* कोणतेही पीठ चाळताना चाळणीत पिठाबरोबर   ३-४ नाणी टाकावीत. पीठ व्यवस्थित चाळले जाते.
* कोणत्याही पदार्थात दही मिसळताना हलक्या हाताने वर-खाली करून मिसळा. जोरात ढवळून घेतले तर दही फाटते.
* चहा करतेवेळी चहा पावडर ओव्हनमध्ये गरम करून घेतल्यास चहाला छान चव येते.
* सॅलडमध्ये दही घालायचे असेल तर दही मलमलच्या कपडय़ात बांधून त्यातील पाणी निघेपर्यंत टांगून ठेवावे व खाण्याच्या थोडावेळ आधी ते सॅलडमध्ये घालावे.
*  बाहेरगावी जाताना फ्रिज डिफ्रॉस्ट करून स्वच्छ पुसून घ्या व त्यात २-३ कोळसे ठेवून बंद करा. फ्रिज कोरडा राहातो व त्याला वासही येत नाही.
*  दूध तापवताना पातेल्याच्या काठाला तुपाचा हात फिरवल्यास दूध उतू जात नाही.
*  २ चमचे व्हिनेगर व १ चमचा ऑलिव्ह ऑईल एकत्र करून त्या मिश्रणात मलमलचे कापड बुडवून त्याने लाकडी फर्निचर पुसले की चांगली चकाकी येते.
*  किसणीची धार कमी झाली असल्यास ती सॅण्डपेपरने किसतो त्याच्या विरुद्ध दिशेने घासावी चांगली धार येते.
* ३ चमचे गव्हाचा कोंडा घेऊन त्यात १ चमचा गुलाबपाणी व १ मोठा चमचा दूध घालून त्याची पेस्ट करावी. १०-१५ मिनिटे हलक्या हाताने चेहऱ्यावर चोळून लावावी. सुकल्यावर चेहरा धुवावा. चेहऱ्यावरील लव कमी होते.
* स्टेनलेस स्टीलचे सिंक असल्यास कपडय़ावर अमोनिया घेऊन सिंक पुसून घ्यावे व नंतर पाण्याने स्वच्छ करावे.
उषा वसंत unangare@gmail.com