अपर्णा देशपांडे adaparnadeshpande@gmail.com
‘‘मला कान हवाय.. शांतपणे माझं ऐकणारा. माझा ताण हलका होईल, अशी समजूत काढणारा. ‘तू बोल, मी ऐकतोय’ म्हणणारा!’ कुणी आपल्याला असं म्हटलं तर आपला कान, आपला खांदा देता येईल त्याला?  याच्या उलटच चित्र दिसतं अलीकडे. आपण ऐहिक आणि भौतिक सुखाच्या इतके आधीन झालो आहोत, की आपल्यातील नैसर्गिक सामुदायिक अथांगपण सोडून प्रत्येकानं आपापलं छोटं डबकं तयार केलं आणि त्यातच रमण्यात धन्यता मानली. आपण बोलणं विसरलोय नि ऐकणंही. ‘मी एकटा एकटा..’ म्हणणाऱ्या अनेकांना ‘ऐकणारा  कान’ आणि सहअनुभूतीनं डोकं  टेकवायला खांदा हवा आहे.. तो आपण देऊ शकतो का?

‘‘रुतलेल्या भावनांचा

Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

खोल सलतोय काटा

वेढलेल्या गर्दीतही

मी एकटा एकटा ..

असं आभाळून आलंय माझं मन. काही तरी आत आत टोचतंय. मित्रांजवळ बोलायचं तर टिंगल करून आणखी चार जणांत चर्चा होईल. घरच्यांना वाटतंय की, आपल्या सलीलला चांगली नोकरी लागलीय, भरपूर पगार आहे, याला तोंड पाडून बसायला काय  झालंय? पण मुळात मला हे सॉफ्टवेअरमधलं कामच आवडत नाही. त्यात माझी ती सतत किंचाळणारी बॉस! सारख्या तिरप्या डोळ्यांनी एकमेकींना इशारे करत हसणाऱ्या त्या काही नटव्या पोरी, धुराडय़ासारखे सतत सिगारेटी फुंकायला टपरीवर जाणारे सहकारी. यांच्याबरोबर आठ-नऊ तास काम म्हणजे मला काळ्या पाण्याची शिक्षा वाटते.

मला कुठलंही व्यसन नाही, मी बॉसच्या पुढे-पुढे करत नाही, उगाच स्त्री सहकाऱ्यांच्या  जवळ-जवळ जाणाऱ्या इतर अनेक पुरुषांसारखा मी मुलींशी विनाकारण बोलत नाही. मी ‘बोल्ड’ नाही म्हणून माझी हेटाळणी करतात सगळे. इथे माझी भयंकर कुचंबणा होतेय हे कुणाजवळ बोलू? कालच रहेजाच्या प्रमोशनची पार्टी होती. बाटल्याच्या बाटल्या रिचवत होते सगळे.  इतरांनी हवी तेवढी व्यसनं करावीत, पण मी त्यांच्यातील एक व्हावं हा हट्ट का? माझ्या शेजारच्या डेस्कवर बसणारी रंभा पिऊन तर्र झाली आणि सगळ्यांसमोर माझा पाणउतारा केला. माझ्या सभ्यतेच्या मर्यादा आडव्या आल्या आणि माझ्यात उलट बोलण्याची हिंमतही नाही. जीव नकोसा झालाय या शहरात; पण कुणाजवळ बोलू? माझ्या गावापासून दूर इथे माझं मन मोकळं करावं अशी एकही व्यक्ती नाही. मला कान हवाय.. शांतपणे माझं ऐकणारा. माझा ताण हलका होईल अशी समजूत काढणारा. ‘तू बोल सलील, मी ऐकतोय’ म्हणणारा!  मला आठवतंय, लहानपणी आमच्या गावी झाडाच्या पारावर आम्ही जमायचो. बिनधास्त मनातलं  ओकू न मोकळं व्हायचो. मित्र ऐकायचे. घरी ताटावर जेवताना गप्पा व्हायच्या. जेवण झालं, हात सुकला तरी पण आम्ही तिथेच असायचो. आई-बाबा, आजी-आजोबा नीट सगळं ऐकत. आता सगळीकडे तसं चित्र का नाही दिसत?’’

‘‘मी आनंदी. नावाप्रमाणेच आनंदी असते. घरात प्रत्येकाला काय हवं नको ते बारकाईनं बघते. अर्धवेळ नोकरी सांभाळून दोन तरुण अपत्यांच्या वेळा, त्यांचे खाण्याचे नखरे, नवऱ्याची फिरतीची नोकरी, अंथरुणाला खिळलेले सासरे, सगळ्यांचं सगळं करताना दमछाक होते माझी. इतरांची मनं सांभाळताना माझं मन अनेकदा दुखलं, विव्हळलं, याची कुणाला जराही जाणीव नाही. मुलं आपल्याच धुंदीत. आजीनं त्यांना फारच लाडावून ठेवलंय. मग ती माझं ऐकत नाहीत. काही सांगायला गेले की, ‘आताच बोलायचं आहे का तुला? वेळ नाहीये गं!’ म्हणतात. जेमतेम पगारावर राबणाऱ्या नवऱ्याची मला काळजी आहे. म्हणून जमत नाहीए तरी अर्धवेळ का होईना, मी नोकरी करतेय, पण नवऱ्याला माझी फरफट दिसत नाही. मी स्वत:साठी आजपर्यंत कुठलाही वाढीव खर्च केला नाही. सतत मन मारूनही आनंदी राहाण्याचा प्रयत्न करते; पण येता-जाता माझ्याकडून सेवेची अपेक्षा करणाऱ्या सगळ्यांचाच हल्ली मला खूप संताप येतो. मला खूप बोलायचं असतं, पण निवांत ऐकणारं कुणी नाही. एके काळी जीव लावणाऱ्या मैत्रिणी आता त्यांच्या त्यांच्या व्यापामुळे दुरावल्या आहेत. ‘हृदयाचा हृदयाशी संवाद’ आयुष्य बदलवून टाकतो हे मी नुसतं वाचलंय. शेजारी कुणालाच वेळ नाही, फार कोरडं वागतात. मग मनात साचून साचून रक्तदाब, थायरॉईड मागे लागले. डॉक्टर म्हणतात, ‘मनातल्या मनात नका कुढत जाऊ. तुम्हाला समुपदेशनाची गरज आहे.’ किती कमाल आहे नाही? आपली म्हणवणारी इतकी माणसं आहेत भोवती, पण समस्येवर तोडगा तो परका समुपदेशक काढणार. माणूस म्हणून इतरांना समजून घेण्याची कुवत हरवून बसतोय आपण. आपल्या यांत्रिक जगण्यात नेमकी कोणती प्रगती करतोय हे तपासून बघण्याची खरंच गरज आहे..’’

पावलोपावली आपल्याला असे सलील आणि आनंदी भेटतात. त्यांचं कोंदटलेलं मन का पोहोचत नाही आपल्यापर्यंत? आपण फार आत्मकेंद्रित झालो आहोत का? आणि याचं उत्तर ‘हो’ असेल, तर स्वत:ला विचारूया, ‘का?’ का मला समोरच्या माणसाची तगमग उमगली नाही? घरात सतत अपयश येणारं मूल किंवा तरुण व्यक्ती असेल, तर त्याच्या आत दडलेल्या वाफेचा निचरा मलाच करावा लागणार, हे डोक्यात ठेवून आपण शांतपणे, निवांत संवाद का नाही करू शकत? अशाच एका ऋताला आलेला एक अनुभव बघू-  ‘‘मी ऋता. ‘आय.आय.एम.’मधून व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन आता एका मोठय़ा कंपनीत काम करतेय. माझ्यासोबत शिकायला परितेश नावाचा एक तडफदार विद्यार्थी होता; पण तिथल्या प्रचंड व्यग्र आणि तणावपूर्ण दिनचर्येशी त्याचे सूर जुळत नव्हते. त्याला तो अभ्यासक्रम अतिशय जड जात होता, प्रकृती साथ देत नव्हती. आज शहाणपणा आणि चातुर्याला जास्त महत्त्व आहे हे त्याला कधी समजलंच नाही. तो सारखा मला फोन करून आपली व्यथा मांडायचा. मी शांतपणे ऐकून कधी उपाय सांगे, कधी स्वत: जाऊन मदत करे. नंतरचे त्याचे दिवस आनंदात जात. म्हणजे माझ्याकडे समस्या निराकरणाची कुवत होती; पण काही काळानं मी त्याला प्रतिसाद देणं कमी केलं. त्याचे फोन उचलले नाहीत आणि एक दिवस त्याच्या आत्महत्येची बातमी आली. रात्री १ वाजता त्यानं मला फोन केला होता, जो मी उचलला नव्हता. आता वाटतं, त्याचं म्हणणं कु णी तरी ऐकू न घ्यावं, एवढीच त्याची तेव्हा इच्छा असेल का? आधी त्याला समजून घेतलेली मी ऐन वेळी मात्र त्याच्यासाठी ‘आधार’ झाले नाही याचं दु:ख वाटतं.’’

कुठलीही समस्या सोडवायची असेल, तर त्याच्या मूळ कारणाविषयी ज्ञान असणं गरजेचं आहे. ज्ञानेंद्रियांमधील कान हा फक्त कंपनं ऐकण्यासाठी नसून ग्रहण करण्यासाठीही आहे ना? आपल्याजवळ बोलताना कुणाला खूप जास्त आधार वाटतो, बोलून झाल्यावर दिलासा वाटतो आणि आपलं गुपित इथे सुरक्षित राहील हा विश्वास वाटतो, ही किती समाधान देणारी भावना आहे. ‘मन चलो निज निकेतने’ (मना, शांती प्रदान करणाऱ्या आवासात चल) याची अनुभूती त्याला मिळणं हे किती सुखावह आहे; पण समोरील व्यक्तीस आपला खांदा देताना आपल्यातील अहंकार, ‘मी मोठा’ असल्याची भावना जागृत होत असेल, तर ते नीचतम व्यक्तिमत्त्वाचं लक्षण आहे, माणुसकीचं नाही!  मनुष्यास संवेदना, ग्रहणशक्ती, निर्णयशक्ती आणि भावना दिल्या आहेत ईश्वरानं. जन्मत: मिळालेल्या निसर्गदत्त भेटीचा आपण योग्य वापर करतो का? विचार करायला हवा.

अनेक ठिकाणी स्त्रियांचे भिशीचे गट असतात. त्यात एखादी तरी अशी स्त्री असते, जिला अनंत अडचणी असतात. ती परिस्थितीनं गांजलेली असते. महिन्यातून एकदा होणाऱ्या भेटीत मैत्रिणींबरोबर हसतखेळत वेळ घालवायला तिला आवडतं; पण जर तिनं आपली परिस्थिती सगळ्यांसमोर उघड केली, मन हलकं होण्यासाठी आपली बाजू मांडली, तर तिला इतर मैत्रिणींनी मजबूत आधार आणि दिलासा द्यायला हवा. तिच्या नकोशा भावनांचं ‘डम्पिंग ग्राऊंड’ होऊन तिचं दु:ख हलकं कसं होईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. हे असं प्रत्येक गटात निखालसपणे होतं का? (होत नसेल तर जाणीवपूर्वक लक्ष घालण्याची गरज आहे.)

परंतु बऱ्याचदा असं होतं, की ‘ऐकणारा कान’ इथपर्यंतच आपली भूमिका मर्यादित राहात नाही. काही जणांना त्याही पलीकडे जाऊन बोलून रितं होणं गरजेचं असतं. अन्यथा तेच तेच विचार त्या व्यक्तीला त्रास देत राहतात. अशा वेळी आपल्याकडे ती व्यक्ती वेगळ्या अपेक्षेने पाहात असते. आपण अनुभवानं आणि ज्ञानानं समृद्ध आहोत, त्यामुळे त्याची बाजू नक्कीच समजून घेऊन त्यावर अपेक्षित समाधान मिळेल, अशी त्या व्यक्तीची अपेक्षा असते;  पण होतं असं, की आपल्याला त्याची नेमकी दुखती नस समजतच नाही किंवा त्या मुद्दय़ावर चिंताजनक काही असेल असं वाटतच नाही. आपण अनुभवसंपन्न असल्यानं म्हणा अथवा आपल्याजवळील ज्ञानानं म्हणा; पण त्याची नेमकी अडचण आपल्या लक्षात येत नाही. याला ‘कर्स ऑफ नॉलेज’ असं म्हणतात.  समोरच्याचं मन नेमकं न वाचता आल्यानं आपलं ज्ञान इतरांच्या उपयोगी पडू न शकणं हा ‘आपल्या ज्ञानाला लागलेला शाप’ ठरतो.  एका व्यक्तीला प्रचंड मानसिक त्रास देणारा विषय दुसऱ्या व्यक्तीसाठी अतिशय सरळ, सोपा आणि सहज असू शकतो. म्हणूनच इतरांच्या प्रति आपण अधिक संवेदनशील असणं गरजेचं आहे. आपल्याच घरातील छोटय़ा मुलांचं उदाहरण घेऊ. त्यांची गाणी, त्यांचे खेळ, त्यांच्या बाललीला आपण सगळ्यांनी नीट लक्ष देऊन, पूर्ण दखल घेत ऐकावं/ बघावं ही त्यांची अपेक्षा असते. आपलं म्हणणं सगळे ऐकतात, ही सुरक्षिततेची भावना त्यांच्या निकोप वाढीसाठी आवश्यक आहे.  या कृतीतून स्वत:चं या घरातील महत्त्व मुलं त्यांच्याही नकळत तपासून निर्धास्त आणि मोकळी होत असतात. असं निर्धास्तपण ही मनुष्याची नैसर्गिक गरज आहे.

आज आपण ऐहिक आणि भौतिक सुखाच्या इतके अधीन झालो आहोत, की आपल्यातील नैसर्गिक सामुदायिक अथांगपण सोडून प्रत्येकानं आपापलं छोटं डबकं तयार केलं आणि त्यातच रमण्यात धन्यता मानली. सलील, आनंदी, परितेशसारख्या असंख्य जीवांना हक्कानं मनातलं काही बोलून दाखवता येईल अशा व्यक्तींची नितांत गरज आहे. गेल्या दोन वर्षांपासून कहर माजवणाऱ्या महासाथीनं ही गरज जास्तच अधोरेखित केली. करोनामुळे नव्हे तर के वळ मृत्यूच्या भीतीनंही अनेक जीव गेले. अनेकांना आपल्या गुदमरलेल्या भावनांना मोकळं करण्याची जागाच मिळाली नाही. ही आपल्यासाठी धोक्याची सूचना नाहीये का? स्वत:ला बदलू या. कुणासाठी तरी हक्काचा ‘कान’ होऊ या. त्याला बोलतं करू या. दु:खभरल्या मनाला रितं करून आनंदानं जगण्यासाठी मदत करू या.