* दाढ दुखत असल्यास घरचे, साजूक तूप कापसावर लाऊन तो बोळा दाढेत ठेवावा. दाढ दुखायची थांबते.
* डोळे आले असल्यास कापराची पुरचुंडी डोळ्याभोवती सतत फिरवावी. डोळ्यांचा दाह कमी होतो.
* केस शांपूने धुतल्यावर ओल्या नारळाच्या दुधाने केस धुवावेत. त्याने केस मऊ राहतात व केसात कधीही कोंडा होत  नाही.
* पायाच्या बोटात चिखल्या झाल्यास आंघोळ करताना गरम पाण्याची धार (जेवढे सोसले तेवढे) त्यावर सोडावी. त्याने कीड मरते व चिखल्या कमी होतात.
* पायात काटा गेल्यास त्यावर खोबरेल तेलाचा थेंब लावावा. काटा बाहेर येतो.
* रोज कडुलिंबाची १०-१५ कोवळी पाने खाल्यास टॉन्सिल्स वाढत नाही.
* डोळे चिकटत असल्यास ताकाच्या वर जे पाणी येते त्या पाण्याची घडी डोळय़ावर ठेवावी. उष्णता कमी होते.
* तोंड आले असता खायच्या डिंकाचा खडा तोंडात चघळावा म्हणजे ते उतरते.
सुनंदा घोलप -sunandaagholap@gmail.com