४ ऑक्टोबर १९५७ रोजी सोव्हिएत युनियनने ‘स्पुतनिक १’ या पहिल्या मानवनिर्मित कृत्रिम उपग्रहाचं प्रक्षेपण केलं आणि अवकाशयुगाला खर्या अर्थानं सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर अवकाश संशोधनाला चालना देण्यासाठी, सहकार्य आणि सामूहिक प्रगतीची वाट धरण्यासाठी, एका अराजकीय, जागतिक मंचाची आवश्यकता लक्षात घेऊन ३ ऑक्टोबर १९५८ रोजी ‘इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स युनियन’ (आताचं ‘इंटरनॅशनल सायन्स काउन्सिल’) या आंतरराष्ट्रीय संस्थेनं ‘ उडरढअफ’ (कमिटी ऑन स्पेस रिसर्च)ची स्थापना केली. शीतयुद्धाच्या काळात देशांमध्ये सहकार्याची भावना वृद्धिंगत करणं हा या समितीच्या स्थापनेमागचा उद्देश होता. यामध्ये सहभागी देशांची सभा १९७९ पर्यंत दरवर्षी एका मोठ्या वार्षिक परिषदेच्या रूपात होत असे. पुढे मात्र दर दोन वर्षांनी ही परिषद वेगवेगळ्या सहभागी देशांमध्ये होऊ लागली. २०२६ मध्ये परिषदेची ४६वी आवृत्ती नुकतीच १ ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान युरोपातील इटलीमधील फ्लोरेन्स शहरात आयोजित करण्यात आली होती. सोमवारी, ३ ऑगस्ट रोजी सर्व भारतीयांना अभिमान वाटेल अशी घटना या परिषदेमध्ये घडली.
भारतीय अवकाश विज्ञान कार्यक्रमाचे पिता म्हणून ओळखले जाणारे डॉ. विक्रम साराभाई यांच्या स्मरणार्थ ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ (इसरो) आणि ‘कमिटी ऑन स्पेस रिसर्च’ (उडरढअफ) यांनी संयुक्त विद्यमाने ‘ उडरढअफ विक्रम साराभाई पदक’ पुरस्काराची घोषणा १९९० मध्ये केली. विकसित देशांतील अवकाश विज्ञान कार्यक्रमाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणार्या वैज्ञानिकांना हा पुरस्कार दर दोन वर्षांच्या अंतराने प्रदान करण्यात येतो. २०२६ पूर्वी हा पुरस्कार प्राप्त करणार्या आंतरराष्ट्रीय नावांच्या यादीत डॉ. यू. आर. राव (१९९६), डॉ. गुरुबक्ष सिंग लखीना (२०१४) आणि डॉ. अनिल भारद्वाज (२०२४) या तीन भारतीय व्यक्तींचा समावेश होता. आनंदाची बाब अशी की, २०२४ मध्ये डॉ. भारद्वाज यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर लगेच २०२६ मधील पुरस्कारही एका भारतीय व्यक्तीला मिळाला आहे. इतकंच नाही तर २०२६ मधील हा पुरस्कार प्राप्त करणारी ही व्यक्ती जागतिक स्तरावर तिसरी स्त्री आणि पहिली भारतीय स्त्री ठरली आहे.
त्याआहेत, डॉ. अन्नपूर्णी सुब्रमणियम. केरळमधील पलक्कड येथे अन्नपूर्णी यांचा जन्म झाला आणि तिथेच बालपण गेलं. त्यांचे आईवडील दोघेही संगीतसाधना करत. कर्नाटकी शास्त्रीय संगीत सादर करणार्या आपल्या पालकांकडून संगीतसाधनेचा त्यांना वारसा मिळाला. त्या फार सुरेख व्हायोलिन वाजवत. आपल्या वडिलांना सादरीकरणात सोबत म्हणून व्हायोलिनवादन करण्यासाठी त्या हमखास जात. पलक्कडचे भौगोलिक स्थान आणि तेथील वातावरण लक्षात घेता केरळ राज्यातील काही सर्वाधिक उष्ण वातावरण असणार्या प्रदेशांपैकी ते एक शहर. तेथील असह्य उष्णतेमुळे अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून छोट्या अन्नपूर्णीने यावर एक तोडगा काढला.
रात्रीच्या प्रहरी किंवा पहाटे जेव्हा सूर्य आग ओकत नसतो, वातावरण थंड आणि शांत असतं अशा वेळी त्या अभ्यास करायच्या. त्या वेळी आकाशातील लुकलुकणारे तारे त्यांना सोबत करायचे. शीतल प्रकाश देणार्या या खगोलांविषयी त्यांना त्या वयात खूप कुतूहल वाटायचं. पण त्याविषयी प्रश्न विचारता येतील, चर्चा करता येईल असं कुणीच त्यांच्या अवतीभोवती नव्हतं. ते कुतूहल शमवण्यासाठी त्या वाचनालयामध्ये जाऊन वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध होणारी तारे व नक्षत्रांच्या माहितीची कात्रणं घरी आणण्याची परवानगी मिळवण्यासाठी धडपडायच्या. परवानगी मिळाली की मग रात्रभर त्या कात्रणांच्या मदतीनं आकाशातील नक्षत्रं ओळखण्याचा प्रयत्न करायच्या.
आईवडिलांचा सांगीतिक वारसा पुढे नेऊन त्यात करिअर करण्याचा विचार अन्नपूर्णी यांच्या मनात अनेक वेळा डोकावला तरी प्रत्येक वेळी विज्ञानप्रेमामुळे, आकाशातील तार्यांविषयी आणि अज्ञाताचा शोध घेण्यासाठी असणार्या कुतूहलामुळे त्या कायमच्या विज्ञानाकडे परतल्या. भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्या संशोधनाकडे कशा वळल्या ही गोष्ट रंजक आहे. पदव्युत्तर शिक्षणानंतर आता पुढे काय, हा विचार करत असताना त्यांना शिक्षकी पेशा स्वीकारण्याचा पर्याय दिसत होता, पण हा पर्याय त्यांना पुरेसा आकर्षित करत नसल्यामुळे त्यांनी या विचाराला डावलून आपल्या लहानपणीच्या आवडीच्या विषयात म्हणजेच खगोलशास्त्र विषयात पीएच.डी. करायचं ठरवलं.
आपली मुलगी तार्यांचा अभ्यास करणार आहे असं समजल्यावर ती तिचं पुढचं आयुष्य अडनिड्या गावातील दूरच्या कुठल्या तरी वेधशाळेमध्ये रात्री जागवत काढेल या विचाराने भांबावलेल्या त्यांच्या आईने त्यांना ‘‘त्यापेक्षा तू सूर्याचा अभ्यास का बरं करत नाहीस? तो दिवसाउजेडी दिसतोसुद्धा.’’ असा निरागस सल्ला दिल्याचं त्या हसत सांगतात. १९९० मध्ये जेव्हा त्यांनी खगोल भौतिकशास्त्रासारख्या नव्या विषयात संशोधन करायचं ठरवलं तेव्हा हे क्षेत्र प्रसिद्ध नव्हतं.
पुढे जाऊन या क्षेत्रात उपलब्ध संधी काय असतील याची फारशी कल्पनाही तेव्हा नव्हती. या क्षेत्राला आता आहे तशी मागणीही नव्हती. अशा वेळी केवळ विषयावर असणारं प्रेम, स्वत:वरील विश्वास आणि शोध घेण्याची वृत्त्ती या जोरावर त्यांनी या क्षेत्रात ठेवलेलं पाऊल म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखंच होतं. अर्थात अशा वेळी ‘‘हे क्षेत्र मला आनंद देतं म्हणून मला इथे काम करायचं आहे आणि तेच या क्षेत्रात काम करत राहण्यासाठी पुरेसं कारण आहे हे आधी स्वत:ला पटवून द्यायला हवं आणि त्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाच्या असणार्या मोजक्या माणसांना. त्यापलीकडे इतर लोक आपल्या कामाविषयी काय विचार करतात याने आपल्याला मुळीच फरक पडत कामा नये,’’ असं त्या आवर्जून अधोरेखित करतात.
बंगळूरुच्या ‘इंडियन इ्स्टिटट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स’मधून पीएच.डी. करत असतानाच त्यांचं लग्न झालं. आपल्या या क्षेत्राच्या करिअर निवडीविषयी स्पष्टीकरण द्यावं न लागलेली एकमेव व्यक्ती आपल्याला भेटली, असं त्या मिश्कीलपणे सांगतात. लहानपणी स्वच्छ आकाशात उघड्या डोळ्यांनी दिसणारी आकाशगंगा पाहून अन्नपूर्णी यांचं अवकाशाचा अभ्यास करण्याचं स्वप्नं दृढ झालं होतं. अन्नपूर्णी यांनी ‘भारतीय खगोल भौतिकी’ संस्थेत तारकासमूह (स्टार क्लस्टर्स) आणि मॅगेलॅनिक क्लाउड्स (आकाशगंगेभोवती फिरणार्या दोन लघु आकाशगंगा) यांचा अभ्यास केला. तार्यांचं जीवनचक्र समजून घेण्यासाठी त्यांचं संशोधन कार्य मोलाची भूमिका बजावतं.
‘ॲस्ट्रोसॅट’ या अवकाश कार्यक्रमातील त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या अनुभवाच्या पायावर त्या सध्या कठरकरळ (कल्ल्रिंल्ल रस्र्ीू३१ः२ूःस्र्रू ंल्लि केंॠ्रल्लॠ रस्र्ंूी ळी’ी२ूःस्र्ी) या प्रकल्पाच्या प्रमुख संशोधक म्हणून कार्यरत आहेत. कठरकरळ हा भारताचा प्रस्तावित भविष्यवेधी अल्ट्राव्हायोलेट-ऑप्टिकल अवकाश टेलिस्कोप आहे. प्रोफेसर सुब्रमणियम यांनी ळँ्र१३८ टी३१ी ळी’ी२ूःस्र्ी ( ळटळ) प्रकल्पातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ळटळ हा जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय सहकार्य प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पात भारत सहभागी देशांपैकी एक आहे, आणि भारतीय खगोलभौतिकी संस्था ( कल्ल्रिंल्ल कल्ल२३्र३४३ी ःऋ अ२३१ःस्र्ँ८२्रू२) ही भारताची समन्वयक केंद्र म्हणून काम पाहत आहे. ‘इंडियन इ्स्टिटट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स’ येथे पीएच.डी.साठी दाखल झालेल्या डॉ. अन्नपूर्णी २०१९ मध्ये त्याच संस्थेच्या पहिल्या स्त्री संचालक म्हणून नियुक्त झाल्या. त्यांच्या योगदानामुळे संस्थेच्या अध्यक्षपदी तब्बल दोन वेळा त्यांची निवड झाली आणि संस्थेसोबतचे त्यांचे ऋणानुबंध अधिक घट्ट झाले.
एक संशोधिका म्हणून तसेच क्षेत्रातील नेतृत्व म्हणून कार्यरत असताना स्त्री म्हणून आपण आपल्या गरजा, अपेक्षा स्पष्टपणे मांडणं, आपल्या मर्यादा आणि सीमा न्यूनगंड न मानता ठरवणं या जोडीनेच आपल्याला काय स्वीकारार्ह नाही याची यादी स्पष्ट करणंसुद्धा तितकंच आवश्यक असल्याचं त्या म्हणतात. आपण सगळंच करू शकत नाही हे स्वीकारणं ही या प्रवासाची पहिली पायरी आहे. अशा नियमांची आखणी करणं म्हणजे केवळ स्वप्रेम नाही तर आपल्या कुटुंबाला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणंसुद्धा आहे असं त्या सांगतात. त्यासाठी त्या आपल्या आयुष्यातील एक लहानसं उदाहरण देतात. त्यांच्या घरी प्रत्येक जण स्वत:ची न्याहरी स्वत: तयार करतं. यामुळे प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव असते. प्रत्येक जण एकमेकांना मदत करतं आणि एकमेकांच्या कामाचा आदर यातून आणखी घट्ट होतो तर अवांतर अपेक्षा कमी होतात. यामुळे प्रवास करताना, आपल्या करिअरला, संशोधनाला प्राधान्य द्यायला घरातील स्त्रीला कमीपणा वाटत नाही. त्यांचा खगोलशास्त्रातला एकूणच यशस्वी प्रवास म्हणजे केवळ स्वत:ला ओळखणं नव्हे, तर आपल्या गरजा स्पष्टपणे मांडण्याचं धैर्य दाखवणं आणि अधिक समानता व समजूतदार समाजासाठी प्रयत्न करणं, भूमिका घेणं याचं प्रेरणादायी उदाहरण आहे.
‘ॲस्ट्रोसॅट’ या अवकाश कार्यक्रमातील डॉ. अन्नपूर्णी यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या अनुभवाच्या पायावर त्या सध्या INSIST (Indian Spectroscopic and Imaging Space Telescope या प्रकल्पाच्या प्रमुख संशोधक म्हणून कार्यरत आहेत. कठरकरळ हा भारताचा प्रस्तावित भविष्यवेधी अल्ट्राव्हायोलेट-ऑप्टिकल अवकाश टेलिस्कोप आहे. प्रोफेसर सुब्रमणियम यांनी Thirty Metre Telescope ( TMT) प्रकल्पातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ळटळ हा जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र सहकार्य प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पात भारत सहभागी देशांपैकी एक आहे, आणि भारतीय खगोलभौतिकी संस्था (Indian Institute of Astrophysics) ही भारताची समन्वयक केंद्र म्हणून काम पाहत आहे. ‘इंडियन इ्स्टिटट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स’ येथे पीएच.डी.साठी दाखल झालेल्या डॉ. अन्नपूर्णी २०१९ मध्ये याच संस्थेच्या पहिल्या स्त्री संचालक म्हणून नियुक्त झाल्या.
डॉ. अन्नपूर्णी यांनी ‘भारतीय खगोल भौतिकी’ संस्थेत तारकासमूह (स्टार क्लस्टर्स) आणि मॅगेलॅनिक क्लाउड्स (आकाशगंगेभोवती फिरणार्या दोन लघु आकाशगंगा) यांचा अभ्यास केला. तार्यांचं जीवनचक्र समजून घेण्यासाठी त्यांचं संशोधन महत्त्वाची भूमिका बजावतं.
u postcardsfromruchira@gmail.com
