१) लायटर जर बंद पडला असेल तर दोन तास उन्हात ठेवा.
२) कापसाच्या वाती बनवताना त्यावर किंचित मीठ चोळावे त्याने दिव्याची ज्योत जळते, मात्र कापूस जळत नाही.
३) नेसकॉफी, बोर्नव्हिटा यांच्या बाटल्या फ्रिजमध्ये ठेवाव्या, दगडासारखं घट्ट होत नाही.
४) पेटवण्यापूर्वी मेणबत्त्या फ्रिजमध्ये ठेवल्यास त्या जास्त जळतात.
५) कापूर उडून जाऊ नये म्हणून डबीमध्ये थोडेसे तांदळाचे दाणे घालून ठेवावे म्हणजे कापूर बरेच दिवस टिकतो.
६) कपडय़ाला चुइंगम चिकटले तर कपडा उलथा करून त्यावर गरम इस्त्री फिरवावी म्हणजे चुइंगम सहजपणे निघून येते.
७) चार दिवस गावाला जायचे झाल्यास, झाडांतील कुंडय़ांमध्ये ओला स्पंज ठेवा. म्हणजे झाडे चांगली राहतात.
८) सफरचंदाच्या बिया वाळवून तांदळात घालाव्या म्हणजे तांदळात अळी-पोरकिडे होत नाहीत.
९) लोकरीचे कपडे कपाटात ठेवताना वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवावेत म्हणजे टसर लागत नाही.
१०) शेकायला गरम पाण्याची पिशवी घ्यायची असेल तर पाण्यामध्ये थोडेसे मीठ घालावे म्हणजे पाणी बराच वेळ गरम राहते.
सुनंदा घोलप – sunandaagholap@gmail.com