माझ्या पिढीच्या अनेकांनी एक गोष्ट नक्की केली असेल- कुठच्या तरी दुकानात ब्लॅन्क कॅसेट देऊन त्यात गाणी भरून घेतली असतील. माझ्या मैत्रिणीने दिलेली एक कॅसेट कुठल्याही दागिन्यापेक्षा मूल्यवान होती. त्याच्यात एका बाजूला नूरजहानची गाणी होती. दुसऱ्या बाजूला कृष्णा हंगलचा केदार होता.. अलीकडे सहज यू टय़ूबवर काही आहे का बघावं म्हणून पाहिलं – आणि काय अद्भुत! मला तो राग केदार मिळाला! हाच तो साक्षात्काराचा क्षण!

‘‘आपण फार उशीर केला या जगात यायला..२५ ते ३० र्वष आधीच यायला हवं होतं..’’ कालपरवापर्यंत मला असं वाटत असे.. आजच्या तंत्राशी, त्याच्या वेगाशी जुळवून घेणं कधी कधी कठीण होतं मला.

PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”

टेलेक्स कसा चालतो मी कधी बघितलं नाही, पण ऐकलं तेव्हा अजब वाटलं होतं. कुठे तरी बसून टाईप केला जात असलेला मजकूर आपल्या मशीनवर उमटणार? फॅक्सची प्रत पहिल्यांदा मशीनमधून बाहेर पडताना पाहिलं तेव्हा म्हटलं ही तर भुताटकी! हे फार मस्त वगैरे असेल पण आपल्याला नको हे! मोबाइल फोन पहिल्यांदा आले तेव्हा वाटलं हा तर कुत्र्याच्या गळ्यातला पट्टा! कुठेही जा- जे तुम्हाला गाठायला बघतायत ते गाठणारच! पूर्वी किती छान होतं- एकदा घराच्या बाहेर पडलं की परत येईपर्यंत आपण मोकळे! इकडचं जग तिकडे का होईना- आपण निवांत!

पूर्वी मला सायन्स फिक्शन वाचायचा खूप नाद होता. कारण त्यातलं जग परीकथेसारखं असायचं. ते वाचताना डोळ्यासमोर एक यांत्रिक पण चकचकीत जग उभं राहायचं. सगळीकडे शांतता, शिस्त, स्पष्टता, सगळे हुशार, कितीही अवघड गोष्ट एकदा सांगून बरोब्बर कळणारे.. कुठे काही चूक नाही.. काही गडबड-गोंधळ नाही. केव्हा तरी दूरच्या भविष्यात असं जग असणार आहे असं वाटत असताना बघता बघता आपल्याच आयुष्यात त्या सगळ्या गोष्टींनी कधी शिरकाव केला ते लक्षातच आलं नाही.

काही लोक स्वत:ला भोवतालच्या गदारोळापासून दूर ठेवू शकतात-  त्यांचं काम आणि त्यांचे विचार हे दोन्ही त्यांना तसं करायची मुभा देतात. चित्रकार गोडसे कधीही फोन वापरत नसत. विजयाबाई मेहतांच्या ‘हयवदन’ नाटकाची रंगावृत्ती तयार होत असताना मी त्यांच्याकडे मदतीला जात असे. वर्ष १९८४. ते राहत माटुंग्याला आणि मी राहत होते दादर टी.टी.ला. आमच्या दोन घरांतलं अंतर

चालत १० मिनिटांचं होतं. पण कामासाठी ते मला माटुंग्याहून पोस्टकार्ड टाकत! ‘‘माझा फोनवर विश्वास नाही!’’ ते म्हणायचे. मला

ते सगळं फार रोमँटिक वाटत असे. आपल्यालाही असं करता यायला हवं.. त्यातला ‘‘मी जगाला जुमानत नाही’’ हा भाव मला फार आवडायचा.. पण मला काही ते शक्य झालं नाही.

‘दिग्दर्शक म्हणून मला ज्या गोष्टी सांगायच्या आहेत, ज्यांच्या गोष्टी सांगायच्या आहेत, त्यांना २५ ते ३० वर्षांपूर्वी एक मोठं प्लेईंग फिल्ड मिळालं असतं..’  हे माझं नेहमीचं स्वप्नरंजन आहे. पण त्याला एक दुसरी बाजूही आहे! स्वप्नांच्या खोलात शिरायचं नसतं, पण काही गोष्टी प्रामाणिकपणे स्वीकाराव्याच लागतात. आज त्या गोष्टी सांगण्यासाठी जे तंत्र उपलब्ध आहे, त्याचं काय? मी जर खरोखरच त्या काळात असते तर मी दिग्दर्शक तरी झाले असते का, हाच प्रश्न आहे. ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट सिनेमाच्या काळात चित्रीकरण करताना कॅमेरामनला प्रत्यक्षात ते दृश्य रंगीत दिसत असे, पण ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईटमध्ये ते रंग उठून कसे दिसतील, ग्रे रंगाची नक्की कुठली शेड दिसेल- याचा विचार करून ते लायटिंग करत असत. एका गप्पांच्या अड्डय़ात ऐकलेली गोष्ट- की ‘प्यासा’मधल्या व्ही. के. मूर्तीनी शूट केलेल्या – ‘‘जिन्हें नाज़्‍ा है हिंद पर वो कहाँ हैं’’ – या गाण्यात ग्रे रंगाच्या शंभरहून अधिक शेड्स आहेत म्हणे! एक झपाटलेपण असल्याशिवाय असं काम होणं शक्य नाही. मग आपण त्या काळात असतो तर केलं असतं का असं काम? हा प्रश्न पडतो आणि उत्तर मिळत नाही.

‘अगं अगं म्हशी’ करत का होईना पण आता मी ही सगळी तंत्र-यंत्रं वापरायला शिकले आहे. त्यातली सोयही मला पटायला लागली आहे. पण ते मान्य करायला मला आवडत नाही. रसिका (ओक) जोशीला गॅजेट्सचा फार शौक होता आणि तिला त्यात गतीदेखील होती. दर काही दिवसांनी ती काही तरी नवीन दाखवायला आणायची आणि मला ते सगळं बघून फार कटकट व्हायची. मी तिला सांगायचे फोन हा दूर ठिकाणी असलेल्या माणसांशी बोलण्याचं साधन आहे आणि मी ते तेवढय़ासाठीच वापरते. पुढे मी ई-मेल करायला शिकले आणि कौतुकाने तिला सांगायला गेले, पण तोपर्यंत ती जीपीएस घेऊन आली होती! मी सांगतेय ती गोष्ट ९ ते १० वर्षांपूर्वीची आहे! स्मार्ट फोन यायच्या आधीच्या काळातली. तेव्हा मी तिला ठणकावलं होतं- मला ई-मेल करता येते आणि मला वाटतं तेवढं पुरेसं आहे. पण चहूबाजूने अंगावर येणाऱ्या या बदलाच्या वेगाची पावलं मला दिसली नव्हती, हेच खरं! कधी तरी मलाही जीपीएसची गरज पडेल आणि तो मला वापरताही येईल याची मी कल्पना केली नव्हती. पण मध्यंतरी एके ठिकाणी अत्यंत चविष्ट बिर्याणी खाल्ली आणि परत ती चाखावी म्हणून दुकान शोधायला लागले. दुकानाचा पत्ता, ते ठिकाण काहीच ओळखीचं नव्हतं, तेव्हा हाच जीपीएस मदतीला धावून आला! गूगलच्या त्या तरुणीचा आवाज ऐकताना मला रसिकाची खूप आठवण आली..

पण परवा एक साक्षात्कार झाला..

माझ्या पिढीच्या अनेकांनी एक गोष्ट नक्की केली असेल- कुठच्या तरी दुकानात ब्लॅन्क कॅसेट देऊन त्यात गाणी भरून घेतली असतील. ‘‘सुबह का इंतज़ार कौन करे, सपना बन साजन आये, झूमती चली हवा, यहाँ बदला वफम का बेवफाई के सिवा क्या है..’’ अशी कित्येक गाणी मिळवण्यासाठी मी जंग जंग पछाडले होते. माझ्या जिवलग मैत्रिणीने- शुभदा रेगेने- दिलेली एक कॅसेट कुठल्याही दागिन्यापेक्षा मूल्यवान होती- त्याच्यात एका बाजूला ‘‘मुझसे पेहली सी मुहब्बत मेरे मेहबूब न मांग’’बरोबर नूरजहानने पाकिस्तानात गायलेली काही गाणी होती. दुसऱ्या बाजूला कृष्णा हंगलचा केदार होता- ‘‘अब कैसी धूम मची है..’’ ती कॅसेट जवळजवळ टेप फाटेपर्यंत मी ऐकली होती. काही तरी निमित्ताने त्या आठवणी जाग्या झाल्या आणि सहज यू टय़ूबवर काही आहे का बघावं म्हणून पाहिलं – आणि काय अद्भुत! मला तो राग केदार मिळाला! हाच तो साक्षात्काराचा क्षण!

लहानपण आणि तरुणपण अशी असंख्य सुंदर गाणी, गाणं, ऐकण्यात गेलं आणि आता जरा आयुष्याचा वेग कमी करावा असं वाटायच्या वयात या सगळ्या गोष्टी ‘हाताशी’ आल्या! घराबाहेर पडलं, काही मनाविरुद्ध घडलं की वाटतं ठीक आहे- घरी गेल्यावर भीमसेन जोशींचा ‘दुर्गा’ ऐकू या. रसिकाची आठवण आली, लगेच तिचे व्हिडीयो पाहिले. या सदरातला प्रत्येक लेख परदेशातल्या मित्र-मैत्रिणी, भाऊ-बहिणी वाचतात..

दैवाची लीला अगाध आहे की त्याने एका बाजूला अनिल विश्वास, सलील चौधरी, नौशाद, जयदेव, सचिन देव बर्मन आणि असे कित्येक-तर दुसऱ्या बाजूला बिमल रॉय, गुरुदत्त, के. असिफ, मेहबूब खान या सगळ्यांना एकाच काळात पृथ्वीवर पाठवलं.. आणि त्या सगळ्यावरचा कळस म्हणजे साक्षात लता मंगेशकर! गदिमा, सुधीर फडके आणि आशा भोसले.. कोण ठरवत असेल की या सगळ्यांनी एकाच काळात या जगात यावं आणि आपल्या आयुष्यात प्रचंड आनंद निर्माण करून जावं? ज्याने त्या मलाही याच काळात इथे पाठवलं, त्याला माझं शतश: नमन!

pamakulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com