साधनेतील सजगता

‘योगवासिष्ठ’मध्ये योगाची व्याख्या आहे -‘मन: प्रशमन: उपाय: योग’ म्हणजेच मनाला शांत करण्यासाठी ‘योग’ हा उपचार आहे.

‘योगवासिष्ठ’मध्ये योगाची व्याख्या आहे -‘मन: प्रशमन: उपाय: योग’  म्हणजेच मनाला शांत करण्यासाठी ‘योग’ हा उपचार आहे. आपल्या शास्त्रामध्ये अत्यंत चंचल अशा दहा गोष्टींचे वर्णन आहे- मत्स, मधुकर, मेघ, मारूत, माकड, मनिनि, मदन या साऱ्या यादींमध्ये ‘मन’ प्रथम क्रमांकावर आहे. मन अतिशय गतीमान, तरलस्वभावी आहे, ‘कसे आवरू मना माधवा’ हा प्रश्न अर्जुनालाही पडला आहे. गंमतीचा भाग असा, की रणांगणावरील अर्जुन हाही साठी पुढचाच, आणि प्रत्यक्ष भगवान कृष्णाचे देहधारी वयही वार्धक्याचेच!  कुठल्याही वयात ठरविले तर बदलता येते हेच खरे! दुर्दैवाने आपण सारे दुर्योधन बनतो आहोत. आपल्याला मन शांत करण्यासाठी अभ्यास व वैराग्याची शिकवण देणाऱ्या आपल्यात दडलेल्या कृष्णापेक्षा, त्याच्याशी जडलेल्या इतर गोष्टीच हव्या वाटतात. आसने, प्राणायाम करायचा तो कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आचरणात आणायला मदत होण्यासाठीच. त्यासाठी साधनेतील निरंतरता, सहजता, सजगता महत्त्वाची!
  साधनेतील सजगता
हाताचे, मनगटांचे, बोटांचे सांधे सल करण्यासाठी कृती करू या. बठक स्थितीतील सुखासन, अर्धपद्मासन किंवा वज्रासन, अशी कुठलीही सुखावह अवस्था धारण करा. पाठकणा समस्थितीत ठेवा. खांद्याच्या उंचीवर हात पुढे लांब करा. हाताची बोटे सरळ असावीत. आता पंजे मागच्या बाजूस वाकवा. बोटे वरच्या दिशेला असतील. आता पंजे पुढे वाकवा म्हणजेच आता बोटे जमिनीच्या दिशेला वळतील. हात कोपरात सरळ ठेवा.
श्वासावर आधारित ही कृती करू या. श्वास घेत हाताची बोटे वर घ्या, श्वास सोडत हात खाली घ्या. साधारण ५ ते १० आवर्तने करण्यास हरकत नाही. आतापर्यंत आपण करीत असलेल्या साऱ्या कृती अगदी व्याधीग्रस्त असलेल्या व्यक्तीदेखील सहज करू शकतील. आपण जे सांधे व स्नायू हलवीत आहोत, त्याकडे सजगता महत्त्वाची. जे सांधे व स्नायू कृतीमध्ये वापरले जात नाहीत, त्यामधे अनावश्यक ताण येऊ न देणे ही सजगतादेखील फार महत्त्वाची आहे.
आनंदाची निवृत्ती
५४ वर्षांनी पुन्हा विद्याíथदशेत
नुकतीच माझी पंच्याहत्तरी साजरी झाली. आता उत्तरायण सुरू झाले आहे. मात्र निवृत्तीनंतरची ८-१० वर्षे आनंदात गेल्यावर, नातवंडे मोठी झाल्यावर बराच वेळ हाती आहे असे लक्षात आल्याने काही शिकावे असे वाटले. खूप आधीपासून मला ‘प्राचीन संस्कृती- भारत व इजिप्त’ याविषयी प्रचंड कुतूहल होते. त्यावर मिळेल ते मी वाचत होते. त्याच वेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात हा विषय शिकवला जातो असे समजले. चौकशी करुन यावर्षीच मी एम.ए. इंडोलॉजीला प्रवेश घेतला आणि आनंदाचा खजिनाच माझ्यापुढे उघडा झाला. मला जे हवे होते, ते सर्व या अभ्यासक्रमात आहे. त्यात पुरातत्त्वशास्त्र, जुनी आर्य व सिंधू संस्कृती, आपले प्राचीन वाड.मय, त्याकाळातील समाजव्यवस्था, शिक्षण पद्धती, स्त्रियांचे स्थान, वेद वाड.मय, हिंदू-बौद्ध- जैन धर्माचा इतिहास, प्राचीन राजवंश अशा अनेक गोष्टी शिकता आल्या. भारतीय संस्कृतीचे पाच हजार वर्षांपूर्वीचे टप्पे अभ्यासले तेव्हा आश्चर्य व अभिमान वाटला.
वर्ग सुरू झाल्यापासून माझे मन इतके रमले की सर्व लहानमोठे आजार, काळज्या यांचा विसरच पडला जणू. नव्या उमेदीने अभ्यास सुरू झाला. नवे मीत्र मैत्रिणी मिळाले. ५४ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा वर्गात, बाकावर बसले. एका जागेवर इतका वेळ बसण्याची सवय मोडल्याने गुडघे व पाठ फार दुखायची. आता सवय झाली. स्मरणशक्ती दगा देते म्हणून काहीसे नैराश्य येते. सकाळी वाचलेले दुपारी आठवत नाही. नावे, सनावळ्या यांचा विसर पडतो. मात्र कोणतीही पदवी मिळवणे हा हेतू नव्हताच. कदाचित मी उत्तीर्णही होऊ शकणार नाही. पण या निमित्ताने आपला प्राचीन भारतीय इतिहास अभ्यासता आला. चुकीच्या कल्पना दूर झाल्या. हे वाचन पुढेही चालू राहणार, याचा आनंद फार मोठा आहे.
 आपला वर्तमान हा भूतकाळाशी जोडलेला असतो. म्हणूनच आपले प्राचीन काळाचे पूर्वज कसे राहात होते यासंबंधीची माहिती प्रत्येकाला असायली हवी, असे मला वाटते. त्यामुळेच या विषयाचा अभ्यास या वयात करत असण्यावर अनेकांनी नवल व्यक्त केले, नव्हे याची गरजच काय असा शेराही ऐकवला. अर्थात मी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. कारण ऐकावे जनाचे करावे मनाचे, नाही का? मी खूपच आनंदात जगते आहे, हे खरं.
मीनाक्षी केतकर
खा आनंदाने
‘सुपरवुमन’
प्रिय आजीस,
आजच्या महिला दिनानिमित्त तुला तुझ्या नातीकडून हार्दकि शुभेच्छा! तसा रोजचाच दिवस छान असतो तुझा, पण आज जरा खास. हो! आहेसच तू सुपरवुमन. तुझ्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत किती भूमिका यशस्वीरीतीने पार पाडल्यास.  एका गोड, खोडकर मुलीपासून झालेली आयुष्याची सुरुवात बहीण, मत्रीण, पत्नी, सून, जाऊ, मामी, मावशी, आत्या, सासू आणि आता आजीपर्यंत येऊन ठेपली आहे. पण हे सर्व काही पार पाडताना स्वत:च्या आरोग्याकडे थोडं दुर्लक्ष झालंय का? काही हरकत नाही. जुन्या आठवणींमध्ये रमताना तुझं वर्तमानातलं आरोग्य कसं सुधारता येईल ते बघुया.
 शरीरातील बदललेल्या होर्मोन्सची पातळी, मासिक पाळी बंद झाल्यावर हाडांमधील वाढलेली ठिसूळता आणि मंद झालेली चयापचय क्रिया यामुळे योग्य प्रमाणात कॅलरीज, कल्शिअम, लोह आणि प्रथिने इत्यादी जीवनमूल्यांची गरज भासते आणि वजनही आटोक्यात ठेवण्याची गरज असते.  
उपयुक्त पदार्थ-नाचणी, जव, राजगिरा, कुळीथ, मेथीदाणे, गायीचे दूध किंवा सोया दूध, अळशी बिया, मोड आलेले मूग, शतावरी, भिजवलेले बदाम, अक्रोड, जर्दाळू, मनुका, खजूर, अंजीर, फळ, खसखस, भोपळाबिया, तीळ वगरे. वजन कमी करण्यासाठी ‘डाएट’ न करता, योग्य अन्न योग्य प्रमाणात खा. तेलकट किंवा गोड पदार्थ शक्यतो टाळा. नुकत्याच मी बनवलेल्या एका चटणीची पाककृती सांगते नक्की करशील ना!
अळशीची चटणी :
 साहित्य – पाव कप अळशी, पाव कप कडिपत्त्याची पाने व दोन मोठे चमचे तीळ. आमचूर पाव चमचा, तेल अर्धा चमचा, जिरे १ मोठा चमचा, लाल मिरच्या चार, चवीपुरते काळे मीठ.
कृती- सर्व साहित्य तेलामध्ये भाजून घ्यायचे. आणि त्याची पूड बनवा. खाण्यासाठी झाली तय्यार.    
वैदेही अमोघ नवाथे, आहारतज्ज्ञ
संगणकाशी मत्री
ऑनलाइन शॉपिंग
शॉपिंग करणं हा केव्हाही आनंदाचा भागच असतो. वेळ आणि पैसा मुबलक असेल तर याचा आनंद काय वर्णावा! चोखंदळ स्वभावामुळे पटकन खरेदी होत नाही आणि आता वयाप्रमाणे फार चालणं होत नाही. म्हणूनच आजी-आजोबांसाठी ऑनलाइन शॉपिंग हा एक चांगला पर्याय होऊ शकतो.
 ऑनलाइन शॉपिंग म्हणजे आपल्याला हवी असलेली वस्तू बाजारात न जाता, घरबसल्या संगणकाच्या मदतीने इंटरनेटवरून खरेदी करणे. अगदी सुईपासून घरापर्यंत प्रत्येक गोष्ट ऑनलाइन पद्धतीने विकत घेता येऊ शकते. अगदी तुम्हाला आवडात ती पुस्तकंही तुम्ही विकत घेऊ शकता. म्हणूनच बघूया ऑनलाइन शॉपिंग नेमके कसे करावे-  त्यासाठी अगदी सोपा मार्ग म्हणजे गुगलवर Online Shopping Websites  असं जरी टाकलं तरी भली मोठी यादी तुमच्या हाती येईल. अगदी भारतीय आणि परदेशीसुद्धा.
काही लोकप्रिय वेबसाइट पुढीलप्रमाणे –
 flipkart india
http://www.ebay.in
http://www.indiasmartdeal.com/
http://www.jabong.com
shoponlineindia.com
http://www.alibaba.com
http://www.myntra.com
http://www.smartdeals.com
१. या किंवा आपल्याला माहीत असलेल्या कोणत्याही एका साइटवर जा. प्रत्येक साइटवर जी वस्तू घ्यायची आहे ती सहज सापडावी म्हणून सर्च (शोधणे) कॉलम असतो त्या ठिकाणी आपल्याला हव्या असलेल्या वस्तूचे नाव लिहा.
२. आपल्यासमोर त्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सर्व कंपन्यांची विविध किमतींची घडय़ाळे दिसतील.
३.  यापकी आपल्याला जे घडय़ाळ आवडले असेल त्या चित्रावर क्लिक करा. त्या घडय़ाळाची माहिती समोर येईल. उदा. किंमत, उपलब्ध असलेले रंग, वजन, वैशिष्टय़े इ.
४.  समजा आपल्याला त्या घडय़ाळाची इतर घडय़ाळांसोबत तुलना करून पाहायची असेल तर आपल्याला आवडलेली घडय़ाळे निवडून ूेस्र्ं१ी या पर्यायावर क्लिक करा.
५. आता आपल्याला आवडलेले घडय़ाळ निवडूनी७स्र्१ी२२ ूँीू‘४३ किंवा स्र्१ूी ियांसारख्या पर्यायांवर क्लिक करा. संकेतस्थळावर विचारलेली माहिती (नाव, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक, ईमेल- आयडी) व्यवस्थित भरा.
६. जर आपल्याला वस्तूचे पसे त्वरित भरायचे असतील तर इंटरनेटच्या बँकिंगच्या साहाय्याने ते आपण भरू शकता. (याकरता बँकेत अर्ज करून ईमेल आयडी व पासवर्ड घ्यावा लागतो) किंवा डेबिट कार्डही वापरू शकता किंवा उत्तम पर्याय म्हणजे वस्तू घरी आल्यावर पसे देणे.
७. समजा घेतलेली वस्तू सदोषअसेल तर ठरावीक कालावधीच्या आत ती परत पाठवता येते. त्यामुळे पसेही वाया जात नाहीत.
८. परंतु ऑनलाइन शॉपिंग करताना काही बाबींची काळजीही घ्यावी लागते. उदा. संकेतस्थळाची विश्वासार्हता, वस्तूचा खरेपणा त्याची गॅरंटी इत्यादी
तुमच्या जबाबदारीवरच नीट पारखून शॉपिंग करावं, अन्यथा पश्चातापाची वेळ येणार नाही. मग काय आजी-आजोबा रेडी फॉर शॉपिंग?    
 ( संकलन- गीतांजली राणे)     rane.geet@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आनंद साधना बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Health for happiness

ताज्या बातम्या