पावसाळ्यातच नव्हे तर एरवीही संकटात सापडलेल्या, पण पाळीव नसलेल्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना मदत करणाऱ्या संस्थांच्या हेल्पलाइन्सची माहिती आपण घेत आहोत. आणखी काही संस्थांची नावे आणि त्यांच्या हेल्पलाइन्सचे क्रमांक.

मुंबईमधील प्राण्यांचा होणारा छळ थांबवून त्यांना मदत करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी झटणारी संस्था आहे, ‘द बॉम्बे सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल्स’. त्यांचे ‘बाई साकराबाई दिनशॉ पेटिट प्राणी रुग्णालय’ प्रसिद्ध आहे. त्यांच्या हेल्पलाइनचे दूरध्वनी क्रमांक आहेत-  ०२२-२४१३७५१८, ०२२-२४१३५२८५, ०२२-२४१३५४३४.

iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित
sangli wild animal attack marathi news
सांगली : हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात २४ मेंढ्या ठार, ७ गायब

इन डिफेन्स ऑफ अनिमल्स, इंडिया या संस्थेच्या केंद्रांच्या हेल्पलाइन्स-
देवनार केंद्र, मुंबईच्या पूर्व उपनगरांसाठी- ९१-९३२००५६५८१ (सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत)
नवी मुंबई केंद्र, नवी मुंबईसाठी- ९१-९३२००५६५८५.
सिडको केंद्र, रायगडमधील सिडको विभागासाठी- ९१-९३२००५६५८९ (सकाळी ९ ते संध्याकाळी
४ वाजेपर्यंत).
अ‍ॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन इन कँसर या संस्थेचे खारघर, नवी मुंबई येथे ‘टाटा मेमोरिअल सेंटर’ आहे. तेथे कर्करोग झालेल्या प्राण्यांवर उपचार केले जातात. मात्र तेथे आधी नावनोंदणी करावी लागते. त्यांच्या हेल्पलाइनचा दूरध्वनी क्रमांक आहे- ०२२-२७४०५००० विस्तारित क्रमांक- ५४५१.
इतर काही संस्था आणि त्यांच्या हेल्पलाइन्सचे दूरध्वनी क्रमांक आहेत-
अहिंसा, मुंबई- ०२२-२८८०८२०६.
आश्रय, मुंबई- ९१-९८३३८३९०११.
करुणा, मुंबई- ९१-९८१९१००१००.
ऑल इंडिया अ‍ॅनिमल वेलफेअर असोसिएशन, मुंबई- ०२२-२३०९४०७७.
अ‍ॅनिमल मॅटर्स टू मी, मुंबई-
९१-९८२०३३५७९९, ९१-९८१९३८०३१०.
असोसिएशन फॉर सव्‍‌र्हिस अ‍ॅण्ड हीलिंग ऑफ अ‍ॅनिमल्स, मुंबई- ९१-९८२०१२७०८५ (रविवार सोडून इतर दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ५.३० वाजेपपर्यंत).
बेहेना, मुंबई- ०२२-२६६७३८३८. या संस्थेत पाळीव नसलेल्या प्राणी व पक्ष्यांवर उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात.

शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com