स्पर्श ही चार पातळ्यांवर होणारी गोष्ट आहे. कारण आपलं अस्तित्वही चार पातळ्यांवर असतं. जेव्हा एखादं गाणं, कविता वा कथा आवडते तेव्हा त्या कलेच्या आविष्काराने आणि पर्यायाने त्या कलाकाराने आपल्या हृदयाला स्पर्श केलेला असतो. हा मनाच्या पातळीवरचा स्पर्श असतो. तसाच एक स्पर्श बुद्धीच्या पातळीवर असतो. सर्वात उच्च पातळीवरचा स्पर्श हा ‘परतत्त्वाचा’ स्पर्श. ज्ञानेशाची ओवी किंवा तुकारामांचा अभंग ऐकताना आपण शरीर-मन-बुद्धीच्या पातळ्यांवर स्पर्श करत करत त्याहीपलीकडे जातो तो हा स्पर्श..

लहान मुलं खेळात रमलेली पाहणं मला फार आवडतं कारण त्यातून खूप काही शिकायलाही मिळतं. अशीच परवा एका क्रीडांगणावर गेले होते. वेगवेगळ्या वयाच्या मुलांचे वेगवेगळे खेळ सुरू होते. एकीकडे अगदी छोटुकली मुलं साखळीचा खेळ खेळत होती. आऊट झालेल्यांनी एकमेकांचे हात हातात धरून साखळी करायची आणि आऊट न झालेल्यांच्या पाठीमागे धावायचं आणि साखळीतल्या कडेच्या मुलांनी त्यांना आऊट करायचं.  बाजूला उभं राहून त्यांच्या ताई चिअर करत होत्या आणि म्हणत होत्या ‘‘सगळ्यांनी हात घट्ट धरा. सोडू नका आणि साखळी तोडू नका.’’ हे ऐकलं की मुलं अगोदरच धरलेले हात आणखीनच घट्ट धरत होते आणि कुणी आऊट झालं की ‘‘हेऽऽऽ, आऊट!’’ म्हणून लगेचच त्याला आपल्या साखळीत सामील करत होते. दुसरीकडे जरा मोठय़ा मुलांच्या एका ग्रुपचा खो-खो चालला होता तर तिसऱ्या ग्रुपचा कबड्डीचा खेळ चालला होता. सगळीकडे नुसता जल्लोष होता आणि बच्चेकंपनी मोकळ्या हवेत नाचत, बागडत, उडय़ा मारत, पळत होती. या सर्वच खेळांमध्ये आनंद तर होताच पण मला त्यामध्ये एक सामायिक दुवा दिसला तो म्हणजे ‘स्पर्श.’ त्या सर्व खेळांमध्ये एकमेकांच्या स्पर्शाला खूपच महत्त्व होतं.

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
Matka Hygiene know the mistakes while drinking matka water or clay pot water
उन्हाळ्यात माठातील पाणी पिण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा…

स्पर्श.. पंचभूतातल्या आपल्या अवतीभवती असणाऱ्या वायुतत्त्वाचा हा गुण आहे. कोणत्याही गोष्टीला स्पर्श केल्यानं त्याचं एका विशिष्ट प्रकारे आकलन होतं. शारीरिक दृष्टीने स्पर्श करण्याचा अवयव म्हणजे त्वचा. शरीरातला हा सर्वात मोठा अवयव मानला जातो. त्वचेला स्पर्शेद्रिय म्हणतात. आतल्या अवयवांना एकत्र बांधून ठेऊन त्यांचं ऊन, वारा, पाऊस, थंडी, पाणी यांच्यापासून रक्षण करणं हे त्वचेचं प्रमुख कार्य. याशिवाय या त्वचेतल्या प्रत्येक रोमारोमांत बाहेरून केसांचं आवरण असतं. तसंच आतल्या बाजूने मज्जातंतूंचं जाळं असतं. यामुळेच स्पर्शज्ञान होतं आणि आपण आपलं रक्षण करू शकतो. शास्त्रीयदृष्टय़ा त्वचेचं हे मुख्य कार्य आहेच, पण स्पर्शाचं कार्य याहीपेक्षा खूपच सूक्ष्म असं आहे. कसं ते पाहू या. रेशमी, तलम वस्त्राचा, फुलांच्या पाकळ्यांचा, छोटय़ाशा पिलाचा, मऊ  तांबडय़ा मातीचा, हिरवळीचा, थंड वाऱ्याच्या झुळुकेचा स्पर्श आपल्याला शारीरिक पातळीवरचा आनंद मिळवून देतो यात शंकाच नाही. पण मनालाही आनंदित करतो. माणसाइतकं विकसित मन दुसऱ्या कोणत्याही प्राण्याजवळ नाही. म्हणूनच मनाचा आनंद हा शरीराच्या आनंदापेक्षा जास्त सूक्ष्म आहे. मनाचा संबंध भावनांशी आहे. भावना हृदयाला स्पर्श करतात आणि काही हृदयस्पर्श आपले जगणे आनंदाचे करतात. अशा हृदयाला स्पर्श करणाऱ्या काही प्रथा आपल्या संस्कृतीत आहेत. उदाहरणादाखल अशा एक-दोन प्रथांबद्दल जाणून घेऊ  या.

औक्षण : औक्षण ही आपल्या प्रत्येकाच्या घरी केली जाणारी प्रथा आहे. वाढदिवस किंवा काही शुभ घटना साजरी करण्यासाठी औक्षण केले जाते. तसेच कोणी लांबच्या प्रवासाला चालले असेल तर (किंवा कोणी दूरच्या प्रवासावरून परतलेले असेल) औक्षण केले जाते. या लेखात खूप खोलवर न जाता औक्षणाच्या आपल्यावर होणाऱ्या स्पर्शासंबंधी बोलत आहोत.

औक्षण शब्दात ‘औक्ष’ (आयुष्य) हा शब्द दडलेला आहे. त्यामुळे या प्रथेचा दीर्घायुष्याच्या कामनेशी संबंध आहे. भाऊबीज, राखीपौर्णिमासारखे सण सोडले तर बहुतेक वेळी आई/आजी मुलांचे औक्षण करते. औक्षण ही एक क्रिया आहे आणि ती करण्यासाठी एका ताम्हणात हळद-कुंकू, अक्षता, तेवते नीरांजन, सुपारी, अंगठी वगैरे गोष्टी असतात. शास्त्रात या क्रियेमागची वेगवेगळी स्पष्टीकरणे असू शकतील पण मला असे वाटते की ही सर्व क्रिया एक सात्त्विकतेचा/शांततेचा स्पर्श दर्शविते. औक्षणाचा पाट मांडला आणि डोक्यावर टोपी घालून मुलगा/मुलगी त्यावर बसला/ली की एक वेगळेच वातावरण तयार होते. समोर आईचा हातात ताम्हण धरलेला शांत पण हसरा चेहरा असतो. मुलाला/मुलीला प्रथम कपाळावर कुंकू लावले जाते, डोक्यावर अक्षता टाकल्या जातात आणि शेवटी निरांजनाने ओवाळले जाते. अक्षता हे दीर्घायुष्याचं तर निरांजनातल्या ज्योतीचं तेज हे ज्ञानाचं/प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं. बऱ्याच ठिकाणी असं दृश्य दिसतं की आईने मुलाच्या/मुलीच्या कपाळावर कुंकू लावलं की त्यांचा उजवा हात स्वत:च्या डोक्यावर जातो आणि त्याचे डोळे आपोआपच बंद होतात. मनाची एकाग्रता होते आणि आईच्या ओवाळण्यातून येणारी ऊर्जा आत घेतली जाते. डोक्यावरच्या हातामुळे स्वत:च्याच मस्तकाला स्पर्श होतो. हा स्थूल स्पर्श आणि ओवाळण्यामुळे झालेला सूक्ष्म हृदयस्पर्श यांचा मिलाफ होऊन मेंदूतून चांगली रासायनिक द्रव्ये स्रवली जातात. (उदाहरणार्थ एंडोर्फिन्स) ही द्रव्ये उत्साहवर्धक, आत्मविश्वास वाढवणारी असतात. सुरक्षिततेची भावना जागवतात. प्रथा छोटीशीच पण हिचा परिणाम हृदयस्पर्शी.

आशीर्वाद : त्यानंतर मुलगा/मुलगी आईला वाकून नमस्कार करतात. तिच्या पायाला स्पर्श करते. त्याच वेळी आईच्या हाताचा स्पर्श मुलांच्या मस्तकावर होतो. हे दोन्हीही स्पर्श किमयागार असतात. एकीकडे आईचा हात मुला/मुलीच्या मस्तकावर असतो आणि तिच्या तोंडातून ‘दीर्घायुषी हो’, ‘कल्याणमस्तु’, ‘शुभं भवतु’ असे सदिच्छादर्शक शब्द निघत असतात. ही हाता-तोंडाची कृती मुलांच्या मस्तकाला आणि हृदयाला स्पर्श करते आणि वर म्हटल्याप्रमाणे मुलांच्या मेंदूतून अनेक उत्साहवर्धक रासायनिक द्रव्ये स्रवली जातात.

जसे औक्षण शब्दात ‘औक्ष’ शब्द आहे तसा आशीर्वाद हा जोडशब्द असून त्यात ‘आशिर + वद (वच)’ असे शब्द आहेत. आशिर म्हणजे संपूर्ण मस्तक (आपण आस्वाद म्हणतो नं तसं.) म्हणजेच, वाकून नमस्कार करणाऱ्या व्यक्तीच्या मस्तकावर वडिलधाऱ्या मंडळींनी हात ठेवून तोंडाने शुभेच्छा देणे म्हणजे आशीर्वाद. पाठीवरून प्रेमाचा हात फिरवून शाबासकीच्या थापेचा स्पर्शही अशीच किमया करतो.

अलीकडेच एक बातमी वाचण्यात आली. ती म्हणजे आजकाल सर्वसाधारण माणूस दिवसातून अंदाजे २४०० वेळा त्याच्या मोबाइल फोनला स्पर्श करतो. ही बातमी वाचत असताना मला एका नाटकातला संवाद आठवला. एका तरुण जोडप्याच्या घरी त्याचे वृद्ध वडील राहात असतात. त्या वडिलांचा मित्र त्या तरुणाला विचारतो, ‘‘तू तुझ्या वडिलांना शेवटचा स्पर्श केव्हा केला होतास?’’ त्याला खरंच ते आठवत नाही. म्हणून जेव्हा एखादा वृद्ध ‘‘कुणी घर देता का, घर?’’ असं विचारत असतो ते अन्न, वस्त्र, निवारा याकरता असेलही कदाचित, परंतु मुख्यत: त्याला विचारायचं असतं की, ‘‘अरे, कुणी मला प्रेमाने स्पर्श करता का, स्पर्श?’’ इतकं आपल्या जीवनात स्पर्शाचं महत्त्व आहे.

स्पर्श ही केवळ शारीरिक पातळीवर होणारी ‘क्रिया’ नाही. तर चार पातळ्यांवर होणारी गोष्ट आहे. कारण आपलं अस्तित्वही चार पातळ्यांवर असतं. शारीरिक पातळीवरचा स्पर्श आपण वर बघितला. पण जेव्हा एखादं गाणं किंवा कविता किंवा कथा आवडते तेव्हा त्या कलेच्या आविष्काराने व पर्यायाने त्या कलाकाराने, आपल्या हृदयाला स्पर्श केलेला असतो; ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचं तर ‘ये हृदयीचे ते हृदयी.’ अशा स्पर्शाला स्थल-कालाचे बंधन नसते. कारण हा मनाच्या पातळीवरचा स्पर्श असतो. त्याहीपेक्षा अजून एक स्पर्श बुद्धीच्या पातळीवर असतो. जेव्हा आपल्याला एखादा थोर विचार पटलेला असतो आणि आपण तो प्रयत्नपूर्वक आत्मसात करतो तेव्हा बुद्धीच्या पातळीवर आपण त्या थोर व्यक्तीशी संबंधच जोडत असतो आणि सर्वात उंच पातळीवरचा स्पर्श हा ‘परतत्त्वाचा’ स्पर्श. ज्ञानेशाची ओवी किंवा तुकारामांचा अभंग ऐकताना आपण शरीर-मन-बुद्धीच्या पातळ्यांवर स्पर्श करत करत त्याहीपलीकडे जातो तो हा स्पर्श.

पण या चारही पातळ्यांवर होणाऱ्या प्रत्येक स्पर्शाची सुरुवात मात्र शारीरिक स्पर्शानेच होते म्हणून त्याचे महत्त्व असाधारण आहे. मग तो स्पर्श नवजात बालकाचा असो की, मित्राच्या खांद्यावर प्रेमाने टाकलेला हात असो. विद्यार्थ्यांच्या पाठीवर शिक्षकाने कौतुकाने मारलेली थाप असो की राम-भरतासारखे दोन भावांमधले आलिंगन असो. काही वेळा माणसाला स्पर्शाची उब हवी असते तर काही वेळा गारवा. नैराश्याने ग्रासलेल्याला जवळीकेच्या स्पर्शाची उब हवी असते तर संतापाने ग्रासलेल्याला स्पर्शाचा गारवा हवा असतो यावरून एक समजते की प्रत्यक्ष स्पर्श जरी शरीराने होत असला तरी त्यामागे वर म्हणलेल्या तीनही पातळ्यावर सूक्ष्म रूपाने अस्तित्वात असतोच.

आपण या जगात राहात असताना त्या जगाशी सतत संबंध येतो (स्पर्श होतो). तो दोन प्रकारचा असतो. पहिला बाहेरून आत, म्हणजे बाह्य़ परिस्थितीचे ज्ञान आत येणे. उदाहरणार्थ-डोळ्यांनी दृश्य पाहणे, कानांनी आवाज ऐकणे इत्यादी. दुसरा स्पर्श आतून बाहेरच्या जगाला प्रतिसाद देणे. उदाहरणार्थ- बोलणे, हाताने काम करणे इत्यादी. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की आपल्याला होणारे सुख-दु:ख हे जगाशी होणाऱ्या आपल्या संबंधांमुळे (स्पर्शामुळे) येते. जगाशी संबंध कसा जोडायचा याची एक युक्ती आहे. ती काय आहे हे एका नेहमीच्या उदाहरणावरून स्पष्ट होईल. आपल्या रोजच्या आयुष्यात इलेक्ट्रिसिटीचा वापर तर अनिवार्य आहे. पण आपण त्या इलेक्ट्रिसिटीशी डायरेक्ट संबंध करायला गेलो तर शॉक बसतो पण तोच संबंध जर आपण आपल्या आणि इलेक्ट्रिसिटीच्यामध्ये इन्सुलेशन वापरून जोडला तर आपण ती सहज वापरू शकतो. मनाचा (आणि त्यावर नियंत्रण करणाऱ्या बुद्धीचा) समतोलपणा हे जगाशी संबंध जोडण्याकरता वापरण्याचे इन्सुलेशन आहे. सुखाने फार हुरळून गेलो नाही तर दु:खानेही फार खचून जायला होणार नाही. तसेच यशाने फार ‘चढून’ गेलो नाही तर अपयशानेही फार ‘खाली’ उतरणार नाही आणि आपल्या आतच असलेला आनंद अबाधित राहील.

health.myright@gmail.com