डॉ. नरेंद्र जाधव drnarendra.jadhav@gmail.com

पार भरकटल्याशिवाय, तद्दन गाढवपणाकेल्याशिवाय आयुष्यात टर्निग पॉइंटयेत नाही, असे मला वाटते. पण अशा सावरण्यासाठी योग्य ती दिशा मात्र मिळायला हवी. माझ्या बाबतीत ही स्थिती वयाच्या पंचविशीच्या बरीच आधी आली आणि मला माझा टर्निग पॉइंटसापडला, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या वाचनात. त्यांच्या प्रेरणेने मी सतत माझी कु वत पारखून पाहू लागलो. अभ्यास आणि संशोधनाचा ध्यास लागला आणि  माझ्या आयुष्याची गाडी आडवळणे घेत का होईना, पुन्हा रुळावर आली.  गद्धेपंचविशीमध्ये मिळालेल्या शहाणिवेने माझे अवघे आयुष्य समृद्ध केले.  

Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..
nashik bjp marathi news, pravin darekar marathi news
“मोदी द्वेष हेच महाविकास आघाडीचे सूत्र”, प्रवीण दरेकर यांची टीका
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !

गाढव हे मूर्खपणाचे प्रतीक! प्रत्येक बाप आपल्या मुलाला कधी ना कधी गाढव म्हणत आला आहे. पंचविशीत जोश जास्त, पण ‘होश’ कमी असल्यामुळे प्रत्येक जण काही प्रमाणात ‘गाढवपणा’ करीतच असतो. कालपरत्वे त्याचे स्वरूप बदलले तरीही. पंचविशीतील अशा सर्व अविचारी व अविवेकी कृतींना ‘गद्धेपंचविशी’ म्हणायला हरकत नसावी. माझ्या आयुष्यात ‘गद्धेपंचविशी’ बरीच लवकर आली आणि दोनेक वर्षांत गेलीदेखील! माझा गद्धेपंचविशीचा काळ म्हणजे वयाच्या १६ ते १८ वयोगटातला कालखंड. सोळाव्या वर्षांपर्यंत, शालेय शिक्षण सुरू असताना मी

कुटुंबाच्या- विशेषत: आमच्या बापाच्या प्रचंड दडपणाखाली होतो. त्यानंतर मुंबईच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश के ला आणि त्या स्वच्छंदी वातावरणात मी हुरळून गेलो. अक्षरश: मोकाट सुटलो..

रूढ अर्थाने ज्याला अयोग्य, वाईट, किं बहुना अनैतिक अशा तद्दन गाढवपणाच्या म्हणता येतील, अशा अनेक गोष्टी मी त्या वेळी के ल्या. काय करायचे मी बाकी ठेवले? काहीही नाही. उत्तर भारतात ज्यांना ‘छुट्टे सांड’ म्हणतात, तसा माझ्या बेछूट आणि बेबंद वागणुकीतून मी उधळत गेलो. पार भरकटत गेलो. मात्र, कु ठल्या तरी आंतरिक प्रेरणेने मी दोन वर्षांत पूर्णपणे सावरलो. मार्क  ट्वेनचे एक वचन आहे- ‘अनलेस यू गो व्हेरी फार, यू विल नेव्हर नो हाऊ फार कॅ न यू गो’. खरेच आहे हे. आयुष्यात कधीतरी भरकटल्याशिवाय तुम्हाला तुमची क्षमता, तुमच्या अंत:प्रेरणा आणि तुमच्या मर्यादा याची पुरेपूर जाणीव होऊच शकत नाही, हा माझाही आवडता सिद्धांत आहे. गद्धेपंचविशीत- ती जेव्हा येते त्या वेळी, भरकटले तर पाहिजेच. अर्थात, त्याहूनही महत्त्वाचे असते ते त्यातून वेळीच सावरणे, त्यातून धडा घेऊन आपल्या आयुष्याला योग्य ती दिशा देणे. माझ्या बाबतीत हे सर्व घडले ते वयाच्या १६ ते १८ या वर्षांमध्येच. त्यातूनच मला माझा वेगळा मार्ग शोधता आला. त्यानंतर मात्र कविवर्य नारायण सुर्वे म्हणतात तसे मी ‘स्वत:ला रचित’ गेलो. एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षांत माझ्या गुणांची टक्के वारी झर्कन खाली आली. माझी शैक्षणिक अधोगती पाहून अनेकांनी माझे सांत्वन करण्याचा प्रयत्न के ला, काहींनी मानभावीपणे, तर काहींनी प्रामाणिकपणे. मला दोन्हींची मनस्वी चीड आली. 

माझा भाऊ (जे. डी. जाधव) त्या वेळी परभणीला जिल्हाधिकारी होता. मी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडे गेलो आणि तिथेच माझ्या आयुष्यात ‘टर्निग पॉइंट’ आला. डोक्यात विचारांचं काहूर असताना आयुष्याबद्दल मी प्रथमच तिथे शांतपणे विचार के ला. भावाच्या प्रेरणेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, त्यांच्याविषयी लिहिली गेलेली पुस्तके  वाचली. ‘अत्त दीप भव’ अर्थात ‘तू स्वत:च स्वत:चा दीप हो’ हे मनात कोरले गेले. आयुष्य भरकटू न देता त्याला दिशा द्यायला हवी, हे जाणवू लागले. तिथे मी एक महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे महाविद्यालय बदलण्याचा. पूर्वीच्या मित्रांच्या गोतावळ्यातून मला अंग काढून घेता येणार नाही आणि कदाचित मी पुन्हा वाहवत जाईन, असे मला वाटत होते. मी ‘रुईया’ महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे ठरवले. मला महाविद्यालयाच्या प्रथम वर्षांत जे गुण मिळाले होते, त्याच्या आधारावर तेथे प्रवेश मिळणे के वळ अशक्य वाटत होते. पण मी चंगच बांधला. मी थेट ‘रुईया’चे प्राचार्य कु लकर्णी यांना भेटलो आणि मला तिथे प्रवेश मिळणे का गरजेचे आहे, याबद्दलची सत्य परिस्थिती त्यांना स्पष्टपणे सांगितली. ते कडक स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी मला काही मोजके च, पण नेमके  प्रश्न विचारले. खरे तर त्या वेळी अनेक मंडळी थोरामोठय़ांच्या चिठ्ठय़ा घेऊन ‘रुईया’त प्रवेश घेण्यासाठी थांबली होती. पण त्यांना डावलून त्यांनी मला प्रवेश दिला. वस्तुस्थितीला धीराने आणि प्रामाणिकपणे सामोरे जाण्याचे ते मला मिळालेले फळ होते. 

इंटर सायन्सची परीक्षा दिल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत मला मसुरीला जाण्याची संधी मिळाली. भाऊ ‘मिड करिअर’ प्रशिक्षणासाठी मसुरीच्या ‘लाल बहादूर शास्त्री अकॅ डमी’त गेला होता. तिथे मला अनेक ‘आयएएस’ अधिकाऱ्यांना जवळून पाहता आले. मलाही त्यांच्यासारखे होता आले पाहिजे असे प्रकर्षांने वाटू लागले. पण यात एक अडचण होती. मी शास्त्र शाखेत शिकत होतो आणि त्या विषयांत मला मुळीच रस वाटत नव्हता. त्याच वेळी प्रा. वि. म. दांडेकर आणि प्रा. नीळकंठ रथ यांनी लिहिलेले ‘पॉव्हर्टी इन इंडिया’ हे पुस्तक माझ्या वाचनात आले. मी झपाटून जाऊन ते पुस्तक पुन:पुन्हा वाचले आणि यापुढे अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा असा पक्का निश्चय के ला. मुंबईला परतल्यावर मी संख्याशास्त्र व अर्थशास्त्र हा जोड विषय घेऊन ‘बी.एसस्सी.’साठी प्रवेश घेतला आणि मला सूर सापडला. मी अभ्यासाला उत्साहाने सुरुवात केलीच, शिवाय व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा यासाठी जाणीवपूर्वक स्वत:ला विधायक कार्यात गुंतवून घेऊ लागलो.  

‘रुईया’ महाविद्यालयात याच सुमारास ‘वार्षिक वाद स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. त्यातील ठराव होता, ‘मागासवर्गीयांच्या सर्व सवलती तत्काळ बंद कराव्यात’. वक्तृत्व हा माझा प्रांत आहे असे मला तेव्हा अजिबात वाटत नव्हते. पण हा विषय पाहून मला चेव आला. त्यावर बोलणे ही माझी नैतिक जबाबदारीच आहे, असे मला वाटू लागले. अनेक उत्कृष्ट विद्यार्थी वक्ते  ‘रुइया’मध्ये होते. पण मी जिद्दीने स्पर्धेत उतरलो. मी कसून मेहनत घेऊन भाषण तयार केले आणि कुटुंबीय व मित्रमंडळींसमोर अनेकदा त्याची रंगीत तालीम केली. माझ्या अपेक्षेप्रमाणे या वाद स्पर्धेत दलितांच्या बाजूने बोलणारे कोणीही नव्हते. माझे त्या भाषणातले विचार फार प्रगल्भ होते असे नाही, पण त्वेषाच्या जवळपास जाईल, असा आवेश जरूर होता. वक्तृत्वाच्या या पहिल्याच प्रयत्नात मला पहिले पारितोषिक मिळाले. ज्वलंत इच्छा असेल आणि त्यास कठोर परिश्रमांची जोड असेल, तर एरवी असाध्य भासणाऱ्या गोष्टीही सहजसाध्य होऊ शकतात, याची मला आलेली ती प्रथम प्रचीती.

व्यावसायिक यशासाठी पदवीच्या परीक्षेत प्रथम वर्ग मिळणे गरजेचे होते. तो मिळाला नाही तर काय, हा प्रश्न मला सारखा भेडसावत होता. मी कठोर प्रयत्न चालू ठेवले. इतर सर्व प्रलोभने दूर ठेवली. स्वत:ची कु वत सिद्ध करण्याची ही शेवटची संधी आहे असे मला सतत वाटत असे. पदवी परीक्षेचा निकाल लागला आणि माझा नंबर ‘फस्र्ट क्लास विथ डिस्टिंक्शन’च्या यादीमध्ये होता. माझ्या आयुष्याची गाडी आडवळणे घेत का होईना, पुन्हा रुळावर आली होती. 

१९७३ मध्ये ‘बी.एस्सी.’ झाल्यावर मी ‘एम.ए.’साठी ‘अर्थशास्त्र’ हा विषय घेऊन मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला. हा विषय माझ्या अत्यंत आवडीचा. त्यात प्रा. ब्रह्मानंद, प्रा. भारद्वाज, प्रा. पंचमुखी यांच्यासारखे उत्कृष्ट शिक्षक. त्यामुळे शिकताना मला खूपच आनंद मिळू लागला. ‘एम.ए.’च्या प्रथम वर्षांला असताना बहुतेक विद्यार्थी बसतात तसा मीही केवळ गंमत म्हणून स्टेट बँके च्या ‘प्रोबेशनरी अधिकाऱ्या’च्या परीक्षेला बसलो आणि त्यात माझी निवड झाली. वयाच्या के वळ एकविसाव्या वर्षी ‘स्टेट बँके ’चा अधिकारी होण्याचा मान माझ्या नावावर नोंदला गेल्याचेही मला सांगण्यात आले. माझ्या आनंदास पारावार उरला नाही. माझा भाऊ मात्र नाराज झाला होता. मी ती नोकरी स्वीकारू नये आणि ‘आयएएस’ व्हावे, असा त्याचा आग्रह होता. पण ‘आयएएस’च्या पोलादी चौकटीत मी गुदमरून जाईन, असे मला वाटत होते. त्यावर भाऊने नवीनच मुद्दा मांडला, ‘‘आजवर दलित समाजातील कोणालाही मुंबई विद्यापीठात अर्थशास्त्र विषय घेऊन ‘एम.ए.ला प्रथम वर्ग मिळवता आलेला नाही. तू स्टेट बँके ची नोकरी स्वीकारलीस तर ही सुवर्णसंधी नक्कीच हातची जाईल.’’ मला नोकरी करण्याची निकड नव्हती. भाऊचे म्हणणेही पटत होते. पण हजारो इच्छुकांना मिळूशकणारी चांगली नोकरी चालून आली असताना त्याकडे पाठ फिरवणे मला व्यवहार्य वाटेना. मी स्टेट बँकेत रुजू झालो आणि ‘एम.ए.’चा अभ्यासही सुरू ठेवला.

प्रा. ब्रह्मानंद, इतर प्राध्यापक आणि काही सुहृदांच्या अमोल सहकार्यामुळे १९७५ मध्ये मी ‘एम.ए.’ पूर्ण करू शकलो आणि त्यात प्रथम वर्ग मिळवण्यातही यशस्वी झालो. आता भाऊच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

मी स्टेट बँके त तीन वर्षे नोकरी केली, पण माझ्याकडून काहीही उल्लेखनीय कामगिरी होऊ शकली नाही. एक तर मी वयाने लहान होतो, विचारांनी अपरिपक्व होतो आणि कार्यालयीन कामाचा काहीच अनुभव नव्हता. पण मुंबई, अकोला, भंडारा (साकोली), वर्धा (आर्वी) या ठिकाणी काम के ले. अनेक बरेवाईट अनुभव घेतले. हातून काही चुकाही झाल्या, पण मी त्यातून शिकत गेलो. विदर्भात असताना रिझव्‍‌र्ह बँकेच्या अर्थशास्त्र विभागासाठीच्या ‘रिसर्च ऑफिसर’ या पदाची जाहिरात पाहाण्यात आली आणि मी अर्ज केला. तिथेही निवड होऊन मी रिझव्‍‌र्ह बँके चा सर्वात तरुण ‘रिसर्च ऑफिसर’ ठरलो. मुंबईत राहण्याची सोय आणि अर्थशास्त्रासारख्या आवडत्या विषयात संशोधन करण्याचे काम, यामुळे मला ती नोकरी लगेच आवडली. आपले व्यावसायिक बस्तान आता व्यवस्थित बसले आहे असे वाटू लागले.

मग डॉ. रामस्वामींसारख्या अनुभवी कार्यकर्त्यांबरोबर मी सामाजिक कार्यास सुरुवात केली. ‘बौद्ध हितवर्धिनी सभा’ या संस्थेची उभारणी झाली. पुढे तिचे ‘डॉ. आंबेडकर इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग सव्‍‌र्हिसेस’ असे नामाभिधान करण्यात आले. डॉ. रामस्वामी त्याचे अध्यक्ष, तर मी सरचिटणीस. बँकांमधील नोकऱ्यांसाठीच्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी विनामूल्य मार्गदर्शन वर्ग घेण्यास सुरुवात झाली. ही व्याख्याने घेण्याची जबाबदारी मी, वसुंधरा (ती पुढे माझी पत्नी झाली.) आणि बँकिंग क्षेत्रातील सेवाभावी वरिष्ठ अधिकारी घेत. हे उपक्रम फारच यशस्वी ठरले.

सामाजिक कार्याचीही एक झिंग चढते. माझ्या बाबतीत तोच प्रकार घडत होता. मला खासगी आयुष्यच उरले नव्हते, मग अर्थशास्त्राचे वाचन-संशोधन काय करणार? रिझव्‍‌र्ह बँके चे काम तर मी इमानेइतबारे करत होतो, पण स्वत:चा वेगळा ठसा उमटवू शके न असे संशोधनकार्य होत नव्हते. मी पुन्हा कठोर आत्मपरीक्षण करू लागलो. व्यावसायिक स्थैर्य आले असले, तरी त्यातून आपोआप व्यावसायिक यश साध्य होणार नाही याची जाणीव झाली. अर्थशास्त्रीय वाचन-संशोधनास खूप वेळ द्यायची गरज लक्षात आली आणि अमेरिके त जाऊन अर्थशास्त्रात डॉक्टरेट करायचे ठरवले. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे  उच्च शिक्षणासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती दिली जाते, त्यात माझी निवड होऊन १९८१ मध्ये मी ‘इंडियाना’ विद्यापीठात दाखल झालो. तिथेही भारतीय विद्यार्थ्यांच्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम के लं. मला रिझव्‍‌र्ह बँके कडून के वळ तीन वर्षांची रजा मिळाली असल्यामुळे मी प्रत्येक सेमिस्टरला इतरांपेक्षा जास्त कोर्सेस घेत प्रचंड खपत होतो. मला गुणही उत्तम मिळत गेले.

एक दिवस  इंडियाना विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या संचालकांनी  मला बोलावून घेतले आणि खुशखबर दिली की माझा शैक्षणिक ‘ट्रॅक रेकॉर्ड’ आणि भारतीय विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष म्हणून के लेल्या सामाजिक कार्याचा सन्मान याकरिता ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी’ पुरस्कारासाठी माझे नाव ‘शॉर्टलिस्ट’ करण्यात आले आहे. माझे नामांकन अधिक सबळ व्हावे म्हणून विद्यापीठाच्या काही सुविख्यात भारतीय प्राध्यापकांकडून शिफारसपत्रे मिळवून त्यांच्याकडे सादर करण्यात यावीत, असा सल्ला देण्यात आला. मी त्या कामाला लागलो. अनेक भारतीय मित्रांनी सुचवले, की तेथील एका आंतरराष्ट्रीय कीर्तिच्या ज्येष्ठ प्राध्यापकांकडून शिफारसपत्र मिळवावे. त्यांच्याशी माझा व्यक्तीश: परिचय नव्हता. त्या वेळी ब्लूमिंग्टन येथे एक अजातशत्रू मध्यमवयीन गृहस्थ होते- बॉबी सरदेसाई (म्हणजे राजदीप सरदेसाईचे काका), ते माझ्या मदतीला धावून आले. ठरलेल्या दिवशी मी त्यांच्याबरोबर ‘त्या’ प्राध्यापकांच्या घरी गेलो. सरदेसाईंनी भेटीचे प्रयोजन सांगितले. प्राध्यापक महाशय काहीशा थंडपणे म्हणाले,‘‘ठीक हैं’’.

एवढय़ा व्यासंगी विद्वानाचा अधिक वेळ घेऊ नये, म्हणून आम्ही दोघे जायला उठलो. तेवढय़ात ते बॉबी सरदेसाईंना म्हणाले, ‘‘बॉबी, डू यू हॅव अ मिनिट?’’ साहजिकच बॉबी मागे थांबले. त्यांच्या खासगी संभाषणात व्यत्यय नको म्हणून मी बाहेर पडलो आणि बॉबी यांची वाट पाहत बाहेर थांबलो. मुख्य दरवाजा अर्धा उघडा असल्यामुळे आणि प्राध्यापक महाशयांनी चांगलाच टीपेचा सूर लावल्यामुळे मला बाहेर त्यांचे संभाषण स्पष्टपणे ऐकू  येत होते.

(किं बहुना, ते ऐकू  यावे म्हणूनच प्राध्यापक मोठय़ाने बोलत असावेत.) ५० वर्षांपेक्षा जास्त काळ अमेरिके त अध्यापन- संशोधन के लेले सुप्रतिष्ठित प्राध्यापक इंग्रजीची कास सोडून आपल्या मातृभाषेत- हिंदीत ओरडून सांगत होते, ‘‘बॉबी तुम्हारी अकल मारी गयी हैं क्या? कै से आदमी को मेरे पास ले आए हो? ये तुम्हे कै से लगा, की एक ‘धेड’ के  बच्चे को मैं शिफारिश दे दूँगा?’’ मला प्रचंड संताप आला होता. पुन्हा घरात जाऊन त्या प्राध्यापकाची ऐशीतैशी करावी, अशी प्रबळ इच्छा मनात दाटून आली होती. पण प्रत्येक निर्वाणीच्या क्षणी मी नेहमी करतो तसा, डॉ. आंबेडकरांचा विचार के ला. त्यांना भोगाव्या लागलेल्या यातना मला आठवल्या आणि लगेच मी शांत झालो. त्यानंतर उच्चशिक्षित, परंतु असंस्कृत,  प्राध्यापक महाशयांची मला कीव करावीशी वाटली!

खरे तर मी जन्माने दलित असल्याचे मी पूर्णपणे विसरून गेलो होतो. अमेरिके सारख्या प्रगत देशात भारतीय विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी एकू णच साऱ्या भारतीयांचे प्रतिनिधित्व करीत होतो. मात्र या प्रसंगातून मला जन्माचा धडा मिळाला. कितीही उच्चशिक्षण घेतले, कितीही महत्पदावर पोहोचलो, तरी माझी जात मला पुसून टाकता येणार नाही आणि माझ्या मनातून जातीची भावना जरी दूर झाली तरी जातीव्यवस्थेची कीड लागलेला समाज मला माझ्या जातीची सदोदित आठवण करून देत राहील, याची विदारक जाणीव प्रखरपणे झाली. पण विशेष आनंदाची बाब म्हणजे ‘त्या’ प्राध्यापकाच्या शिफारसपत्राशिवाय मला ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी’ म्हणून सन्मानित करण्यात आले. घरी परतल्यानंतर पत्नीला ही बातमी सांगताना माझे डोळे पाणावले होते. जुन्या वडाळ्याच्या अत्यंत साधारण शाळेत सुरुवात करूनसुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने, जेमतेम तिशीत असतानाच मी खूप दूरवर येऊन पोहोचलो होतो. त्यानंतर दोन वर्षांत मला अर्थशास्त्राची डॉक्टरेट मिळाली. त्या वेळी अमेरिके ला गेलेले विद्यार्थी सहसा परत येत नसत. अनेक संधी अमेरिके त हात जोडून समोर उभ्या असताना लगेच आम्ही मुंबईला परतलो. त्या वेळी अनेक मित्रांनी मला अक्षरश: वेडय़ात काढले होते. त्यावर माझे उत्तर होते, ‘‘हा जर वेडेपणा असेल, तर असा वेडेपणा मी वारंवार करत राहणार आहे!’’ आणि झालेही तसेच. २००२ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय नाणे निधी’ (आयएमएफ) येथे भारताचे चार वर्षे प्रतिनिधित्व केल्यानंतर तिथेच कायम होण्याच्या कु ठल्याही मोहाला बळी न पडता मी लगोलग भारतात परतलो. तद्नंतर २००६ मध्ये अफगाणिस्तानातील (त्या वेळच्या) वर्षांकाठी सव्वा कोटी रुपये पगाराची नोकरी सोडून, ९० टक्के  वेतन कपात स्वीकारून, सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाचा कु लगुरू म्हणून भारतात परतलो. या सर्व घडामोडींमागे मनोभूमिका आणि प्रेरणा एकच- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची!