संहिता जोशी
अमेरिकेतील न्यायालयाने गर्भपातावर र्निबध आणल्याने आपल्याला काय फरक पडतो? भारतात इतके कठोर र्निबध नाहीत, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. अशा वेळी या घटनेकडे साकल्यानं पाहायला हवं.हाती बहुमत, पैसा आणि सत्ता असलेल्या बलदंड वर्गानं दुबळय़ांवर सत्ता गाजवण्याचंच हे जागतिक पातळीवरचं उदाहरण आहे, हे लक्षात आलं, तर या घटनेचा समस्त स्त्रियांशी असलेला जवळचा संबंध लक्षात येईल..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोनाल्ड ट्रम्प २०१६ मध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले, तेव्हा ते सर्वोच्च न्यायालयात मोठय़ा प्रमाणावर कट्टर सनातनी, रिपब्लिकन न्यायाधीश भरणार आणि त्याचे काय परिणाम होणार, या प्रकारची चर्चा जबाबदार माध्यमांमध्ये सुरू झाली होती. नुकताच, २४ जूनच्या शुक्रवारी अमेरिकी सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला, की गर्भपात हा अमेरिकी नागरिकांचा घटनादत्त अधिकार नाही आणि अमेरिकेतली ५० राज्यं आपापला कायदा करू शकतात. हा निर्णय ही फक्त सुरुवात आहे. यापुढे गर्भनिरोधक आणि समलैंगिकांचे विवाह या दोन्हीवरही गदा येण्याचं सूतोवाच क्लॅरेन्स टॉमस या सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशानं करून झालं आहे.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My body my right us court bans abortion president donald trump amy
First published on: 02-07-2022 at 01:38 IST