसा वेगळा आहे यावर अभ्यास आणि संशोधन करण्यात आलं. पुढे हे संशोधन मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून केलं गेलं. सतत एकत्र असणाऱ्या दोन व्यक्ती एकमेकांबरोबर नक्की कशा वागतात? त्यांच्या सतत बरोबर असल्याचे परिणाम काय होतात? त्याचा फायदा होतो, की ते नुकसानकारक असू शकतं? त्यांना एकमेकांबरोबर राहायला आवडतं का? तसं राहणं त्यांना बंधनकारक वाटतं का? त्या दोन व्यक्तींमध्ये एकमेकांबद्दल नकारात्मक भूमिका असते का? जेव्हा ते एकमेकांपासून वेगळे होतात तेव्हा ते कसे राहतात? वयात आल्यानंतर या दोन जुळ्या व्यक्तींच्या आयुष्यात तिसरी व्यक्ती येते तेव्हा त्या जुळ्या व्यक्तींच्या काय भावना असतात? त्यांच्यामध्ये सातत्याने तुलना केली जाते का? त्यांच्या नात्यावर परिणाम होतो का? त्यांना अवलंबून राहण्याची सवय असते का? जुळ्या व्यक्ती सतत बरोबर असतात का? जेव्हा दोघांपैकी एकाचा मृत्यू होतो, तेव्हा जिवंत असणाऱ्या जुळ्या भावंड

या संदर्भात माहिती घेतल्यावर लक्षात येतं, जुळ्या व्यक्तींचं संगोपन व जुळ्या व्यक्तींचं एकमेकांशी असलेलं नातं याचा त्यांच्या मानसिकतेवर कळत-नकळत परिणाम होतोच. मध्यंतरी जुळ्या बहिणींनी एकाच व्यक्तीशी लग्न केलं तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. महाराष्ट्रात घडलेली ही पहिलीच घटना असावी, पण जगभरात अशा अनेक जुळ्या बहिणींच्या जोड्या आहेत ज्यांनी एकाच पुरुषाशी लग्न केलं आहे अथवा एकाच पुरुषाबरोबर ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहतात. त्यापैकी ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध जुळ्या मुली अॅन आणि लुसी. ज्या अगदी डिट्टो एकसारख्या दिसतात (identical twins). त्यांनी एकाच व्यक्तीशी लग्न केलं. दक्षिण आफ्रिकेच्या प्रसिद्ध टीव्ही कलाकर ऑल्वेथु आणि ओवामी यांनीही एकाच पुरुषाशी लग्न केलं होतं. नऊ वर्षं एकत्र राहिल्यानंतर त्या बहिणींनी त्या पुरुषापासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला. आता त्या दोघी एकत्र राहतात. अॅन आणि लुसी या जुळ्या बहिणी त्यांच्या पौगंडावस्थेपर्यंत सर्वसामान्य जुळ्या व्यक्तींप्रमाणेच आयुष्य जगत होत्या, त्या एकसारखेच पण वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालायच्या. त्यांची जुळं म्हणून असलेली ओळख त्यांना आवडत होती. वडिलांशी त्यांची खूप जवळीक होती. त्या २४ वर्षांच्या असताना वडिलांचं निधन झालं. त्यामुळे भावनिकरीत्या आणखीन जवळ आल्या. लोकांकडून मिळणारं प्रेम, प्रसिद्धी त्यांना हवी होती. स्वतंत्र व्यक्ती म्हणून राहण्यापेक्षा जुळं म्हणून राहणं त्यांनी पसंत केलं असावं. यामध्ये सुरक्षिततेची भावना होती. आपण एकसारखे नसल्यास नाकारले जाऊ ही भावना त्यांच्यात निर्माण होऊन त्यांना अस्वस्थ वाटायचं. सारखेपण टिकवण्यासाठी त्यांची काहीही करण्याची तयारी असायची. ऑल्वेथु आणि ओवामी जुळ्या मुलींचं संगोपन त्यांच्या आजीनं केलं. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. दोन मुलांच्या गरजा पूर्ण करण्यास ती सक्षम नव्हती. एक वस्तू विभागून वापरायची सवय या मुलींना लागली. त्या जे काही करायच्या ते एकत्रितपणे. अनेक वर्षं त्या अशा पद्धतीचं आयुष्य जगत होत्या. पुढे त्यांनी लग्नही एकाच पुरुषाशी करण्याचा निर्णय घेतला.

मी स्वत: जुळ्यापैकी एक आहे. माझ्या आजूबाजूच्या जुळ्या व्यक्तींचं नातं कसं आहे, त्यांच्या एकमेकांबद्दल काय भावना असतात, हे जाणून घेण्यासाठी २०२०मध्ये मी एक सर्वेक्षण केलं. सर्वेक्षणात १६८ जुळ्या व्यक्ती- सहभागी झाल्या होत्या. यामध्ये ७५ जुळ्यांच्या जोड्या होत्या. तर १८ व्यक्ती जुळ्यांपैकी एक होत्या. वय वर्ष १८ ते ६० या वयोगटांतील पुरुषआणि स्त्रियांचा यात समावेश होता.

या सर्वेक्षणातील काही ठळक मुद्दे असे – १६८ जुळ्या व्यक्तींपैकी ४९ जुळ्या व्यक्तींना स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्या कशा आहेत याबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली नाही, असं वाटतं कारण त्या कायम एकत्र असत. ३७ जुळ्या व्यक्तींना ते त्यांच्या भावंडांपेक्षा वेगळे आहेत म्हणून वाईट वाटतं. ६८ जुळ्या व्यक्तींना आपल्या जुळ्या भावंडापासून वेगळं होणं म्हणजे स्वत:ला हरवून जाण्यासारखं आहे. ४४ जुळ्या व्यक्ती आपल्या भावंडांपासून वेगळ्या राहतात, त्यांच्यामते हे योग्य नाही. ७१ जुळ्या व्यक्ती स्वत:पेक्षा अधिक काळजी आपल्या भावंडांची करतात. ४८ जुळ्या व्यक्ती भावंडांबरोबर तुलनात्मक स्पर्धा करतात. २४ जुळ्या व्यक्ती स्वत:च्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, कारण त्यांना त्यांच्या भावंडांची अधिक काळजी वाटते. ३७ जुळ्या व्यक्तींना वाटतं, त्यांचं जुळं भावंडं त्यांच्यावर वर्चस्व गाजवतं. ३४ जुळ्या व्यक्ती त्यांच्या भावंडांवर अवलंबून आहेत. १७ जुळ्या व्यक्तींना वाटतं की, त्यांचा जन्म जुळ्या व्यक्ती म्हणून झाला नसता तर बरं झालं असतं.

यावरून मला वाटतं, जुळ्या व्यक्ती आपल्या भावंडांच्या नात्याबद्दल संवेदनशील असतात. त्यांच्यात भावनिक, मानसिक गुंतवणूक ही सर्वसामान्य भावंडांपेक्षा अधिक असते. अनेक वेळा दिसून येतं, दोघांपैकी एक वर्चस्व गाजवणारा, तर एक दुसऱ्यावर अवलंबून असणारा, एक नेतृत्व करणारा तर दुसरा त्याचं अनुकरण करणारा असतो. काही परिस्थितीत दोघांना एकमेकांवर अवलंबून राहण्याची सवय होते. काही वेळा एक कायम स्वत:पेक्षा भावंडांची जास्त काळजी करणारा असतो. काही वेळा दोन्ही जुळ्या व्यक्तींना अथवा जुळ्यांपैकी एकाला ती स्वतंत्र व्यक्ती म्हणून कशी आहे, याची जाणीव होण्यास अडथळे निर्माण होतात. काही जुळ्या व्यक्तींना ते स्वतंत्र व्यक्ती म्हणून कशा आहेत याची जाणीव असते. ते त्यांचं नातं सक्षमपणे हाताळतात. एकमेकांपासून वेगळं होताना काळजी, भीती वाटणं, आपल्या भावंडांव्यतिरिक्त इतर व्यक्तींशी जुळवून घेताना आव्हानात्मक वाटणं हे त्यांच्यातील उत्कट, प्रेम, विश्वास आधार दर्शवतं.

मी जुळ्यांपैकी एक आहे, याची जाणीव नक्की कधी झाली हे स्मरणात नाही पण कळत्या वयापासून माझ्या इतर भावंडांपेक्षा माझं माझ्या बहिणीशी (डॉ. श्रुती देऊलकर)असलेलं खास नातं जाणवू लागलं. मला तिचा कायम आधार, तिच्याबरोबर अधिक सुरक्षित वाटायचं. माझ्यापेक्षा तिची अधिक काळजी घ्यायचे, अनेक प्रसंगांमध्ये मला काय वाटतं यापेक्षा तिला काय वाटतं, याचा विचार केला. तिच्यापासून वेगळं होताना भीती वाटायची, असुरक्षित वाटायचं. आमच्या नात्यात ती नेतृत्व करायची आणि मी अनुकरण. शिक्षणाच्यानिमित्ताने आमचे मार्ग वेगवेगळे झाले तेव्हा स्वतंत्र व्यक्ती म्हणून वावरताना मला अनेक आव्हानांना सामोर जावं लागलं, याचा मला मानसिक त्रासही व्हायचा. एकटं राहताना, काम करताना सतत ताण जाणवायचा, याचा माझ्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होत होता. मी मानसिक, भावनिकरीत्या आमच्या नात्यात गुंतलेले होते. या कारणाने स्वत:च्या निर्णय क्षमता, आवड-निवडींबद्दल कायमच शंका असायच्या. याच्या मुळाशी माझं जुळं असणं आहे असं वाटायचं. आपला जन्म जुळी व्यक्ती म्हणून झाला नसता तर बरंच झालं असतं असं वाटायचं.मला पडलेल्या प्रश्नांची उत्तर मला जुळ्यांच्या मानसशास्त्राबद्दल जाणून घेतल्यावर मिळत गेली. स्वत:च्या भावभावना सक्षमपणे हाताळायला मदत झाली, स्वत:ला आहे तसं स्वीकारता आलं आणि आता स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याचा आनंद घेता येतो.

आम्ही ‘ fraternal twins’ म्हणजे आमचं दिसणं, वागणं वेगळं आहे. आमचं बोलणं, स्वभाव, आवड-निवड अभ्यासातील गुण याबद्दल आजूबाजूच्या लोकांनी कायम तुलनात्मक चर्चा केली, पण याचा आमच्या नात्यावर परिणाम झाला नाही. आमच्यातलं नातं कायमच विश्वासाचं, प्रेमाचं, आधाराचं राहिलं. आमच्यात टोकाचं वेगळेपण आहे, पण आजही एकमेकींसाठी काहीही करण्याची तयारी असते. कितीही मतभेत, भांडणं झाली तरी ‘तुझं-माझं जमेना तुझ्यावाचून करमेना’ असंच आहे.

प्रत्येक जुळ्यांचं नातं हे जुळ्यांच्या जोडीनुसार वेगळं असतं, कारण प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. जुळं म्हणजे एकाच वेळी जन्म घेतलेल्या दोन व्यक्ती पण त्यांच्या शारीरिक, भावनिक, मानसिक गरजा या वेगवेगळ्या असतात. जुळ्या मुलांना जुळं म्हणून स्वीकारताना त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जपणं आवश्यक असतं.

जुळ्या असूनही वेगळ्या असल्या तरी इतर भावंडांप्रमाणेच त्यांच्यातलं प्रेमाचं आणि हक्काचं नातं अतूट असतं, हे मात्र नक्की.

दीप्ती वीरेंद्र वारंगे

warangedipti@gmail.com

जुळ्यांचे अतूट बंध

मी आणि दीप्ती जुळ्या बहिणी. खरं तर जुळं असणं म्हणजे मानसिकदृष्ट्या गुंतागुंतीचं प्रकरण. जन्मलेल्या बाळांसाठी व विशेषत: त्यांच्या आईवडिलांसाठी तर अग्निपरीक्षा. मला आठवतं आजी सांगायची, ‘‘दोघी एवढ्या कृश व वितभर हाताच्या होत्या की एकीला एका आणि दुसरीला दुसऱ्या मांडीवर सहज ठेवता येत असे.’’ दीप्ती कमालीची शिस्तप्रिय, नीटनेटकी. मी कमालीची बिनधास्त, हलगर्जी. ‘‘शाळेतलं सगळं आईला का सांगतेस?’’ म्हणून आमची भांडणं व्हायची.

जुळे जसजसे मोठे होऊ लागतात, तसतसं त्यांचं आयुष्य खूप किचकट होत जातं. नकळतरीत्या घरातून, शाळेतून, आजूबाजूच्या सामाजिक चष्म्यातून सतत होणारी तुलना हे त्यांचं मूळ कारण असावं. दोन जुळी मग ती Identical असोत अथवा Fraternal, पण नैसर्गिकरीत्या ही दोन वेगवेगळी व्यक्तिमत्त्वे असतात. दोन भिन्न शरीरं, भिन्न प्रकृती, वृत्ती त्यांना सतत तुलनेच्या तराजूत तोललं जातं.

वैद्याकशास्त्रानुसार, तुम्ही जुळे असलात तरी काहीतरी वेगळेपण, वेगळा बंध असतोच. तो मनानं, भावनेनं, विचारानं दोन भिन्न व्यक्तींना त्यांच्या वेगवेगळ्या कठीण व अवघड वळणावर घट्ट बांधून ठेवतो. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. शाळेत असताना कचाकचा भांडणाऱ्या, एकमेकींना बोचकारणाऱ्या आम्ही आता एकमेकींशी फोनवर बोलताना नुसतं ‘हॅलो’ म्हटलं तरी एकमेकींचा मूड ओळखतो. एकमेकींचे विचार पटत नाहीत, पण काळानुसार एकमेकींना समजून घेतो आणि काही झालं तरी ‘मी आहे तुझ्यासाठी’ हे कृतीतून आता जास्त प्रगल्भ झालंय. कधी कधी एकटं वाटून रडत असताना दीप्तीचा अचानक फोन येतो व मला माझी हक्काची जुळी बहीण माझ्या रडवेल्या मूडमधून (आईला न कळता) अलगद बाहेर काढते. यापेक्षा मोठा आधार असूच शकत नाही.

-डॉ. श्रुती देऊलकर